Maharashtra Live News Update: Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: उंबरणेवाडीत पुन्हा झोळीतून बाळंतीण महिलेचा प्रवास

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात, आषाढी वारी अपडेट, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

उंबरणेवाडीत पुन्हा झोळीतून बाळंतीण महिलेचा प्रवास

खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडी येथे रस्ता नसल्याने बाळंतीण महिलेला उपचारासाठी पुन्हा झोळीतून दवाखान्यात नेण्याची वेळ आली. यावेळी तिच्यासोबत नवजात बाळालाही पाऊस, डोंगराळ वाट आणि ओढे पार करत जीवघेणा प्रवास करावा लागला. काही दिवसांपूर्वीही याच महिलेला बाळंतपणासाठी झोळीतून दवाखान्यात नेण्यात आले होते. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्यातील साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

केतन अग्रवाल हत्या प्रकरण

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्यातील साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

फेब्रुवारी महिन्यात झाला होता दोघांचा साखरपुडा

१८ जून रोजी केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून पडून झाला मृत्यू

याप्रकरणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना सध्या न्यायालयीन कोठडी

मालेगावच्या जळकूमध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्व परिसर जलमय झाला. नाशिकच्या पूर्व भागात कुठेच पाऊस नसताना फक्त जळकू येथे पावसाने धुवांधार बॅटिंग करीत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले.अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेताची माती वाहून गेली तर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र असे असले तरी जोरदार झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

संजय राऊतांच्या आमंत्रणाला भाजपचं प्रत्युत्तर

नागपूरमध्ये होणाऱ्या राम रक्षा पठण कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. यावर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलयं. भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी पत्रातून चोख प्रत्युत्तर दिलंय.

श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद

मंदिरात इतर कोणालाही व्हीआयपी दर्शन दिल तर आपत्ती व्यवस्थापन याच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करणार. आजपासून व्हीआयपी दर्शनाचे काटेकोर पालन होणार. संविधानिक पदावर असणारी व्यक्ती यांनाच स्टेट प्रोटोकॉल आहे अशा 3 लोकांनाच दर्शनासाठी सोडणार. व्हीआयपी दर्शनाचे काटेकोर पालन करणार आहे.

लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पर्यटनस्थळांसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत लागू करण्यात आलेला आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी रद्द केला आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

सिया व चेतन चौधरीची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढली आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी असतो. चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करूनच जामिनासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे

नागपुरातील ३० मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये आग; अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य

नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील आनंदम सिटी येथे बांधकाम सुरू असलेल्या ३० मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीत पार्किंगमध्ये ठेवलेले पाईप्स, सेंट्रिंगच्या पाट्या, बांधकाम साहित्य आणि काही मशिनरी जळून खाक झाली. धुराचे मोठे लोट उसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बीडमध्ये गूढ आवाजाने खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गूढ आवाजाने बीड शहर व परिसर हादरला.

दुपारच्या सुमारास झाला गूढ आवाज

हिंगोली परिसरात काही दिवसापूर्वी जाणवले होते भूकंपाचे धक्के.

बीडमध्ये गूढ आवाज झाल्याने चर्चेला उधाण.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

गोल्फ कोर्स चा हमाल बनला नायजेरियन "बेनी" चा दलाल, पुण्यात जप्त केलेल्या ६ कोटींच्या ड्रग्स चे आंतरराष्ट्रीय रॅकेट

पुण्यातील कात्रज परिसरातून तब्बल ५ कोटी ७९ लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने हा अमली पदार्थ दिल्लीहून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आलीय. बेनी नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून हा ड्रग्जचा साठा बंगळुरूत पोहोचविण्यासाठी निघालेला असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कात्रज येथे सापळा रचून त्याला पकडले.

रायगडमध्ये भातशेती लावणीच्या कामांना वेग

गेली आठ ते दहा दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केल्याने रायगडमध्ये भातशेतीच्या लावण्याच्या कामांना वेग आला आहे. मुळातच पाऊस उशीरा सुरु झाल्याने शेतकरी चिंतातुर होता त्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतीवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण झाली होती. आठ दहा दिवसांनंतर पुन्हा दमदार पाऊस बरसत असल्याने शेतात लावणीच्या कामाला वेगळ आल्याचे रायगडमध्ये पहयला मिळत आहे.

पुण्यात पुन्हा एकदा डबलडेकर इलेक्ट्रिक बसची चाचणी घेतली जाणार

बीआरटी आणि मेट्रो सेवा नसलेल्या मार्गांवर भर दिला जाणार आहे.

चाचणी २१ जुलैपासून शहरातील १० मार्गांवर केली जाणार आहे.त्यामध्ये हडपसर–वाघोली आणि हडपसर–स्वारगेट या मार्गांवर होणार चाचणी

वारकरी सेवेचा भक्तीभाव जपत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्याकडून काटेवाडीत स्नेहभोजन

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज काटेवाडी येथील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले. यावेळी त्यांनी स्वतः उपस्थित राहून वारकऱ्यांना प्रेमाने भोजन वाढले व त्यांच्या सेवेत सहभागी होत आशीर्वाद घेतले.

जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला

जेजुरी भीषण अपघातातील आणखी एका रुग्णाचा मृत्यू

पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली

अपघातात यापूर्वी ३ जणांचा मृत्यू झाला होता, आता हा आकडा ४ वर पोहोचला आहे.

पुण्यात फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्या दिवशी हॉटेल, क्लब रात्री २.३० पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

येत्या १९ तारखेला रात्री फिफा वर्ल्ड कप चा अंतिम सामना अमेरिकेत होणार असल्यामुळे भारतीय स्थानिक वेळेनुसार रात्री १२.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे. मोठ्या संख्येने फुटबॉल प्रेमी अशा ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी हॉटेल, क्लबमध्ये जाणार आहेत. मात्र मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व स्थायी आस्थापना रात्री १.३० वाजता बंद करण्याचे आदेश आहेत.

पुणे - सातारा महामार्गावरील खेडशिवापूर उड्डाणंपुलावर पिकअप टेम्पो आणि ट्रक यांच्यात धडक

अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी.. पिकअप वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला

साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं भरधाव पिकअपची ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला

अपघातानंतर मध्यरात्री काहीकाळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.

धाराशिव- मुख्यमंत्र्यांनी वीज बिल माफीची घोषणा केलेली फसवी :आमदार कैलास पाटील 

मुख्यमंत्र्याकडून शेतकऱ्यांची 48 हजार कोटीची वीज बिल माफीची घोषणा

ठाकरे सेना स्मार्ट मिटर रद्द करा,लोडसडिंग बंद करा या मागणीसाठी रस्त्यावर

धाराशिवमधील महावितरणच्या कार्यालयासमोर स्मार्ट मीटर फोडत केले रास्ता रोको आंदोलन

धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

मुख्यमंत्र्यांनी वीज बिल माफीची घोषणा केलेली फसवी,आधी वीज द्या मग माफी करा:आमदार कैलास पाटलांची मागणी

पुण्यात 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दिला चोपलं

आरोपी पोलिसांच्या स्वाधीन

आंबेगाव पोलिस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

आंबेगाव पोलीस यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे

आंबेगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

पावसाने उसंत घेतल्याने तूर पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे खरिपाच्या हंगामातील पिकांना मोठे नुकसान पोहोचले आहे कापूस उडीद मूग यासह हळद सुकून जात असताना आता शेतकऱ्या सह सर्वसामान्यांच्या घरातील डाळीची गरज भागवणारे तुरीचे पीक पावसाअभावी जमीन कोरडी पडल्याने अक्षरशः नष्ट होऊन जात आहे.

कोल्हापूरमध्ये  ई-20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलविरोधात अंत्ययात्रा आंदोलन

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे केंद्र सरकारचे ई-20 धोरण सध्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. वापरात असलेल्या बहुतांश दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी हे इंधन पूर्णपणे सुसंगत नसल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीने कोल्हापुरात अनोखे आंदोलन छेडले आहे. बसंत बहार थिएटर परिसरातून प्रतीकात्मक दुचाकीची अंत्ययात्रा काढत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

नाशिक- कळवण तालुक्यातील भैताने दिगर गावात आदिवासी आणि पोलीस प्रशासन यांच्यात चकमक

- नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील घटना

- सोलर प्रकल्पाच्या भूसंपादनावरून ग्रामस्थ, सरपंच विरुद्ध प्रशासन

- गावात जेसीबी आणि बुलडोझर आणल्यामुळे आदिवासी ग्रामस्थ आक्रमक

- मागील एक ते दीड तासाभरापासून सुरू आहे संघर्ष

- भूसंपादनाला आदिवासी ग्रामस्थांचा आहे विरोध

नागपूर रामदासपेठेतील नामांकित हॉटेलमधील एमडी पार्टीवर पोलिसांची धाड

- एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज पार्टीवर सीताबर्डी पोलिसांनी छापा टाकून गोंदियातील तीन तरुणांना अटक केली

- त्यांच्या ताब्यातून १.६४० ग्रॅम एमडी जप्त करून त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केलाय

- मयंक महेश अग्रवाल (३०), पराग सुरेश अग्रवाल (३१) आणि कुणाल किशोर नखाते (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

- एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु

- आरोपींनी नागपुरातील हॉटेलमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी सुमारे २.५ ग्रॅम एमडी पावडरची व्यवस्था केली होती.

- हॉटेलच्या खोलीत ते ड्रग्जचे सेवन करत असतानाच पोलिसांना याबाबत माहिती मिळाली

- पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली असता तिन्ही आरोपी एमडीचे सेवन करताना आढळले

RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

आरटीई प्रवेश प्रक्रियेत गंभीर त्रुटी समोर आली आहे. ऑनलाइन लॉटरीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळेत प्रवेश मिळाल्याने पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आता या चुकीचा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना बसला असून, संबंधित विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्याची मागणी होत आहे.

अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत

अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत

शिवाजीनगर पोलिसांनी दुकानदाराला ठोकल्या बेड्या

हत्यारं नेमकी का ठेवली? याचा तपास सुरू

Buldhana : नीलगायींचा धुमाकूळ; सहा एकरांवरील नव्याने पेरलेले सोयाबीन फस्त!

निकृष्ट बियाण्यांच्या फटक्यातून सावरत नाही तोच आता नीलगायींच्या धुमाकूळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

मेहकर तालुक्यातील जानेफळ शिवारातील मिस्किनवाडी येथील संदीप आडवे आणि अरुण आडवे या सख्ख्या भावांच्या सहा एकरांवरील नव्याने पेरलेले सोयाबीन काही तासांतच नीलगायींच्या कळपाने उध्वस्त केले.

धाराशिव जिल्ह्यातील बोगस बियाणं व बोगस खताचा मुद्दा तापला

धाराशिव जिल्ह्यातील बोगस बियाणं व बोगस खताचा मुद्दा तापला

गळ्यात पाचशे रुपयांचा बंडल व शंभर रुपयाच्या नोटा घालून शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या घोषणाबाजी आंदोलन

बोगस खत पकडून दिलं त्यात दोनच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली तीच नुकसान भरपाई च्या माळा गळ्यात घालून शेतकरी बसले आंदोलनाला

पुण्यातील धायरी गावात गढूळ पाण्याचा पुरवठा

पुण्यातील धायरी गावात गेली आठवडाभर गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय

नागरिकांना तक्रारी करूनच पालिका विना प्रक्रिया दुषित पाणीच पुरवतेय

याच गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी धायरीतील कार्यकत्यांनी थेट गढूळ पाण्याच्याच बाटल्या पाणी पुरवठा उपायुक्तांना भेट दिल्यात

स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

ढाणकीत स्मार्ट मीटरविरोधात जनआक्रोश,शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद

आठवडी बाजारातून महावितरण कार्यालयावर निघणार भव्य मोर्चा

स्मार्ट मीटर तात्काळ बंद करण्याची मागणी,वाढीव वीजबिलांची चौकशी करा

नागरिकांचा स्मार्ट मीटरला तीव्र विरोध

भंडारदरा परिसरात पावसाची संततधार

भंडारदरा परिसरात पावसाची संततधार

आदिवासी शेतकरी भात लावनीत व्यस्त

आणखी दमदार पावसाची अपेक्षा

अंबरनाथ पालिकेत ३७ कामांचे टेंडर बिलो रेटने ओपन!

अंबरनाथ पालिकेत ३७ कामांचे टेंडर बिलो रेटने ओपन!

सर्वाधिक ४५ टक्के बिलो टेंडरचा नवा रेकॉर्ड

विकासकामांचा दर्जा घसरण्याची शक्यता

Pune: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण, सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची न्यायालयीन कोठडी आज संपणार

पुणे -

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची न्यायालयीन कोठडी आज संपणार

आज पुन्हा या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता

दोघांकडून देखील जामीन मिळण्यासाठी अर्ज आज करणार नाहीत

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या वकिलांकडून स्पष्टीकरण

आज दुपारी व्हि सी द्वारे दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार

दोघांना पुन्हा न्यायालयीन कोठडीच मिळण्याची शक्यता

Solapur: सोलापूरमध्ये विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

सोलापूर -

सोलापूरजवळील आनंदनगर तांडा येथे विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे दुर्दैवी अकरा वर्ष मुलीचा मृत्यू

शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी गेल्यानंतर चिमुरडीचा पाय घुसून पडल्यामुळे मृत्यू

इंदिया रामजी राठोड असं बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव

आनंद नगर तांडा येथे इंदिया राठोड हे शेळ्या राखण्याचं काम करत असत..

मात्र विहिरीजवळ शेळ्यांना घेऊन गेल्यानंतर विहिरीच्या जवळ पाय घसरून पडली आणि त्यातच पुढून तिचा मृत्यू झाला

याबाबतीत शासकीय रुग्णालयात नोंद करण्यात आली आहे

Nashik: बनावट शालार्थ आयडी प्रकरणात १,१०० पानांचे दुसरे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

नाशिक -

- बनावट शालार्थ आयडी प्रकरणात १,१०० पानांचे दुसरे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

- एसआयटीने नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले

- दुसरे आरोपपत्र दाखल झाल्याने न्यायालयीन प्रक्रियेला येणार वेग

- मुख्य संशयित नितीन उपासनी यांना कारागृहातून न्यायालयात करण्यात आले हजर

- बेकायदेशीर पैशांतून खरेदी केलेल्या मालमत्तेची तपासणी सुरू

- संशयितांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता

- अटक आरोपी एजंट प्रशांत वाडीले याची पोलीस कोठडी उद्या संपणार असल्यानं उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार

Baramati: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काटेवाडीत होणार स्वागत

बारामती -

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काटेवाडीत होणार स्वागत

परीट समाजाकडून पालखीसाठी घातल्या जाणार धोतराच्या पायघड्या

दुपारी होणार मेंढ्यांचे गोल रिंगण

काटेवाडीत

काटेवाडीत वारकरी यायला सुरुवात

Dharashiv: शेतकऱ्यांची लेकरं म्हणून घेता तर शेतकरी विरोधी धोरण बदलून घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण आणा

धाराशिव -

शेतकऱ्यांची लेकरं म्हणून घेता तर शेतकरी विरोधी धोरण बदलून घेतलं पाहिजे,शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण आणा

विरोधात असा किंवा सत्तेत असा शेतकऱ्यांची लेकर म्हणून घेता तर प्रत्येकाने शेतकऱ्यांसाठी काम करायला हवं

आमदार कैलास पाटलांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांना खोचक सल्ला

पिक विमा योजनेतील ट्रिगरसाठी दोन वर्षांपासून कैलास पाटील आग्रही; सोबतीला असलेले खासदार ओमराजे निंबाळकर आता सत्तेत सहभागी

सत्तेतून शेतकरीविरोधी धोरण बदलून घेण्याची कैलास पाटलांची मागणी

Nagpur: नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या 3 बंदिवानांनी गोंधळ घातला

नागपूर -

- नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या तीन बंदिवानांनी गोंधळ घातला.

- घटना छोटी गोल विभागातील बराक क्रमांक 1 मध्ये घटना घडली.

- दीपक उर्फ खट्या, रामकृष्ण घनचक्कर आणि नदिर खान अतिक खान पठाण अशी आरोपी बंदिवानांची नावे आहेत.

- तुरुंग अधिकारी वामन तुकाराम निमजे यांच्यावर दीपकने थुंकल्याचा आरोप आहे.

- समज दिल्यानंतर तिन्ही बंदिवानांनी निमजे यांच्यावर धाव घेत शिवीगाळ केली.

- तसेच अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

- घटनेमुळे कारागृह परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

- कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी तिन्ही बंदिवानांविरोधात गुन्हा दाखल केला.

- या घटनेमागील नेमके कारण काय, याचा पोलीस तपास करत आहेत.

- घटनेनंतर कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Pune: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

पुणे -

पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

पीककर्ज नसल्याचे हमीपत्र बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.

कृषी विभागाची केंद्र सरकारकडे हमीपत्राची अट रद्द करण्याची मागणी.

पुढील दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता.

हमीपत्रामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा पीकविमा अर्ज रद्द होणार नाही, कृषी विभागाचे स्पष्टीकरण.

खरिप हंगामासाठी पीकविमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू.

Pune: पुणे ग्रँड टूरसाठी 130 किलोमीटर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार

पुणे -

पुणे ग्रँड टूरसाठी 130 किलोमीटर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार

पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी 130 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण आणि दुरुस्ती होणार आहे

या कामासाठी १३७ कोटी रुपये महापालिकेच्या पूर्वगणन समितीने बुधवारी मान्यता दिलेली आहे

सलग दुसऱ्या वर्षी पुणे ग्रामीण आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुण्यात होत आहे

जिल्ह्यातील सातशे किलोमीटर पेक्षा अधिक रस्त्याचे काम सुद्धा यासाठी केले जाणार आहे..

Nagpur: राज्यातील विजेची मागणी २५ हजार मेगावॉटच्या उंबरठ्यावर

नागपूर -

- राज्यातील विजेची मागणी २५ हजार मेगावॉटच्या उंबरठ्यावर

- राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने विजेची मागणी पुन्हा वाढली.

- बुधवारी दुपारी २ वाजता विजेची मागणी २४,९२५ मेगावॉट इतकी नोंद.

- मात्र, खापरखेडा, चंद्रपूर आणि भुसावळ येथील महानिर्मितीचे चार संच देखभाल आणि तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT