Maharashtra Local Body Election 2022 News Updates Saam Tv
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घेता येणार? निवडणूक आयोगानं तारखाच सांगितल्या

Maharashtra Local Body Election 2022: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास आमची यंत्रणा सज्ज आहोत असं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसह जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका (Local body election in maharashtra) कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता हा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास आमची यंत्रणा सज्ज आहे, असं निवडणुक आयोगाने (Election Commission) म्हटलं आहे. निवडणुक आयोगाने तसं पत्र प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दिले आहे. राज्यात ज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, त्याठिकाणी तत्काळ प्रक्रिया सुरू केल्यास मनपा निवडणुका घेणं शक्य असल्याचं निवडणुक आयोगाने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. (Maharashtra Local body elections 2022 News Updates)

इतकंच नाही तर, निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात निवडणुकांच्या तारखा देखील सांगितल्या आहेत. त्यानुसार, नगरपालिका निवडणुका १७ जून, जिल्हा परिषद २२ जून,पंचायत समितीच्या निवडणुका ११ जुलै, आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका २ जुलै रोजी घेणे शक्य असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. राज्य निवडणूक आयोगाने एक वेळापत्रकच सादर केल्यामुळे निवडणुका बाबत येत्या ४ मे रोजी काय निर्णय होतो, याची आता उत्सुकता आहे.

दरम्यान, यावरआता सर्वोच्च न्यायालयात ४ मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी प्रतिवादी राज्य शासन, राज्य निवडणूक आयोगाची पुढील सुनावणीची किंवा मुदतवाढीची विनंती मान्य करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य शासनाने ११ मार्च रोजी प्रभागरचनेचे अधिकार स्वतःकडे ठेवणारा कायदा मंजूर केला असून त्याला आव्हान देणारी याचिका औरंगाबादच्या पवन शिंदे आणि इतरांनी अडव्होकेट सुधांशू चौधरी, देवदत्त पालोदकर, आडगावकर यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT