कराड तालुक्यातील कृष्णा नदीचे पाणी दूषित झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून समोर आले आहे. नदीत अल्गल ब्लूम आणि सायनोबॅक्टेरियाची वाढ झाल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य ठरले आहे. त्यामुळे कृष्णाकाठावरील ग्रामपंचायतींना पर्यायी पाणी स्रोत वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने यापूर्वीच जनजागृती केल्याने दूषित पाण्यामुळे कोणत्याही गावात आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य विभागाकडून आवश्यक दक्षता घेतली जात आहे.
अमरावती विधान परिषद निवडणूक; वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसची पुन्हा बैठक सुरू....
बैठकीला काँग्रेस नेत्यांसह अमरावती जिल्ह्यातील महानगर पालिका ,नगरपरिषद, नगरपंचायत मधील काँग्रेसचे गटनेते उपस्थित....
वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा संदर्भात अजूनही काँग्रेसचा निर्णय होईना....
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विलास इंगोले यांच्या उपस्थितीत बैठक
वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसमध्ये दोन मत प्रवाह असल्याची सूत्रांची माहिती...
वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचे लक्ष
दुधात भेसळ केल्याचा संशय.
अकोल्यातल्या अकोला अकोट रस्त्यावरील चौहट्टा बाजार येथे अन्न औषध विभागाकडून एका दुध डेअरीची तपासणी.
पेढे, दूध आणि इतर खाद्यपदार्थांची करण्यात आली तपासणी.
तपासणी दरम्यान दुधात भेसळ असल्याचा संशय या ठिकाणी झाला.
त्यानंतर 33 लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला असून हे भेसळीचं दूध अन्न व औषध विभागाकडून नष्ट करण्यात आले.
डोंबिवली -
केडीएमसीच्या कचरा डेपोत धक्कादायक घटना
घंटागाडीत सापडला महिलांचा मृतदेह
कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह
डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल
मृत महिलेची ओळख अजून पटलेली नाही
बाईट सुहास हेमाडे एसीपी डोंबिवली
सातारा -
सांगली- सातारा विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीचा तिढा अखेर सुटला
शिवसेनेने महायुती धर्म पाळणार असल्याचे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले
आज शिवसेनेची बैठक साताऱ्यात पार पडली
या नंतर या बैठकीचा गोपनीय अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आला होता.
यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे काम करण्याचे आदेश सातारा ,सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
पुणे -
साई भक्तांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून सुरू होणार पुणे- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव दाखवणार नव्या ट्रेनला हिरवा कंदील
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन उपस्थित राहणार
पुणे रेल्वे स्टेशनचा होणाऱ्या विस्ताराची पायाभरणी सुद्धा उद्या होणार
पुणे रेल्वे स्टेशनला मिळणार नवीन ६ प्लॅटफॉर्म
खारघरमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी आज सिडकोच्या पाणी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. आंदोलकांना अधिकाऱ्यांची भेट नाकारण्यात आल्याने त्यांनी कार्यालयाच्या गेटवरून उड्या मारत आत प्रवेश केला आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, पाणी समस्या न सुटल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाही अर्धनग्न करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी अधिकमासात भाविकांनी भरभरून दान अर्पण केले. या कालावधीत दानपेटीत तब्बल ६ कोटी ८५ लाख रुपयांची भर पडली. तसेच ८४१ ग्रॅम सोने आणि जवळपास २० किलो चांदी देवीला अर्पण करण्यात आली. सशुल्क दर्शनातूनच २ कोटी ८८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. अधिकमास आणि उन्हाळी सुट्ट्या एकत्र आल्याने भाविकांची विक्रमी गर्दी झाली असून, दररोज सरासरी एक लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
अमरावती शहरात आज दुपारी पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. सलग तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पेरणीपूर्व तयारीला वेग येण्याची शक्यता आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
वाशिम शहरासह तालुक्यात आज वातावरणात बदल होत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे..
वाशिम शहरात आनंदाचे वातावरण... प्रचंड उकाड्यापासून वाशिमकरांना काहीसा दिलासा...
वाशिम जिल्ह्याला हवामान विभागाने दिला होता पावसाचा यलो अलर्ट.....
तुळजापूर शहरात वाढत्या चोरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांच्या बदलीची मागणी करण्यात आली आहे. तुळजापूरला प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी नियुक्त होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आज नांदेड दौऱ्यावर आल्याची अफवा पसरली.आणि याच भीतीपोटी शहरातील पान टपऱ्या अचानक बंद झाल्या.तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर , गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर देखील कारवाया सुरू झाल्या. त्याची धास्ती पान टपरी चालकांना आहेच.त्यातच आज तुकाराम मुंढे नांदेडला आले अशी अफवा पसरली ,आणि दुपारनंतर शहरातील मुख्य भागातील पान टपऱ्या बंद झाल्या.कारवाईच्या भीतीपोटी टपऱ्या बंद करून, टपरी चालक पसार झाले.
एका हॉटेलच्या समोर फर्निचर दुकानाला आग
फर्निचरच्या दुकानाला भीषण आग
आगीमध्ये फर्निचर सामान जळून खाक
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
राज्यभरात सध्या वीज ग्राहकांना स्मार्ट सेवा देण्यासाठी महावितरण विभागाने स्मार्ट मीटर बसवणे सुरू केले आहे, 48 तासाच्या आत स्मार्ट मीटर बदलून घेतल्यास वीज पुरवठा खंडित होतो असे संदेश प्राप्त झाल्याने विद्युत ग्राहक संभ्रमात सापडले आहेत, ते मेसेज नंतर विद्युत ग्राहकांमध्ये कसा संभ्रम निर्माण झालाय पाहुयात साम टीव्ही च स्पेशल रिपोर्ट
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील दुकानांना आग
आगीचे कारण अस्पष्ट असले तरी सुद्धा दुकानांचे मोठे नुकसान
अग्निशमन दलाच्या ५ वाहनांकडून आगीवर नियंत्रण
सुदैवाने घटनेत कोणीही जखमी नाही
शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या 2025-26 आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा लेखाजोखा समोर आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत संस्थानच्या एकूण उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे.. मात्र मुदत ठेवींवरील व्याज उत्पन्नात तब्बल 14 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.. 2024-25 या आर्थिक वर्षात साईबाबा संस्थानचे एकूण उत्पन्न 648 कोटी रुपये होते.. तर 2025-26 मध्ये हे उत्पन्न 638 कोटी रुपयांवर आले आहे.. म्हणजेच उत्पन्नात सुमारे 10 कोटी रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे.. मात्र काही भक्तांनी साई संस्थानच्या रुग्णालयाला वस्तू स्वरूपात 15 कोटींहून अधिकची देणगी दिल्याचे संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलंय..
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील दगडथर येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून शिवाजी परसराम खराटे असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी खराटे हे सकाळच्या सुमारास गावाबाहेरील परिसरात गेले असता अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.या घटनेमुळे दगडथर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या जीआर मध्ये अनेक त्रुटी आणि अटी आहेत. या जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या जीआरची ठाकरे गटाच्या वतीने होळी करण्यात आली.
सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक आज साताऱ्यात पार पडत आहे. या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई,फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित आहेत.
अमरावती विधान परिषद निवडणूक; वंचितला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपली
वंचितला पाठिंबा देण्यासंदर्भात अजूनही ठोस निर्णय नाही
काँग्रेस या निवडणुकीत तटस्थ राहन्याची शक्यता असल्याची विश्वसनिय सूत्रांची माहिती
अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत मधील काँग्रेसच्या सर्व गटनेत्यांना आज अमरावतीत बैठकीसाठी बोलावलं
वाशिममध्ये सरसकट कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक...
सरकारच्या निषेधार्थ स्वतःची दुचाकी पेटवून केला संताप व्यक्त...
वाशिमच्या अडोळी येथे पेटवली दुचाकी..
बुलढाणा इथं रविकांत तुपकर यांच्या सरसकट कर्जमाफी आंदोलनाला समर्थ देत पेटवली दुचाकी...
सतीश इडोळे असं दुचाकी पेटवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव...
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे या वर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे.
सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय आणि निर्धारित नियमांचे उल्लंघन करून नालेसफाईच्या कामावर तैनात केले जात असल्याची तक्रार दाखल झाल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.
आय टी पार्क हिंजवडी परिसरात ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली आहे. फेज वन येथे एका मद्यधुंद आलिशान कार चालकाने दुचाकी वाहन चालकाला ड्रंक अँड ड्राईव्ह करत जोरदार धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आलिशान कार मध्ये बसलेले सहा तरुण मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होते.
नंदुरबार तालुक्यातील सैतान गावात शेतकरी पुत्राने गावात स्वतःची प्रेत यात्रा काढत केला सरकारचा निषेध....
मागण्या पूर्ण होत नाही म्हणून शेतकऱ्याला विहिरीत मारली उडी....
शेतकरी प्रमोद पाटील यांना समजावण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू....
विहिरीत उडी मारत शेतकऱ्याने केला सरकारचा निषेध....
शेतकऱ्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न
जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर संदर्भात तातडीचा संदेश पाठविण्यात आला असून, 48 तासांच्या आत जुने वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याच्या सूचना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता महावितरणाच्या संदेशामुळे सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आकाशवाणीच्या ९० वर्षांच्या वाटचालीदरम्यान वृत्त विभागाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
भारतीय माहिती संवाद अधिकाऱ्यांचे कायमस्वरूपी पद उपलब्ध नसल्याची सबब पुढे
पुण्यातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप
वृत्त सेवेच्या भवितव्याबाबत पत्रकार आणि श्रोत्यांमध्ये अस्वस्थता
या निर्णयाविरोधात नागरी विमान उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन
वाहतूक पोलिस ऑन ड्युटी असताना झालेल्या वादातून राजगड पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार प्रशांत राऊत यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली.
या हल्ल्यात राऊत जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले..
या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार आहे
आसनगाव येथील जोंधळे कॉलेजच्या
इमारतीची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे का
तसेच संस्थेकडून घरपट्टी कराची आकारणी करणयात आली आहे का ?
या बाबत माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मागविलेल्या माहितीत महत्त्वाची बाब समोर आली आहे.
ग्रामपंचायत आसनगाव यांच्या दप्तरी जोंधळे कॉलेतनच्या इमारतीची कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागपूरच्या हिंगणा नगरपंचायत मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सहा नगरसेवक नॉटरीचेबल
सहाही नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची कुजबुज
एक हजार कोटींपेक्षा अधिकच्या धान घोटाळ्या प्रकरणात नाना पटोलेंच्या पत्राचा गैरवापर
गडचिरोली ते मंत्रालयापर्यंत तार जुळल्याचा संशय
महसूलमंत्री बावनकुळेंनी दिले छगन भुजबळांना फेर तपासणीबाबत पत्र
दक्षिण आफ्रिकेत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ या दोघांनीही यशस्वीपणे ९० किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग दरम्यानच्या अत्यंत आव्हानात्मक 'अप रन' मार्गावर पार पडलेल्या या स्पर्धेत अभिजित पड्याळ यांनी पहिल्याच सहभागात ९ तास ५१ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली
वेंगुर्ला तालुक्यातील आजगाव-धाकोरा येथे मायनिंग सर्वेक्षणावरून वाद पेटला आहे.
ड्रोन सर्वे करत असताना 7 जणांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले व त्यांचा ड्रोन फोडून टाकला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी हा ड्रोन सर्वे करण्यास सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हाबळेश्वर येथील हेरिटेज क्षेत्रातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोड आणि उत्खननप्रकरणी संबंधित संस्थेच्या चेअरमन आणि सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर महाबळेश्वर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात परवानगीशिवाय वृक्षतोड आणि उत्खनन केल्याचा आरोप असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
तसेच उच्चस्तरीय समितीच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘विद्यार्थी सुरक्षा उपक्रमा’अंतर्गत भुसावळ शहरात दामिनी पथकाने विशेष मोहीम राबवली. शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक काळे व त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. तसेच टवाळखोरांवर वचक बसवण्यासाठी विशेष गस्त घालण्यात आली. विद्यार्थ्यांना पोलीस हेल्पलाईन व तक्रार निवारण यंत्रणेची माहिती देत सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.
इंदापूर शहरातील कचरा डेपोला काल रात्री अचानक आग लागली.
नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
मात्र पालखी सोहळा जवळ आला की कचरा डेपोला आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.
आग लागली की लावली? असा थेट सवाल नागरिक करत असून, याप्रकरणी नगराध्यक्ष व संबंधित ठेकेदारांनी खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
बुलढाणा पाटबंधारे विभागाच्या आजच्या जलाशय अहवालानुसार जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प मिळून एकूण जलसाठा केवळ 22.37 टक्के शिल्लक आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख खडकपूर्णा धरणात शून्य टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला असून मृतसाठ्यावर परिस्थिती पोहोचली आहे.
नळगंगा व पेनटकळीसह अनेक प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे.
मान्सून अद्याप दमदारपणे सक्रिय न झाल्याने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाले असून प्रशासनाने तातडीने नियोजन न केल्यास नागरिकांसह शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे
अमरावतीच्या अचलपूर मध्ये चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली अचलपूर शहरातून धिंड...
कायद्यात तर फायद्यात राहाल अमरावती पोलिसांचा संदेश..
अचलपूर या ठिकाणी नऊ तारीखेला झाला होता चाकू हल्ला..
दोन तरुणांची अचलपूर पोलिसांच्या वतीने परतवाडा या ठिकाणी दिंड काढण्यात आली.
यंदा एल-निनोच्या तीव्र प्रभाव आहे पाऊस कमालीचा लांबणीवर पडलाय
अशा बिकट परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 75 प्रकल्पांमध्ये केवळ 33% इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे.
भविष्यात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ नये
यासाठी शासनाने तातडीने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या असून संपूर्ण जिल्हा प्रशासनाला हाय अलर्ट वर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नवापूर शहरात दरवर्षी जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावीत यांनी पुढाकार घेतला आहे.
काळआंबा परिसरात माता भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून 5 हजार लिटर क्षमतेच्या सिटेक पाण्याच्या टाक्या बसवल्या असून, नुकतेच याचे लोकार्पण करण्यात आले.
कापूस लागवडीसाठी मान्सूनपूर्व आणि 30 जून पर्यंतचा कालावधी महत्त्वाचा मानला जात असून यातून शेतकरी अधिक कापूस उत्पादनासाठी घाई करतात कालावधी लांबला तर कापसाचे उत्पादन कमी येते यावर्षी मान्सूनची आगेकूच रेंगाळली आहे.20 ते 22 जून नंतरच पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे,यामुळे या कालावधीत नंतरच शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे.
आज नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आहे. राजस्थानधील जयपूर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.