मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचे निलंबन करण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबन केले. नव्वद हजार ब्रासपेक्षा जास्त उत्खनन केल्याचा आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यासह सर्व नियम धाब्यावर ठेवून उत्खनन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
- नागपूरातील त्रीमुर्ती नगर परिसरातील बारमध्ये तोडफोड केल्याची व्हिडीओ व्हायरल...
- उर्वशी बारमध्ये पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने तोडफोड झाल्याची चर्चा...
- प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
- चार चे पाच जणांनी तोडफोड केल्याचा सीसीटीव्ही व्हायरल
- प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्याचं बोललं जातं असून आरोपींचा शोध सुरु असल्याची प्माहिती..
महाज्योती अंतर्गत संशोधकांना दिली जाणारी फेलोशिप मागील तीन वर्षापासून मिळालीच नसल्यानं संशोधक आज शुक्रवारी संतप्त होत ठिय्या आंदोलन केलं.
ऊस दर मागणीसाठी पंढरपुरात भजन आंदोलन करण्यात आलं
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाणीत सकाळी 11 वाजेपासून आंदोलन
आंदोलनामुळे आठ तासा पासून कारखान्याचे गाळप बंद
ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रूपये मिळावी या मागणीसाठी पांडुरंग कारखान्यावर आंदोलन सुरू.
वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अनेक तास ताटकळत थांबावे लागले.
अपघात झाल्यानंतर पोलिसांकडून एकेरी वाहतूक सुरू.
यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुकांना अर्ज वाटप आज पासून सुरु झालं आहे.मनसेच्या शहर कार्यालयात अर्ज घेण्यासाठी गर्दी झालीय.आज मनसेच्या शहर अध्यक्षकाकडून इच्छुकांना अर्ज वाटप सुरु करण्यात आली आहे.
इच्छुक उमदेवारांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. शिवसेना आणि मनसे युती झाली तर आम्ही युतीमध्ये लढण्यासाठी तयार आहोत. मनसेकडे ही मोठी गर्दी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी झाली आहे.
पुण्यातील मनसे चे नेते बाबू वागसकर यांनी लावला ठाकरे बंधूंचा फोटो
मनसे ने आज उमेदवारी अर्ज देण्यास केली सुरुवात
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात बाबू वागसकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो एका बॅनर वर लावून केला प्रचाराला सुरुवात
एका बाजूला मनसे ने अद्याप अधिकृत युती जाहीर केली नसली तरी सुद्धा उमेदवारांना दोन्ही भावांची युती अपेक्षित
रायगड जिल्ह्यातील सहा आसनी प्रवासी रिक्षाचालकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आपल्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन देखील कोणतीही कार्यवाही होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. सहा आसनी वाहनांची वयोमर्यादा किमान पाच वर्षांनी वाढवावी, सहाआसनीच्या परवान्यावर सहा आसनी बदली वाहन द्यावे, पासिंग फीची भरमसाठ वाढ कमी करावी, माणगाव येथील पासिंग ट्रॅक तातडीनं सुरू करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
बीडमध्ये मांजरसुंबा घाटात घाटात डिझेलच्या टँकरचा स्फोट झाला आहे. यामुळे ठिकठिकाणी डिझेल सांडले आहे.
यामुळे संपूर्ण परिसरात आगीचे लोट उठत आहेत.
काही वेळापूर्वीच हा स्फोट झाला असून धुळे सोलापूर महामार्गावर भेटीचे वातावरण पसरले आहे.
स्फोट कुठल्या कारणावरून झाला यामध्ये चालक आणि क्लिनर कुठे आहेत याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
शिर्डी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा...
महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शिर्डी परिसरात मोठी वाहतूक कोंडी...
अवजड वाहन धारकांसह साई भक्तांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप...
सावळीविहीर ते शिर्डी दरम्यान महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक...
एकेरी वाहतुकीमुळे वाहतुकीचा खोळंबा...
वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक..
