Raosaheb Danve and Pankaja Munde Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: भाजपकडून विधानपरिषदेवर कुणाला संधी? पंकजा मुंडे मंत्री, दानवे होणार आमदार?

Maharashtra Legislative Council Election 2024: विधानसभेपूर्वीच महायुती आणि मविआमध्ये विधानपरिषदेचा सामना रंगणार आहे. यासाठी भाजपनं जय्यत तयारी सुरू केलीय. भाजप आपल्या 5 जागांसाठी 10 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवलीय. यात कुणाची वर्णी लागणार ? लोकसभेतल्या कोणत्या पराभूत उमेदवारांचं पुनर्वसन होणार? हेच जाणून घेऊ ...

Vinod Patil

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची धामधूम सुरू झालीय. सत्ताधारी महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. भाजपनं पाच जणांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यासाठी 10 जणांची नावं केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहेत. यात

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ही नावं हायकमांडकडे?

पंकजा मुंडे, बीड

अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड

परिणय फुके, भंडारा

सुधाकर कोहळे, नागपूर

योगेश टिळेकर, पुणे

निलय नाईक, यवतमाळ

हर्षवर्धन पाटील, इंदापूर

रावसाहेब दानवे, जालना

चित्रा वाघ, मुंबई

माधवी नाईक, ठाणे

या दहा नेत्यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

याव्यतिरिक्त महादेव जानकरांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसलाय. त्यामुळे पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे आणि जानकरांना संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय.

पंकजा, दानवे, जानकरांना का संधी?

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला. पंकजांची वर्णी लागल्यास ओबीसी समाजाची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे. दानवेंना संधी दिल्यास मराठा समाजाचीही नाराजी दूर होऊ शकते. जानकरांची वर्णी लागल्यास धनगर समाजालाही गोंजारता येणार, असं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या पुनर्वसनाचीही शक्यता आहे. यामुळे मात्र हर्षवर्धन पाटलांची इंदापूरमधून विधानसभा लढण्याची संधी हुकण्याची चिन्ह आहे. याचा मात्र मोठा दिलासा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणेंना मिळणार आहे. त्यामुळे महायुतीतला जागांचा तंटा सोडवण्यास मदत होण्याची शक्यता आहे. तर धनगर, ओबीसी आणि मराठा नेत्यांचं पुनर्वसन करून सामाजिक समीकरणांच्या आधारावर विधानसभेत सत्तेचं समीकरण जुळणार का हे पाहणं महत्तावाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT