Rohit Pawar SaamTvNews
महाराष्ट्र

Rohit Pawar News: पिक्चर अभी बाकी है; अनेक आमदार साहेबांच्या संपर्कात... रोहित पवार यांचा मोठा दावा

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे|ता. ३० मार्च २०२४

Maharashtra Politics News:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे ठाकरे गट तसेच काँग्रेसमधील बडे नेते महायुतीत प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही मोठे विधान केले आहे. (Maharashtra Loksabha Election)

काय म्हणाले रोहित पवार?

"पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पुन्हा शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. निलेश लंके आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत काल त्यांनी राजीनामा दिला. हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है! अनेक आमदार आमच्या आणि साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेकांना आपण परत घेऊ ," असे ते म्हणालेत.

तसेच "बारामती मतदार संघाचे नऊ सर्व्हे अजित पवार गटाकडुन झाले आहेत. त्यात त्यांचे उमेदवार सर्व सर्व्हेमध्ये मागे असल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळेच त्यांच्या सर्व्हेमधे पुढे दिसत आहे. त्यामुळे ते आता दहावा सर्व्हे करतील. आणि त्यानंतर बारामतीचा उमेदवार जाहीर करतील," असा मोठा दावाही रोहित पवार यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, यावेळी बोलताना रोहित पवार यांनी बारातमीमध्ये सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही व्यक्त केला. "सागर बंगला काही गोष्टी अनेकांना देण्याचं केंद्र झालं आहे. भाजपने पक्ष आणि घर फोडलं. भाजपचे देखील अनेक मतदार आता तुतारीला मतदान करतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे लीड अडीच लाखाच्यांवर असेल," असे रोहित पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT