भोर, नगरपालिकेचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे आणि उपनगराध्यक्षा ॲड जयश्री शिंदे यांच्या कार्यालयाला नगरपालिका प्रशासनाने सील ठोकले. विनापरवानगी कार्यालयातील फर्निचर मध्ये बदल केल्यामुळे आणि एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्यामुळे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी ही कारवाई केली. नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी नगरपालिका प्रशासनाची परवानगी न घेता त्यांच्या दालनातील फर्निचर मध्ये बदल करण्यास सुरुवात केली. तर उपनगराध्यक्षा ॲड जयश्री शिंदे यांनी परवानगी न घेता त्यांच्या दालनातील फर्निचरच्या रचनेत बदल केला. याबाबत एकमेकांच्या विरोधात मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यामुळे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी तक्रारींची चौकशी होऊन मान्यते बाबत योग्य निर्णय होईपर्यंत दोघांच्याही कार्यालयाला सील ठोकले. मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासन अधिकारी सागर कुऱ्हाडे यांनी कार्यालयाला सील ठोकले.
महाराष्ट्रात प्रशासक काळात महापालिकांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी केला आहे. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाही,सत्ता नसताना त्या काळात काय काय भ्रष्टाचार झालाय,हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, असं विधान देखील आमदार विश्वजित कदम यांनी केले आहे,सांगली महापालिकेच्या वाढीव घरपट्टी सह विविध प्रश्नांवर आमदार विश्वजीत कदम यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली,यावेळी ते बोलत होते.
जिल्हा न्यायालयाने आज दिला निर्णय..
न्यायालयाच्या निर्णयामुळे मूर्ती वरील लेपन प्रक्रियेचा मार्ग मोकळा...
लेपन प्रक्रिये विरोधात स्थानिक महाराज मंडळींनी न्यायालयात घेतली होती धाव....
- खासदार संजय राऊत यांच्यातर्फे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी स्वतः महाल येथील राजवाड्यात जाऊन मुधोजी भोसले यांना निमंत्रण दिले
- नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात उद्धव ठाकरे यांचातर्फे रामरक्षा पठण शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता संपन्न होणार आहे
- यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, आरएसएस सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्यासह नागपुरातील विविध मान्यवरांना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाचे निमंत्रण दिले आहे
- शहरातील विडी घरकुल भागातील अनेक भागात पाणी साचायला सुरुवात
- मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती.
- सोलापूर जिल्ह्यात कालपासून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
- मात्र आज पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोलापूरकर सुखावलेत.
गोंदिया शहरात बेवारस मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण सकाळी, शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या एका निष्पाप मुलीवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून तिला जखमी केले. गोंदिया शहरातील प्रभाव क्र. ४ रिंग रोडवरील मजारच्या मागे असलेल्या एका घरात, ७ वर्षांची एक मुलगी शाळेत जाण्याच्या तयारी करून घरासमोर उभी होती. याचदरम्यान, परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या एका कळपाने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी किरकोळ जखमी झाली, पण मुलीने आरडाओरडा करताच, शेजारची एक महिला तिथे आली आणि तिने कुत्र्यांना पळवून लावले
बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. नागपूरमधील आंदोलनाला 'प्रभू श्रीराम रक्षा आंदोलन' असे नाव द्यावे, तसेच रामाचा उल्लेख आदराने करावा, असे ते म्हणाले. श्रीराम मंदिरातील चोरीचा निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली. शरद पवार यांच्या एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चेवर त्यांनी भाष्य केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान व्हावे आणि महाराष्ट्राची धुरा एकनाथ शिंदे यांनी सांभाळावी, अशी इच्छा व्यक्त केली. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल सरकारने घ्यायला हवी होती, असेही त्यांनी सांगितले.
गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने आज संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात जोरदार हजेरी लावली. कुडाळ, सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग तालुक्यात संध्याकाळी पावसाने झोडपून काढले. सावंतवाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरशिंगे गावातील धोंडवाडी येथे तेरेखोल नदीला पूर आला. या पुरामुळे पुलावर पाणी आले त्यामुळे शिरशिंगेहून सावंतवाडीकडे येणारा मार्ग बंद झाला होता. तर चौकुळ गावात देखील मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यावरून पाणी आले.
राज्यातील समाजकल्याण विभागाच्या अनुदानित वस्तीगृहांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार CAG च्या अहवालातून समोर आला आहे. राज्यातील सहा वसतिगृहांमध्ये एकही विद्यार्थी उपलब्ध नसताना गेल्या चार वर्षांत तब्बल 1 कोटी 62 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या सहा वसतिगृहांपैकी चार वसतिगृह हे जालना जिल्ह्यातील आहेत. याच अहवालात जालना शहरातील समाजकल्याण विभागाच्या मोदीखाना वसतिगृहावरही गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज दुपार पासुनच बदलापूर आणि परिसरात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. दुपारपासूनच सतत कोसळणाऱ्या मुसळधार सरींमुळे नागरिकांची आणि चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. पाऊस काही वेळ विश्रांती घेतो आणि पुन्हा पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत. काही सखल भागात पाणीही साचायला सुरुवात झाली आहे.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाकरे शिवसेनेने पाठिंबा दिलाय.याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने लावण्यात आलेल्या एका बॅनरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
यवतमाळच्या नेर तालुक्यातील येलगुंडा येथील मेंढपाळ शंकर हाके हे आपल्या मेंढ्या घेऊन रत्नापूर शिवारात चराई साठी गेले होते. अज्ञात इसमाने या ठिकाणी युरिया टाकून ठेवला होता. हा युरिया मेंढ्यांनी खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन कळपातील 31 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाल्या तर पंधरा मेंढ्यांची अत्यवस्थ झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
शेगावचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखीच सिद्धारमेश्वरांची पावनभूमी सोलापूर शहरात झालं आगमन
सोलापूरच्या शहरात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी केलं गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत
शेगाव ते पंढरपूर असा तब्बल 750 किमी प्रवास करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने होणार रवाना
कल्याण पूर्व येथील अडवली-ढोकली परिसरात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुन कालपांडे असे मृत तरुणाचे नाव असून, गुरुवारी रात्री ही घटना घडली.
आंबोली येथील नांगरतासवाडी परिसरात भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच ‘सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुपच्या पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत या चारही जणांना सुखरूप बाहेर काढले. आंबोली परीसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पाण्याचा प्रवाह आणि पातळी वाढल्यामुळे हे चारही शेतकरी पलीकडे अडकून पडले होते. या चारही शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
मारहाण प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना आज न्यायालयात केले हजर
- आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी मागितली सात दिवसांची पोलिस कोठडी
- मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी
विजय बबन जाधव असे व्यापाऱ्याला गंडा घालणाऱ्या भामट्याचे नाव आहे. वसईतील न्यू मोर्बी स्वीट्स अँड फरसाण च्या दुकानात भेसळयुक्त खाद्यपदार्थ आहेत. मी एफडीए चा अधिकारी आहे. असे सांगून त्याने बोगस व्हिजेटींग कार्ड, आय कार्ड दाखवून व्यापाऱ्या ची फसवणूक केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत दुचाकी वाहनांमध्ये इंजिनसंबंधी बिघाडाच्या तक्रारी वाढल्याचा दावा वाहन दुरुस्ती करणाऱ्या तज्ज्ञांनी केला आहे. ई-20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे या समस्या निर्माण होत असल्याचा त्यांचा दावा आहे.
अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ची धडक कारवाई
3420 किलो कोरल हायड्रेट आणि ते करण्यासाठी लागणारे 5800 लिटर रॉ केमिकल केलं जप्त
पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील एका कारखान्यातून 3420 किलो वजनाचा पिवळ्या रंगाचा स्फटीक सदृश्य पदार्थ तसंच ते तयार करण्याकरिता लागणारं 5800 लिटर रॉ केमिकल मिळून आलं होतं
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या नेवरी येथे नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रक्तदान आंदोलन करण्यात आले आहे... खून लो, खेती मत लो असा नारा देत, शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांकडून रक्तदान करण्यात आले आहे..
21 वर्षीय तरुणाचा जीव गमावला
मोहम्मद मुजम्मील असे या तरुणाचे नाव
तर दोन व्यक्ती या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत
पुण्यातील येरवडा भागात असणाऱ्या अग्निशमन केंद्रात गेल्या पाच दिवसांपासून वीज पुरवठा बंद आहे. येरवडा भागात असणाऱ्या महापालिकेच्या एका प्रकल्प जवळ वीज पुरवठा करणारी केबल तुटल्यामुळे अग्निशमन केंद्र गेल्या पाच दिवसांपासून अंधारात आहे. विज पुरवठा नसल्यामुळे अग्निशमन केंद्रातील प्रमुख खोली ज्यामध्ये सगळं सामान ठेवण्यात आलं आहे तिथे घोर अंधार आहे तसंच जवानांकडे असलेल्या वॉकी टॉकी बॅटरी डाउन झाल्यामुळे बंद पडल्या आहेत.
भाजप नेते अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रभू श्रीराम आणि रामनामाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी सतत रामनामाचा जप करावा रामरक्षा आणि हनुमान चालीसाचे पठण करावे असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री असताना काँग्रेससोबत जाणे आणि इतर भूमिकांवरून त्यांनी टीका करत रामनामाचा जप केल्याने पाप कमी होईल असेही बोंडे म्हणाले.
नीट पेपर फुटी नंतर देशभरात मोठा गदारोळ झाला असून त्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन झाले,सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरू केले असून,त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व त्यांनी उपोषण सोडावे यासाठी नाशिकच्या मालेगाव येथे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध केला.
शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील गोंधळ आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेच्या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
कोल्हापूर -
भाजप कार्यकर्ता सुरज साखरे गोळीबार प्रकरण
कोल्हापूर पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात
पुणे-बंगळुरू महामार्गावरून दोघांना ताब्यात घेतलं
संशयित आरोपींना घटनास्थळी नेऊन होणार पंचनामा
गोळीबार कोणत्या कारणातून झाला याचा पोलीस करत आहेत तपास
कोल्हापूर-
प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट श्वेता जुमानी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू
डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार निदर्शने
कोल्हापुरात श्वेता जुमानींना मोठ्या प्रमाणात विरोध
श्वेता जुमानी भविष्य सांगण्याच्या पाहण्याने लोकांची लूट करत असल्याचा डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा दावा
राजर्षी छत्रपती शाहूंच्या नगरीत थोतांडपणा चालू देणार नाही, डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा विरोध
नाशिक -
- नाशिक आणि नगर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रांसाठी वन विभागाची नवीन कडक नियमावली जाहीर
- हुल्लडबाजी आणि रील्स बनवणाऱ्यांवर होणार कारवाई, मद्यपानावर देखील बंदी
- दुगारवाडी, हरिहर गडावर ३०० पर्यटकांची मर्यादा
- हरिहर गडावर दुपारी २ पर्यंतचीवेळ, ग्रुपसाठी ७२ तास आधी नोंदणीचा नियम आणि मोबाईल नंबर
- दुगारवाडी-पहिने येथील सकाळी ८ ते ४:३० ची वेळ, गाईड आणि सुरक्षा रक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर -
पैठणमध्ये ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक
पैठण तहसील कार्यालयाच्या पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन
श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने ऊस बिल थकवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
थकीत ऊस बिल तात्काळ मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ६ वाजल्यापासून आंदोलन सुरू
ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत; मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा
पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड मेट्रो स्टेशन जवळ पिण्याच्या पाण्याची एक मोठी पाईपलाईन फुटली आहे.
चिंचवड स्टेशन जवळ सध्या पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. याच कामा दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिण्याच पाणीपुरवठा करणारी एक मोठी लाईन फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे.
