N D Patil Saam Tv
महाराष्ट्र

N D Patil: महाराष्ट्राचा आधारवड हरपला; नेत्यांसह सामान्यांची भावना

एन.डी. पाटील सर हे व्यक्तिमत्व आमच्यासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक होते.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी. पाटील (N.D. Patil) यांचे आज (साेमवार) निधनाचे वृत्त समजताच संपुर्ण महाराष्ट्र हळहळला. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक एन.डी यांना अदारांजली वाहत आहेत. महाराष्ट्राचा आधारवड हरपला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली असून डाॅ. एन.डी.पाटील यांचे विचार पुढं नेण्यासाठी प्रयत्न करु या असेही नमूद करीत आहेत. (maharashtra leaders pays tribute to senior leader n.d.patil)

काेल्हापूरचे पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी ट्विट करुन एन.डी (N D Patil ) यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ही बातमी अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेला. समाजाच्या हितासाठी अखेपर्यंत सरांनी रस्त्यावर उतरून लढाई केली. कामगार-शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे, आंदोलने करत न्याय भूमिका घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन,सीमा प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर लढा उभारणारे अभ्यासू आणि वैचारिक,कणखर व्यक्तिमत्व आमच्यासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक होते.

वेदनादायी वृत्त

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे,त्यांना शिक्षण मिळाले हे त्यांनी कृतीतून करून दाखविले. सर आज आमच्यात नाहीत ही भावना अत्यंत वेदनादायी आहे असे पाटील यांनी नमूद केले आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी ही पूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखाची आहे. विविध क्षेत्रातील त्यांचा अभ्यासपूर्ण वावर आणि मार्गदर्शन यांना आपण पारखे झालो आहोत असे नमूद केले आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे कार्य अलाैकिक आहे. एन.डी सर हे माेठं व्यक्तीमत्व हाेते. समाज हेच ध्येय ठेवून त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या सारखे अनेक कार्यकर्ते घडावेत.

शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी आज सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं आहे. या दु:खातून सावरण्याची शक्ती पाटील कुटुंबियांना मिळो अशी भावना व्यक्त केली आहे.

शोषित-वंचितांचा, शेतकरी-कष्टकऱ्यांचा आवाज, ज्येष्ठ नेते तथा पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील सरांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने न्यायासाठी तळमळीने संघर्ष करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले अशी भावना मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT