Maharashtra SEC increases campaign spending limit ahead of local body elections. Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Local Body Election : नगराध्यक्ष कोण? निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपची ३-३ नावे, प्रदेशाध्यक्षांकडे यादी पोहचली

Maharashtra Local Body, Municipal Elections 2025 Date: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजपने निवडणुकीपूर्वीच नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी शहरातून तीन नावे निश्चित केली. ही यादी बंद लिफाफ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे जमा. पुढील काही दिवसांत अंतिम उमेदवार जाहीर होणार.

Namdeo Kumbhar

BJP shortlists three mayor candidates per city in Maharashtra civic elections : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. पण या निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच भाजपकडून नगराध्यक्षाची चाचपणी झाली होती. भाजपकडे ३-३ नावे तयार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यासाठी भाजपकडून कसून चाचपणी करण्यात आली अन् उमेदवार ठरवण्यात आले. निवडणुकीच्या घोषणेआधी तीन दिवस भाजपने प्रत्येक शहरातून ३-३ नावे निश्चित केली.

निवडणुकीची घोषणा होण्याआधी भाजपकडून नगरपंचायतींच्या थेट नगराध्यक्षांची नावे तयार ठेवल्याचे समोर आले. मागील तीन दिवसांत निवडणुका होणाऱ्या प्रत्येक शहरात गेलेल्या पक्षाच्या निरीक्षकांनी ३-३ नावे निवडली. ही नावे त्यांनी लिफाफ्यात बंद करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. त्याआधीच भाजपकडून नगराध्यक्षासाठी कोण उतरणार, हे ठरवण्यात येणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अखेर सुरूवात झाली. मंगळवारी दुपारनंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली. पण निवडणुकीच्या घोषणेआधी भाजपने आपली जोरदार तयारी केली होती. मागील शनिवार, रविवार व सोमवारी प्रत्येक नगरपालिकेच्या शहरांत पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांना पाठवण्यात आले होते. विविध आघाड्यांच्या अध्यक्षांसह भाजपची प्रत्येक शहरात ६१ जणांची कार्यकारिणी आहे. हे ६१ जण आणि त्या शहराचे रहिवासी असलेले जिल्हा पदाधिकारी, महापालिका पदाधिकारी यांची 'वन टू वन' चर्चा करून नगराध्यक्षपदाचे योग्य उमेदवार कोण, हे ठरवण्यात आल्याचे समजतेय. यामधूनच भाजपकडून प्रत्येक शहरात तीन तीन नावे ठरवण्यात आली आहे.

मिळालेल्या ३ नावांचे सर्वेक्षण तातडीने केले जाणार आहे. प्रत्येक शहरातील मतदारांना या उमेदवाराबाबत काय वाटते? तिघांपैखी क्रमांक एक आणि क्रमांक दोनला कोण राहू शकते, याचा आढावा सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. तीन दिवसात हे काम झाल्यास चौथ्या दिवशी त्या व्यक्तीला उमेदवार ठरवले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Monorail : ट्रायल रनमध्येच मोनोरेलमध्ये बिघाड, MMRDAच्या 'आधुनिक तंत्रज्ञाना'चा बोजवारा | पाहा VIDEO

Jayant Patil : 'अपक्ष खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका', जयंत पाटलांचा विशाल पाटलांना थेट टोला

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंची पाली गावातील शेतकऱ्यांसोबत संवाद

Rahul Gandhi H-Files : राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब, ब्राझिलच्या मॉडेलचे नाव घेत भाजपवर पुराव्यासह गंभीर आरोप

शिवसेना शिंदेसेनेला भाजपकडून जोरदार झटका; दोन बड्या नेत्यांची कमळाला साथ, काँग्रेसलाही खिंडार

SCROLL FOR NEXT