वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री दहा वाजता संपणार आहे. त्यानंतर उद्या शहरात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने शहरातील प्रचाराचे बॅनर, पोस्टर आणि फ्लेक्स काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील घोणसरी सती मंदिर येथे मादी बिबटला जेरबंद करण्यात आले आहे. घोणसरी सती मंदिर परिसरात ग्रामस्थांना बिबट दिसून आले होते यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहीती दिली.
वनविभागाचे जलद कृती दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यात मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
मनमाड- येवला मार्गावरील अंकाई शिवारात संध्याकाळच्या सुमारास टँकरने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींना उपचारासाठी तातडीने येवला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर टँकर चालक फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रच लढणार असल्याचं निश्चित झालं.
महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांच्या बैठकीत झाल एकमत
पालकमंत्री प्रकाश आबिटकर , वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह आमदार अमल महाडिक यांच्यात झाली संयुक्त बैठक
बैठकीत तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी
मनमाड-इंदोर या रेल्वे मार्गाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात झालेली असताना अनके घरे,शेतजमिनी अधिग्रहित होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक दृष्टीने अजित पवार गटाला महायुतीमध्ये घेण्यात यावं यासाठी तिघांमध्ये मध्यरात्री चर्चा होणार आहे.
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन झाले.
आम्ही एकदा शब्द दिला की तो पूर्ण करतो...
लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार...
शेतकऱ्यांची योग्यवेळी कर्जमाफी करणार...
नेवासामधील घराणेशाही संपली पाहिजे.. गुंडागर्दी संपली पाहिजे...
नेवासाचा विकास करण्यासाठी महायुतीच पाहिजे...
काही लोक या शहराला आपली मक्तेदारी समजतात, आपली मालकी समजतात...
पण जनता त्यांना जागा दाखवेल...
जे स्वतःला मालक समजत होते, जनतेने त्यांना घरी बसवले...
पालिका निवडणुकीत आपलाच भगवा फडकणार...
मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो...
मी 2022 ला ऑपरेशन केले...
जगातल्या 32 देशांनी पहिलं...
धुळे तालुका पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीविरुद्ध प्रभावी कारवाई करत मोठे यश मिळविले आहे, गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण भागात सातत्याने घरफोडीचे प्रकार करणाऱ्या या टोळीला अटक करून पोलिसांनी एकूण सहा गुन्ह्यांची उकल केली असून सुमारे 15 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे,
भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 आणि 15 मध्ये उद्या मतदान होतं आहे. या दोन जागांसाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग 12 मध्ये 5 तर, प्रभाग 15 मध्ये तीन उमेदवार उभे आहेत. दोन्ही प्रभागात प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत मतदारांना मतदानाचं साकडं घातलं. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनही सज्ज झाला असून 9 मतदान केंद्रावर 45 कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर कलमगाव जवळ दोन बाईक अपघातात नवरा बायको चा मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या सुमारास शहापूर तालुक्यातील कलमगाव जवळ मुंबई नाशिक महामार्गावर दोन बाईकने एकमेकांना समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात कल्याण डोंबिवली येथे रहाणारे अवंतिका रोहन लगडे हे नवरा बायको चा जागीच मृत्यू झाला आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात झालेली आहे.
भाजपकडून फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्मुला सांगण्यात आलेला आहे
भाजपकडून मंत्री अतुल सावे, आमदार संजय केनेकर, शहर जिल्हा प्रमुख किशोर शितोळे बैठकीला आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने आज ' मिशन कोल्हापूर महानगरपालिका' मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना लढवत आहे.
अजित पवार केवळ मिरज इथल्या एकाच कार्यक्रमाला हजेरी लावून मुंबईला रवाना होणार
मिरज आणि सांगलीतले इतर कार्यक्रम अचित पवारांनी केले रद्द
सहानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांची बैठक
बनावट कागदपत्रं दाखवून शासकीय कोट्यातली सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आज हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उद्या मतदान होणार आहे.
मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील 31 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून यासाठी 250 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवेढा शहरात 28 हजार 634 मतदार उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दहा प्रभागातून 20 नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
ठाकरे गटा कडून सलग 25 वर्ष नगरसेवक राहिलेले ठाकरे गटाचे जेष्ठ नेते प्रशांत वानखडे यांचा युवा स्वाभिमान संघटनेत पक्ष प्रवेश
आमदार रवी राणा यांचे उपस्थितीत प्रशांत वानखडे यांचा युवा स्वाभिमान संघटनेत पक्षप्रवेश केला
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाऊ नये, असा स्पष्ट निकाल दिला असताना राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर महानगरपालिकेत ५३ टक्के आरक्षण कायम ठेवून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या विरोधाभासी स्थितीमुळे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचे भविष्य धोक्यात आले आहे. निवडणूक झाल्यानंतर जर सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांवरील आरक्षण बेकायदेशीर ठरवले आणि संबंधित प्रभागांच्या निवडणुका रद्द केल्या, तर उमेदवारांना होणारे आर्थिक, मानसिक आणि वेळेचे नुकसान कोण भरून देईल, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करीत माजी नगरसेवक संजय गुणवंतराव वैद्य यांनी वकिलामार्फत थेट महानगरपालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. चंद्रपुरात आरक्षण 53 टक्क्यांपर्यंत नेण्यात आले आहे.
भाजप जिल्हा महामंत्री संदीप तिवारी व अन्य भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलेली भाजपाची साथ
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीच्या निकाल अनुषंगाने कोणत्याही अनुचित घटना घडू नये, याच अनुषंगाने बुलढाण्यातील कारंजा चौकात बुलढाणा उपविभागीय अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोक ड्रिल आणि रूट मार्च काढण्यात आला.. यावेळी नगरपालिका मतमोजणीचे अनुषंगाने पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली आहे.. यामध्ये दंगा काबू पथकासह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची रंगीत तालीम सुद्धा घेण्यात आली आहे.. यावेळी बुलढाणा शहरात रूट मार्च सुद्धा काढण्यात आला आहे.. आगामी मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले आहे..
भाजप जिल्हा महामंत्री संदीप तिवारी व अन्य भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलेली भाजपाची साथ
संदीप तिवारी आणि समर्थक मोठ्या संख्येने मातोश्रीवर पक्ष प्रवेश करण्याकरिता दाखल
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणारा पक्षप्रवेश
- बुटीबोरी येथील अवाडा कंपनीत निर्माणाधिन टाकी कोसळली
- या अपघातात काही कामगार जखमी झाल्याची माहिती
- अवाडा ही सोलर पॅनल निर्मितीची कंपनी आहे
- नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील बुटीबोरी येथील नवीन एम आयडिसी परिसरात या कंपनीचे निर्माणाधिन कार्य सुरू आहे
महाविकास आघाडीची पहिली यादी 23 तारखेला जाहीर होण्याची शक्यता. काँग्रेस 80 जागांवर ती दावा करणार. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वांना समान न्याय देणार असल्याची माहिती अरविंद शिंदे. मनसे बाबत कुठलीही चर्चा आम्ही केली नाही आमची आघाडी ही शिवसेना ठाकरेंशी आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याने भाजपला सत्तेवर येऊ देणार नसल्याचा निश्चय आघाडीने केल्याचं रमेश बागवे यांनी सांगितलं. उद्या पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होईल त्यावर कुणाला किती जागा हे निश्चित होईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांना बदलण्यात याव आरोपीचा कोर्टात अर्ज.
सुदर्शन घुले आणि प्रत्येक घुले चा कोर्टात या दोन आरोपींचा कोर्टात अर्ज.
सरकारी वकील हे राजकीय पक्षाशी निगडित असल्याने सुनावणी वर परिणाम अर्जात उल्लेख.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी निगडित असून या प्रक्रिये वरती परिणाम होत असून तात्काळ बदलण्यात याव आरोपींकडून अर्ज करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी आहे यांनी सुनावणी दरम्यान अर्ज दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम हा आता अंतिम टप्प्यात आला असून उद्या देऊळगाव राजा नगरपरिषदेसह जळगाव जामोद येथील तीन खामगाव येथील चार व शेगाव येथील दोन प्रभागातही मतदान होणार आहे. यासाठी आज मतदान यंत्र घेऊन कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. तर या निवडणुकीसाठी प्रचारही अंतिम टप्प्यात आला आहे. देऊळगाव राजा नगर परिषदेचे अध्यक्ष पदासाठी साठी तीन तर नगरसेवक पदासाठी 77 एकूण असे एकूण 80 उमेदवार नशीब आजमावत आहेत. देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक महत्त्वाची असून यात विद्यमान आ.मनोज कायंदे,माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे व माजी आ.शशिकांत खेडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे....
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख खात्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयात हजर.
आरोपींचे वकील विकास खाडे अनंत तिडके राहुल मुंडे आदी न्यायालयात हजर.
सरकारी पक्षाकडून विशेष सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे न्यायालयात हजर.
आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयात हजर.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला प्रत्यक्षात सुरुवात बीडच्या विशेष मकोका पाटवदकर यांच्या न्यायालयासमोर सुनावणी सुरू.
सगळ्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक
बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित
सुनील तटकरे जाणून घेणार राज्यातील महापालिकांचा आढावा
पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहराध्यक्ष सुनील टिंगरे राहणार उपस्थित
पुणे शहरातील इच्छुकांची प्रारूप यादी राष्ट्रवादीकडून तयार
४४१ इच्छुक उमेदवारांच्या प्रारूप यादीवर सुद्धा होणार चाचपणी
- एकीकडे आघाडीची चर्चा होत असताना, कॅाग्रेसने सर्व 151 जागांवर मुलाखती सुरु केल्या
- निरीक्षक रणजित कांबळे,शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात इच्छूक उमेदवाराच्या मुलाखती
- आज आणि उद्या दोन दिवस चालणार कॅाग्रेसच्या मुलाखती
- नागपूरात कॅाग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू मात्र आघाडी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष
- 151 जागांसाठी एक हजारापेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांचे अर्ज
- 18 वर्षानंतर नागपूर मनपा मध्ये सत्ता स्थापन करण्याचे काँग्रेस समोर आव्हान
गेल्या दोन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. या अतिदुर्गम भागात कडाक्याची थंडी पसरली असून, अनेक ठिकाणी दवबिंदू गोठत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विशेषतः मोलगी परिसरातील डाब आणि वालंबा भागात थंडीचा जोर सर्वाधिक आहे. आज सकाळी या भागात भाताच्या चाऱ्यावर साचलेले दवबिंदू गोठल्याने सर्वत्र पांढरीशुभ्र बर्फाची चादर पसरल्याचा पाहायला मिळाले निसर्गाचे हे विलोभनीय रूप पाहण्यासारखे असले, तरी हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी स्थानिक नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांचा सहारा घेताना दिसत आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज इच्छुकांच्या मुलाखती
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार
पुणे महापालिका भाजप आणि शिंदे सेना युती मध्ये लढण्याचा निर्णय झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार का हे पाहणं महत्त्वाचं
संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत गेल्या चार वर्षांपासून विज्ञान, गणित व इंग्रजी या अत्यंत महत्त्वाच्या विषयांचे शिक्षकच उपलब्ध नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. परीक्षेच्या तोंडावर मूलभूत विषयांचे अध्यापन होत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या शाळेत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून खासगी शिकवणी परवडणारी नसल्यामुळे ते पूर्णपणे शाळेतील अध्यापनावर अवलंबून आहेत. मात्र शिक्षक नसल्याने अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
- कोकाटेंच्या विरोधातील याचिकाकर्ते अंजली दिघोळे राठोड आणि आशुतोष राठोड आज उच्च न्यायालयात राहणार उपस्थित
- उच्च न्यायालयात देखील कोकाटेंच्या याचिकेला देणार आव्हान
- राठोड दांपत्य उच्च न्यायालयात करणार युक्तिवाद
- नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील निकाल कायम रहावा, यासाठी मांडणार बाजू
- नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना सुनावलीय दोन वर्षांची शिक्षा
- उच्च न्यायालयात देखील न्याय मिळेल, याचिकाकर्ते आशुतोष राठोड
- कोकाटेंच्या अटकेचा फार्स करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न, राठोड यांचा आरोप
- नाशिकच्या राजकारणातून मोठी बातमी
- सर्व 122 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाजपच्या स्थानिक नेत्यांची इच्छा
- शहराध्यक्षांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा भाजप पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात आला अहवाल
- 122 जागांसाठी भाजपकडे जवळपास 1100 इच्छुक उमेदवार
मुलाकडून वृद्ध आई-वडिलांचा निर्घृण खून
खून करून संशयित मुलगा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
हुपरी इथल्या महावीर नगर परिसरात पहाटे सव्वापाचच्या सुमारास घटना
मुलाच्या हल्ल्यात विजयमाला भोसले (७०) आणि नारायण भोसले (७८) यांचा जागीच मृत्यू
मुलगा सुनिल भोसले (४८) पोलिसांच्या ताब्यात
फॉरेन्सिक पथक घटनास्थळी, तपास सुरू
- तर विदर्भात सर्वात निच्चांकी तापमान गोंदियाचे, गोंदियात आज 8 अंश सेल्सियस तापमान
- गोंदिया नंतर अमरावतीचे तापमान 9.8 अंश सेल्सियस
- उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड हवेमुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्याचे तापमान 12 अंशांच्या खाली
- पुढील आणखी काही दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगड हंगाम सुरू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ बिबवणे येथे स्थानिक व्यावसायिकांनी कलिंगड विक्री सुरू केली आहे. सध्या सिंधुदुर्गसह गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने कलिंगडचा आस्वाद घेण्यासाठी वाहनधारक आवर्जून थांबत आहेत.
गेल्या आठवड्या पासून यंदाच्या हंगामाला सुरुवात झाली असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ा पर्यंत सिंधुदुर्गात कलिंगड उपलब्ध होणार आहेत. सध्या 30 ते 35 रूपये किलोचा भाव असून काही दिवसात अजून मोठ्याप्रमाणात कलिंगड विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उर्वरित दोन जागांसाठी तर तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये पाच जागांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाच्या वतीने दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या एकूण २७ जागांपैकी यापूर्वीच तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित २२ जागांसाठी दोन डिसेंबर महिन्यात मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. मात्र, दोन प्रभागांतील जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली होती. तर तळेगाव दाभाडे मध्ये 27 जागांसाठी निवडणूक होणार होती त्यामध्ये 19 नगरसेवक बिनविरोध झाले. त्यापैकी तीन जागांसाठी दोन तारखेला निवडणूक संपन्न झाली. तर उद्या पाच उर्वरित जागसाठी मतदान होणार आहे..
इचलकरंजी महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीत जागा वाटपाबाबत एकमत नाही
मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार प्रकाश आवाडे यांची झाली बैठक
काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा झाला निर्णय
भाजपकडून दिल्या जाणाऱ्या जागांचा ताळमेळ बसत नसल्याने गुंता वाढला
धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली नोंदविला गेला आहे, धुळ्यात आज तापमानाचा पारा 5.6°c वर आहे, वाढत्या थंडीमुळे धुळेकर नागरिक चांगलेच गारठले असून, थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत गरम व उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे,
हवेमध्ये वाढलेला प्रचंड गारवा यामुळे धुळेकरांना वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे, यापुढे देखील थंडीचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे, त्यामुळे पुढील काळात देखील अशाच प्रकारे धुळेकरांना थंडीचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज आहे.
- निफाडचा पारा ५.४ अंश सेल्सिअसवर
- वाढत्या थंडीचा गहू हरभरा पिकाला होणार फायदा
- तर द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता
० पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा
० खोपोली एक्सिट पर्यंत पोहोचल्या रांगा
० वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महामार्ग पोलिसांचे प्रयत्न
० पोलिसांकडून ब्लॉक घेण्यास सुरुवात
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी आज बीडच्या मकोका न्यायालयामध्ये होणार आहे.आरोपी वाल्मीक कराडचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पहिलीच सुनावणी आज होत आहे. आणि या सुनावणी मध्ये आता प्रकरण चार्ज फ्रेम होणार असून प्रकरणाला प्रत्यक्षात साक्षी पुराव्याला सुरुवात होणार आहे.ही महत्त्वपूर्ण सुनावणी असून आज या प्रकरणाला अर्थात साक्षीदार त्याचबरोबर गोपनीय जबाब तपासी अधिकाऱ्यांची जबाब या सर्व बाबींना आज पासून सुरुवात होणार आहे प्रकरण चार्ज फ्रेम होऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांचा पाढा आता न्यायालयामध्ये वाचला जाणार आहे.म्हणून या सुनावणीला विशेष महत्त्व आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद करणार असून त्यांचं काम विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे स्वतः न्यायालयामध्ये हजर राहून काम पाहणार आहेत.
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य तस्करीविरोधात दोन स्वतंत्र कारवाया करत मोठा साठा जप्त केला.
उरुळी कांचन आणि भोर तालुक्यात सापळा रचून एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली.
या कारवाईत चारचाकी, ट्रकसह सुमारे ४८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. .
‘कोणार्क रिवा’ आणि ‘एल्कोन सिल्व्हर लीफ’ सोसायटीच्या पार्किंग परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच वन विभाग व बचाव पथकाने तपासणी सुरू केली.
बिबट्या सापडला नसला, तरी पाण्याच्या टाकीजवळ त्याचे पायांचे ठसे आढळले. नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
पुणे बुक फेस्टिव्हलला मंत्री उदय सामंत आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावली हजेरी…
१३ डिसेंबर पासून सुरू झालेला पुस्तक महोत्सव अंतिम टप्प्यात आहे
त्याच वेळी दोन्ही मंत्र्यांनी उपस्थिती लावून महोत्सवाचे कौतुक केले आहे…
यंदा महोत्सव १०० कोटींचा उलाढाल करेल अशी भावना उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे
आगामी मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, या महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी ( शरद पवार ) शिवसेना ( ठाकरे गट ) बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सेक्युलर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा समावेश,महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरणार असून,या आघाडीत मात्र माजी आमदार आसिफ शेख व समाजावादी पार्टीला मात्र वगळण्यात आले आहे.तर इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीने आपल्या १२ उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे.
शहरातील बाणेर परिसरात पुणे महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधात कारवाई
बाणेर, पाषाण परिसरात पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर हातोडा
अनधिकृत हॉटेल्स, पत्र्याचे शेड आणि पक्के बांधकाम देखील महानगरपालिकेने केली जमीन दोस्त
एकूण 19850 चौ. फूट अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडले
अनेकदा नोटीस देऊन देखील अनधिकृत बांधकाम न हटवल्याने पुणे महापालिकेने केली कारवाई
राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती म्हणूनच लढतील,असा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे. त्यानुसार पुण्यात आम्ही युती म्हणून एकत्र लढू. गुरुवारी शिवसेनेशी प्राथमिक चर्चा झाली. पुढील टप्प्यात आणखी बैठका घेऊन युतीला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांची युती होण्याची शक्यता आहे...कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी अमरावती महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती येथील शिवसेना भवन राजापेठ येथे दिली सदिच्छा भेट .शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख पराग गुडधे व राजू उंबरकर यांच्यात अमरावती महानगर पालिका निवडणुकी करिता झाली प्राथमिक चर्चा झाली, यावेळी उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी मनसे नेते राजू उंबरकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत. शिवसेना पदाधिकारी व मनसे पदाधिकारी यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात झाली चर्चा. यावेळी मनसे शहर प्रमुख धीरज तायडे ,मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष शरयू पाजणकर उपस्थित होते,
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांनी वाटाघाटींना सुरुवात केली आहे. महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेतील चर्चेनंतर आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नेत्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली आहे. एकीकडे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना, दुसरीकडे सहकारी मित्र पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा वेगाने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या विभागीय कार्यालयात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
आज महायुतीतील भाजप आणि सेनेच्या नेत्यांची बैठक आज काही जागांवरती सेनेकडून प्रस्ताव दिला जाणार
गणेश बिडकर, धीरज घाटे ,नाना भानगिरे यांच्यामध्ये होणार बैठक
22 तारखेला पहिली यादी जाहीर केली जाणार
शिवसेनेला 25 ते 30 जागा भाजपकडून दिल्या जाण्याची शक्यता
शिवसेनेने दिला आहे 35 ते 40 जागेचा प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पूर्णतः रद्द करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच निवडणुकीच्या काळात कोणालाही सुट्ट्या घेता येणार नाहीत असे प्रशासकानी सांगितले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात सर्व विभागप्रमुखांसाठी त्यांनी परिपत्रक काढले. निवडणूक होईपर्यंत आता कोणालाही सुट्या घेता येणार नाहीत. महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण संपेपर्यंत आणि नव्याने परिपत्रक निघेपर्यंत कोणालाही सुट्ट्या घेता येणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूकीसाठी नऊ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय राहणार आहे. प्रत्येक कार्यालयाला निवडणूक साहित्य उपलब्ध करून द्यावे असे निर्देश गुरुवारी एका बैठकीत प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले.
यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असल्याने उमेदवारांकडे प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. प्रमुख पक्षांनी शहरात रॅली काढून काॅर्नर सभा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले, निवडणुकीच्या प्रचार तोफा आज रात्री दहा वाजता थंडावणार आहे. यामुळे उमेदवारी यांनी आता डोअर टू डोअर जाऊन मतदारांच्या भेटीसाठी घेणे सुरू केले आहे. यवतमाळ पालिकेत नगराध्यक्ष आणि 58 नगरसेवक पदासाठी निवडणूक होत आहे शहरात एकूण 2 लाख 32 हजार 315 मतदार आहेत मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग 248 मतदान केंद्र तयार केली आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी तापमानाचा पारा हा दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेलेला जाणवला. सकाळपासून थंडीचा गारठा वाढल्यामुळे रस्ते कल्याण मध्ये शेकोटा पेटलाच दिसत आहे. मागच्या आठवड्यात अचानक थंडीचा कडाका वाढला होता. त्यानंतर पुन्हा थंडी कमी झाली होती. आज पुन्हा वाढ होऊन आज सकाळपासून थंडी अधिक जाणवू लागली आहे. पुढील काही दिवस अशीच थंडी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
- नागपूर शिवसेना शिंदे गटाकडून ५० ते ६० जागांची भाजपकडे मागणी
- तर भाजप पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा आग्रह
- वरिष्ठ नेत्यांनी दिले महायुतीचे संकते, पण स्थानिक नेत्यांचा संवाद नाही
- २०१७ च्या निवडणुकीत भाजप १०८ तर शिवसेनेला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या
- त्यामुळे भाजप या निवडणुकीत दोन आकडी जागांपेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही
निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार यवतमाळ नगरपरिषद, वणी- दिग्रस तसेच पांढरकवडा नगरपरिषद साठी उद्या 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क निर्विघ्नपणे बजावता यावा यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सुट्टी जाहीर केली असून यवतमाळ पालिकेत सर्वच प्रभागत मतदान होताहेत तर दिग्रस येथे तीन प्रभाग तर पांढरकवडा दोन आणि वणी येथे एक असे तीन पालिकेतील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
मुरुड समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. मुरुड बीचवर स्टंटबाजी खपवून घेतली जाणार नाही. समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी असताना नियम मोडणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याच्या कडक कलमांखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत वाहन प्रवेश रोखण्यासाठी प्रमुख मार्गांवर बॅरिकेट्स बसवण्यात आले असून, गर्दीच्या वेळेत कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पर्यटकांनी नियम पाळून मुरुड बीचची सुरक्षितता आणि शांतता राखावी, असे आवाहनही पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजप कडून स्वबळावर लढवण्याची संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप निवडणूक प्रमुख आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्यात एक तास चर्चा
माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतरच माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासंदर्भात नाशिक पोलीस निर्णय घेणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.