State Election Commission announces municipal election dates; political focus shifts to Zilla Parishad polls saam tv
महाराष्ट्र

Zilla Parishad Election: जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार? महापालिकांसाठी घोषणा झाली, ZP निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार?

Zilla Parishad Election: सर्वांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जाणार आहेत.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या

  • महापालिका निकालानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार

  • राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच झेडपी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील महापालिकांच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोगाकडून आज सोमवारी संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यात सर्व महापालिका निवडणूक प्रक्रिया कधी पार पडेल याची माहिती देण्यात आली. राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. त्या तारखांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागलंय.

सर्वाच्च न्यायालयाने ३१ जानेवारी आधी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. पण आरक्षणामुळे २० जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पेच निर्माण झाला. त्यामुळे या निवडणुका जानेवारीत ढकलल्या गेल्या. २१ जानेवारी रोजी आरक्षणावर कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका मार्ग मोकळा होईल. त्यामुळे जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात झेडपीसाठी मतदान होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. तर डिसेंबरच्या अखेरीस निवडणुकीची घोषणा होऊ शकते.

पत्रकार परिषदेत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा आणि संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कारभाराची दिशा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या, असे निर्देश सरकारला दिले होते.

त्यानुसार निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचे नियोजन केले होते. आधी नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. २९ महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडतील.

दरम्यान महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका ४ वर्षांपासून रखडल्या होत्या. निवडणुका रखडल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाकामांवर परिणाम झालाय. विकासाच्या अनेक योजना ठप्प झाल्या असून नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. तर गेल्या २-३ वर्षापासून या महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र अखेर आज निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार, अशी माहिची सूत्रांकडून आधीच मिळाली होती. ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही असेही सांगण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: आनंदावर विरजन! लग्नाला जाताना समृद्धी महामार्गावर कार उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,अपघातापूर्वीचा VIDEO समोर

आचारसंहिता लागली! ३१ डिसेंबरची पार्टी करण्यापूर्वी नक्की वाचा, अन्यथा मद्यपींना होणार अटक, वाचा नियम काय सांगतो

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Liver Damage: काय सांगता खरं की काय! त्वचेवर काळे डाग आणि लिव्हरचा काही संबंध आहे का? 5 गोष्टी जाणून घ्यायलाच हव्यात

Peru Benefits: हिवाळ्यात पेरू का खातात, त्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT