Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update city wis Saam TV marathi News
महाराष्ट्र

Local Body Election Result : मतमोजणीआधीच 3 ठिकाणाचे निकाल समोर, ३ महिलांच्या नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update city wise : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतमोजणीपूर्वीच तीन ठिकाणचे निकाल समोर आले. तिन्ही ठिकाणी महिला नगराध्यक्ष निश्चित झाल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra Nagar Palika nagar parishad Nivadnuk Nikal : राज्यातील २४६ नगरपरिषदा अन् ४२ नगर पंचायतीचा निकाल आज जाहीर होणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात सर्वाधिक नगरसेवक अन् नगराध्यक्ष भजापचे निवडून येतील, असा अंदाज वर्तवला जातोय. आज सकाळी १० वा. पासून २८८ ठिकाणाची मतमोजणी सुरू होणार आहे. त्याने अनेक उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. पण त्याआधीच राज्यातील ३ ठिकाणाचे निकाल समोर आले आहेत. त्या तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आल्याचे शिक्कामोर्तब झालेय. १० वाजता निवडणूक अधिकाऱ्याकडून अधिकृत माहिती दिली जाणार आहे.

जळगावमधील जामनेर, सोलापूरमधील अनगर आणि धुळ्यातील दोंडाई या तिन्ही ठिकाणाचे निकाल समोर आले आहेत. या ठिकाणाच्या नगरपंचायत- नगरपरिषदेत भाजपची सत्ता आली आहे. कारण, या नगरपरिषदा बिनविरोध झाल्य आहेत. त्या ठिकाणाचे नगराध्यक्षही भाजपचेच निवडून येणार आहेत. कारण, जामनेर, दोंडाई आणि अनगर या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराशिवाय एकाही व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. आज सकाळी १० वाजता स्थानिक निवडणूक अधिकारी याबाबत घोषणा करतील.

तिन्ही ठिकाणी महिला राज -

महाराष्ट्रात सोलापूर, जळगाव अन् धुळ्यातील तीन ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निकाल बिनविरोध लागले आहेत. या तिन्ही ठिकाणी महिला नगराध्यक्ष निश्चित झाल्या आहेत. त्या तिन्ही नगराध्यक्ष या भाजपच्या आहेत. जामनेरमध्ये साधना महाजन, दोंडाईमध्ये नयनकुंवर रावल आणि अनगरमध्ये प्राजक्ता पाटील (भाजपा) यांची बिनविरोध निवड झाली आहे. या तिन्ही ठिकाणी आता महिला राज असेल.

अनगरमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता

सोलापूरमधील नगरपंचायत निवडणूक राज्यात गाजली होती. पण अखेर मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकऱ्यांना पत्र पाठवलेय. अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व १७ सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध जाहीर करण्यास आयोगाची मान्यता मिळाली आहे. आज सकाळी सर्व विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्द करतील. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतमध्ये सर्व 17 प्रभाग आणि नगराध्यक्ष पदावर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार विजयी

Emraan Hashmi : इमरान हाश्मी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी; पोटातले टिश्यू फाटले, नेमकं घडलं काय?

Husband Name Mangalsutra Design: नवऱ्याच्या नावाचे घाला मंगळसूत्र!, या आहेत ट्रेडिंग 5 डिझाईन्स

Diabetes: डायबिटीज असलेल्या रुग्णांना किडनी खराब होण्याचा धोका, 'ही' १ चूक ठरते कारण

Mistake after dinner: रात्रीच्या जेवणानंतर तुमची ही चूक आरोग्यासाठी पडेल महागात; तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

SCROLL FOR NEXT