ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद करण्यात आलं रद्द
लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्ष पद रद्द
जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडून करण्यात आले.. मलगुंडेवर करण्यात आली अपात्रतेची कारवाई.
खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
भिवंडी एसटी महामंडळाच्या खडवली–पडघा फेरीतील घटना; कोणतीही जीवितहानी नाही
सायंकाळच्या सुमारास खडवली–पडघा या नियमित फेरीवर असलेल्या भिवंडी एसटी महामंडळाच्या बसला खडवली येथे अचानक भीषण आग लागल्याने काही मिनिटांत संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र, एका सतर्क रिक्षाचालक शैलेश जाधव यांनी वेळीच बसचालकाला आग लागल्याची सूचना दिल्यामुळे बसमधील प्रवाशांचे जीव वाचले.
त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा आमदार किसन कथोरे गटाने आपलं वर्चस्व राखलंय. कथोरे यांचे खंदे समर्थक अरुण पाटील यांची टीडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालीय तर भाग्यश्री भोईर यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. संचालक निवडीपासून ते अध्यक्ष पदाच्या निवडीपर्यंत टीडीसी बँकेची निवडणूक अत्यंत संघर्षमय राहिली. या निवडणुकीत सहकार पॅनलने 17 संचालक निवडून आणत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलला आधीच धक्का दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदी कुणाची निवड होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीतही कथोरे गटानं बाजी मारल्याचं दिसून येतय.
- नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिर परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण
- अयोध्येतील राम मंदिरात दान चोरी प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक
- राम रक्षा पठण आणि महाआरतीसाठी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर देखील उपस्थित
- हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी करत केला राम मंदिर दान चोरीचा निषेध
- रामरक्षा पठणावेळी ठाकरेंच्या अनेक नगरसेवकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय
- दोन दिवसांपासून ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या सुरू आहेत चर्चा
मोशी दुर्घटनेचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण
अजूनही एक व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू
कचऱ्याचा ढीग इमारतीवर पडल्याने झाली होती दुर्घटना
गेल्या ७२ तासांपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन
उलवे सेक्टर 17 येथील भव्येश्वर ओएसिस सोसायटीमध्ये पहाटे लिफ्टचा केबिन अचानक कोसळून मोठी दुर्घटना टळली.
बिल्डरच्या निष्काळजीपणाचा रहिवाशांचा आरोप
सुदैवाने लिफ्टमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच तिघे रहिवासी थांबल्याने जीवितहानी झाली नाही.
संबंधित बिल्डरवर कारवाई करावी आणि लिफ्टच्या सुरक्षेची तातडीने तपासणी करण्याची रहिवासीयांची मागणी.
लिफ्ट मधील सिसीटीव्ही समोर.
सैराट फेम आरबाज शेख याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 1 लाख रुपयाचा चेक देऊन करण्यात आली मदत..
=घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. घोडबंदर ते नायगाव बाफाना ब्रिजदरम्यान तब्बल 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हे काम आज आणि उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नायगाव बाफाना ब्रिजवरून आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी वाहतूक कोंडीचा आढावा घेतला.
आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी आज बीड शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाली. पालखी आगमनानिमित्त बीड नगरपरिषदेने एक महत्त्वाचा निर्णय घेत, शहरातील सुभाष रोडचे नामकरण 'संत मुक्ताई पालखी मार्ग' असे केले आहे. पालखी ज्या मार्गाने दरवर्षी शहरात प्रवेश करते, त्या मार्गाला हे नवे नाव देण्यात आले. समस्त वारकरी, भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. या निर्णयामुळे वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण असून, संत परंपरेचा सन्मान करणारे हे पाऊल असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.
हिंगोलीत टीसी घेण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्था अध्यक्षाची मारहाण
सेनगाव तालुक्यातील कोळसा परिसरात असलेल्या अहिल्याबाई होळकर बी फार्मसी महाविद्यालयातील घटना
संस्थाध्यक्षाने मारहाण केलेल्या पालकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
गजानन जाधव असे मारहाण झालेल्या पालकाचे नाव
घोडबंदर रोडवरील कर्पे कंपाउंडजवळ रस्त्यावरील खड्ड्याचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून खड्डा बुजविण्याचे काम सुरू असून, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तासनतास एकाच ठिकाणी वाहने अडकून पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मावशी येथील कचरा डेपो इमारत दुर्घटना या ठिकाणी सुरू असलेलं बचाव कार्य आज रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता एनडीआरएफ ने व्यक्त केली आहे अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
महिला संत मुक्ताबाई यांच्या पालखी सह दिंडी सोहळा आज बीड शहरात मुक्कामी आहे. सर्व संताची भगीनी आणि चांगदेवाची गुरु असलेल्या मुक्ताईच्या पालखीची गेल्या तिनशे वर्षाची अखंड परंपरा आहे. हि पालखी वारकरी सांप्रदायात स्त्रि संताच्या नेतृत्वाचे दर्शन घडवनारी असून या पालखी सोहळ्यात हजारो महिला भाविक सहभागी झाले आहेत.
अमरावती ग्रामीण भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी भाजपा आमदार प्रताप अडसड यांची नियुक्ती करण्यात आली,या अनुषंगाने राजापेठ भाजप कार्यालयात प्रताप अडसड यांचा पदग्रहण सोहळा पार पडला, यावेळी जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रताप अडसड यांच स्वागत करण्यात आले,भाजप तरुण पिढीला संधी देणारा पक्ष आहे
आपल्या भक्तीने आणि संस्कृतीने सात समुद्र पारही महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय आपली ओळख टिकवून आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे साऊथ आफ्रिकेत साजरा झालेला विठू माऊलीचा पालखी सोहळा.नंदुरबार येथील रहिवासी विकास बागुल यांनी साऊथ आफ्रिकेत राहून आपल्या कलेच्या माध्यमातून विठू माऊलीची वारी अतिशय भक्तिमय वातावरणात साजरी केली.या सोहळ्यात एक चिमुकला विठ्ठलाच्या वेशभूषेत अत्यंत प्रसन्न दिसत होता, तर त्यांच्यासोबत असलेल्या स्थानिक नागरिकांनीही टाळ-मृदंगाच्या तालावर फेर धरत विठ्ठल विठ्ठल चा जयघोष केला.
TET पेपर फुटी प्रकरणातील कपिल दहिया आणि संजय कुमार शर्मा यांना आज भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश पी. एम कोळसे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयाने 22 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मोशी कचरा डेपो दुर्पिंघटनेत मृत्यू मुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तर्फे पाच लाख, पिंपरी चिंचवड महापालिके तर्फे 10 लाख आणि अँथनी कंत्राटदारातर्फे 25 लाखाची मदत देऊन मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील मुलांचा शिक्षणाचा खर्च अँथनी हा कंत्राटदार करणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे.
वसई-विरार शहरातील पूरस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली आहे.
चोरीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी केटीआयएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुलाच्या निकृष्ट बांधकामावरून धारेवर धरले असून रातोरात पुलाच्या भेगा सिमेंट भरून बुजल्याने आमदार बोंढारकर चांगलेच संतापले. असं काम करून तुम्ही सिमेंट घालून थुक्का पॉलिश काम करता का, असं करायला तुम्हाला कोणी सांगितलं असं म्हणत आमदाराने प्रोजेक्ट मॅनेजरला धारेवर धरलं.
हवामान कोरडे झाल्याने लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात
हिंगोलीत शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले
अयोध्यातील राम मंदिर देणगी चोरी प्रकरण सांगलीमध्ये काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे.
सांगली मिरज रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली टाळ-भजन आंदोलन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला भेट देणार
बदलापूर-मुरबाड दौऱ्यानंतर पुण्याकडे रवाना
मोशीत युद्धपातळीवर बचावकार्य –सुनेत्रा पवार
येरवडा येथील गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
एकमेकींचे केस ओढत रस्त्यावरच मारहाण झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नव्याने केलेला रस्ता अनेक ठिकाणी उखडला
कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा तीव्र रोष
महाराष्ट्राची चेरापूंजी अशी ओळख असलेल्या आंबोलीत आज पर्यटकांनी गर्दी केली आहे.
विकेंडच्या सुट्टीचे निमित्त साधून हे पर्यटक मोठ्याप्रमाणात आंबोलीत दाखल झाले आहेत.
सध्या आंबोलीत आल्हाददायक वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत.
उंच डोंगरातून कोसळणारा धबधबा व अधूनमधून येणाऱ्या पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक घेताना पाहायला मिळत आहेत.
राज्य शासनाच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविला जातोय.
त्याचं अनुषंगाने शाळेतील मुलांना शेतात नेऊन त्याची माहिती शालेय मुलांना व्हावी या हेतूने बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला जात आहे.
तळकोकणात देखील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जातं आहे.
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हळवल नंबर 2 या प्रशालेच्या वतीने बांधावरची शाळा उपक्रम राबविण्यात आला.
भाजपच्या नेतृत्वाबाबत वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार टीका केली.
उबाठा गटात नगरसेवकाचे तिकीट देण्याचाही अधिकार नसलेले संजय राऊत भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार हे सांगत असल्याचे त्यांनी म्हटले.
भारतीय जनता पक्षाचे निर्णय केंद्रीय आणि राज्य नेतृत्व घेत असून पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो, इतरांच्या सांगण्यावर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
२०२९ ची विधानसभा निवडणूकही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तळणी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही,सरकारने बी बियाणे व खताचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सध्या सुरू आहे.
कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, करवीर आणि राजवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 160 हून अधिक सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी एकत्रितपणे बोलावून त्यांची घेतली ओळख परेड
पोलिसांनी सर्व गुन्हेगारांना कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देत दम भरला
साध्या गुन्हेगारांपासून नामचीन गुंडांपर्यंत सर्वांची पोलिसांनी ओळख परेड घेत गुन्हेगारीवर आळा घालण्याचा स्पष्ट दिला संदेश
मुंबईहून गारगोटीकडे येत असणाऱ्या चार चाकी वाहनाचा शेळेवाडी गावाजवळ ड्रायव्हरचा ताबा सुटून अपघात झालाय. पहाटे ४ वाजता ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने गाडी थेट एका ओढ्यात पडली. या चार चाकी गाडीत प्रवास करणाऱ्या सहा व्यक्तींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आलंय.
- सभापती उपसभापती पदाच्या निवडीसाठी बाजार समितीचे संचालक मंडळ हजर...
- मात्र निवडणूक पिठासीन अधिकारी कांतीलाल गायकवाड अकरा वाजून गेल्यानंतरही आलेच नाही...
- या निवडीसाठी पत्रकारांनाही केले पोलिसांनी आत येण्यासाठी मज्जाव....
- या निवडणूक प्रक्रियेवर स्टे आल्याची सूत्रांकडून माहिती
वसमत औंढा व हिंगोली शहरातही भूकंपाचा जोरदार धक्का
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
11 वाजून 26 मिनिटांनी भूकंपाचा हादरा बस
नाशिक आर्थिक गुन्हा शाखेने प्रशांत वाडीले याला अटक केली असून आज प्रशांत वाडीले याला धुळे कोर्टात हजर केले जाणार
प्रशांत वाडीले याची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शिक्षक आघाडीचा धुळे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती
दरम्यान प्रशांत वाडीले यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील अधिकची माहिती आता समोर येण्याची शक्यता
शालार्थ बनावट आयडी प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले यांच्या निवासस्थानाची नाशिकच्या पथकाकडून करण्यात आली झाडाझडती
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सांगली ते पंढरपूर डोळे बांधून सायकल वारी दोघा विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे. पर्यावरण वाचवा असा संदेश देत सांगलीतील ऋतांबरा नागमोती आणि राजवीर नागसेन 14 वर्षीय विद्यार्थ्यांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधून पंढरपूर सायकल वारी सुरू केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या 'भाजपमुक्त राम' या नाऱ्यावर आणि राम रक्षा आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. "सत्ता नसली की राम आठवतो" असा टोला लगावत शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रथम सत्रातील 17 वर्षीय कॅडेटचा शारीरिक प्रशिक्षणादरम्यान अचानक कोसळल्यानंतर मृत्यू
अभिनव बाजपेयी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव
तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर शहरातील होता
दुर्घटना ग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्या खाली अजूनही आठ कर्मचारी अडकले असल्याची भीती बचाव कार्य पथका कडून व्यक्त करण्यात येते आहे. मात्र दुर्घटना ग्रस्त इमारतीच्या फक्त पहिल्या मजल्याला महापालिकेच्या बांधकाम विभागाने परवानगी पूर्णत्वाचा दाखला दिला होता. तर वरचे दोन मजले बेकायदेशीर उभारण्यात आल्याची धक्कादायक बाईक माहिती आता समोर आलीये.
गोदावरी तीरी वसलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या सरलाबेट येथून पायी दिंडीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.. 200 वर्षाची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले असून श्रीरामपूर शहरात पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले
कुडाळ नगरपंचायतीतील कथित जागा गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदू काॅलनी प्रभागातील भाजपाच्या सत्ताधारी नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी कुडाळ नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण छेडले. या उपोषणाला भाजप पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, मनसे, काँग्रेस या पक्षानी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठींबा दिला.
नाशिक जिल्ह्याच्या पुर्व भागात पावसाने ओढ दिल्यानंतर तीन ते चार दिवस सतत झालेल्या रिमझिम पावसानंतर ४० टक्क्या पेक्षा जास्त शेतक-यांच्या रखडलेल्या पेरणीच्या कामांना आता वेग आलाय,कुठे बैलजोडीच्या तर कुठे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीची लगबग सुरु असून पेरणी नंतर शेतक-यांना जोरदार पावसाची आस लागली आहे.जर पाऊस झाला नाही तर पेरण्या वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं अनोखं उदाहरण रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पाहायला मिळालं. येथे दोन ह्युमनॉइड रोबोट्सचा प्रतीकात्मक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात रोबोडॉगनं नवदांपत्याला विवाहाच्या अंगठ्या पोहोचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगतीचं प्रदर्शन करण्यासाठी या अनोख्या विवाहाचं आयोजन करण्यात आलं.
मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली.. जी तीन मजली इमारत कोसळून एका कामगाराचा जीव गेला आणि आठ कामगारांच्या जीवाशी तब्बल 65 तास खेळ झाला. त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळमजल्यालाचं पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलाय. महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला हा पूर्णत्वाचा दाखला समोर आलाय. 27 जुलै 2023ला या ऍडमिन बिल्डींगला रेकॉर्ड प्लॅन नुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला. मात्र या दाखल्यात फक्त तळमजल्याचाचं उल्लेख आहे. मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का?
लोणावळ्यातील पूरग्रस्त भागांना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी आणि नुकसानीची माहिती घेतली.यावेळी पूरग्रस्तांनी घरांमध्ये शिरलेले पाणी, झालेले आर्थिक नुकसान तसेच प्रशासनाकडून अपेक्षित मदतीबाबत आपल्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या. नागरिकांना धीर देताना आमदार शेळके यांनी लोणावळा नगरपरिषद आणि टाटा धरण प्रशासनाशी समन्वय साधून पूरग्रस्तांना शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, दरम्यान तळेगाव नगरपरिषद प्रशासनाने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढली नाही, टाटा धरणाने एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडले.
रावेर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शहरात वेग कारमधून पोलिसांनी दोघांना साहित्यासह अटक केली. यातील तिघे फरारी झाले आहेत. कारमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांची २४ बंडले आढळून आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
मध्य रेल्वेच्या बडनेरा अमरावती रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक एस-01, जुनीवस्ती,बडनेरा येथे सुमारे 67 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या चार लेनच्या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पणरविवार रोजी सकाळी होणार आहे. मात्र या लोकार्पणापूर्वीच श्रेयवादाच्या राजकारणाने जोर धरला असून आमदार रवी राणा यांच्या निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांचे नाव स्पष्टपणे समाविष्ट आहे. मात्र आमदार रवी राणा यांनी प्रसिद्ध केलेल्या स्वतंत्र निमंत्रण पत्रिकेत खासदार बळवंत वानखडे तसेच विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे-पाटील यांची नावेच वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे.विशेष म्हणजे, निमंत्रण पत्रिकेत स्थानिक नगरसेवकांची नावे मात्र ठळकपणे देण्यात आली आहेत.
- १ सप्टेंबरपर्यंत टीईटी उत्तीर्ण असण्याची अट बेकायदेशीर असल्याचं म्हणत १४ मे २०२६ चे परिपत्रक रद्द केलेत...
- पदोन्नती प्रक्रिया सुरू होताना टीईटी पात्रता असणे हाच निकष असल्याचं मत
पाकिस्तानातील कुख्यात गुंडांच्या सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर मोठी कारवाई केली आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये छापे टाकून तब्बल ११२ तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुणांचाही समावेश आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, कारवाईबाबत एटीएसकडून कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखीचे आज सकाळी पंढरपूर कडे जाताना पुण्यातून सासवड कडे प्रस्थान झाल आहे.
काल आळंदीहून सोहळा निघाल्या नंतर दोन दिवस माऊलींची पालखी ही पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला होती. त्यानंतर आज सकाळी सहा वाजता माऊलीच्या पालखीने सासवडच्या दिशेने प्रस्थान केल आहे. टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात हजारो वारकरी भाविक माऊलीच्या आषाढी वारी मध्ये सहभागी झाले आहेत. माऊलींची पालखी पुण्यातून हडपसर मध्ये दाखल होणार असून त्यानंतर माऊलींची पालखी अवघड दिवे घाट मार्गे झेंडेवाडी या ठिकाणी दाखल होईल आणि तेथील विसावा उरकून सोपान काकांची नगरी सासवड येथे माऊली मुक्कामी असतील...
मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका रायगडच्या पेणमधील ग्रामीण भागातील गणेश मूर्ती उद्योगाला बसला आहे. पुराच्या पाण्यात मूर्ती, गणेश मुर्ती बनवण्याच साहित्य भिजल्याने मूर्तिकाराना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. कर्ज कसं फेडायचं याबरोबरच गणेशभक्तांची मागणी कशी पूर्ण करायची या विवंचनेत मूर्तिकार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे मोशी येथील दुर्घटनेबाबतचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रशासन बचावाचे काम आज रात्री पूर्ण करेल, अशी माहिती आयुक्तांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली.
मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. याशिवाय, दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबतही प्रशासनाला आवश्यक निर्देश यावेळी त्यांनी दिले.
यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.