राज्यात अजित पवारांनी एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे यंदाच्या कार्तिकीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान राज्य शासनाने तसे परिपत्रक काढून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देऊन कार्तिकी एकादशीच्या महापूजेला येण्याचे निमंत्रण दिले आहे. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला.
मुंबईहून पालघरच्या दिशेने जात असताना चिंचोटी नायगाव परिसरात पालकमंत्री गणेश नाईक यांचा ताफा अडकला होता.
सुरक्षारक्षक तसेच वाहतूक पोलिसांच्या मदतीने हा ताफा बाहेर काढण्यात आला.
मात्र पालकमंत्र्यांचा ताफा विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे गुजरात लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
सलग चौथ्या दिवशीही मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
पालकमंत्र्यांच्या गाड्या काढण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांच्या गाड्या अडवून ताफा काढला जात असल्याचा आरोप प्रवासी नागरिकांनी केला आहे.
गोवंडी शिवाजी नगर वॉर्ड क्रमांक १३६ मध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्या सहकाऱ्यांसोबत मैदानाच्या सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ करिता गेले असता तेथील काही नागरिकांनी अबू आजमी यांना विभागातील प्रश्नांवरून धारेवर धरले यावेळी अबू आझमी यांचे जवळचे सहकारी पदाधिकारी फाद आझमी व कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला आहे याप्रकरणी शिवाजीनगर गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस करत आहे
सोलापुरात ध्वनी प्रदूषनावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासनानं घेतलेल्या धार्मिक गुरूंच्या बैठकीनंतर एक अनोखा उपक्रम सुरु झाला आहे. ध्वनीप्रदूषण न करता अजान पोहोचवण्यासाठी ‘ऑनलाईन अजान ऍप’ तयार करण्यात आलं आहे. सोलापुरातल्या फ़ॉरेस्ट परिसरातील बडी मशीदने हा अनोखा प्रयोग केलाय. तामिळनाडूमधील एका डेव्हलपरनं हे ऍप बनवलं असून,मोबाईलवरूनच अजाण ऐकता येते आणि सूचना देण्याची सुविधाही यात आहे.धार्मिक आचरण कायम ठेवत तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो याचं सोलापुरातलं हे उत्तम उदाहरण ठरतंय.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात मातोश्री निवासस्थान येथून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी निघणार आहे.काल देखील सर्व पक्षीय नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन मतदार यादीतील घोळासंदर्भात निवेदन दिले होते.
सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा परिसरातील एका घरात गोमांस साठवल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ८० किलो गोवंश सदृश्य मांस जप्त केले असून, याप्रकरणी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा आणि सनोबर भाऊद्दीन ख्वाजा या दोघांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घराची झडती घेण्यासाठी पोलीस पोहचले असता, घरातील व्यक्तींनी सुरुवातीला दरवाजे उघडण्यास नकार दिला. मात्र पोलीसांनी खाक्या दाखवताच संशयितांनी दरवाजा उघडला. यावेळी घरात सुमारे ८० किलो गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस मिळून आले.
सकाळपासूनच जिल्हा ढगाळ वातावरण; जिल्ह्याला पुन्हा पाऊस झोडपणार
छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट
मराठवाड्यातला शेतकरी अतिवृष्टीतून सावरत असतानाच पुन्हा पावसाचे संकट
आभाळात ढग दाटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
आजी माजी नगरसेवक तसेच विविध पक्षातील मुख्य पदाधिकारी करणार भाजप मध्ये प्रवेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत "मेगा प्रवेश" सोहळा होणार संपन्न
आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजप ची रणनीती होणार यशस्वी
येत्या काही दिवसात या "मेगा प्रवेश सोहळ्या"चे आयोजन केलं जाणार
स्ट्राँग उमेदवार असेल तर त्याला पक्ष प्रवेश दिला जाणार असा सुतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात केला होता
पुणे शहराच्या राजकारणातील अनेक वर्षांपासून असलेले पदाधिकारी करणार प्रवेश
वाशिम च्या रिसोड नगर परिषदेत कार्यरत असलेल्या व्हॉल्व्हमन या पदावरील कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पदोन्नतीचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संतोष चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जहीर अहमद खान अजमल खान (वय ५२) या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संबंधित आरोपी सध्या फरार आहे. प्रकारामुळे रिसोड नगर परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीवर काम सुरु करण्याचे प्रशासनाला दिले आदेश
पुणे महापालिका निवडणुकीसाठी १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार त्यासाठी ४ सदस्यांचे ४० प्रभाग आणि ५ सदस्यांचा एक प्रभाग असणार
महापालिका पशुवैद्यकीय विभागाचा प्रायोगिक उपक्रम संख्या समजण्यास मदत
भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने निर्भीजीकरण लसीकरण करणे आव्हानात्मक ठरत आहे
शहरात आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होत असल्याने नागरिकांना त्रास
भटक्या श्वानावर मायक्रोचीप द्वारे आता नजर ठेवण्यात येणार आहे
जयपुर आणि दिल्ली शहराच्या धर्तीवर हा प्रयोग तत्त्वावर उपक्रम राबवून चा निर्णय घेण्यात आला आहे
भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी जाहीर झालेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार, प्रभागांनुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.
माझ्यावर मकोका का लावला म्हणत छत्रपती संभाजीनगर मधील कुख्यात गुंड टिप्या उर्फ जावेद शेखने कारागृहात पोलिस हवालदारासह साक्षीदाराला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचे समोर आलंय. याप्रकरणी त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणि शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा गुन्हा हसूल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. टीप्याच्या या सगळ्या कारणामुळे काही महिन्यांपूर्वी त्याची शहरातून धिंड काढण्यात आली. तरीही तो काही थांबत नव्हता. शहरात खून करण्याचा प्रयत्न करणे, दहशत माजवणे अशा घटना वारंवार करत असल्यामुळे टिप्यावर मोक्काची कारवाई केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीच्या वेळी त्याला मोक्काची कारवाई केल्याची माहिती मिळाली. तेव्हापासूनच तो बिथरला होता. सुनावणी पूर्ण होऊन बाहेर आल्यापासून त्याने कुरबुर सुरू केली होती. त्याची वारंवार समजूत घालूनदेखील तो ऐकत नव्हता. दुपारी दोनच्या सुमारास त्यास पुन्हा कारागृहात डांबत असताना त्याने गेटवरच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करून माझ्यावर मोक्काची कारवाई कशी काय केली? असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरू करून कारागृहात जाण्यास नकार दिला. त्याला समजावून सांगणाऱ्या उपनिरीक्षक कैलास जाधव यांच्यासह साक्षीदाराला त्याने धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्याने जाधव यांची कॉलर पकडून 'बाहेर आल्यावर तुला बघून घेतो' अशी धमकी दिली. टिप्याचा माज उतरत नसल्याचे बघून अन्य पोलिसांचा बंदोबस्त मागवून त्याला कारागृहात डांबले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पूर्वसंध्येलाच निवडणूक विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर....
निवडणूक पूर्वी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यात अख्खे गावे गायब माजी सभापती शशिकांत मंगळे यांचा आरोप.
शशिकांत मंगळे यांनी जिल्हाधिकारी यांकडे केली तक्रार
- नागपूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांची धडक कारवाई
- तब्बल 309 गुंडांना केले हद्दपारची कारवाई
- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शांतपणे पार पडाव्या यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
तब्बल 9 ते 10 तास शाळकरी मुलांच्या सहलीसाठी आलेल्या बसेस या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या
स्थानिक नागरिकांनी मध्यराती या शाळकरी मुलांच्या 12 बसेस सुखरूप बाजूला करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.
स्थानिक वाहतूक पोलीस प्रशासन या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निष्फळ ठरले असल्याचा आरोप स्थानिक नागरिक सुशांत पाटील यांनी केला आहे.
राज्यातील अनेक भागातून पावसाने माघार घेतली आहे.हा पाऊस पडत असताना यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे काही भागात वादळवाऱ्यासह कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सध्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस वेचणीला वेग आलाय अशा त जर परतीच्या पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विदर्भातील शेतकऱ्यांची दिवाळी सोयाबीन पिकाच्या भरोश्यावर साजरी होते,मात्र यावर्षी सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने सोयाबीन खराब झालं,परिणामी सोयाबीनचं उत्पन्न फारच कमी शेतकऱ्यांना झाल आहे,तर दुसरीकडे नवीन सोयाबीन अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालं,परंतु अमरावतीमध्ये खाजगी बाजारात हमीभावापेक्षा प्रतिक्विंटल मांगे दीड ते 2 हजार रुपयांनी कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहे,तर दुसरी कडे अजूनही शासकीय खरेदी सुरू झाली नाही,सोयाबीनचा शासकीय हमीभाव 5 हजार 328 प्रतिक्विंटल आहे,तर व्यापाऱ्याकडून 3ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव सोयाबीनला मिळत आहे,त्यामुळे व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे पाडलेल्या भावावर सरकारने नियंत्रण आणावे, आणि तातडीने नाफेडची सरकारी सोयाबीन खरेदी चालू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
राज्य निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी बुधवार ११ वाजता एकत्र महाविकास आघाडी आणि सहयोगी शिष्टमंडळास भेटतील आजची अपूर्ण चर्चा पुढे जाईल “१२.३० वाजता शिवालय येथे संयुक्त पत्रकार परिषद होईल.” निवडणूक आयोगाला अधिक पारदर्शक बनवण्याचा मोहिमेत सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे ।संजय राऊत
सकाळी ७ पासून आज अजित पवार यांचा दौरा
पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील तानपुरा पुलाची पाहणी
नव्याने उभारण्यात आलेल्या तानपुरा पुलाची पाहणी
छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या या पुलाची अजित दादांकडून पाहणी
पुलाची पाहणी करून अजित दादा पिंपरी चिंचवडला होणार रवाना
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना २०,००० रुपये बोनस मिळणार आहे. सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाकडून कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती , मात्र आज शिवसेनेच्या युनियनचे रवी पाटील यांनी थेट आयुक्तांची भेट घेत बोनस संदर्भात चर्चा केली असता आयुक्तांनी २० हजार रुपयांचा बोनस निश्चित केल्याची माहिती शिवसेनेचे कामगार नेते रवी पाटील यांनी दिली हा बोनस जाहीर झाल्याने केडीएमसीमधील कायम कर्मचारी, परिवहन कर्मचारी आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा चांगलीच गोड होणार आहे
जालना नांदेड समृद्धी महामार्गात बाधित होणारे शेतकरी आक्रमक झालेत. रात्री उशिरापर्यंत जालना सिंदखेड राजा महामार्गावरील देवमूर्ती येथे समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.जवळपास सात ते आठ तास शेतकरी महिलांसह रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते.जालना नांदेड समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी गेल्या 160 दिवसापासून आंदोलन सुरू आहे.समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीची दखल सरकार घेत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जालना सिंदखेड राजा महामार्गावर देवमूर्ती येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केल.
तळोजा एम.आय.डी.सी. येथील ए-३ या भुखंड अनियमित पद्धतीने विभाजित करून विक्री केल्या प्रकरणी आलेल्या तक्रारीबाबत विधानभवन येथे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दालनात आढावा बैठक बोलविण्यात आली होती. याप्रकरणी शासनाचा अंदाजे ५०० कोटींचा महसूल बुडवला गेला असा आरोप करण्यात आला आहे.महादेव इम्पेंक्ट्स् कंपनीकडून अवैधरित्या एम.आय.डी.सी. च्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले.भुखंडाचे विभाजन करुन उद्योजकांना विक्री करणे आले.
पनवेल महानगरपालिकेच्या कारभाराबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहेत अशाच प्रकारे 50 सून अधिक कर्मचारी पदनियुक्ती करण्यात आले आहेत कर्मचाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र तांत्रिक अहर्ता आणि शैक्षणिक कागदपत्रे देणे बंधनकारक असताना सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांनी कागदपत्र सादर न करताच पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापना प्रशासनाने 50 हून अधिक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांचा प्रमोशन करण्यात आला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकरण झाल्याचं आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरीषकर यांनी केला आहे
स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळच्या वडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विरोधकावर जोरदार टीका केली. महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला पुढे जाण्यासाठी तयार आहे. आमच्याकडे उमेदवार असूनही महायुतीचा भाजपचा कार्यकर्ता संतोष दाभाडे यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा नगराध्यक्ष म्हणून नाव राष्ट्रवादीने घोषित केले. तळेगाव दाभाडे येथील सर्वे करत असताना 75 टक्के मतदार आमच्या बाजूला असूनही आम्ही मोठेपणाने भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय दिला.. मात्र येथील पुढाऱ्यांना आम्ही दिल्या उमेदवाराला विरोध केला. तुम्हाला जर यात माती कालवायची असेल तर नक्कीच कालवा. अशी जोरदार टीका मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विरोधकावर केली... या मेळाव्याला तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. दरम्यान या मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे केले.
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांनी सध्या रिल्स बनवण्याच्या माध्यमातून दहशत पसरवणारे,अवैध धंदे करणारे यांच्या विरोधात कठोर कारवाई करत नाशिक जिल्हा कायद्याचा जिल्हा ही मोहीम सुरू करत ग्रामीण भागातील स्थानिक पोलीस एक्शन मोडवर आले असून,नाशिकच्या नांदगाव मध्ये रिल्स बनवत दहशत पासवणाऱ्या दोघा तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे,रिल्स बनवत ती सोशल मीडियावर या दोघा तरुणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
ऐन दिवाळीच्या वेळेस विक्रीसाठी आणण्यात आलेल्या रांगोळी बरोबरच रंग तसेच दिवाळीच्या साठी लागणाऱ्या वस्तू विकणाऱ्यावर पालिकेचा अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई केली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांनी राग व्यक्त केला. दिवाळीच्या सणात व्यवसाय करून देण्याची मागणी केली आहे. सदरची कारवाई स्टेशन परिसरातील असलेल्या 150 मीटर चा हद्दीत असल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.
पालघरच्या डहाणू विधानसभेत शिवसेना शिंदे गटाने मोठा डाव टाकत नगरपरिषद हद्दीतील बड्या नेत्यांना आपल्या गळाला लावल आहे . डहाणू नगरपरिषद हद्दीतील बड्या नेत्यांपैकी एक असलेल्या डहाणू नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला . राजू माच्छी यांच्यासह डहाणू नगरपरिषद मधील सहा माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला. येत्या नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने आपला मित्र पक्ष असलेल्या भाजप सह राष्ट्रवादी , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे . राजू माच्छी आणि त्यांच्यासोबत पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे डहाणू नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट स्वबळाची तयारी करत असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत . विशेष म्हणजे डहाणू नगरपरिषदेवर नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हेच दावा करत असल्याचं समोर येत असतानाच राजू माच्छी यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाच मोठ आवाहन निर्माण झाल आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.