कल्याण पश्चिम गोविंदवाडी बायपास परिसरात दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक्टिवा चालक प्रकाश पाटील वय – ४५ यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी प्रिया पाटील गंभीर जखमी झाल्या आहेत. पत्री पूल–दुर्गाडी–गोविंदवाडी रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक एका बाजूने सुरू होती. याचदरम्यान ट्रक आणि एक्टिवामध्ये जोरदार धडक होऊन हा अपघात झाला.
- राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयामुळे पालिका प्रशासनाला आता प्रत्येक झाडाचा हिशोब द्यावा लागेल
- महापालिकेला आता सर्व कागदपत्र द्यावी लागतील आणि पारदर्शकपणे सर्व काम होईल
- गरज पडल्यास नाशिककर म्हणून आम्ही देखील याचिका दाखल करू, पर्यावरणप्रेमींच्या प्रतिक्रिया
खडकपूर्णा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचा उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. याची दखल पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घेत कालपासून खडकपूर्णा धरण क्षेत्रातील अवैध वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने कारवाई केली आहे. अलीकडच्या काळात ही सर्वात मोठी कारवाई असून जवळपास सात वाळू उपसा करणाऱ्या बोटीनसह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खरं तर ही कारवाई महसूल प्रशासनाने करणे अपेक्षित असताना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
न्यायालयाने गुंड निलेश घायवळ याला घोषित फरार घोषित केल आहे. आता ३० दिवसात निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार असा इशारा पोलिसांनी दिलाय. निलेश घायवळवर दाखल असलेल्या तीन गुन्ह्याची चार्जशीट पोलिसांनी नुकतीच न्यायालयात दिली आहे…त्यामध्ये पोलिसांनी घायवळ याला फरार घोषित केलाय .त्यामुळ आता घायवळ याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.
बदलापूर जवळच्या आंबेशिव गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास एका बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा दावा स्थानीकाने केलाय. तर इथे एक नव्हे दोन बिबटे असल्याचही सांगण्यात येतय.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून आंबे शिव गावात स्थानिकांना बिबट्या दिसल्यामुळे इथली नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्या ची माहिती मिळताच वनविभागाने याठिकाणी कोंबिंग ऑपरेशन रापवत तातडीच्या उपायोजनाही सुरू केल्या होत्या. मात्र बिबट्याला पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आलेलं नाही. अशातच एका घराच्या आवारात बिबट्याने कोंबड्यांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. त्यानंतर आज रस्त्यावर रक्ताचा सडा दिसून आला. बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. त्यामुळे आंबेशिव तसच आसपासच्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलय.
हरित लवादामधे नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. हरित लवादाने तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारी पर्यंत स्थगिती दिलीय.हा अंतिम आदेश नाही तर अंतरिम आदेश आहे.
तपोवनातील झाडे तोडण्याधी न्यायिक प्रक्रिया राबवायला हवी असं आमचं मत आहे.ती न राबवताच वृक्षतोड केली जातेय .
एकदा तोडलेल्या वृक्षांचं पुनरोपन नीट केलं जातं नाही हा अनुभव आहे.
यावर्षी झालेल्या कुंभमेळ्यात उभारण्यात आलेल्या एक्झीबीशन सेंटरचा काहीही उपयोग झाला नाही.
वृक्षतोडीला आमचा विरोध आहे.
सत्तरी ओलांडल्यामुळे प्रकाश महाजन यांना स्मृतीभ्रंश झाला आहे अशी प्रतिक्रिया मनसे चे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिली आहे. प्रकाश महाजन यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मी घाबरत नाही अशी टीका केली होती. आता मनसेकडून महाजन यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर बोलण्या इतके मोठे नाहीत. वाचाळविरांच्या पंक्तीत ते महाजन जाऊन बसले आहेत. महाजन यांचं वय बघता त्यांच्या विधानावर काही बोलणार नाही फक्त त्यांनी वाचाळगिरी करु नये. कदाचित सत्तरी ओलांडल्यामुळे प्रकाश महाजन यांना स्मृतिभ्रंश झाला असावा अशी टीका संभूस यांनी दिली आहे...
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात उद्यापासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होतेय. या ठिकाणी वाचक आणि पुस्तक प्रेमींना तब्बल ८०० बुक स्टॉल ला भेट देता येणार आहे आणि विशेष म्हणजे तब्बल ५० लाख पुस्तकं याठिकाणी पाहता आणि वाचता येणार आहेत. मराठी, हिंदू, इंग्रजी, तमिळ, तेलगू या सारख्या विविध भाषांमधील पुस्तकं याठिकाणी पुस्तक प्रेमींना पाहायला मिळणार आहेत. ९ दिवस होणाऱ्या या महोत्सवात केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे व्याख्यान आयोजित केलं आहे. यासोबतच इस्रो 'गगनयान' कार्यक्रमातील अंतराळवीर म्हणून ओळखले जाणारे हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे व्याख्यान सुद्धा या महोत्सवात आयोजित केलं आहे. उद्यापासून सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हा महोत्सव खुला राहील.
गोव्यातील एका नाईट क्लबला भीषण आग लागली होती. या घटनेमध्ये जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच भुवनेश्वरमध्येही एका नाईट क्लबला आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वलसाड जिल्ह्यातील महाराष्ट्र हद्दी जवळील उंबरगाव तालुक्यातील तुम वंकास जवळील लुक्रो प्लास्टिक या प्लास्टिक दाणे बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग
आजूबाजूच्या भागातून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल.
आगीच्या धुराचे लोळ दहा किलोमीटर अंतरा पर्यंत दिसत असल्याची माहिती
घटनास्थळी उंबरगाव पोलिस आणि अग्निशमन दल दाखल.. आग विझवण्याचे अग्निशमन दलाकडून आटोकाट प्रयत्न सुरू
आजूबाजूलाही इतर कारखाने असल्याने भीतीचे वातावरण
अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील १८३७१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी केवळ ४ कोटी ८ लाख रुपयाची तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली आहे. यावरूनच कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे हे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विदर्भात जो एनडीआरएफचा निकष लावला त्याच धर्तीवर कोकणात देखील निकष लावून जास्तीतजास्त नुकसान भरपाई कोकणातील शेतकऱ्यांना देण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी केली. सरकार जर न्याय देणार नसेल तर आम्ही दात कोणाकडे मागायची असा उद्विग्न सवाल देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत उपस्थित केला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती हिंगोली मध्ये मूकबधिर निवासी विद्यालयात साजरी करण्यात आली आहे, राष्ट्रसंत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चिमुकल्यांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली अर्पण केली होती.
आपल्या नेत्याचा वाढदिवस प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या परीने साजरा करत असतो. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एका कार्यकर्त्यांने अनोख्या पद्धतीने शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गिरीश गुरनानी या कार्यकर्त्याने आज शरद पवारांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना ८६ रुपये प्रति लिटर पेट्रोल उपलब्ध करून दिलं आहे. पेट्रोल चे दर सामान्यांना परवडणारे नाहीत आणि पेट्रोल ही दररोज लागणारी मूलभूत गरज झाली असल्याचं म्हणत त्याने आज सकाळपासून पुण्यातील कोथरूड भागातील एका पेट्रोल पंपावर १०५ रुपये प्रति लिटर असणारे पेट्रोल नागरिकांना ८६ रुपये प्रति लिटर दरात उपलब्ध करून दिलं आहे.
विक्रोळी पुर्व द्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेल पादचारी पुलाखाली मोटरसायकलने मोटरसायकला दिली जोरदार धडक यात तिघे गंभीर जखमी
घटनास्थळी विक्रोळी पोलीस ठाणे दाखल
जखमींना उपचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे
या अपघातामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे
सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन चांगलेच पेटले आहे. आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. ऊसाला प्रति टन 3500 रुपये भाव मिळावा. यासाठी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानीचे प्रशांत पाटील आणि सिद्धेश्वर घुगे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको केला. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून आल्या.
कल्याण डोंबिवलीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असले, तरी दुसरीकडे वातावरणातील गारठा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील तापमानाचा पारा सलग दुसऱ्या दिवशी घसरला असून, यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज करण्यात आली आहे.
थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये आज 12.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. त्याहून कमी थंडी कल्याणात जाणवली असून येथे 12.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली.
ऊसाला प्रति टन 3500 रुपये भाव मिळावा. या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समिती समिती आक्रमक झाली आहे. दरम्यान आज माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील पांडुरंग कारखान्यावर आंदोलन करण्यात आले. पांडुरंग कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्र केले. काल पंढरपुरातील सिताराम कारखाना बंद पडल्यानंतर आज श्रीपूरचा पांडुरंग कारखानाही शेतकऱ्यांनी बंद पाडत ऊस दराची आग्रही मागणी केली आहे. पुढील दोन दिवसात सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद पाडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय.
कालची मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस तब्बल ६ तास उशिराने
रात्री १२ वाजता सीएसएमटी स्थानकात येणारी गाडी आज सकाळी ६.१३ वाजता पोचली
कोकण रेल्वे मार्गात २ वेळा इंजिनात बिघाड आणि एका ठिकाणी सिग्नल मध्ये बिघाड झाल्याने आधीच उशिराने धावत असलेली गाडी कळंबोली येथील मध्य रेल्वेच्या पुर्वनियोजित ब्लॉक मध्ये अडकली
हा ब्लॉक देखील वेळेपेक्षा जास्त कालावधीने संपला त्यामुळे गाडीला अजून उशीर झाला
देशभरातील अश्वशौकिनांना वर्षभर प्रतीक्षा असलेल्या सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमधील अश्व नृत्य स्पर्धांना आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. ढोल-ताशे, हलगी आणि दफाच्या दमदार तालावर देशभरातून आलेल्या अश्वांनी आपल्या अप्रतिम अदाकारीने प्रेक्षकांना थक्क केले.
अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना बुरशी लागलेली औषधं देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणाची मनसेनं तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.
नवले ब्रीज अपघात थांबवा
स्थानिक नागरिकाचे महामृत्युंजय आंदोलन
स्वामीनारायण मंदिर ते नवले ब्रिज उड्डाणपूल करण्याची मागणी
रस्ता तोडण्यासाठी जे सी बी आणण्यात आला आहे.
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक जवळपास दहा हून अधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पदस्पर्श दर्शन आणि मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची दैनंदिन संख्या मोजणे तसेच गर्दी व्यवस्थापन सुकर करण्यासाठी या कॅमेऱ्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसाठी राज्यातील विविध विभागातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी तात्काळ करावी या एकमुखी मागणीसाठी आज नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने कर्मचारी जमा झाले.
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ गावातील घटना...
पहाटेच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडला असल्याची शक्यता..
गावातील मनाजी सुपेकर यांच्या विहिरीत पडला बिबट्या....
गेल्या अनेक दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यात मानवी वस्तीत बिबट्यांचा संचार
शेतात रस्त्याअभावी टिनपत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला कापूस आणि कृषी वापरातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील विठोली शेत शिवारात येथे घडली.संजय ठाकरे यांच्या शेत शिवारात अचानकपणे साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला आग लागली. यामध्ये २२ क्विंटल कापूस जळून खाक झाला. तर तीन फवारणी पंप, सौर ऊर्जा झटका मशीन सह अनेक साहित्य जळून खाक झाले.यात शेतकऱ्याचे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात थार आणि फॉर्च्यूनर सारख्या महागड्या स्पोर्ट कारला संपूर्ण ब्लॅक फिल्मी लावून रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई करत दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच स्वतःच्या हातून एक थार कार आणि एक फॉर्च्युनर कार ची ब्लॅक फिल्म पोलिसांनी काढली आहे.
- नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार
- नाशिकच्या गडकरी चौकातील विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालय परिसरात बिबट्याचा वावर
- विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात पहाटेच्या सुमारास बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ
रत्नागिरी-
कोकणातील कात उद्योजक ईडीच्या रडारवर
रत्नागिरी आणि सिंधुदूर्गातील कात उद्योजकांवर ईडीची धाड
सावर्डे आणि खेड येथील कात उद्योजक सचिन पाकळे यांच्यावर ईडीची छापेमारी
२४ तास उलटून देखिल अद्याप ईडीची चौकशी सुरु
काल सकाळी ६ वाजल्यापासून ईडीच्या दोन टिम उद्योजक पाकळे यांच्या कार्यालयात
चौकशीत काय कागदपत्रे आणि मालमत्तेची चौकशी झाल्याची सुत्रांची माहिती
नाशिक -
- नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार
- नाशिकच्या गडकरी चौकातील विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालय परिसरात बिबट्याचा वावर
- विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात पहाटेच्या सुमारास बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ
नाशिक -
- राजमुन्द्रीवरून निघालेले 15 हजार झाडे नाशकात दाखल व्हायला सुरुवात
- पहिल्या टप्प्यातील 1 मोठे कंटेनर नाशिक शहराच्या सीमेवर दाखल
- गिरीश महाजन यांनी राजमुन्द्री येथे जाऊन स्वतः निवडले 15 हजार देशी झाडे
- उद्यापासून होणार वृक्षलागवडीला होणार सुरुवात
- शहराच्या वेगवेगळ्या भागात होणार वृक्षलागवड
- वड,पिंपळ,निंब, जांभूळ यांची होणार लागवड
- आधी 15 हजार झाडांचे होणार वृक्षारोपण
- त्यानंतर होणार तपोवन परिसरातील झाडांचा निर्णय
- गिरीश महाजन यांचं आश्वासन
बीड -
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची विशेष मकोका न्यायालयात 15 वी सुनावणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आज न्यायालयात चार्ज फ्रेम होणार असल्याची शक्यता.
गत वेळेच्या तारखेस वकिलांनी दिली होती माहिती की बारा डिसेंबर रोजी प्रकरण चार्ज फ्रेम होणार.
प्रकरणाला प्रत्यक्षात साक्षी पुराव्याला सुरुवात होणार आह
बुलडाणा -
नगराध्यक्षपदासाठी पाच- सात कोटी खर्च होत असल्याचा उम्मेदवाराचा दावा
समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरातील प्रकार
नागपूर
- नागपुरात आजच तापमान 10 अंशाची नोंद
- कालच्या 8.1 अंश तापमान नोंदवल्या गेले असतांना आज 1.9 अंशांनी घट झाली आहे
- मागील तीन ते चार दिवसांपासून सातत्याने पारा 10 अशाच खाली नोंदवत होता,
नाशिक -
- नाशिकसह निफाडमध्ये थंडीची लाट
- नाशिकमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद
- नाशिकमध्ये ७.८ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद
- तर निफाड पारा ५.७ अंशापर्यंत घसरला
- मागील दोन ते तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने होतेय घट
- पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता
पुणे -
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले समन्स रद्द
कथित धमकी प्रकरणी अजित पवारांना दिलासा
"खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही, तर गावाचे पाणी बंद करू," अशी कथित धमकी दिल्याप्रकरणी अजित पवारांना बजावले होते समन्स
अजित पवार यांच्याविरोधात कार्यवाहीसाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने काढलेले समन्स बारामती सत्र न्यायालयाने केले रद्द
पुणे -
पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन
पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये एन्काऊंटर करून आरोपीला ठार करणारे संदीप भोसले यांच्या निधनामुळे पोलिस दलात हळहळ
वयाच्या ५५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
काही दिवसांपासून कर्क रोगाने ग्रस्त असलेल्या भोसले यांची गुरुवारी प्राणज्योत मालवली
नाशिक -
- नाशिक शहर पोलिसांकडून नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई, मनाई आदेशही लागू
- प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा निर्मिती, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
- नायलॉन मांजामुळे अनेकांचे जीव गेल्याच्या घटना घडत असल्याने पोलिसांकडून ॲक्शन प्लॅन
- अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा आढळल्यास पालकांवर होणार गुन्हे दाखल
- नाशिकमध्ये आत्तापर्यंत आठ कारवाईत एकाला अटक, 70 हजारांचा नायलॉन मांजा जप्त
- शाळा महाविद्यालयांमध्ये नायलॉन मांजा वापरू नये यासाठी विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
- नायलॉन मांजामुळे मागील वर्षी गेले होते अनेकांचे प्राण, यंदा मात्र नायलॉन मांजा वापरणारे पोलिसांच्या रडारवर
पंढरपूर -
पंढरपुरात ऊस दर आंदोलन पेटले
आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी 4 ट्रॅक्टरचे एकूण 32 टायर फोडले...
ऊस वाहतूक ठेकेदारांचे लाखो रूपयांचे नूकसान...
वाखरी येथे रात्री शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायर फोडून ऊस वाहतूक रोखली....
फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी! लिओनाल मेस्सी उद्यापासून ३ दिवस भारत दौऱ्यावर
मेस्सी भारतात येत असल्याने फुटबॉल चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्साह शिगेला
३ दिवसात देणार भारतातील ४ शहरांना भेटी
कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीत मेस्सी चे कार्यक्रम आयोजित
कोलकाता येथे स्वतःच्या ७० फुटी पुतळ्याचे करणार अनावरण
हैदराबाद मध्ये खेळणार एक चॅरिटी फुटबॉल मॅच, मुंबईत सुद्धा लावणार २ कार्यक्रमांना हजेरी
मेस्सी त्याच्या टूर च्या शेवटच्या दिवशी घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
पुणे -
पुणे महापालिकेसाठी आता मनसे सुद्धा मैदानात
उद्धव ठाकरेंच्या सेनेशी युतीबाबत चर्चा बाजूला ठेवत पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी
आजपासून मनसे चे पुण्यात फॉर्म वाटप सुरू होणार
काल शहर कार्यालयात पार पडली मनसे ची बैठक
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना निवडणूक उमेदवारी अर्ज वाटप सुरू होणार
शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी ४ ते ७ या वेळात उमेदवारी अर्ज वाटपाची प्रक्रिया होणार आहे
अर्ज स्वीकृती शनिवार १४ व रविवार १५ या दोन दिवस चालणार
पुणे -
भाजपमधील इच्छुकांच्या आजपासून मुलाखती
महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपतर्फे सुमारे २ हजार ३५० कार्यकर्त्यांनी तयारी
इच्छुक उमेदवारांची छाननी करण्यासाठी भाजपच्या शहर कार्यालयात शनिवारी आणि रविवारी कोअर कमिटीतर्फे मुलाखती घेतल्या जाणार
यानिमित्ताने एकाच प्रभागातील अनेक स्पर्धक एकमेकांच्या पुढे येणार
पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता
त्यामुळे शहरातील राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकोरकर यांचे निधन
वयाच्या ९० व्या वर्षी दिला अखेरचा श्वास
नाशिक -
- नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला
- वाढत्या थंडीमुळे महापालिकेच्या शाळांच्या वेळेत बदल
- थंडीमुळे पालिकेच्या शाळा सकाळी ८ वाजता भरणार
- महापालिकेच्या शिक्षण विभागाचा निर्णय, सकाळी ७ ऐवजी ८ वाजता शाळा भरवण्याचा निर्णय
- दुपारच्या सत्राची वेळ मात्र कायम
- खासगी शाळा व्यवस्थापनांना मात्र सक्ती नाही, खासगी शाळांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे निर्देश
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.