Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, पंतप्रधान मोदी मणिपूर दौऱ्यावर जाणार, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Pandharpur: पंढरपुरात जोरदार पाऊस

पंढरपुरात आज कृत्तिका नक्षत्राच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळी अर्धा तासाहून अधिक काळ धो धो पाऊस पंढरपूर शहरात कोसळला. त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसरात आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली. तर शहरातील नागरिकांचे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले दिसून आले.

Nanded: नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे मराठा - ओबीसी वाद पेटला

शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.याला विरोध म्हणून नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील मराठा समाज बांधवांनी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 21 विद्यार्थ्यांचे दाखले मागितले आहेत. तर आता या विरोधात ओबीसी समाज बांधव सुद्धा आक्रमक झाला असून ज्या मराठा संस्था आहेत त्या मराठा संस्थेत आम्ही ओबीसी समाजाचे विद्यार्थी शिकवणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी घेतलेली भूमिका ही कायदेशीर आहे असं मत ओबीसी बांधवांनी व्यक्त केल आहे. आरक्षणाच्या लढाईमुळे गावगाड्यातील वातावरण चांगलं तापलं असून मराठा विरुद्ध ओबीसी असावा आता वाद पेटला आहे.

Amravati: अमरावतीमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाचा मोर्चा

अमरावतीमध्ये राहुल गांधीं यांच्या विरोधात भाजपा महिला मोर्चाचं राजकमल चौकात आंदोलन.....

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा AI व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी भाजप आक्रमक....

भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी...

भाजप महिला मोर्चाच्या वतीने काँगेस विरोधात आक्रमक..

Nandurbar: आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

आदिवासी बांधवासाठी नर्मदा काठावर आरोग्य सेवा देणाऱ्या बोट रुग्णवाहिका पाहणी दरम्यान चूक...

नर्मदा नदीवर विशाल पात्रावर तरंगणाऱ्या बोट रुग्णवाहिकेत एकही लाइफ जॅकेट नाही....

लाइफ जॅकेट विनाच आरोग्य मंत्रासोबत आमदार आमश्या पाडवी यांच्या जीव धोक्यात घालून प्रवास....

बोट ॲम्बुलन्स मध्ये लाइफ जॅकेट अनिवार्य असताना एकही लाइफ जॅकेट नसल्याचा धक्कादायक प्रकार...

Pandharpur: भीमा साखर कारखाना कामगारांचे आंदोलन

पंढरपूर जवळच्या भीमा सहकारी साखर कारखाना कामारांनी थकीत पगाराच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा मागील तीन वर्षांपासून पगार थकीत आहे. शिवाय 68 महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी ही जमा केला नाही. यासह विविध मागण्यासाठी कामगारांनी कारखाना गेटवर आंदोलन सुरू केले आहे. कामगारांनी कारखाना प्रशासनाच्या विरोधात घोषणी देत थकीत पगार देण्याची मागणी केली आहे.

Hingoli: हिंगोलीत परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल

हिंगोलीत पावसामुळे शेतकरी हवालदिल

मदतीसाठी सरकार कडे याचना करत शेतकरी साम टीव्हीवर ढसाढसा रडला

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आरळ ,तेलगाव शिवारात दीड हजार हेक्टर शेती 24 तासांपासून पाण्याखाली

तर गुंडा गावात दोन महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्युमुखी

Tuljabhavani Mandir: शारदीय नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किमतीत वाढ, 20 सप्टेंबर पासून नवे दर लागू

दोनशे रुपयांचा देणगी दर्शन पास तीनशे रुपयांना मिळणार, तर पाचशे रुपयांच्या देणगी दर्शन पासची किंमत 1000 रुपये असणार

तसेच स्पेशल गेस्ट रेफरल पासची किंमत ही दोनशे रुपयावरून वाढ होऊन पाचशे रुपये करण्यात आली

शिवाय सकाळच्या अभिषेक पासची संख्या तीनशेवरून चारशे करण्यात आली

तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून परिपत्रक काढून नवे दर जाहीर करण्यात आले

Amravati: अमरावती जिल्ह्यातील मोझरी बसस्थानक परिसरात मोठे खड्डे...

बस चालकांना बस डेपोत टाकताना आणि बाहेर काढताना होत आहे अडचण..

खड्डे मोठे असल्याने अनेकदा बस चालकांचे सुटते नियंत्रण...

जीव घेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष खड्डे बुजवण्याची बसचालकांची मागणी..

Mahad: महाडमध्ये किरकोळ भांडणाच्या वादातून मित्राची हत्या

चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणांत एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राची पुलावरुन नदी पात्रात ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील शिवथर येथे घडली आहे. तळशीराम गायकवाड असे मयताचे नाव असून तुषार येनपुरे याने तुळशीराम याची पुलावरून नदीच्या पाण्यात लकटून हत्या केली आणि सोबत असलेल्या मित्रांना जीवे ठार मारण्याचा दम भरल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळशीराम गायकवाड, तुषार येनपुरे, रोशन येनपुरे, गणेश सुतार आणि आणखी एक अनोळखी मित्र असे पाच जण कुभे शिवतर येथून आंबे शिवथर येथे किराणामाल घेऊन चालत निघाले होते. यावेळी झालेल्या किरकोळ वादाचे पुर्नवसन मारामारीत झाले. या हत्येची नोंद महाड MIDC पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Nanded: नांदेडच्या पुराच्या पाण्यात तरुणाची स्टंटबाजी

काल झालेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.त्यामुळे गोदावरी नदीपात्राला मोठा पूर आला आहे. गोदावरी नदी पात्रावरील वाजेगाव येथील बंधारा संपूर्ण पाण्याखाली गेलेला असताना तीन तरुणांनी या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जीव धोक्यात घालून हे तिन्ही तरुण आजूबाजूला सर्वत्र पाणी असताना पुराच्या पाण्यात वावरताना पाहायला मिळत आहेत.

Amravti: अमरावती जिल्ह्यात 16 रेशनची दुकाने रद्द, एक निलंबित

अमरावती जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने अमरावती जिल्ह्यात केलेल्या तपासणीत रेशनमध्ये तफावत आढळून आल्याने ५२ रेशन दुकानदार दोषी आढळून आले आहे. यातील १६ दुकाने रद्द करण्यात आली असून एक दुकान निलंबित करण्यात आले आहे. या दुकानदारांना २० लाख १४ हजार १६५ रुपयाचा दंड ठोठाविला आहे.जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून रेशनकार्डधारकांना सुविधा मिळण्याकरिता त्यांना धान्य मिळण्यास त्रास होवू नये याकरिता विविध पथकांकडून एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ या दरम्यान तपासणी मोहिन राबविली होती. यामध्ये १९१६ रेशन दुकानांपैकी १५६१ दुकानांची तपासणी करण्यात आली. याशिवाय ९२ दुकानांमध्ये आकस्मिक भेट देण्यात आली. तर प्राप्त तक्रारीवरुन १३ दुकानांची चौकशी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांचे आदेशावरुन करण्यात आली. या तपासणीमध्ये ३५ दुकानदार किरकोळ दोषी, एक दुकानदार मध्यम व १६ दुकानदार हे गंभीर दोषी आढळून आले. असे एकुन ५२ रेशन दुकानदार दोषी आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी गंभीर दोषी आढळलेल्या १६ दुकाने रद्द केली असून मध्यम दोषी आढळलेले एक दुकान निलंबीत केले आहे. या सर्व दुकानदारांवर

धनगरांना एसटी आरक्षण दिलं नाही तर वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

धनगर आरक्षण एसटी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला आहे .या मागणीसाठी धनगर समाज बांधव आक्रमक झालेले आहेत. पुणे येथे सर्वपक्षीय सर्व संघटना धनगर समाजाच्या एकत्रित 15 सप्टेंबर 2025 रोजी पत्रकार भवन येथे निर्णायक बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मेंढरे सोडण्याचे काम येथील धनगर समाज बांधव करेल आणि यशवंत संघर्षनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी फडणवीस सरकारला इशारा दिलेला आहे. की जर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी नाही झाली तर वर्षा बंगल्यावर एका महिन्याच्या आत आत्मदहन करेल रॉकेल टाकून स्वतःला पेटवून देईल एसटी आरक्षणासाठी अनेक बलिदान झालेले आहेत त्यात अजून एक नवीन बलिदान असेल असा इशारा यशवंत संघर्ष सेनेने दिला आहे.

चिखलदऱ्यात 1220 मिलिमीटर पावसाची नोंद

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा 1220 मिलिमीटर पावसाची नोंद..

चार महिन्यात अडीच लाखावर पर्यटकांची हजेरी..

चिखलदऱ्याचा परिसर पावसामुळे हिरवागार.

चिखलदरा परिसरात अल्लाददायक वातावरण असल्याने सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची गर्दी वाढली

भीमकुंड धबधबा देखील प्रवाहित झालाय..

अडीच लाख पर्यटक आत्तापर्यंत चिखलदऱ्यात दाखल झाल्याने महानगरपालिकेला 56 लाखाचे उत्पन्न प्राप्त.

Parbhani: परभणीत जोरदार पावसाचा कहर

परभणी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस बरसलाय याच पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे याचप्रमाणे शहरातील रेल्वे स्टेशन बाहेरी परिसरात रोडवर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनला जाता येणे कठीण झाले. सकाळच्या सुमारास स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी असते आणि याच ठिकाणी स्टेशनवर जाण्यासाठी परिसरात पाणी झाल्यामुळे पाण्यातून प्रवाशांना वाट काढत स्टेशनमध्ये जावे लागत आहे यामुळे प्रवाशांची चांगली च गैरसोय होताना दिसत आहे

Akkalkot: अक्कलकोटमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस

अक्कलकोट तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची झाली दैना

सांगोगी - तळेवाडी पुला जवळील रस्ता पूर्णतः खचला

अक्कलकोट तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने सांगोगी - तळेवाडी पुलावरील सुरक्षाकडे ही तुटले

यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून बोरी नदीवरील पुलावरून करावा लागतोय प्रवास

भंडाऱ्याच्या मिनी मंत्रालयात अध्यक्षपदावर येणार ओबीसी चेहरा

राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. यामुळे सर्वच पक्षांमध्ये इच्छिकांकडून अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदारी राहणार, असे चित्र आतापासूनच दिसायला लागले आहे.ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक दि. १२ डिसेंबर २०२१ आणि दि. १९ फेब्रुवारी २०२२ अशी दोन टप्प्यांत झाली होती. ५२ सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ३९ गणांमध्ये, तर दुसऱ्या टप्प्यात १३ गणांमध्ये निवडणूक झाली होती. त्यानंतर दि. १० मे २०२२ तारखेला ही जिल्हा परिषद अस्तित्वात आली होती. पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून त्याची मुदत आता दि. १० मे २०२७ रोजी संपणार आहे.विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा कार्यकाळ कार्यकाळ एकाच वेळी पूर्ण होत आहे. ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षापासून लांबणीवर पडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील दोन महिन्यांत या निवडणुका होण्याची शक्यता आहे. ग्रामीण विकास विभागाने शुक्रवारी जाहीर केलेले जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण हे पुढील अडीच वर्षांसाठी लागू होणार आहे.

डॉक्टरांच्या नावाचा व बनावट नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून विमा कंपनीची फसवणूक.

पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या बनावट सही व नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून विमा कंपनीची दिशाभूल करून लाखो रुपये उकळणाऱ्या चौघांविरुद्ध खामगाव येथील डॉ.ब्रह्मानंद टाले या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या तक्रारीवरून फलटण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे फलटण येथे डॉ. ब्रह्मानंद टाले यांची बनावट सही व नोंदणी क्रमांक वापरून हे भामटे रक्त चाचणीचे रिपोर्टही देत होते. 5 ऑगस्ट 2025 रोजी "बुलेट हेल्थकेअर सर्व्हिसेस फॉर रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स" कंपनीचे प्रतिनिधी यांनी खामगाव येथे येऊन डॉ. ब्रह्मानंद टाले यांना काही रक्त चाचणीचे अहवाल दाखवले व हे तुम्ही प्रमाणित केले आहे का..? असं विचारल असता डॉ. ब्रह्मानंद टाले यांना शंका आली व हे रिपोर्ट मी प्रमाणित केले नाही व यावर माझी बनावट स्वाक्षरी व बनावट नोंदणी क्रमांक आहे.

धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून कॅम्पेनिंग

सोशल मीडियावर कधी काय चर्चेला येईल सांगता येत नाही.धाराशिव मध्ये एका पोलिटिकल कॉम्पेनिंगची जोरदार चर्चा आहे. धन्यवाद खा. ओम आम्हाला कळालं.... भाजपकडून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात हे सोशल मीडियावर कॅम्पेनिंग सुरू आहे.राजकीय विरोधक असलेल्या ओमराजे विरोधात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या समर्थकांकडून हे कॅम्पेनिंग सुरू असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाल असून चर्चेला उधाण आलं आहे. भाजपला या कॅम्पेनिंग मधून नेमकं म्हणायचे काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची पाच मतं फुटल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला होता.त्यानंतर धाराशिव मध्ये खासदार असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात भाजपकडून धन्यवाद खासदार ओम म्हणत सुरू केलेले कॅम्पेनिंग चर्चेत आहे.श्रीकांत शिंदे यांचा दावा आणि याचा काही संबंध आहे का ? अशीही एक चर्चा सुरू आहे.दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांनी भाजपाने सुरू केलेल्या कॅम्पिंगला बालिशपणा असल्याचं म्हटलय.

Maharashtra Live News Update: मिनी मंत्रालयावर चौथ्यांदा येणार महिलाराज,गट आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींला आला वेग

राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करताच राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.धाराशिव जिल्हा परिषदेवर सलग दुसऱ्यांदा महिलाराज येणार आहे.माञ यावेळी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी अध्यक्षपद राखीव आहे.जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून तीन वेळा अध्यपदाची महिलेला संधी मिळाली आहे.त्यामध्ये दोनवेळा आरक्षित प्रवर्गातून तर एक वेळा खुल्या प्रवर्गातुन महीलांनी अध्यपद भुषवले आहे.गटाचे राजकीय आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींला वेग आला आहे.सोशल मिडियावर महिला नेत्यांमध्ये शर्यत पाहायला मिळणार आहे.समर्थकाकडुन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल होत आहेत तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत यांच्या नावाची पोस्ट देखील भावी अध्यक्षा म्हणून व्हायरल होत आहेत. महायुतीमधील भाजप व शिवसेना शिंदे गट यातील दोन उमेदवार इच्छुक असल्याचे सोशल मिडीयातुन समोर आल आहे.

देशी,विदेशी दारूच्या दरात वाढ केल्याचा फटका...ऑगस्ट महिन्याच्या विक्रीत झाली घट

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात देशी आणि विदेशी दारूच्या दरात वाढ केल्याचा फटका ऑगस्ट महिन्याच्या विक्रीतून समोर आल आहे. वाशिम जिल्ह्यात विदेशी दारूच्या विक्रीत 16. 69 टक्क्यांनी घट झाली आहे. तर देशी दारूच्या विक्रीत मात्र चार 4 टक्क्याची घट झाल्याचं आकडेवारीतून समोर आला आहे. देशी, विदेशी दारूच्या विक्रीत घट झाली असताना दुसरीकडे मात्र बियरच्या विक्रीत मात्र 17 टक्क्यांनी वाढ झाल्याचं बघायला मिळालं.

वाशिम जिल्ह्यात गतवर्षी ऑगस्ट महिन्यात विदेशी दारूची 1 लाख 12 हजार 390 लिटरची विक्री झाली होती. तर या ऑगस्टमध्ये 93 हजार 636 लिटर ची विदेशी दारू विकल्या गेली. यात तब्बल 18 हजार 754 लिटर दारूच्या विक्रीत घट झाली आहे. यात 16.69 टक्क्यांनी कमी झाली आहे.

पुण्यात ईडीची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेला ३२ लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांनी फेब्रुवारी महिन्यात तक्रारदार ज्येष्ठ महिलेशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. महिलेच्या नावाने एका कंपनीची नोंदणी झाल्याचे आणि त्यांच्या नावाचा गैरवापर करून एका बँकेत खाते उघडल्याचे सांगण्यात आले. त्या खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप करून महिलेस ईडीची कारवाई होणार असल्याची भीती चोरट्यांनी दाखविली. त्यानंतर मनी लाँड्रिंग करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ज्येष्ठ महिलेकडून बँक खात्याची गोपनीय माहिती मागितली. कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील,असे सांगून चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन रक्कम पाठविण्यास भाग पाडले.

- १३ वर्षांनंतर नागपूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्यासाठी पुरुषांनाही संधी

- नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव

- यंदा अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गातील पुरुषांसाठी राखीव

- २०१२ पासून नागपूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सलगपणे महिलांकडे आहे

- अध्यक्षपदी वर्णी लागेल म्हणून भाजप आणि कॅाग्रेसमधील अनेक ओबीसी नेत्यांच्या आशा पल्लवीत मोरिचेबांधणी होणार सुरु

- राज्य सरकराने पंचायतराज संस्थांच्या निवडणुकांतील आरक्षण सोडती नुकतीच जाहीर केली

- या सोडतीत नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसीसाठी निश्चित झालेय.

Maharashtra Live News Update: चांदीत एकाच दिवसात ३००० रुपयांची वाढ

जळगाव सोने-चांदीच्या भावामध्ये वाढ सुरूच असून एकाच दिवसात चांदीच्या भावात तीन हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख २९ हजार ५०० रुपयांवर पोहचली. सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १० हजार ५०० रुपयांवर पोहचले. ११ सप्टेंबरपर्यंत सोन्याने एक लाख १० हजार रुपयांचा टप्पा गाठला. तर चांदीही सव्वा लाखाच्या पुढे जाऊन ११ सप्टेंबर रोजी एक लाख २६ हजार ५०० रुपयांवर पोहचली. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी तर चांदीच्या भावात एकाच दिवसात तीन हजार रुपयांची वाढ झाली व ती एक लाख २९ -- हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. एक किलो चांदीसाठी आता एक लाख ३३ हजार ३८५ रुपये मोजावे लागणार आहे.

कौटुंबिक वादातून भुसावळमध्ये वादातून खून दुसरा गंभीर

भुसावळ, कौटुंबीक वाद झाल्याने आयान कॉलनीतील रहिवासी सुभान शेख यांची पत्नी माहेरी गेली.सुमारास सासरे व मामा जावायाची घरी समजूत काढण्यासाठी आले. मात्र, जावायाने मामसासरे समद शेख इस्माईल कुरेशी यांचा चाकूने खून केला, तर चाकू हल्ल्यात सासरे शेख जमील शेख शकूर गंभीर जखमी झाले. संशयित सुभान शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संशयित शुभान शेख याचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला. त्याचे पत्नीसोबत नेहमीच कौटुंबीक वाद होत असतं. वाद झाले, की पत्नी माहेरी निघून जायची. दोघांत वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली. जावायाची समजूत काढण्यासाठी शुभानचे मामा व सासरे भुसावळला आले. मात्र, शुभान याने केलेल्या चाकूहल्ल्यात मामा समद शेख इस्माईल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सासरे शेख जमील शेख शकूर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित शुभान शेख यास ताब्यात घेतले.

पोलिसाची दुकानदाराला मारहाण_विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिस ठाण्यात मारहाणीचा आरोप

अहिल्यानगर जिह्यातील लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोल्हार गावात पोलीस हवालदार रात्री दुकान बंद करण्याच्या नावाखाली दुकानदाराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय.. तक्रार घेतली जात नाही म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा पोलीस ठाण्यात विचारणा करण्यासाठी गेली असता तीला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होतोय.. या सगळ्या प्रकारामुळे, कायद्याचे रक्षण करणारेच सामान्य जनतेवर गुंडागर्दी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय..

nashik : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पाठलाग करत महिलेला लुटले

- नाशिकच्या रामवाडी परिसरातील धक्कादायक घटना

- महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची चैन दोन चोरट्यांनी केली लंपास

- महिलेच्या घरापर्यंत पाठलाग करत थेट घरात घुसून महिलेला लुटलं

- संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

- महिलेने या दोघा चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न अयशस्वी

- या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna Photos : ये लाल इश्क; अनारकली ड्रेसमध्ये रश्मिकाचं हिऱ्यासारखं लखलखतं सौंदर्य

Weak Relationship: नवरा- बायकोमधील या ६ चुकांमुळे नात्याचा होतो शेवट

Dilip Prabhavalkar: 'कलाकार झालो, पण बाबा नव्हते...'; अभिनय करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या वडीलांच्या आठवणीत दिलीप प्रभावळकर भावुक

हायवे, रेल्वे, लोकल अन् मेट्रो... नवी मुंबई विमानतळावर कोणत्या मार्गानं कसं जाल? वाचा सविस्तर

Raj Thackeray Setback : राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, प्रकाश महाजन यांचा मनसेला जय महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT