Local Body Election Result Dhule Shindkheda Saam Tv
महाराष्ट्र

Dhule : धुळ्यातील शिंदखेडामध्ये भाजपला मोठा धक्का! अजित पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी

Local Body Election Result Dhule Shindkheda : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कलावती माळी विजयी झाल्यापासून भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Alisha Khedekar

  • शिंदखेडा नगरपंचायतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विजय

  • कलावती माळी नगराध्यक्षपदी विजयी

  • भाजपच्या उमेदवार रजनी वानखेडे यांचा पराभव

  • कार्यकर्त्यांचा जल्लोष व मिरवणूक

राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा धुरळा उडाला. या निवडणुकींचे आज सकाळी १० वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, पिंपळनेर नगरपालिका आणि शिंदखेडा नगरपंचायत मधील सदस्यपदाच्या ६७ जागांसाठी २०७ तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या ३ जागांसाठी १० उमेदवारांचे निकाल जाहीर झाले आहेत. शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटाच्या उमेदवारांनी गड राखला असून कलावती माळी यांचा विजय झाला आहे.

धुळ्यातील शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीचा निकाल ६ फेऱ्यांत पार पडला आहे. राज्यात सर्वत्र महायुतीच्या विजयाचा झेंडा फडकत असून धुळ्यातील शिंदखेडा येथे नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलावती माळी, यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटाच्या उमेदवार विजयी झाल्याने मंत्री जयकुमार रावल यांना मोठा धक्का बसला आहे.

दोंडाईमध्ये हुकूमशाहीचा विजय झाला तर, शिंदखेडामध्ये लोकशाहीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी शामकांत सनेर यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कालावती माळी विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मिरवणुकीवर नोटा उधळल्या. धुळ्यात अजित पवार गटाचा विजय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झालेला पाहायला मिळतो आहे. तर दुसरीकडे भाजप गटाच्या उमेदवार रजनी वानखेडे यांचा पराभव झाला असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla beetroot carrot juice: रिकाम्या पोटी आवळा, बीट अन् गाजराचा ज्यूस प्यायलात तर काय होईल? वाचा

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Navratri Kamarband Designs : गरबा नाइटसाठी रॉयल लूक! घागरा चोळीवर ट्राय करा कंबरपट्टाचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगारवाढ कधी होणार? एरियर आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर घरच्या घरी कसा चेक कराल? जाणून घ्या ७-२-२ चा नियम

SCROLL FOR NEXT