Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागांमध्ये पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यात मान्सूनची प्रगती अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा, महागाईचा भडका, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Beed: भाजपा आमदार सुरेश धस यांनी खान कुटुंबीयांची घेतली सात्वन पर भेट

बीड -

बीडच्या परळी येथील तोहीद खान हत्याप्रकरण

भाजपा आमदार सुरेश धस यांनी खान कुटुंबीयांची घेतली सात्वन पर भेट

यावेळी खान कुटुंबीयांना आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी आपल्या सोबत आहे असे आश्वासित केले.

तोहीद खान या 36 वर्षीय तरुणाचा भयंकर प्रकारे खून करण्यात आला होता

फक्त खून करून आरोपी थांबले नसून त्याला गाडीत टाकून गावभर फिरले आणि रेल्वे पटरीवर टाकून दिले होते

Nagpur: नागपूर शहरातील काही भागांमध्ये पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

नागपूर -

दिवसभर प्रचंड उष्णतेनंतर सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी...

नागपूर शहरातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी

पावसाच्या सरींसोबत ऊन सावलीचा खेळही या निमित्ताने पाहायला मिळाला.

वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागांमध्ये पावसाचे सरी पडल्या

थोड्या वेळासाठी गारवा निर्माण झाला असला तरी जून महिना लागूनही तापमान अजूनही 40 ते 42 अंशाच्या घरात असल्याने प्रचंड उकाडा आणि उष्णतेचा त्रास नागपूरकरांना सोसावा लागत आहे...

मात्र अधून मधून हलका पाऊस आल्याने थोडा गारवा मिळतोय..

PM Modi: मी साधना म्हणूनच देशाची सेवा केली - PM मोदी

पीएम मोदी -

मी साधना म्हणूनच देशाची सेवा केली

१२ वर्षांत अनेकवेळा चढ-उतार आलेत

मला दिलेल्या संधीबद्दल देशातील जनतेचे आभार

देशाच्या महान जनतेला मी नमन करतो

PM Modi: माझ्यासाठी सर्वसामान्य जनताच देवाचे रूप - PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी -

भारत मातेची सेवा करण्याची संधी मिळाली

जनतेच्या सेवेलाच मी साधना मानतो

माझ्यासाठी सर्वसामान्य जनताच देवाचे रूप

Bhandara: फिरायला गेलेला दोन मुलांच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

फिरायला गेलेला दोन मुलांच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयातील घटना

सात मुले थोडक्यात बचावले

जलाशतील नाव पलटी झाल्याने घडली दुर्दैवी घटना

महाराष्ट्रातील जवान काश्मीरमध्ये शहीद

काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवान

अर्जुन राजेंद्र जाधव वय 30 यांना हॅन्ड ग्रॅनाईटच्या स्फोटात वीरमरण आले.

लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते.

सांगली-मिरजमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

सांगलीच्या मिरज मध्ये मध्यवर्ती ठिकाणी सुरू असणाऱ्या कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान लहान-मोठ्या 37 गाय व म्हैशीची सुटका करण्यात आली. तसेच यावेळी सुरू असणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखान्यातून तब्बल 1 हजार 400 किलो मांस जप्त करण्यात आले. या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेले गाय व कालवड मोठ्या संख्येने जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली. दरम्यान बेकायदेशीरित्या कत्तलखाना चालवल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी

दिवसभर असलेल्या प्रखर उष्णतेनंतर सायंकाळी अचानक मेघ दाटून येत वादळी वाऱ्यासह भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. भंडारा शहरासह तुमसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. तर, ग्रामीण भागात कुठं हलक्या ते कुठं मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. पावसाच्या या हजेरीनं वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे.

सांगली-कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांची ताफा आडवू- राजू शेट्टी

शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही थांबवावी अन्यथा सांगली-कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या गाड्या आडवू, सभेत घुसून जाब विचारू,असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,मात्र शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे, दोन सर्वेक्षण थांबवा आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट विटा तहसील कार्यालयावर धडक दिली यावेळी प्रशासनाच्या राजू शेट्टी यांनी अधिसूचना नसताना रोज सर्वेक्षण कशासाठी केला जातो असा विचार सांगली कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा गाड्या अडवून, त्यांच्या सभेत घुसून मुख्यमंत्र्यांना जाब विचारू,असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

washim : अहेरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचा वाशीम कर्मचाऱ्यांकडून निषेध आंदोलन

वाशिमच्या नगरपरिषद कर्मचाऱ्याकडून आज निषेध आंदोलन करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपरिषदेच्या करनिर्धारक प्रशासकीय सेवा अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. घटनेचा निषेध करत घोषणाबाजी करून आरोपीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली..

Congress : मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा अर्ज बाद, काँग्रेस आक्रमक  

मिनाक्षी नटरजान यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

Gadchiroli : गडचिरोलीच्या अहेरीत नगरपंचायत अधिकाऱ्यावर हल्ला 

गडचिरोलीत अहेरीत नगर पंचायत अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.

माजी जिल्हा परिषद अध्यक्षासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारीमुळे तिढा कायम 

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे तिढा कायम आहे. तर स्थानिक पातळीवर देखील गोकुळ गीतेंना मनधरणीसाठी प्रयत्न केले जातायत. गोकुळ गीतेंचा राग महायुतीतील नेत्यांवर नाही तर उमेदवारावर आहे. ते आमच्या परिवारातीलच असून आज एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते भूमिका बदलतील आणि युतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास नाशिकचे उपमहापौर आणि शिंदे सेनेचे नेते विलास शिंदे यांनी व्यक्त केलाय

jalgaon : जळगावात भर उन्हात एकाचे आमरण उपोषण

जळगाव : विविध शासकीय विभागांतील कथित भ्रष्टाचार, अनियमितता आणि प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कैलास नरसिंग पारधी यांनी जळगावातील जी.एस. मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, तब्बल ४१ अंश सेल्सिअस तापमानात कोणत्याही मंडपाशिवाय उघड्यावर सुरू जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एकूण १६ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. काही शासकीय कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आणि मद्यधुंद अवस्थेत चाकव्या त्याचे गंभीर आरोपही यात आहेत. रणरणत्या उन्हात उपोषण करणे हा सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

Jaykumar gore : PM नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक काळ काम करण्याचा विक्रम - मंत्री जयकुमार गोरे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 वर्ष पूर्ण झालीच आहेत. पण अजून 2029 चा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ राहण्याचा त्यांचा विक्रम होईल, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.

ratnagiri : रत्नागिरीच्या जगबुडी नदीत तिघेजण बुडाले

रत्नागिरी- खेडमधील जगबुडी नदीच्या डोहात तिघेजण बुडाले

नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला.

thane : ठाण्यातील वृद्धाला मारहाण प्रकरण, मनसे ॲक्शन मोडमध्ये

ठाण्यातील परप्रांतीय चालकाकडून वृद्धाला केलेल्या मारहाणीनंतर मनसे ॲक्शन मोडमध्ये.. परप्रांतीयाने मारलेल्या घटनास्थळी पोहोचत ओला चालकांना मनसे नेते अविनाश जाधव यांनी चोप दिला. ओला चालकांना मराठी येते का, असे सक्तीने विचारत मनसे नेते अविनाश जाधव यांनी परप्रांतीय ओला चालकांना धडा शिकवला.

चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी आमरण उपोषण सुरू

लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून कायमस्वरूपी जागा आरक्षित करावी, या मागणीसाठी सुमारे २०० महिला-पुरुषांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

सोलापुरातील थकीत ऊस बिलासाठी सुरु असणारे जल समाधी आंदोलन स्थगित

प्रशासनाकडून लवकरात लवकर ऊस बिल देण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी घेतली माघार घेतली आहे. जल समाधी आंदोलन माघारी घेतलं असलं तरी आश्वासनांची जोपर्यंत ऊस बिल मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नसल्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे.

खाकी वर्दीतील गुंडांची शेतकऱ्यांच्यावरील दडपशाही खपवून घेणार नाही - राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा.. 

खाकी वर्दीतील गुंडांना घेऊन शेतकऱ्यांच्यावर दडपशाही करणार असाल, तर आम्ही खपवून घेणार नाही,असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.तसेच पोलिसांच्या भूमिकेला जनरल डायरची उपमा देत,प्रसंगी रक्ताचे वाट वाहू,पण शक्तिपीठ होऊ देणार नाही,अशी भूमिका देखील राजू शेट्टी यांनी जाहीर केली आहे.

जळगावात 'विमल'चा बंपर स्टॉक जप्त; एमआयडीसी पोलिसांची डिझो पेट्रोल पंपाजवळ धडक कारवाई 

जळगाव महामार्गावर सापळा रचून प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप पकडली आहे. अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या डिझो पेट्रोल पंपाजवळ ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ लाख ६१ हजार रुपये किंमतीचा विमल सुगंधित गुटखा आणि ७ लाखांची बोलेरो पिकअप असा एकूण २८ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अडीच लाखांची लाच घेताना प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना रंगेहाथ पकडले 

भिवंडी महानगरपालिका भ्रष्टाचारा मध्ये नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यानुसार मंगळवार ( ९) रोजी सायंकाळी प्रभाग समिती क्रमांक तीनचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर वय ५२ मूळ नियुक्ती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या विकासातही मोदींचे मोठे योगदान - एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली असून देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्राच्या विकासालाही त्यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व गती मिळाली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

आ. अनिकेत तटकरे यांनी घेतली मंत्री भरत गोगावले यांची भेट 

आ. अनिकेत तटकरे यांनी घेतली मंत्री भरत गोगावले यांची भेट

अनिकेत तटकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर गोगावले यांच्या भेटीला

गोगावले यांच्या रूची या शासकिय निवसस्थानी घेतली भेट

पुप्पगुच्छ देत गोगावले यांनी केल अनिकेत तटकरे यांच स्वागत

गोगावले आणि अनिकेत तटकरे यांच्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही

धरणे मृतसाठ्यात, कालवे कोरडे; सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा 

तळकोकणात मान्सूनचे आगमन झाले असले तरी सह्याद्रीच्या कुशीत मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कुकडी प्रकल्पातील सात आणि भीमा-भामा खोऱ्यातील तीन धरणांची पाणीपातळी मृतसाठ्यात गेल्याने कालव्यांचा विसर्ग बंद झाला असून शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधनासमोर संकट उभे ठाकले आहे.

सांगलीत पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात

कवठेमंकाळ तालुक्यातील विट्टलवाडी जवळ थार गाडीचा अपघात

रत्नागिरी नागपूर हायवे वर विठ्ठलवाडी येथे साईड डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती,

गाडीत सिकंदर सिंग होता, की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही, हायवे पोलीस या बाबत अधिक तपास करत आहेत

पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण

तपासणीतून कुठला ही बॉम्ब किंवा बॉम्ब सदृष्य वस्तू नाही

तपासणीनंतर पुणे महापालिका पुन्हा सुरू

बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

विद्यापीठाकडून अटी शर्ती सह आंदोलनाला परवानगी

अभिजीत दिबके यांच्या उपस्थितीत होणार आंदोलन

बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात

बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरीमध्ये अधिक मासाच्या महिन्यांमध्ये राज्यभरामधून भाविक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत.

पुरुषोत्तम पुरी या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे याच गोदावरी नदी पत्रातून बोट च्या साह्याने प्रवास करावा लागत आहे.

मात्र बोट मध्ये अनधिकृतपणे पैशाच्या हव्याश्यापोटी बोट चालकांकडून जास्त प्रवासी बसवले जात आहेत यामुळे बोटचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी

पुणे महापालिकेतील महापौर कार्यालय उडवून देण्याचा आला मेल

सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेतील कर्मचाऱ्यांना काढले बाहेर

बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया

आधीच भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बुलढाणा शहरासाठी आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. खडकपूर्णा धरणावरून शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे

अभिजित दिबके यांची आज पुण्यात पत्रकार परिषद

दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद

उद्या पुण्यात होणाऱ्या आंदोलनाबाबत स्वतः देणार माहिती

उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन

उद्या दुपारी ४ वाजता विद्यापीठात आंदोलन

येळगाव धरणात केवळ 10 टक्के जलसाठा; बुलढाण्यावर पाणीटंचाईचे सावट

बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील जलसाठा केवळ 10 टक्क्यांवर आला असून शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे नागरिकांना सध्या 10 दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे.

अंबरनाथमध्ये जिवंत मासा तोंडात सोडून पारंपरिक आयुर्वेदिक अस्थमा उपचार

हैदराबाद येथे सुमारे १७१ वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या जिवंत मासा तोंडात सोडून पारंपरिक आयुर्वेदिक अस्थमा उपचार पद्धतीचे शिबिर अंबरनाथमध्ये यशस्वीपणे पार पडले. गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सलग नवव्या वर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला राज्यासह देशातील विविध भागांतून रुग्णांनी मोठी उपस्थिती लावली.

अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ

अमरावती शहर पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेला एक पोलिस अंमलदार गुटखा तस्करीप्रकरणी अडचणीत सापडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. शेंदूरजनाघाट पोलिसांनी ७ जूनच्या रात्री पुसला–पांढुर्णा मार्गावरील टोलनाक्याजवळ संशयित कार अडवून तपासणी केली.

हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून

हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थापनाचा गलथान कारभार पुढे आला आहे, लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यात दाखल झालेल्या शव वाहतूक करणाऱ्या नव्या कोऱ्या रुग्णवाहिका वापराविना धूळ खात पडून आहेत, जिल्ह्यातील अनेक मृतदेह घेऊन न जाताच या रुग्णवाहिका एकाच जागेवर अडगळीत ठेवण्यात आल्या आहेत हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात उभ्या केलेल्या या शववाहीकाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे दरम्यान या प्रकारानंतर आता जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने धुळखात पडलेल्या या शव रुग्णवाहिका वापरण्यासाठी सुसज्ज करण्याची तयारी सुरू केली आहे.

कळंबोलीत विजेच्या लपंडावाने नागरिक संतप्त; महावितरण कार्यालयावर रात्रभर ठिय्या आंदोलन

उलवे आणि कामोठेनंतर आता कळंबोली परिसरातही वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाविरोधात स्थानिक रहिवाशांनी कळंबोली येथील महावितरण कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले.

Maharashtra News Live Update: सातारा जिल्हा परिषदेतील 'त्या' नाट्याचा वचपा काढण्याची हीच वेळ; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आज सातारा दौऱ्यावर आले असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सातारा जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांत जे राजकीय नाट्य घडले, त्याविरोधातील राग मतदानातून व्यक्त करण्याची हीच पहिली आणि शेवटची संधी आहे, असे सांगत कार्यकर्त्यांनी आपला रोष मतपेटीतून दाखवून द्यावा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले आहे.

पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांना मिळणार दिलासा

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांमध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणातून आरक्षित पिण्याच्या पाण्यापैकी तीन दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.गटविकास अधिकारी,पंचायत समिती उमरखेड यांनी पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये भूजल पातळी घटल्याने गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ग्रामस्थ व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरक्षित पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा

Good News : मोठी बातमी! ७.५ कोटी नोकरदारांच्या खात्यात PF चे पैसे जमा; जाणून घ्या तुमच्या खात्यात किती जमा होणार?

Kidney Cancer: किडनी कॅन्सरची सुरुवात अनेकदा या 1 लक्षणाने होते; 99% लोकं करतात दुर्लक्ष

VIDEO : सिया गोयलची मुजोरी संपेना, कॅमेऱ्यासमोर अश्लील वर्तन, मिडल फिंगर दाखवलं अन्...

मांड्यांवरील स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय|Thigh Strech Marks Tips

SCROLL FOR NEXT