Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: वसुबारसच्या निमित्ताने रायगडमध्ये गाय आणि वासराच्या पुजनाला माहिलांची गर्दी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, राज्यात आज पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

वसुबारसच्या निमित्ताने रायगडमध्ये गाय आणि वासराच्या पुजनाला माहिलांची गर्दी

आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. आज गाय आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. रायगड जिल्ह्यात या निमित्ताने ठिकठिकाणी गाय आणि वासराची पूजा करण्यात आली. महाड शहरात चैतन्य सेवा प्रतिष्ठान तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आणि महिकावती देवस्थान तर्फे महिकावती मंदिर येथे वसुबारस निमित्ताने गाय आणि वासराच्या पुजनाचे आयोजन करण्यात आलं. चारा, दिवाळी फराळाचा नैवेद्य दाखवत भाविकांनी गाय वासराच्या पुजनाचा लाभ घेतला.

 earthquake : अफगाणिस्तान-ताजिकिस्तान बॉर्डरवर भूकंप

अफगाणिस्तान-ताजिकिस्तान बॉर्डरवर भूकंप झाला. अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या बॉर्डरवर ५.६६ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकत्र गाडीतून प्रवास

मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंनी एकत्र गाडीतून प्रवास केला. तर या दिपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले.

दादरमध्ये बाळासाहेबांसोबत ठाकरे बंधूंचा फोटो बॅनरवर

दादर शिवाजी पार्क परिसरातील हॉटेल भारत लाईट कॅफेच्या भिंतीवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोटोचा बॅनर लावण्यात आला आहे.

भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे शासकीय इतमामांत करण्यात आले अंत्यसंस्कार...

अंत्यसंस्काराला भाजपाचे विधानपरिषद सभापती, मंत्री राधाकृष्ण विखे, पंकजामुंडे यांच्यासह आमदार होतें उपस्थितीत....

पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पडले पार तर तीन फेऱ्यांच्या फायरने त्यांना मानवंदना देण्यात आली....

राजकीय, सामाजिक नेत्यांच्या उपस्थितीत वातावरण झाले अश्रुपूर्ण.

बुऱ्हाणनगर परिसरातील नागरिकांसह शहर जिल्हा आणि महाराष्ट्रातून कर्डीले कुटूंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी शेकडोची गर्दी....

मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांचे मंचावर आगमन.

बीडमध्ये आज ओबीसींचा महा एल्गार मेळावा होत आहे आणि या मेळाव्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली असून हा मेळावा हा पक्षाचा पुरस्करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता आणि याच आरोपाला आता समीर भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिला आहे

यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काळी दिवाळी

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा,50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र राज्य सरकारने मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष यांनी केलाय. यावेळी राष्ट्रवादी पवार गटाकडून काळी दिवाळी साजरी करण्यात आली. सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आज एकत्र दिसणार

मनसेकडून दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो मात्र ह्यावर्षी दीपोत्सला महत्त्व प्राप्त होणार आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दीपोत्सव च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत

दीपोत्सव निमित्ताने तयारी सुरू करण्यात आली आहे

शिवाजीराव कर्डिले यांच्या अंत्यविधीसाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती

अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा अंत्यविधी आज शुक्रवारी सायंकाळी बुऱ्हाणनगर येथे होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकंमत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार रावल यांच्यासह अनेक मंत्री, आमदार विविध पक्षांचे पदाधिकारी दर्शन घेत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर सायंकाळी पाच वाजता आगमन होणार आहे.

Beed : बीड मधील मेळावा हा पक्षाचा नसून ओबीसी समाजाचा आहे समीर भुजबळ यांचं मनोज जरांगे यांना उत्तर.

बीड मधील मेळावा हा पक्षाचा नसून ओबीसी समाजाचा आहे समीर भुजबळ यांचं मनोज जरांगे यांना उत्तर.

ओबीसी समाजाचे न्याय हक्कासाठी छगन भुजबळ हे लढत आहेत आणि ते इथून पुढेही लढणार आहेत समीर भुजबळ.

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आणि जर कोणी त्यांचा हिसकून घेत असेल तर आम्ही गप्प करायचं असं सव्वालाही यावेळी समीर भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नी लता शिंदे यांच्या समवेत दरे गावात वसुबारस साजरी केली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नी लता शिंदे यांच्या समवेत दरे गावात वसुबारस साजरी केली. आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस याच दिवशी प्रत्येक कुटुंब गायीची मनोभावे पूजा करतात हिंदु धर्मात गायीला खूप मोठं महत्व दिल जात यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नी त्यांच्या दरे गावातील गायींच्या गोठ्यात गायीचे औक्षण करुन नैवैद्य भरविला आला..

Shivsena : उद्या पश्चिम महाराष्ट्राची शिवसेना शिंदे गटाची बैठक

उद्या पश्चिम महाराष्ट्राची शिवसेना शिंदे गटाची बैठक

मुंबईमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर होणार बैठक

श्रीकांत शिंदे,गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत होणार बैठक

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना बैठकीसाठी बोलावले

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक होणार

Nashik : ट्रकच्या पुढील चाका खाली सापडून एक व्यक्तीचा मृत्यू,संतप्त नागरीकांचा रास्ता रोकोचा प्रयत्न

नाशिकच्या मालेगाव मधिल कुसूंबा रस्त्यावर एका अवजवड वाहनाच्या पुढच्या चाका खाली सापडून द्याने येथिल शंकर अहिरे या व्यक्तीचा मृत्यू झालाय,टायर खाली सापडल्याने त्याच्या शरीराचे अक्षरशा दोन तुकडे झाले.या मुळे परिसरातील नागरीकांनी संतप्त होत रास्ता रोको चा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेत संतप्त नागरीकांची समजूत काढत सर्व नागरीकांना तेथून जाण्यास सांगत मृत देह शासकीय रुग्णालयात पाठविला.

Dombivli : डोंबिवलीत धक्कादायक दुर्घटना, पूजा करताना महिलेचा होरपळून मृत्यू

नवरात्रौत्सवाच्या अष्टमीला होम कुंडात तुपाची आहुती देत असताना स्कार्प ने पेट घेतल्याने डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या टिळकनगर परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Nashik : बसूबारस निमित्ताने शेतक-यांनी केली गो धनाची पूजा

प्रकाशाचा व उत्सवाचा सण असलेल्या दिपावलीचा आज पहिला दिवस.वसूबारसने सुरुवात होत असते. त्या निमित्ताने नाशिकच्या येवल्यातील शेतकरी कुटूंबाने आपल्या गोधनाची पूजा करत दिपावली सणाला सुरुवात केलीय. गाय वासरांना अंघोळ घालत परंपरेनुसार त्यांची पूजा करण्यात येऊन,शेतक-यांवर व त्यांच्या गोधनावर आलेले संकट दूर कर अशी प्रार्थना करत बसू बारसचा सण साजरा केला.

Buldhana : सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या प्रयत्न विरोधात भीम आर्मीचा मोर्चा..

सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या प्रयत्न

हल्याच्या विरोधात भीम आर्मीचा मोर्चा..

आरोपीवर देशद्रोहाच गुन्हा दाखल करा...

Jalna : जालन्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काळी दिवाळी साजरी

जालन्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काळी दिवाळी साजरी..

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासह 50 हजार रुपये हेक्टरी मध्ये द्यावी - राजेश टोपे यांची मागणी..

Pune : निलेश गायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या "त्या" एजंटची चौकशी होणार

आमिरउल्ला हबीबुल्ला चौधरी असे या एजंट चे नाव असून त्यावर ५ गुन्हा दाखल आहेत

निलेश ला पासपोर्ट मिळवण्यासाठी सहकार्य केल्याप्रकरणी चौधरी ची चौकशी होणार

चौधरी एका गुन्ह्यात सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारे कागदपत्र, प्रतिज्ञापत्र हे मिळून देण्यासाठी चौधरी ने मदत केली असल्याचा पोलिसांना संशय

Nanded: शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि पोलिसांमध्ये झटापट

शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि पोलिसांमध्ये झटापट.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा.

मोर्चाच्या समारोपानंतर रविकांत तुपकर जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना पोलीस आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची.

रविकांत तुपकर आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर अडवल्याने रविकांत तुपकर आणि पोलिसांमध्ये वाद.

सरकारच्या मदतीने बियाण्यांचा खर्चही निघत नाही -बच्चू कडू

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आज चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. पक्ष कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी 28 ऑक्टोबरच्या मोर्चाबाबत माहिती घेतली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी पॅकेजवर कडू यांनी टीका केली. तोकड्या मदतीने शेतकऱ्यांच्या शेतातील बियाण्याचा खर्चही भागणार नसल्याचा दावा त्यांनी केला. मोठमोठ्या कंपन्यांना हजारो कोटी रुपये माफ करणाऱ्या सरकारजवळ शेतकऱ्यांसाठी पैसे नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्ष नेते असतानाचे देवेंद्र फडणवीस खरे की आताचे, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा टोला कडू यांनी लगावला.

Beed: माजी मंत्री धनंजय मुंडे परळीहून बीडकडे रवाना

बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होत आहे आणि या मेळाव्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार आहेत ते परळी येथून बीड कडे रवाना झाले आहेत.

Nandurbar: सातपुडा परिसरात पावसाला सुरुवात

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात पावसाला सुरुवात....

सातपुड्यातील अक्राणी , धडगाव आणि मोलगी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस...

अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीचा खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांची धावपळ....

Pune: गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा

पुण्यातील कोथरूड परिसरात झालेल्या गोळीबा प्रकरणी फरार निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांवर सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडिया वर निलेश घायवळ याच्या नावाने असलेल्या अकाउंट वरून त्याने आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांनी गुन्हेगारी चे उद्दतीकरण होत असलेले व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pune: पूरग्रस्तांसाठी पुणेकरांचा 'आपुलकीचा' दीप!

एका बाजूला दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचत असताना, दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातील पूरग्रस्तांवर कोसळलेल्या संकटाची दाहकता लक्षात घेत ,पुण्यातील बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांनी माणुसकीच्या नात्यातून एक अनमोल पुढाकार घेतला आहे. ​भाजपचे युवा नेते,मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'आपुलकीची दिवाळी' हा कार्यक्रम आज घेतला जातोय.

Dharashiv : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साजरी केली काळी दिवाळी

:राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत काळी दिवाळी साजरी करण्यात आली. अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी मोठे पॅकेजची घोषणा केली पण दिवाळी एक दिवसावर आली असली तरी अद्याप पर्यंत कुठलीच मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने ही दिवाळी काळी दिवाळी असून ही जिल्हा प्रशासनाच्या समोरच आम्ही साजरी करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेटवरच हे आंदोलन केले

Solapur: बार्शीतील साईराणानगरमध्ये भीषण आग; १२ लाखांचे नुकसान

बार्शी शहरातील साईराणानगर परिसरात स्क्रॅप व्यवसायिक अमर राम गजघाटे यांच्या कारखान्याला भीषण आग लागली.प्राथमिक अंदाजानुसार एमएसईबीच्या तारा तुटून पडल्यामुळे शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली. यामुळे कारखान्यातील ग्रॅंडिंग मशीन, मोटर,वजनकाटा आणि सुमारे ३२ टन प्लास्टिक साहित्य जळून खाक झाले, एकूण १२ लाख रुपयांचे नुकसान झाले.

घटनेनंतर बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, विद्युत निरीक्षक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी तपासणीसाठी पोहोचले आहेत. रहिवाश्यांनी एमएसईबीच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे.प्रशासनाने आता सर्व औद्योगिक परिसरांचे फायर सेफ्टी ऑडिट आणि तारा तपासणी मोहीम राबवावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

भुजबळ यांच्या वक्तव्यावर अॅड. योगेश केदारांचा पलटवार

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी “मराठ्यांना माझा इतिहास कदाचित माहिती नाही” असे वक्तव्य करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अॅड. योगेश केदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अॅड. केदार म्हणाले, “भुजबळ यांनी मराठ्यांविषयी केलेलं विधान हास्यास्पद आहे. मंडल आयोगाच्या काळात कमंडलवाल्यांच्या बाजूने उभे राहून रस्त्यावर गोमूत्र शिंपडणारे आज ओबीसींचे मसिहा बनण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा इतिहास आम्हाला चांगलाच माहिती आहे.”

राजकीय क्षेत्रात भुजबळ यांच्या वक्तव्यावर आणि केदारांच्या प्रतिक्रियेनंतर नव्या वादळाची चिन्हं दिसत आहेत.

Dhule: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते धुळ्यात आक्रमक

भाजपचे धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या समोर काळया फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर राज्य सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी

शेतकऱ्यांची ही काळी दिवाळी असल्याच म्हणत राज्य सरकारने तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली असून

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी मागणी यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली आहे

राज्य सरकारने जर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारला दिला आहे

Amravati: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मुख्यमंत्री सहायता निधीस पाच लाखांचा धनादेश..

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्यें पाच लाख रुपयांचा धनादेश अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या संकट काळात बाजार समितीने दाखवलेली ही सामाजिक जबाबदारी कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कर्मचारी देखील यावेळी एक दिवसाचा पगार या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिला.

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासन आणि विविध संस्था मदतीचा हात पुढे करीत आहेत. अशा वेळी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेली ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणारी आहे

Gokul Milk: गोकुळ दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ

हसन मुश्रीफ

गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये एक रुपयाची दरवाढ 1 ऑक्टोबर बसून करण्याचा निर्णय घेतला याबद्दल मी संचालकांचा अभिनंदन करतो

डीबेंचर प्रश्नावरून मत मतांतर झालेले आहे

ज्याने 32 वर्षे संघाचे नेतृत्व केलं ज्याने डीबेंचरची पद्धत सुरू केली त्यांच्या सुनबाईंनी या मोर्चाचे नेतृत्व केलं

आणि त्यांचे नेतृत्व केलं ते पराभूत झालेले तीन संचालक

एखाद्या शेतकऱ्याने येऊन व्यथा मांडल्या तर आम्ही समजू शकतो

ज्याने पाच वर्षे सत्ता भोगली त्या त्यावेळी डीबेंचर बदल हीच भूमिका मांडली तेच लोक आता विरोध करत आहेत

Nandurbar: दिवाळी सणानिमित्ताने नंदुरबारच्या बाजारपेठा सजल्या...

दिवाळी सणानिमित्ताने नंदुरबार शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बाजारात विविध आकर्षक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. यंदा बाजारात विविधरंगी आणि नक्षीदार आकाश कंदील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तसेच, घराला आकर्षक रूप देण्यासाठी लागणाऱ्या रांगोळ्या आणि रांगोळीचे रंग विकणाऱ्या स्टॉल्सवर महिलांची गर्दी दिसत आहे.यासोबतच पारंपरिक पद्धतीने बनवलेले मातीचे दिवे पणत्या देखील मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. पर्यावरणपूरक आणि पारंपरिक वस्तूंना नागरिक पसंती देत असल्याने मातीच्या दिव्यांची मागणी वाढली आहे. दिवाळीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नंदुरबारच्या बाजारपेठा आता पूर्णपणे सज्ज झाल्या असून सणासुदीच्या उत्साहात भर पडली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar: राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी घातला घेराव

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी घेराव घातला. 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर हा फसवा आहे त्यातून किती प्रमाणपत्र मिळाली हे सांगा असा जाब त्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना विचारला. छत्रपती संभाजी नगर शहरातील रामा हॉटेलमध्ये विखे पाटील होते. ते हॉटेल मधून नगरकडे निघत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवून निवेदन दिले. संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथले ते मराठा कार्यकर्ते होते.

Shahada:  शहादा नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन....

शहादा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कारण गेल्या आठ महिन्यांपासून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न सुटलेला नाही. एस. आर. ग्रीनवे एंपियर, नाशिक या संस्थेकडे स्वच्छता विभागाचे टेंडर गेल्यापासून कर्मचाऱ्यांना वारंवार पगारात विलंब होत आहे. मागील दीड महिन्यापासून एकाही कर्मचाऱ्याला पगार मिळालेला नाही, त्यामुळे दीपावलीच्या तोंडावरच त्यांची आर्थिक अडचण तीव्र झाली आहे. आजपासून शहरातील सर्व स्वच्छता कामकाज ठप्प झाले असून, अनेक भागांत कचरा साचू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिवाळीच्या तोंडावर विविध मागण्यांसाठी मेळघाटातील आदिवासी बांधवानी केलेउ पोषण

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील आदिवासी बांधवांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

आदिवासी बांधवांच्या प्रमुख मागण्या म्हणजे मेळघाट मधील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा, करावेत. मागील अनेक वर्षांपासून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देत लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आज या उपोषण स्टडी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल व प्रबोधक दिलावकर यांनी भेट दिली

Thane: कोपरी विभागामध्ये दौलत नगर मध्ये पुनर्वसन प्रकल्पावरवरुन राजकारण तापले

दौलत नगर विभागामध्ये सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया दौलत नगर वाशियांशी संवाद साधण्याकरिता येत आहे...या पूर्वी देखील दमानिया याच ठिकाणी आल्या होत्या..आता नवीन नियमानुसार विकासकाने तीन महिन्याचे भाडे द्यावे असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची सरकारने अंमलबजावणी करावी या साठी दमानिया येत आहेत

Kolhapur: कोल्हापुरात वसुबारस निम्मित गो-मातेची विधिवत पूजा करून दिवाळीला सुरुवात

आज पासून दिवाळीला सुरुवात झाली असून आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, आणि कोल्हापुरात आज शहरासह ग्रामीण भागात नागरिकांकडून गोमातेची विधिवत पूजा केली जात आहे. त्यातच राज्य सरकारच्या वतीने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे... त्यामुळे वसुबारसला एक विशेष महत्त्व प्राप्त झालय. हिंदू धर्मात गोमातेला अनन्य साधारण महत्व असून गाईला देव मानले जात असल्याने दिवाळीची सुरुवात ही गोमाता पूजनाने केली जाते... कोल्हापुरातील गोरक्षक संताजी बाबा घोरपडे यांनी घरात गायींच पालन केलय. आज वसुबारस या निमित्ताने गाईंचा गोठा हा फुलांनी सजवलाय तर गाईंच्या पूजेसाठी त्यांनी परिसरात विविध रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात आली आहे.

Pandharpur: पंढरपूरमध्ये शाॅर्टसर्कीट मुळे ऊसाला आग;  शेतकऱ्यांचे नुकसान

पंढरपूर जवळच्या उपरी गावातील एका शेतकऱ्याच्या उसाच्या फडाला आग लागून नुकसान झाले.

यामध्ये तोडणीस आलेला एक एकर ऊस जळाला आहे. शाॅर्टशर्कीट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सुमारे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकर्यांनी वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली.

फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महसूल अधिकाऱ्यांना दिवाळी भेट

राज्यातील २२ उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती

महसूलच्या २३ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती

राज्यातील २३ अधिकाऱ्यांचा आयएएस होण्याचा मार्ग मोकळा

बढती झालेल्या अधिकाऱ्यांचे मंत्री बावनकुळे यांनी केले अभिनंदन

Kolhapur: कागल नगरपालिकेच्या मतदार यादीत घोळ

मतदार यादीत मोठा घोळ

समरजीत घाटगे आज करणार मोठा खुलासा

जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मतदार यादीची करणार पोलखोल

घाटगे मुश्रीफ पुन्हा वाद पेटणार

Beed: मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या व्हिडिओ कॉल वरून शेतकरी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा.

बीड तालुक्यातील इमामपुर भागातील पुरग्रस्तांसह, ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये खाद्यपदार्थांसह, कपडे, दिवाळीचे साहित्य आणि फटाके देखील देण्यात आले. युवासेनेचे पदाधिकारी बाजीराव चव्हाण आणि महंतांच्या हस्ते या किट चे वाटप करण्यात आले.

यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पूरग्रस्तांशी संवाद साधला. सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

तर मराठवाड्यात आत्तापर्यंत 80 हजार किट वाटप केल्याची माहिती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Nashik:  नाशिकमध्ये लोंढे टोळीची गुंडगिरी कायम , एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक -

- नाशिकमध्ये लोंढे टोळीची गुंडगिरी कायम

- लोंढे टोळीने पुन्हा एकदा केला एकावर प्राणघातक हल्ला

- हल्लेखोरांनी डोक्यात कोयता मारत,जिवंत जाळण्याचाही केला प्रयत्न

- चंद्रकांत विश्वकर्मा या युवकावर करण्यात आला प्राणघातक हल्ला

- लोंढे टोळीचा मास्टरमाइंड प्रकाश लोंढे,दीपक लोंढे अटकेत असताना त्यांच्या टोळीची गुंडगिरी कायम

Navi Mumbai: रबाळे एमआयडीसीमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी 

नवी मुंबई -

रबाळे एमआयडीसीमध्ये भीषण आग

फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल

प्लॉट नंबर R/N 952 जेल फार्मासिटिकल कंपनी टीजेएसबी बँकजवळ कंपनीला आग

Pune: पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकात प्रवाशांचा गोंधळ

पुणे -

पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकात प्रवाशांचा गोंधळ

सकाळी ६.३० वाजता शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर बस निघणारी बस अजूनही न असल्याने प्रवाशी संतप्त

रिझर्व्हेशन करूनही प्रवाशांना बस मिळत नाहीय

तब्बल ४० प्रवाशी पडले अडकून

ऐन दिवाळीत गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची तारांबळ

एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना सहकार्य केल जात नसल्याचा आरोप

Pune: पुण्यात दिवाळी अगोदरचा राजकीय पक्षाचा आज वाडेश्वर कट्टा

पुणे -

पुण्यात दिवाळी अगोदरचा राजकीय पक्षाचा आज वाडेश्वर कट्टा

सांस्कृतिक शहर पुण्याची वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय मतभेद दूर करून एकत्र येण्याची परंपरा आहे

दरवर्षी दिवाळी आणि कुठलीही राजकीय पक्षाची निवडणूक आली की हा सांस्कृतिक कट्टा भरवला जातो

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीपूर्वी सगळे मतभेद मनभेद विसरून एकत्र दिवाळी साजरी करावी यासाठी आज वाडेश्वर कट्टा भरवला गेला आहे

सर्वच राजकीय पक्षातले लोक वाडेश्वर कट्ट्यात सहभागी झाले आहेत

Jalna: लाचखोर आयुक्त संतोष खांडेकरच्या घराची पहाटे ३ वाजेपर्यंत एसीबीकडून झाडाझडती

जालना -

लाचखोर आयुक्त संतोष खांडेकरच्या घराची पहाटे ३ वाजेपर्यंत एसीबीकडून झाडाझडती

जालना आणि संभाजीनगर च्या एसीबी पथकाने झाडाझडती घेतली यात,

5 लाख 20 हजारांची कॅश.6 तोळ्याचे दागिनेआणि 2 किलो 770 ग्रॅम चांदी आढळून आल्याची माहिती मिळतेय..

यातील 5 लाख 20 हजारांची रक्कम एसीबी कडून जप्त करण्यात आलीय.

Nashik: नाशिक जिल्हा रुग्णालयात ३.३७ कोटींचा घोटाळा उघड

नाशिक -

- नाशिक जिल्हा रुग्णालयात ३.३७ कोटींचा घोटाळा उघड

- कोविड काळात नाशिक जिल्हा रुग्णालयात मॉड्युलर आयसीयूसह विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड झाला आहे.

- तब्बल ३.३७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तत्कालीन सीएस, एसपीएस, औषध निर्माण अधिकारी, तसेच संबंधित कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- निविदा प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन करून, बनावट कागदपत्रांच्या आधारे कामे मंजूर केल्याचा आरोप आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Nashik: संघटीत गुन्हा निष्पन्न, बागूल टोळीवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू

नाशिक -

संघटीत गुन्हा निष्पन्न, बागूल टोळीवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू

- विसेमळा येथील गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू असताना हा गुन्हा संघटीतपणे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

- त्यामुळे आता पोलिसांनी बागुल टोळीवर मोक्का लावण्याच्या हलचाली सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Virar: विरारमध्ये महामार्गावरील वाहतूककोंडीचा फटका पेट्रोल पंपांना बसला

विरार-

महामार्गावरील वाहतूककोंडीचा फटका वसई-विरारमधील पेट्रोल पंपांना बसला आहे.

महामार्गावरच्या प्रचंड ट्रॅफिकमुळे इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरांना उशीर होत असल्याने शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Pune: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

पुणे -

गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमधील 10 सदनिकावर घायवळने बेकायदेशीर ताबा मारला होता

सदनिका भाड्याने देऊन त्यातून पैसे कमवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आता या सदनिका खाली करू सील करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत

Amravati: अमरावतीच्या तिवसा शहरात घरफोडी

अमरावती -

अमरावतीच्या तिवसा शहरात घरफोडी

90 हजार रुपयांच्या रोखीसह 26 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले

तिवसा येथील शकुंतला ईवनाते या महिलेच्या घराचं कुलूप फोडून चोरी

चोरट्या सोबत झटापट मात्र चोर पळाला

झटापटीत एका चोरट्याचं शर्ट फाटलं,मात्र चोरटा सैरावरा पळत असल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद

सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे पोलीस घेत आहे चोरट्याचा शोध

Pandharpur: माढ्यातील पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची औषधे

पंढरपूर -

माढ्यातील पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची औषधे

माढा तालुक्यातील पूरग्रस्तांच्या आरोग्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुमारे 25 लाख रुपयांची विविध प्रकारची औषधे व वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष सुरज देशमुख यांनी ही मदत स्वखर्चातून पूरग्रस्तांसाठी दिली आहे.

Pune: पावसाने पुण्यात ५३ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

पुणे -

पावसाने पुण्यात ५३ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

३४ कोटींच्या मदतीची मागणी

सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १० तालुक्यांतील २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले

७८१ गावांतील तब्बल ५३ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला

कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पंचनाम्यातून ही माहिती समोर आली

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

जिल्हाभरातील आठ नगरपरिषदेत मतदार यादीवर तब्बल 13000 आक्षेप

नगरपरिषद प्रभागांमध्ये मतदार यादीत मध्ये घोळ, अनेकांच्या रहिवाशी पत्त्यांमध्ये बदल

तर अनेकांची नावे मतदार यादीतून गायब, नावामध्ये चुकांच्याही तक्रारी

धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पाच हजाराहून अधिक तक्रारी धाराशिव नगरपरिषदेत

निवडणूक विभागाकडे मतदार यादी बद्दल तक्रारींचा खच, मुदतीत तक्रारीचे निवारण करण्याचे प्रशासनासमोर आव्हान

Nagpur: महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवर आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टात दाखल

नागपूर -

- महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल

- याचिकाकर्त्याला तांत्रिक कारणांवरून चार आठवड्यात याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश

- ज्यांना गटनिहाय उमेदवारांचा मतदान करायचे आहे. त्यामुळे ही पद्धत असंवैधानिक आहे आणि मूलभूत अधिकारांचे हनन करणारी आहे. असा दावा करण्यात आला.

- याचिकाकर्त्याने या प्रकरणात राज्याच्या विधि न्याय विभागासह राज्य निवडणूक आयोग, महापालिका यांना प्रतिवादी केले आहे.

- निवडणुकीच्या प्रक्रियेत विधि विभाग प्रतिवादी कसा, असा सवाल न्यायालयाने सुनावणीदरम्यान उपस्थित केला.

Solapur: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश  

सोलापूर -

आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

सोलापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधून दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

सोलापुरात भाजपने सर्वच पक्षांना दिला जोरदार धक्का

मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्ष करावेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : ठाकरेंची नवी युवा पिढी एकाच फ्रेममध्ये

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

SCROLL FOR NEXT