पाईपलाईन अचानक फुटल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक -
- नाशिक महापालिकेची महासभा सुरू होण्यापूर्वी ठाकरे गटाच्या शिवसेना नगरसेवकांचे आंदोलन
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप
- अलीकडील पावसात शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
- निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने कारवाई करण्याची ठाकरे गटाची मागणी
- आंदोलनादरम्यान महापालिका परिसरात जोरदार घोषणाबाजी, महासभेपूर्वी वातावरण तापले
विरार -
- अर्नाळाच्या समुद्रात बुडालेल्या दोन मुलांपैकी एकाचा २४ तासानंतर मृतदेह मिळाला
- अर्नाळा बंदरपाडा येथील जेटी जवळ मच्छीमार च्या जाळ्यात अडकल्याने मृतदेहाचा लागला शोध
- आयन झाकीर हुसेन मंडळ (वय १९) असे मृतदेह मिळालेल्या मुलाचे नाव आहे. तर
- शोएब झाकीर अहमद खान याचा अद्याप शोध सुरू आहे.
- काल पावणे दहा वाजता ही दोन्ही मुल अर्नाळा समुद्रातील भरतीच्या पाण्यात बुडाली होती
नाशिक -
- नाशिक आणि नगर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रांसाठी वन विभागाची नवीन कडक नियमावली जाहीर
- हुल्लडबाजी आणि रील्स बनवणाऱ्यांवर होणार कारवाई, मद्यपानावर देखील बंदी
- दुगारवाडी, हरिहर गडावर ३०० पर्यटकांची मर्यादा
- हरिहर गडावर दुपारी २ पर्यंतचीवेळ, ग्रुपसाठी ७२ तास आधी नोंदणीचा नियम आणि मोबाईल नंबर
- दुगारवाडी-पहिने येथील सकाळी ८ ते ४:३० ची वेळ, गाईड आणि सुरक्षा रक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन
हदगाव तालुक्यातील शिबदरा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम बोगस.
बंधाऱ्याचे बांधकाम लाथेने पडत असल्याने बंधाऱ्याच्या कामाचा दर्जा उघड.
- पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा महत्त्वाचा निर्णय.
- वाहतूक पोलिसांसह पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पिस्तूल बाळगणे बंधनकारक.
- गुन्हेगारांकडून होणारे हल्ले आणि आत्मसंरक्षण लक्षात घेऊन निर्णय.
- ड्रंक अँड ड्राइव्ह, नाकेबंदी आणि वाहतूक व्यवस्थेदरम्यान आदेश लागू.
शिवसेनेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले.
नांदेडच्या माहूर तालुक्यातील करंजी–सेलू–गंगाजीनगर मार्गावर मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच मोफत एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
मालवण मधील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाच्या भिंतीला भगदाड पडले आहे.
उजव्या बाजूच्या दोन नंबरच्या बुरुजाच्या भिंतीला पाव्याच्या ठिकाणी भगदाड पडले असून आजूबाजूचे दगडही कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
यामुळे त्या भिंतीला मोठा धोका निर्माण झाला आहे.
- नाशिक आणि त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी पदाची निर्मिती
- राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन उपजिल्हाधिकारी (वर्ग-१) पद मंजूर
- सिंहस्थ कुंभमेळ्यातील व्हीआयपी, मान्यवर आणि परदेशी प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन, समन्वय आणि प्रोटोकॉलची जबाबदारी
फिरोज बाबा प्रकरणावरून सिंधुदुर्गातील राजकारण पुन्हा तापले आहे.
ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांना नोटीस आल्याचा दावा केल्यानंतर, संजू परब यांनी पलटवार केला आहे.
रात्री 9 वाजेपर्यंत मला कोणतीही नोटीस मिळाली नाही. मग माझ्यापेक्षा आधी ती वैभव नाईकांकडे कशी पोहोचली? ते दारू पिऊन बोलत आहेत का?" असा थेट सवाल संजू परब यांनी केला.
बुलढाण्यात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम!..
तीस वर्षांपूर्वीचे अतिक्रमण काढले ..
फळ विक्रेता ते चहा टपरी, अनेक दुकाने हटविले ..
जयस्तंभ चौक ते जांभरुण मार्गावरील कारवाई
जालन्यात घर दाखविण्याच्या बहाण्याने अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केल आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका घेण्याच्या हालचाली
मतदार यादी कार्यक्रम जाहीर, चार ऑगस्टला प्रसिद्ध होणार अंतिम यादी
इराण अमेरिका युद्धामुळे बंद असलेली पुणे दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार
तीन ऑगस्ट पासून इंडिगो एअरलाइन्सची पुणे दुबई थेट विमान सेवा सुरू होणार आहे
आखातात झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंडिको ने तात्पुरती विमान सेवा बंद केली होती
या विमानसेवेचा दुबईच्या प्रवाशांना फायदा होईलच त्याचबरोबर युरोप अमेरिका देशांमध्ये कनेक्टिंग फ्लाईट प्रवास करणाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे
सोलापुरात साडेचार फूट नागाने सहा फुटाच्या धामणीला गिळण्याचा प्रयत्न केला.
अगदी साडेचार फुटापर्यंत धामण गिळलीही. मात्र,त्यापुढे त्याला गिळता न आल्याने तिला पुन्हा नागाने बाहेर काढले.
सोलापूर शहरातील महेश थोबडे नगरात सागर शेटे यांच्या घरी परिसरातील नागरिकांनी हा थरार पाहिला.
- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं अखेर विभाजन
- पेठ आणि त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र बाजार समित्या
- राज्य शासनाच्या निर्णयानुसार दोन्ही तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्यांची स्थापना
- नव्या समित्यांसाठी प्रशासकांची नियुक्ती
- अर्नाळाच्या समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचा अद्याप शोध सुरूच
- भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर, अर्नाळा पोलीस , वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानाकडून मागच्या २० तासापासून सुरू आहे शोधमोहिम सुरू
- नालासोपारा चे चार मुल अर्नाळा च्या समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले असता भरतीच्या पाण्यात बुडाले होते. दोघांना वाचवण्यात यश आले तर दोघांचा अद्याप शोध सुरू आहे
- सामाजिक न्याय विभागातील गैरव्यवहाराची चौकशी वेळेत पूर्ण न केल्याबद्दल शासनाला उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाने फटकारले
- ६६.२६ कोटींच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत गंभीर दिरंगाईवर नागपूर खंडपीठाने व्यक्त केली तीव्र नाराजी...
- दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे मुख्य सचिवांना आदेश
- नागपूर सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी मनपाकडून आयआयटी मुंबईची नियुक्ती
- काँक्रीट रस्त्यांची तपासणी खासगी समितीकडून करण्यास मनपाचा उच्च न्यायालयात विरोध
- आयआयटी मुंबई ही सक्षम, स्वायत्त आणि राष्ट्रीय ख्यातीची संस्था असल्याचा मनपाचा दावा
धुळे -
आत्महत्या ग्रस्त मुलाला न्याय मिळावा या मागणीसाठी शिरपूर पोलिस ठाण्याबाहेर तब्बल 12 तासांपासून उपोषणाला बसलेल्या आईला पोलिस ठाण्याबाहेरच उपचार सुरू
शिरपूर येथील तापी नदीत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करीत तरुणाने आत्महत्या केल्यानंतर शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर सकाळपासून नातेवाईक व ग्रामस्थांचे आंदोलन सुरू
तरुणाला आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची कुटुंबीयांसह ग्रामस्थांची मागणी
जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत त्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी आक्रमक नातेवाईक व ग्रामस्थांची भूमिका
पुणे -
शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल
पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बांधकाम व्यावसायिकाचा विश्वासघात केल्याप्रकरणी तसेच त्याला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
खलील शेख नावाच्या व्यावसायिकाने केली आत्महत्या
आत्महत्या करताना सुसाईड नोट लिहीत पुण्यातल्या अनेक नेत्यांचे नाव या इसमाने घेतले होते
तरडगावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची भक्तिमय धुपारती
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम तरडगाव येथे असून भक्तिमय वातावरणात माऊलींची धुपारती संपन्न झाली.
टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड जयघोषात आणि अभंगांच्या सुरावटींमध्ये वारकरी मोठ्या भक्तिभावाने धुपारतीत सहभागी झाले.
माऊलींच्या पादुकांसमोर धूप अर्पण करत हजारो वारकऱ्यांनी विठ्ठलनामाचा गजर केला. संपूर्ण पालखी तळ भक्तिरसात न्हाऊन निघाला.
धुपारतीनंतर वारकऱ्यांनी माऊलींचे दर्शन घेतले आणि उद्याच्या पंढरपूरकडे होणाऱ्या प्रस्थानाची तयारी सुरू केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.