Mumbai Taxi Rate : मुंबईहून पुणे, नाशिक अन् शिर्डीचा प्रवास महागणार!

Mumbai Taxi Rate Increase : काळ्या-पिवळ्या आणि वातानुकूलित निळ्या- सिल्व्हर टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
Mumbai Taxi Rate
Mumbai Taxi RateSaam TV

Mumbai News :

मुंबईहून पुणे आणि नाशिकसह शिर्डीपर्यंतचा प्रवास अनेक नागरिक करत असतात. या प्रवासासाठी काही प्रवासी टॅक्सीचा देखील वापर करतात. मात्र आता प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण काळ्या-पिवळ्या आणि वातानुकूलित निळ्या- सिल्व्हर टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Mumbai Taxi Rate
Kaali Peeli Taxi: ६ दशकांच्या प्रवासाला कायमचा ब्रेक; मुंबईच्या रस्त्यांवरुन काळी - पिवळी 'पद्मिनी टॅक्सी' होणार गायब

भाडेवाढ किती?

मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी प्रवाशांना टॅक्सीभाड्यात अधिकचे १०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना २०० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. मुंबई-पुणे टॅक्सीने प्रवास करत असाल तर ५० रुपये जास्तीचे भरावे लागणार आहेत.

भाडेवाढ केव्हापासून लागू होणार?

मुंबईमध्ये प्रवासासाठी अनेक नागरिक टॅक्सीचा वापर करतात. टॅक्सीचे भाडे कमी असल्याने वाहन चालकांना ते परवडत नाही. या आणि अशा अनेक कारणांसाठी मुंबई टॅक्सी संघटनेकडून मागण्या करण्यात येत होत्या. त्यानुसार भाड्यात सुधारणा करण्याची मान्यता आता मिळाली आहे. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यापासून ही भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे.

मुंबई-नाशिक वातनुकूलित टॅक्सीचे आताचे दर ४७५ रुपये आणि नवे दर ५७५ रुपये आहेत. मुंबई-शिर्डी वातनुकूलित टॅक्सीचे आताचे दर ६२५ रुपये आणि नवे दर ८२५ रुपये आहेत. मुंबई पुणे साध्या टॅक्सीचे आताचे दर ४५० रुपये आणि नवे दर ५०० रुपये आहेत. मुंबई पुणे वातनुकूलित टॅक्सीचे आताचे दर ५२५ रुपये आणि नवे दर ५७५ रुपये आहेत. टॅक्सीच्या भाडे दरात वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला याचा फटका बसू शकतो.

Mumbai Taxi Rate
Navi Mumbai News : मैत्रिणीला हॉटेलमधून कामावरून काढलं; मित्र बनला तोतया पोलीस अधिकारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com