Maharashtra Lok Sabha Election  Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : नाशिकमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे सामना रंगणार? कोण असणार उमेदवार? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : गिरीश महाजन यांनी, ज्याच्याकडे ज्या जागा त्या त्यांनी लढवाव्या अशी चर्चा असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना सामना रंगण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

शरद पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहील अशी शक्यता वर्तवली होती. त्यात आज गिरीश महाजन यांनी, ज्याच्याकडे ज्या जागा त्या त्यांनी लढवाव्या अशी चर्चा असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना सामना रंगण्याची शक्यता आहे.

नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे सध्या नाशिक शिंदे गटात असून तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर शांतिगिरी महाराज देखिल निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. नाशिकची जागा शिंदे गटाला सोडण्यात आली तर या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते. शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी दिली तर त्याला भाजपही पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाशिक शिंदे गटाला मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इकडे शरद पवार यांनीही उद्वव ठाकरे गटाला जाईल असे संकेत दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल. कारण दोन्ही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

काल भाजपच्या २० उमेदवारांची यादी समोर आली आहे. सर्व खेळीमेळीच्या वातावरणात होणार आहे. आमच्यात बोलणी झाली आहे, कुठे ही अडचण येणार नाही. आमची धावपळ कुठेही होणार नाही.नाशिकची जागा शिवसेनेकडे आहे. ज्या त्या जागा त्यांनी घ्याव्या पण त्यात पण कमी जास्त होणार आहे. श्रीकांत शिंदे यांनी घोषणा केली मात्र त्याबाबतीत एकनाथ शिंदे बोलतील, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MBBS चा विद्यार्थी गोत्यात! दुबईच्या पोराला गाडी देणं पडलं महागात; मुंबईतील प्रतिकच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड सुरू

सरकारी पत्रात भाजप आमदाराचा भूमाफिया उल्लेख; नागरिकांच्या जमिनी हडपल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ, पाहा VIDEO

Politics: महाराष्ट्रापासून ते बिहार-ओडिशापर्यंत भाजपचा विजय, पण हरियाणात फक्त ०.३ टक्क्यांनी कसा झाला पराभव? वाचा सविस्तर

Manda Mhatre : आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका, नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT