Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : वंचितशिवाय महाविकास आघाडीचा 'प्लान बी' तयार; कोणत्या पक्षाकडे असतील किती जागा? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या आठ ते नऊ जागांवर तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची आज पुन्हा एकदा आज बैठक झाली. यावर अंतिम निर्णय होऊन 17 मार्च नंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या आठ ते नऊ जागांवर तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची आज पुन्हा एकदा आज बैठक झाली. यावर अंतिम निर्णय होऊन 17 मार्च नंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी आघाडीतील नेते सकारात्मक असून दिलेल्या प्रस्तावावर वंचित आघाडीच्या भूमिकेची प्रतिक्षा आहे.

वंचित बहुजन आघाडी शिवाय महाविकास आघाडीच्या जागावाटप झाल्यास शिवसेना ठाकरे पुन्हा एकदा 23 जागांवर ठाम असणार आहे. तर काँग्रेस पक्षाला 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा असा फॉर्मुला असणार आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी संदर्भात भूमिका अजूनही स्पष्ट नसल्याने महाविकास आघाडीने आपला प्लान बी तयार ठेवला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

६ हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापून राहुल गांधी मुंबईत येत आहेत. उद्या होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेच्या तयारी बाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. उद्या संध्याकाळी पाच वाजता राहुल गांधी हे चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. वंचित बहुजन आघाडी सुद्धा राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आमच्या महा विकास आघाडी मध्ये कोणताही वाद नाहीये, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केली. द्धव ठाकरे यांनी आज उरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे ग्रुपवर जोरदार हल्ला चढवला. अरविंद सावंत इथून पुन्हा खासदार होणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यावर नाना पटोले यांनीही अरविंद सावंत आमचे दक्षिण मुंबईतून लोकसभेचे उमेदवार आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT