Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: शिरूर बायपासजवळ चार वाहनांचा भीषण अपघात

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई-पुण्यात पावसाला सुरूवात, संसदेत आज अमित शाह बोलण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची? यावर सुनावणी होणार, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

शिरूर बायपासजवळ चार वाहनांचा भीषण अपघात

पुणे आहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ कंटेनर कार दुचाकी आणि बस या चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघाताची भिषणता सीसीटिव्हि कॅमेरात कैद झाली असुन या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.

धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदेंमध्येच; चिन्हाच्या सुनावणी दरम्यान बच्चू कडूंची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षावर आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. त्यामुळे न्यायालयालाही माहिती आहे की, हे चिन्ह शिंदेंशिवाय दुसरं कोणी पेलू शकत नाही. त्यामुळे अखेर न्यायालयाचा निर्णयही एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच लागेल, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी चंद्रपुरात केला.

कराडमधून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

फडणवीस साहेबांनी आता चूक सुधरायला हवी तुम्ही पुन्हा पुन्हा तोच प्रयत्न केला मराठ्यांचा अपमान करायचा हिनवायचे असे झाले तर आता भयानक जड जाणार आहे सरकारला हा खरा संदेश आहे मराठा जर पावसात उभी राहू शकतात तर काय करू शकतात आता पश्चिम महाराष्ट्र एकवटलाय त्यामुळे विदर्भाने मराठवाडा प्रचंड ताकतीने उठला आहे

पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

रायगड ब्रेकिंग :

० पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

० 7 जुलै ते 31 जुलै या कालावधीत दरडी कोसळण्याच्या शक्यतेमुळे हा मार्ग बंद करण्यात आला होता

० ऑगस्ट महिन्यात मार्ग सुरु झाला मात्र पुढील सहा दिवस अतीवृष्टीची शक्यता असल्याने हा मार्ग पुन्हा बंद करण्यात आला आहे

० आंबेनळी घाटातील भौगोलीक परिस्थिती, अतीवृष्टी या दरम्यान नैसर्गिक आपत्ती घडून कोणतीही हानी होऊ नये म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी जारी केले अद्यादेश

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑगस्टला

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑगस्टला

* महेश केदारचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

* महेश केदारने जामिनासाठी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये अर्ज केला होता.

* सरकारी वकिलाचा आणि आरोपीच्या वकिलांचा न्यायालयासमोर युक्तिवाद झाल्यानंतर अखेर आज न्यायालयाने यावरती निर्णय दिला.

* सरकारी पक्षाकडून महेश केदार हा व्हिडिओमध्ये दिसतो असा युक्तिवाद करण्यात आला होता.

* त्यानंतर आता न्यायालयाने महेश केदार यांनी केलेल्या जामीन अर्ज फेटाळला आहे.

* तसेच प्रतीक घुले याचा कारागृहातील अहवालावर

* सरकारी पक्षाच्या वकिलाने आपली बाजू आज न्यायालयात मांडली.

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त; खंडव्याचा प्रवासी ताब्यात

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त; खंडव्याचा प्रवासी ताब्यात

भुसावळ : कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त करण्यात आला. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी आरपीएफच्या मदतीने ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे १२६२८ अप कर्नाटक एक्स्प्रेसच्या पुढील जनरल कोचमध्ये तपासणी केली असता उमेश वर्मा (४२, रा. खंडवा, मध्य प्रदेश) हा आढळून आला. त्याच्या ‘LAVI SPORT’ ट्रॉली बॅगेत Tulsi Royal Zafrani Zarda चे १२० पाउच आणि Premium Rajnigandhaचे १,६६४ नग आढळले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून वर्माला ताब्यात घेतले.

वणीत प्रकल्प बाधिताचा रोजगार मेळावा

यवतमाळच्या वणी येथे प्रहार संघटनेच्या वतीने प्रकल्प बाधिताचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू उपस्थित होते.कोळसा खाणीत या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या त्या अनेक लोकांना त्या गावातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी बच्चू कडू यांनी मांडला प्रकल्प बाधित यांना राग का येत नाही? असा सवालही त्यानी उपस्थित केला.

टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन; १६ वा आरोपी अटकेत, १५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर आले असून भिवंडी पोलिसांनी सोलापूरातील पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या प्रकाश धनसिंग पवारला अटक केली आहे. त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता १५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पवारने अटक आरोपी सोनू जितेंद्र सिंगला विद्यार्थ्यांची काही कागदपत्रे दिल्याचा आरोप आहे. ही कागदपत्रे कोणत्या उद्देशाने देण्यात आली, याचा तपास सुरू आहे. पवारच्या अटकेनंतर आरोपींची संख्या १६ झाली आहे.

स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

उल्हासनगर : शहरातील वाढत्या स्ट्रीट क्राईमला आळा घालण्यासाठी विठ्ठलवाडी पोलिसांनी मध्यरात्री विविध संवेदनशील भागात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे नशेखोर आणि संशयितांमध्ये खळबळ उडाली. काही जणांनी पोलिसांची चाहूल लागताच पळ काढला, तर काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या नेतृत्वात रेल्वे स्थानक परिसर, मोर्यानगरी, व्हीटीसी मैदान, मानेरे गाव, आशेळे पाडा यासह विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.

अमरावती: परतवाड्यातील तरुणींच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन

अमरावतीच्या परतवाडा परिसरात तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल केल्याच्या आरोपांप्रकरणी मुख्य आरोपी अयान अहमद याला अखेर अचलपूर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एप्रिल महिन्यात अयान अहमद याचे अनेक तरुणींसोबतचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून देशभरात व्हायरल झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपीला जामीन मिळाला असून, प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिका वाहन चालक आक्रमक

नंदुरबार -

नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिका वाहन चालक आक्रमक

सहा महिन्यापासून वेतन रखडल्याने 102 रुग्णवाहिका चालक संपावर

गेल्या पाच दिवसांपासून नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर रुग्णवाहिका चालकांचे आंदोलन सुरू

नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील 51 रुग्णवाहिका चालकांचे काम बंद आंदोलन

मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा

Pune: पुण्यात थोड्याच वेळात भाजपच्या तिरंगा रॅलीला होणार सुरुवात

पुणे -

पुण्यात थोड्याच वेळात भाजपच्या तिरंगा रॅलीला होणार सुरुवात

पुण्यातील ललित महाल चौकात पुणेकर जमायला सुरुवात

अनेक पुणेकर, अनेक विद्यार्थी भाजपचे कार्यकर्ते ,या तिरंगा रॅलीत मुख्यमंत्र्यांसोबत चालणार

Pune: भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०५ वाजता राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन येथे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.३० वाजता व शनिवार वाडा येथे सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे.

ध्वजारोहण कार्यक्रमास राष्ट्रीय पोशाखात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.

Pune:  चाकणमध्ये ८ तासांपासून वाहतूक कोंडी; , ५ किलोमीटरपर्यांत वाहनांच्या रांगा

चाकणमध्ये ८ तासांपासून वाहतूक कोंडी; , ५ किलोमीटरपर्यांत वाहनांच्या रांगा

ANC

चाकण औद्योगिक वसाहतीत गेल्या आठ तासांपासून वाहतूक कोंडी कायम असून तब्बल पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कामगारांच्या बस, शाळकरी विद्यार्थ्यांच्या बस आणि औद्योगिक वाहतूक करणारी अवजड वाहने वाहतुककोंडीत अडकलीत

Yavatmal: केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक, दरात मोठी घसरण

यवतमाळ -

केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक, दरात मोठी घसरण

यवतमाळ जिल्ह्यात केळीचे उत्पादन घेतले जाते.

मात्र, पुसद तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या कमी दरामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.

दोन हजार दोनशे रुपये दर मिळणाऱ्या केळीला आता केवळ आठशे ते एक हजार रुपये दर मिळत आहे.

उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Sangli: मनोज जरांगे पाटील हे डिफेंडर गाडीमधून फिरत असल्याचा आरोप

सांगली -

जरांगे पाटील हे डिफेंडर गाडीमधून फिरत आहेत यावर आरोप होत आहेत यावर जरांगे पाटील म्हणाले..

मी समाजाचा काम करतो समाजाला मायबाप मानला आहे. माझ्या समाजातल्या लोकांनी एखादी नवीन गाडी घेतली तर पाटील माझ्या गाडीत बसा आणि फिरा असे म्हणतात..

तुम्हा कोणाला गाडी कोण देतं का असे जरांगे पाटील म्हणाले..

माझे खूप उकरू लागले आहात.. माझ्यावर खूप लक्ष आहे यांचं

विजय थलापतीचा जबरा फॅन, थलापतीला भेटण्यासाठी निघाला देगलूरहून पायी यात्रेवर

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलापती यांना भेटण्यासाठी त्यांचा एक जबरा फॅन पायीयात्रेवर निघाला.नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील नरसी शेळगाव येथील 50 वर्षीय यादव हेगडोळे हे तामीळ सुपरस्टार विजय थलापतीचे चाहते आहेत.यंदा विजय थलापती यांनी विधानसभा निवडणूक लढवली.

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर

पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला सोलापुरात अटक केली आहे. TET पेपरफुटीचे तपास करणाऱ्या विशेष पथकाने सोलापुरातून प्रकाश पवार याला अटक केलीय. सोलापुरातील कुमठे गावात प्रकाश पवार हा ध्रुव प्रतिष्ठान नावाने पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. जवळपास 15-20 वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना पोलीस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करणारी अकॅडमी चालवत होता अशी माहिती आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांची अखेर बदली

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांच्या मागणीची दखल घेतली.

- महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख हे मराठाद्वेषी अधिकारी असल्याची टीका नरेंद्र पाटलांनी केली होती.

- दरम्यान देशमुखांच्या जागी अविनाश रणखांब यांची एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

- मराठा समाजातील उद्योजकांच्या नाराजीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली

आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह तरुणाई थिरकली डीजेच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत सहभाग 

जळगाव जागतिक आदिवासी दिनानिमित्त चोपडा शहरात डीजेच्या तालावर रॅली काढण्यात आली. या रॅलीत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह महिला व पुरुषांसह मुले व तरुण-तरुणीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महापालिका सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत केला सभा त्याग 

सभागृहात मूलभूत प्रश्न मांडू देत नसल्याचा आरोप करत वंचित आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची गोंधळ घालत सभा त्याग केला.महापालिकेच्या पायऱ्यावर बसून सत्ताधारी भाजपाच्या विरोधात वंचित आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले .नांदेड शहरातील अनेक विषयांवर या सर्वसाधारण सभेत चर्चा होणं अपेक्षित होतं.

विद्यार्थ्यांनी केली खराब रस्त्याची पोलखोल; पळशी-गरसुळी रस्त्याला दुरवस्थेचे ग्रहण

लातूर ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. रेनापुर तालुक्यातील पळशी ते गरसुळी या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, खड्डे आणि खराब रस्त्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज या मार्गावरून शाळा-महाविद्यालयासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना खराब रस्त्याचा फटका बसत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

कराडला मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅंनर फाडले

आज कराड तालुक्यातील मसूर आणि पाचवड फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांची बैठक होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी शामगाव घाट ते मसूर मार्गावर उभारण्यात आलेले बॅंनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी मल्हारपेठ- पंढरपूर आणि कराडकडे जाणाऱ्या शामगाव घाटातील रस्त्यावर रास्तारोको केला आहे.मसूर पोलिसांनी आंदोलकांना विनंती करत हटविले आहे. सध्या मसूर पोलिस ठाण्यात बॅंनर फाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज दाखल झाला आहे. आज कराडला मनोज जरांगे पाटील मुक्कामी आहेत.

कुंभवडे गावातील बाबा धबधबा पर्यटकांसाठी बंद

आंबोली चौकुळ जवळील कुंभवडे गावातील बाबा धबधबा वाहतूक कोंडी, पर्यटकांची मुजोरी आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. हुल्लडबाज पर्यटकांनी हत्त्यारे घेऊन माजवलेली दहशत या गंभीर घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला. त्यामुळे बाबा धबधबा खाजगी मालमत्तेत असल्याने त्या जागा मालकाशी चर्चा करून बाबा धबधबा बंद ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या; तिवसा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून तिवसा तहसील कार्यालय परिसरात बेमुदत अन्नत्याग व साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. गेल्या तीन दिवसापासून हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.

पुसदच्या सांडवा जंगलात महिलेचा गळा चिरून खून

यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सांडवा-मांडवा मार्गावरील जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळून आला.महिलेचा गळा चिरून तसेच डोक्यावर वार करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

शिरवळ येथे झालेल्या भीषण अपघातात मावळातील चार जणांचा मृत्यू, तर दोन जखमी.. 

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार युवकांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. मृतांमध्ये तळेगाव दाभाडे येथील वेदांत अर्जुन वारिंगे वय १९ यांचा समावेश आहे. या घटनेमुळे तळेगाव दाभाडे, कामशेत आणि मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील सातारा-पुणे लेनवर शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर झाला.

‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई

टीईटी पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर

भिवंडी पोलिसांकडून संस्था चालक प्रकाश पवारला अटक

आज दुपारी भिवंडी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती

उल्हासनगरमध्ये किराणा दुकानातील गल्ल्यातून रोख रक्कम चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दुकानदार काही क्षणांसाठी समोरील इमारतीत पाणी घेण्यासाठी गेल्याची संधी साधत दोन मुलांनी दुकानातील रोख रक्कम चोरल्याची घटना उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये घडली. चोरीची ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भुसावळमध्ये कथित बोगस डॉक्टरवर कारवाई; जनसेवा क्लिनिकमध्ये छापा

जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये वैद्यकीय पदवी व नोंदणी नसतानाही स्वतःला डॉक्टर म्हणून भासवून वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपावरून उमेश मधुकर सपकाळे (वय ५१) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

१० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ८.१५ या वेळेत आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे ब्रिजजवळ रेल्वेतून पडून २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

साईराज बेणारे असं मृत तरुणाचं नाव असून, रेल्वेतून पडल्यानंतर तो मुंब्रा खाडीतील लोखंडी रॉडला अडकला होता.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वे पोलीस आणि मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आला आहे.

धुळे- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बारा माध्यम प्रकल्पांपैकी पाच माध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले

धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील बारा माध्यम प्रकल्पांपैकी पाच माध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले आहेत, तर उर्वरित सात मध्यम प्रकल्प कमी अधिक प्रमाणात भरले आहेत, त्यापैकी धुळे शहराची तहान भागविणारा नकाने तलाव आणि अक्कलपाडा धरण हे शंभर टक्के भरल्यामुळे धुळेकराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे.

भुसावळमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शहरातील रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणाविरोधात नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे.

अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने पालिका पथकाने संबंधित परिसराची पाहणी करून अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली.

नाशिक शहरातील खड्ड्यांवरून मनपा आणि एमएनजीएल आमनेसामने

- गॅस पाइपलाइनच्या खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचा मनपा प्रशासनाचा आतापर्यंत निष्कर्ष

- तर दुसरीकडे एमएनजीएलकडून मनपाच्या परवानगी आणि मंजुरीनुसारच काम केल्याचा दावा

- रस्ते पुनर्स्थापनेसाठी एमएनजीएलने सुमारे ३९२ कोटी रुपये शुल्क जमा केल्याचा दावा

- शहरातील प्रलंबित सुमारे २ लाख घरगुती गॅस जोडण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे मनपाचे निर्देश

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळमध्ये भीषण अपघात; मावळ-तळेगावच्या ४ तरुणांचा मृत्यू, २ गंभीर

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री भीषण अपघात,भरधाव कार आयशर ट्रकला धडकली.

अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील ४ तरुणांचा जागीच मृत्यू,तर २ जण गंभीर जखमी.

धाराशिव- तुळजाभवानी देवीच्या चरणी ९६७ ग्रॅम वजनाचा चांदीचा टोप अर्पण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील पांगरे येथील अभिजीत विलास काकडे यांनी ९६७ ग्रॅम वजनाचा चांदीचा टोप अर्पण केलाय.अभिजीत काकडे यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी तुळजाभवानी देवींची ओटी भरून कुलधर्म कुलाचार करत दर्शन घेतले.

बीड- जिल्हाभरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचे जेलभरो आंदोलन

बीडमध्ये आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झालेली दिसून आली.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरात आज जेलभरो आंदोलन करण्यात आलंय. पिक विमा, कर्जमाफी, ऊसतोड मजुरांचा त्रिपक्षीय करार, गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा यासह विविध मागण्या यावेळी किसान सभेने केल्यात.

पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड

गाड्या तोडफोड सत्र सुरूच

चार चाकी गाड्यांची केली तोडफोड

पुण्यातील सिंहगड रोडवरील सुयोगश्री सोसायटी समोरील गाड्यांची तोडफोड.

आज्ञातांकडून जवळपास चारचाकी पाच ते सहा गाड्यांची तोडफोड

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्याअंतर्गत पहिल्या गुन्हाची नोंद 

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा नुकताच महाराष्ट्रच्या विधिमंडळात मंजूर झालाय.

या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात नोंद झालाय.

ब्रिटन हून आलेल्या एका धर्मगुरूकडून पुण्यातील गुरुवार पेठेतील चर्चमध्ये प्रवचन दिले जात होतं.

पुणे- खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करण्याची मागणी

पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्यासाठी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

राज्यसभेतील विशेष उल्लेखाद्वारे खडकवासला धरणाच्या घटलेल्या साठवण क्षमतेचा मुद्दा उपस्थित

खडकवासला धरणाची मूळ साठवण क्षमता ३.७५ टीएमसी

गाळ साचल्यामुळे प्रभावी साठवण क्षमता घटून सध्या सुमारे १.७५ टीएमसीवर आल्याचा दावा

साठवण क्षमता घटल्याने पावसाळ्यात पाणी साठवून ठेवण्यावर परिणाम

पुण्याची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता जलसुरक्षेचा प्रश्न गंभीर

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज तिरंगा रॅलीचे आयोजन

तिरंगा बाईक रॅलीमुळे पुणे शहरातील एफसी रोड दुपारी दोन वाहतूक साठी नंतर बंद राहणार

वाहनधारकाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचा आवाहन

एफसी रोड वरील ललित महाल हॉटेल चौक ज्ञानेश्वर पादुका चौक तुकाराम महाराज पादुका चौक गरवारे चौक या मार्गाने तिरंगा रॅली निघणार

स्वारगेट ते पुणे विद्यापीठ जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असा आवाहन

गरवारे चौक ते चापेकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना ही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे

पुण्यात वकील देखील सायबर चोरट्यांच्या जाळ्यात

महिला वकिलाला डिजिटल अरेस्टची धमकी देऊन लुटले ७० लाख रुपये

आपल्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाल्याने आपणास डिजिटल ॲरेस्ट होणार असल्याची धमकी देत पुण्यात वकील महिलेची फसवणूक

डिजिटल ॲरेस्टची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी एका ७० वर्षीय वकील महिलेची ७० लाखांची फसवणूक केली आहे. वकील महिलेने शिवाजीनगरच्या सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार पिसोळी रस्त्यावर राहायला आहेत

सायबर चोरट्यांनी ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून राष्ट्रीयकृत बँकेतून बोलत असल्याची केली होती बतावणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इंदापुरातील मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन अखेर मागे

Skincare Tips : फक्त चहासाठीच नाही! गोकर्णाचं फूल त्वचेसाठीही ठरतं फायदेशीर

Jayanti 2: कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेदाचा थरार उलगडणार; 'जयंती २'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Hair Cut: सुंदर आणि स्टायलिश दिसायचंय? मग, फेस शेपनुसार मुलींनी निवडावा 'हे' हेअरकट

CM फडणवीसांकडून DJ बंदीचे संकेत, नागरिकांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT