Uddhav Thackeray News saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Speech: 'ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं...' उद्धव ठाकरेंचा घणाघात; मोदी- शहांवर डागली तोफ

Uddhav Thackeray Latur Ausa Sabha Live: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा लातूर जिल्ह्यामध्ये जनसंवाद दौरा पार पडत आहे. यावेळी औसा येथे झालेल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला.

Gangappa Pujari

संदिप भोसले, लातूर|ता. ७ मार्च २०२४

Uddhav Thackeray Sabha Latur:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा लातूर जिल्ह्यामध्ये जनसंवाद दौरा पार पडत आहे. यावेळी औसा येथे झालेल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"ओमराजे निंबाळकर आणि कैलास सोळुंके यांचे मी कौतुक करतो. कैलास सोळंके पळून घेऊन जाताना एकटे उतरून आले हा शिवसेनेचा वाघ आहे. आमदार, खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपत नाही हे भाजपच्या आता लक्षात आले आहे. मणिपुर पेटले तिकडे अमित शहा (Amit Shah) जात नाहीत, त्यांची हिंमत नाही ते महाराष्ट्रात येतात महाविकास आघाडीवर बोलतात. मात्र महायुतीचे ट्रिपल इंजिन सरकार भ्रष्टाचाराचे चाक लागलेले इंजिन आहे, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

तसेच "निवडणुकीपुरता तुम्हाला परिवार आहे ते कळाले आहे. पण मी माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणलं जबाबदारी घेतली. शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं तर बँका तुमच्या मागे लागतात. म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. त्यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहे, मात्र निवडणूक रोख्यांमधून हजारो कोटी रुपये भाजपने जमवले त्याचे रेकॉर्ड नाही का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र..

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहिराती साठी 84 कोटी रुपये खर्च केले आहे. आम्ही काम खूप केली मात्र जाहिराती करत बसलो नाही. आम्ही कर्जमुक्त केली याची कुठेही जाहिरात केली नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्हाला गर्व आहे पण आम्ही मोदींचे अंधभक्त नाहीत, अशी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण प्रकरण, आरोपीच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

Beed News: वाल्मिक कराडकडे सापडला स्पेशल फोन, भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ; बीड पोलिस संशयच्या भोवऱ्यात|VIDEO

Raigad : धक्कादायक! रायगडमध्ये उघड्या दरवाजाने एसटी धावली, व्हिडिओ व्हायरल

Gk : जगातील असे 7 देश जिथे कधीच होत नाही रात्र

SCROLL FOR NEXT