Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Session: ब्रेकिंग! चंद्रकांत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, दादांकडून चॉकलेट देत ठाकरेंचे स्वागत; EXCLUSIVE VIDEO

महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन | Maharashtra Assembly Monsoon Session 2024: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर, मुंबई, ता. २७ जून २०२४

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात दाखल झाले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत करत चॉकलेट भेट दिले. उद्धव ठाकरे यांच्यासह अंबादास दानवे आणि अनिल परबही यावेळी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील- उद्धव ठाकरेंची भेट!

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाला नेहमी शेवटच्या दिवशी हजर राहणारे उद्धव ठाकरे आज पहिल्याच दिवशी हजर राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे भाजप नेते आणि राज्याच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत स्वागत केले.

चॉकलेट देऊन स्वागत अन् अनिल परबांना शुभेच्छा..

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांची भेट घेतली. यावेळी विधान परिषदेचे उमेदवार अनिल परबही उपस्थित होते. या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चॉकलेट भेट दिले. तसेच तुम्हाला निकालाच्या आधीच शुभेच्छा देतो, असे म्हणत अनिल परब यांना पेढाही भरवला.

ठाकरे- फडणवीसांचीही भेट! (Uddhav Thackeray and Devendra Fadnavis meet)

विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही विधानभवन परिसरात भेट झाली. देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. अनेक वर्षांनंतर जुने सहकारी एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT