सावंतवाडी इथून फिशिंग रॉड घेऊन आलेले 4 युवक भरतीचा अंदाज न आल्याने अडकले समुद्रात
सिंधुदुर्ग किल्ला शेजारील असणाऱ्या खडकावर अडकलेल्या 4 युवकांची सुखरूप सुटका
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशी आणि पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तटबंदीवरून दोरीच्या साह्याने चार तरुणांची केली सुटका
फलटण येथे आयकर विभागाने संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सुरू केलेली चौकशी अखेर पाचव्या दिवशी संपली आहे. बुधवारी आयकर विभागाचे कर्मचारी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी, पुण्यातील निवासस्थानी , गोविंद मिल्क डेअरी वर चौकशीसाठी दाखल झाले आहे. पाच दिवसापासून संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरासमोर त्यांचे समर्थक देखील ठिय्या मांडून बसले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस ची आज पुण्यात बैठक पार पडली. खासदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. बैठकीला पार्थ पवार सुद्धा होते उपस्थितीत
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस चे सगळे नगरसेवक यांच्यासह मुख्य पदाधिकारी, कार्यकर्ते होते उपस्थितीत
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बैठक
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, पक्षाची निवडणुकीची तयारी, पक्षाची आगामी रणनीती यावर बैठकीत चर्चा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छञपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भिम सैनिक आक्रमक
कळंब शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात केला अचानक रास्ता रोको
अचानक सुरू केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लागल्या रांगा
राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भिम सैनिकांची निदर्शने
राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर दंगल नियंत्रण पथक दाखल
पुणे पोलिसांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह दंगल नियंत्रण पथकाला सुद्धा पाचारण
सोलापूरकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी X वर ट्विट केला
या नंतर सोलापूरकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी
माणगाव बाजारपेठेच्या दुतर्फा पाच ते सहा किलो मिटर वाहनांच्या रांगा
मुंबई आणि कोकणात जाणारे पर्यटक, प्रवासी माणगावमध्ये वाहतुक कोंडीत आडकले
महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणंपुल व भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट हा ११ फेब्रुवारी पासून पुढील ६ महिने बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झीट येथून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
पुण्यातील कोंढवा परिसरातील इमारतीला आग
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कोंढवा परिसरातील सनश्री बिल्डिंगमध्ये आग
दुपारी ३.३० वाजता आग लागल्याची प्राथमिक माहिती
आग विझवण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू
नेमकी ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही
रायगड जिल्ह्यात भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय. शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला आहे. आज प्रकाश देसाई यांनी पाली येथील मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत अवैध मुरूम तसेच वाळू उपसा रोखण्याचे आदेश महसूल व पोलीस प्रशासनाला दिले.. परंतु यानंतरही अवैध मुरूम उपसा सुरूच असल्याचे समोर आले. बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर अवैध वाळू अवैध मुरुमाची वाहतूक करणारा हायवा पकडला आहे.. पंकजा मुंडे यांनी बैठक घेत अवैध मुरूम उपसा तसेच वाळू उपसा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईच्या देखील सूचना केल्या होत्या आता या अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक प्रकरणात कारवाई होणार का असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय.
- पुण्याच्या भोर शहरातील रामबाग रोडवरील लागलेल्या आगीत किराणामालाच्या दुकानसह 2 दुकानांना अचानक आग लागली आहे.
- अगीचे कारण समजू शकले नाही
- भोर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे काम सुरूयं
- आगीत किराणा बाजार या दुकाणातील सर्व माल जळून खाक झालायं
- धुराचे काळे लोट दिसून येत होते
- भोर नगरपरिषद व भोर पोलिस घटनास्थळी दाखल
आर्वी तालुक्याच्या सोरटा येथे आगीमध्ये तुरीची गंजी जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्याचे पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले.सोरटा शिवारातील शहापूर येथील शेतकरी घनश्याम देशमुख यांची शेती पियुष विलासराव उपाध्ये रा. टाकळी निजामपूर यांनी मक्त्याने एका वर्षाकरिता लागवडीसाठी केली होती. शेतातील तुरी मजुरांच्या हाताने कापून त्याची मध्यभागी गंजी लावण्यात आली होती.रात्रीच्या सुमारास तुरीच्या गंजीला आग लागल्याने रात्री गावाकडे शेतात काहीतरी पेटवले असेल असा समज झाला. परंतु सकाळी शेतात जाऊन पाहिले असता तुरीची गंजी जळून खाक झाल्याचे दिसते. आग कशाने लागली याची मात्र माहिती मिळून शकली नाही. पोलीस स्टेशन गाठून त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
एकीकडे आदिवासी बांधवांना एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागत असतं मात्र पोस्टमार्फत आलेले आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्याने नागरिकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.....
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईक यांच्या संकल्पनेतून राज्यभर आयोजित केलेल्या संवाद चिमुकल्यांशी या अभियानांतर्गत शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तळोदा तालुक्यातील अमोनी शासकीय आश्रम शाळेत रात्री मुक्काम करत आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मुंबई गोवा महामार्गावर कर्नाला येथे अपघात
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारवर कंटेनर कोसळल्याने झाला अपघात
मुंबई गोवा महामार्गावर पनवेल नजीक कर्नाळा अभय अरंण्या येतील घटना
मृत आणि जखमींबाबत माहिती हाती नाही
राज्यात लाडक्या बहिणीसाठी पैसे आहेत परंतु दिव्यांग बांधव आणि विधवा महिला यांना मागील सहा महिन्यापासून वेतन मिळालेले नाहीये..अजित पवार 5 तारखे पूर्वी पैसे देणार होते.पण आले नाहीत याचाच निषेध करण्यासाठी 21तारखे पासून रायगड चा पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन करणारबच्चू कडू
प्रत्येकाचा मनात काय असते कुठं जायचं सांगत नाही... दिल्लीतील पत्रकार परिषदेत वज्रमुठ असल्याचं सांगितलं. किती दिवस टिकते बघू.. कोणी आव्हान दिल्यावर प्रति आव्हान देत गरजेचं नाही.. शिंदे शिवसेनाची भूमिका उबाठाच्या लोकांना पटली.उदय सामंत
रत्नागिरी - माजी आमदार राजन साळवी यांची ना घर का ना घाट का अशी राजकिय परिस्थिती
साळवींना भाजपने ठेवलंय वेटींगवर
शिवसेना उबाठानेही कापलेत परतीचे दोर
साळवी उबाठातही सक्रिय नाहीत
त्यामुळे अखेर नाईलाजास्तव साळवी शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती
सामंत बंधूंंनी फेटाळलीय साळवींच्या प्रवेशाची चर्चा
साळवींच्या राजकिय भवितव्याची कसोटी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला. याचे पडसाद सबंध मराठवाड्यासह महाराष्ट्रात पाहायला मिळाले. या घटनेला दोन महिने पूर्ण होतायत. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देशमुख कुटुंबीयांना न्यायाची मागणी केलीय.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला होता. या घटनेला दोन महिने पूर्ण होऊन देखील घटनेतील मुख्य मास्टर माईंड समोर आलेला नाही. तर कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सीआयडी सह एसआयटी तपास यंत्रणा करत आहे.
भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथे चारचाकी उलटून अपघात झाल्याची घटना घडली. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. अंकिता मनोज प्रभाकर असे मृतक महिलेचे नाव असून त्या मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यातील हट्टा येथील रहिवासी होत्या. धोप येथे वाहन पोहोचले असता वाहनावरून चालकाचे नियंत्रण सुटले. यात वाहन उलटल्याने अंकिता यांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. जखमींवर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा तपास आंधळगाव पोलिस करीत आहेत.
अहिल्यानगरच्या बोल्हेगाव या ठिकाणी कचरा वेचक महिला ज्योती घोडके आणि प्रमिला घोडके यांना एका विशिष्ट समाजाच्या (मुस्लिम) काही तरुणांनी मारहाण केली होती...यामध्ये दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या होत्या...या महिलांची आमदार संग्राम जगताप यांनी भेट घेतली...यामध्ये एका आरोपीला अटक केली आहे, परंतु आरोपीच्या इतर साथीदारांना देखील लवकरात लवकर अटक करावी यासाठी आ.जगताप यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली असून आरोपींवर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.
सांगलीच्या मिरज पूर्व भागातील आरग येथे नरवाड रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीमध्ये तीन बेवारस मोटरसायकली आढळून आल्याने मोठे खळबळ उडाली. शेतकऱ्यांची रस्त्या लगत सामायिक विहीर आहे. यामध्ये कोल्हापूर मधील दोन पासिंग गाड्या आणि कर्नाटक येथील एक गाडी आढळून आली आहे. अनेक दिवसापासून या मोटरसायकली पाण्यातच असल्याने गंजलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आल्या आहेत. तर मागील महिन्यात अशाच तीन बेवारस मोटरसायकली बेळंकी येथील विहिरीत आढळून आल्या होत्या. पुन्हा तीच घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे
सांगलीच्या विटा येथील साळशिगे आणि मायणी परिसरात तयार उग्र वासाचा 12 किलो 856 ग्रॅम गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांना विटा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या जप्त केलेल्या गांज्याची किंमत 1 लाख 28 हजार 560 रुपये इतकी आहे. हुसेनबी गुलाब शेख आणि शोभा बाळकृष्ण चिवटे या दोन महिलांना विटा पोलिसांनी अटक केली आहे.
यंदाच्या बेदाणा हंगाम उत्साहात सुरू झाला आहे. मात्र द्राक्ष उत्पादनात झालेली घट आणि द्राक्षाला मिळणार चांगला दर त्यामुळे द्राक्ष बाजारात विकण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादनात 20 टक्के होऊन अधिक घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज बेदाणा व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. तर बेदाण्यास यंदाही दर वाढण्याच्या शक्यतेने बेदाणा उत्पादक शेतकरी सुखावले आहेत.
कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची पुण्यातील मध्यवर्ती भागात ७ ते ८ वाहनांना धडक
पुण्यातील शुक्रवार पेठेतील घटना
भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटले नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या कारची अनेक वाहनांना धडक
कारचालक पोलिसांच्या ताब्यात
सुदैवाने अपघातात कोणीही जखमी नाही मात्र गाड्यांचे मोठं नुकसान
चिखली-बुलढाणा रोडवरील सवना फाटानजीक येथे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव एसटी बस ने धडक दिली. या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात तीस वर्षीय आलोक शामलाल शिंगणे याचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय रमेश पट्टे (वय २६) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिखलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखलीहून जळगावकडे जाणारी एसटी बस भरधाव वेगाने जात असताना सवना फाट्याजवळ हा अपघात घडला.
प्रसिद्ध समाजसेवी दिवंगत बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत आज वरोरा येथे येत आहेत. सकाळी साडेअकरा वाजता हे दोन्ही नेते वरोरा येथे येणार असून, या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती राहणार आहे. आनंदवन परिवाराने आनंदवनाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
चढाई केल्यानंतर दम लागल्यानंतर पाणी पिल्याने, स्ट्रोक बसून बेशुद्ध पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती..
काल संध्याकाळी घडली घटना
गडावर पर्यटक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशी आणि स्थानिक सिंहगड रेस्क्यू टीमच्या सद्यस्यांनी गडावर धाव घेत बेशुद्ध पर्यटकाला स्ट्रेचरवरून गडाच्या पायथ्याची आणले
मध्यरात्री अवघड पायावाटेने गड उतरत, एक - दीड तासांचा कठीण पायी प्रवास करत, पर्यटकाला स्ट्रेचर वरून गडावरून खाली आणत 108 ऍम्ब्युलन्स मधून पुढील कारवाहीसाठी पाठवले..
संबंधित पर्यटक वारजे परिसरातला असून रणजित मोहदास शिंदे असं नाव असल्याची प्राथमिक माहिती
राजगडमधील वेल्हा पोलिसांकडून अधिक तपास सुरू...
जालन्यात विद्युत डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडलीय. शहरातील मुजाहेद चौक भागातील विद्युत डीपीला काल रात्री अचानक भलीमोठी आग लागली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून डीपीला अचानक आग लागल्याने मुजाहेद चौक भागातील नागरिकांचा एकच गोंधळ उडाला होता. विद्युत डीपीला अचानक आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नसून या आगीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर पार पडले.नांदेडच्या किनवट येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळावा, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा तसेच समाजातील तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी या महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या महा शिबिरात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसांना अरेरावी करून धमकविणाऱ्या बांधकाम व्यवसायिक कुणाल दिलीप बाकलीवाल याच्यावर बारा दिवसातच पुन्हा पोलिसांच्या कोठडीत जाण्याची वेळ आली आहे. व्यवसायिकाची फसवणूक करून गुंडांकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत दुसरा गुन्हा दाखल करून सातारा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बाकलीवालच्या घरी दोन वर्षांपूर्वी धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात अडीच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचे 16 लाख रुपये बिल देण्यास बाकलीवालने नकार दिला.पैशांची मागणी केल्यानंतर बाकलीवाल हा त्या व्यवसायिकाला धमकावत होता.
वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या आवारात अपघातग्रस्त आणि चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेली तब्बल ६१ वाहने गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहेत. यात ५४ दुचाकी, ४ ऑटोरिक्षा आणि ३ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. पोलिसांकडून वेळोवेळी मूळ मालकांना वाहनं ताब्यात घेण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही जबाबदारी स्वीकारली गेली नाही. परिणामी, लवकरच या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी दिली. या लिलावामुळे पोलीस ठाण्याचा परिसर मोकळा होईल, तसेच लिलावातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग शासकीय कार्यासाठी होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच अजूनही नेमकं निदान समोर आले नाही.. अशातच आता हा धोका पुन्हा वाढलाय.. शेगाव तालुक्यातील तीन गावात अजून 20 रुग्ण आढळले आहेत.. आणि यामुळे परिसरात मोठे भीतीच वातावरण पसरले आहे.. शेगाव तालुक्याच्या गायगाव मध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांची केस गळती झाल्याने या कुटुंबाकडे कुणी पाहायला आणि बोलायलाही तयार नाही.. एक प्रकारे या कुटुंबावर बहिष्कारच गावकऱ्यांनी टाकल्याचं सांगण्यात येतंय...
आय सी एम आर टीम ने पुन्हा शेगाव तालुक्यातील रुग्णाचे नमुने घेतले असून ते तपासण्यासाठी लॅब मध्ये घेऊन गेले आहेत.. पहिला अहवाल अद्याप प्राप्त नसल्याने जिल्हा संभ्रमात आहे.. आरोग्य विभाग फक्त गावा गावात जाऊन सर्व्हे करते आहे मात्र उपाय योजना कुठल्याच सांगितल्या जात नसल्याने दहाष्टीचे वातावरण पसरले आहे..
समान काम समान वेतन यामागणीसाठी मागील महिनाभरापासून कंत्राटी कामगारांचे सुरु आहे आंदोलन.
मनपा प्रशासन दखल घेत नसल्याने उद्यापासून कामबंद आंदोलनाची करण्यात आलेय घोषणा.
समता समाज कामगार संघटनेच्या नेतृत्वाखालो 8500 कामगार करणार कामबंद आंदोलन.
सफाई कर्मचारी, उद्यान विभाग कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, मलनिस्सारण कर्मचारी, पाणीपुरवठा, विद्युत विभाग, घनकचरा विभाग व इतर सर्व कंत्राटी कामगारांचा असणार सहभाग.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वाशीम जिल्ह्यात १२ मेगावॉट क्षमतेचे चार सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. हिसई, उंबर्डा बाजार, धनज आणि पेटखदानपूर येथे हे प्रकल्प सुरू झाल्याने ३,५०० कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. या सौरऊर्जा प्रकल्पांमुळे दिवसा शेती करणे सोपे झाले असून सिंचनासाठी मोठा फायदा होत आहे.
भोरसह खंडाळा आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२७ अखेर मिळणार सिंचनाचा लाभ, नीरा देवघरचे कार्यकारी अभियंता यांची माहिती
नीरा देवघर उजवा कालवा १५८ किमी लांबीचा असून, १५८ किमी लांबीपैकी ६५ किमीपर्यंतचे कालव्याचे काम पारंपरिक उघड्या पद्धतीने पूर्ण झाले आहे.. त्यातून सिंचनासाठी नियमित पाणी सोडले जात आहे. त्यापुढील किलोमीटर ६६ ते ८७मधील कामे बंदनलिका वितरण प्रणालीच्या माध्यमातून प्रगतिपथावर..
या कामांमुळे भोरसह साताऱ्यातील खंडाळा आणि फलटण तालुक्यातील एकूण ६३६६ हेक्टर क्षेत्रास जून २०२७ अखेरपर्यंत सिंचनाचा लाभ मिळणार..
स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीमध्ये सॅलेसबरी पार्क,पुणे येथे एका चारचाकी इसमास दोन अनोळखी इसमांनी अडवुन त्याच्याबरोबर वाद करुन त्या गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन घेतली म्हणुन स्वारगेट पोलीसात गुन्हा नोंद आहे या गुन्ह्यातील आरोपी १) रोहीत सुर्यकांत कांबळे वय २१ वर्ष २) सागर शिवानंद जळकुटे वय २४ वर्ष या दोघांना अटक केली आहे.
maharashtra weather update : राज्यात थंडीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. वायव्य भारतात थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून,काल पश्चिम मध्य प्रदेशातील येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १४ ते २२ अंशांच्या दरम्यान आहे.राज्यात थंडी कमी झाली असून,कमाल तापमानात देखील चढ-उतार होत आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर,रत्नागिरी आणि जेऊर येथे तापमान ३५ अंशांपार आहे. अनेक ठिकाणी तापमान ३३ ते ३६ अंशांच्या दरम्यान असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. आज राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
माजी आमदार सुभाष बने करणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित
15 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी होणार प्रवेश
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने देखील मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार
सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद
माजी आमदार गणपत कदम यांचा देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश निश्चित
कदम हे राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार
-गेल्या काही महिन्यांपुर्वी शेवगा शेंगाची आवक बाजारात अल्प प्रमाणात होत होती त्यामुळे शेवग्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले होते.मात्र सध्या शेवग्याची मालेगाव बाजार समितीत आवक वाढली असल्याने दर सुध्दा कमी झाले असून ४० ते ५० रुपये किलोने व्यापारी त्याची खरेदी करत असून उच्च प्रतिच्या शेवगा शेंगा मात्र ६० रुपयाचा दर मिळत असल्याच व्यापारी सांगतात
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी परिसरात सध्या राजमा पीक भाव खात आहे. राजमाच्या वाघ्या वाणास प्रतिक्विंटल 8000 ते 9200 भाव मिळत आहे. राजम्याचा एकरी सुमारे सात ते आठ क्विंटल चा उतारा निघत आहे. विशेष म्हणजे बांधावर जाऊन व्यापाऱ्यांकडून राजमाची खरेदी देखील केली जात आहे. दुसरीकडे सोयाबीनचे उत्पादन घटले असून बाजारपेठेत भाव देखील कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्च निघणे कठीण झाले आहे.परिणामी सोयाबीनने त्रस्त झालेले शेतकरी राजमा पिकाकडे वळलेले आहेत.
धाराशिव च्या परंडा शहरात ट्रालीसह ट्रॅक्टर चोरी करुन जात असताना माळी गल्लीत ट्रॉली पलटी झाल्याने चोराने ट्रॉली सोडून टॅक्टरचा हेड घेवुन पसार झाल्याची घटना समोर आलीय दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या चोराकडुन ट्रॅक्टर घेवुन जाताना ट्रॉली पलटी झाली त्यामुळे मोठा आवाज झाला त्यामुळे घाबरलेल्या चोराने ट्रॉली सोडून टॅक्टरचा हेड घेऊन पसार झाला दरम्यान नागरीकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या माध्यमातून ट्राली उचलून ती पोलीस ठाण्यात लावली असुन चोराचा शोध घेण्याचे काम सुरू केल आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षकांना आता श्रेणी पोलीस निरीक्षक या पदावर बढती देण्यात आली असून यासंदर्भातील आदेश नुकतेच काढण्यात आले आहे.बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना नाशिक येथे किमान तीन महिने प्रशिक्षण अनिवार्य आहे.
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालया मार्फत राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन एल्डरलाइन- 14567 ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यावर मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधता येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूतीपूर्वक सेवा करून सुखी आणि निरोगी जीवन वृद्धींगत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही हेल्पलाइन महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,समाज कल्याण आयुक्तालय आणि जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येत आहे.
हमी दरानुसार यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी 14 केंद्रावर सोयाबीनची खरेदी करण्यात आली मात्र अजूनही चाळीस हजार क्विंटल सोयाबीन अद्यापही गोदामात पोहोचलेले नाही हे सोयाबीन बाजार समितीच्या शेडमध्ये आणि काही खाजगी गोदामात ठेवले आहे. शासकीय गोदामात सोयाबीन जाईपर्यंत या सोयाबीनची देखभाल करण्याची जबाबदारी हमी केंद्रावर राहणार आहे यामुळे सोयाबीन खरेदी केंद्राचे टेन्शन वाढलेले आहे.
जिल्हा बँकेतील विरोधी गटातील संचालकांनी सहकार विभागाकडे केली होती तक्रार..
बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर त्याला पदावर राहता येत नाही, अशी बँकेच्या उपविधीत तरतूद असल्याने, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एक वर्ष शिक्षा ठोठावली त्यामुळे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना पंधरा दिवसात खुलासा सादर करण्यासाठी दीदी नोटीस
बच्चू कडू यांना पंधरा दिवसात विभागीय सहनिबंधकांकडे मांडावे लागणार आपलं म्हणन..
या शिक्षेला बच्चू कडूंनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ठ आहे...
मात्र विरोधकांनी 14 जानेवारीला बँकेचे अध्यक्ष अविश्वासाचा ठराव करण्यासाठी विशेष सभा बोलावली आहे
महापालिकेकडून शहरातील खासगी बोअरवेल्सचे सर्वेक्षण केले जाणार असून वापरात नसलेले बोअरवेल बंद केले जाणार आहेत.
बोअरवेलमध्ये मुले पडण्याच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बोअरवेलच्या सुरक्षेसाठी नियमावली घालून दिली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
अशी आहे नियमावली
■ वापरात नसलेल्या बोअरवेल बंद करणे,
■ त्या बंद न केल्यास संबंधितांवर कारवाई.
■ सर्व बोअरवेलची नोंदणी करावी.
■ नागरिकांसाठी जनजागृती मोहीम.
■ संरक्षक भिंत तसेच सूचना फलक असावा.
* नियमांचे पालन होत नसल्यास दंडात्मक कारवाई.
पुणेकरांनो पाणी जपून वापरा, जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या कडक सूचना
शहरातील पाणी वापर वाढला असल्याचे केले नमूद
महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू
महापालिकेस मंजूर असलेल्या पाणी वापराच्या कोट्यापेक्षा खडकवासला धरणांतून शहरासाठी अधिक पाणी घेतले जाते.
परिणामी जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी कमी पडत असून पालिकेने शहरातील पाणी वापर कमी करावा अशा, सूचना जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने एका सुनावनीत पालिकेस दिल्या आहेत
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आज घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ९ लाख ४४ हजार ४३४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, ६ हजार ४४९ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५ लाख ६६ हजार ३५३. तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ लाख ७८ हजार ८१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. परीक्षेसाठी एकूण ७६ हजार मनुष्यबळाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे
महापालिकेकडून तब्बल अडीच कोटी रुपयांचा खर्च करून जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या प्रवेशद्वारा जवळ मेकॅनिकल वाहनतळ उभे करण्यात आले आहे.
हे वाहनतळ मागील अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्तीअभावी पडून आहे. हे पार्किंग आता महामेट्रोच्या ताब्यात दिले जाणार आहे,महापालिकेच्या भाडे आणि सुरक्षा ठेव निर्धारण समितीत त्यास मान्यता दिली आहे. पार्किंगमधुन मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ८० टक्के उत्पन्न महापालिकेस,तर २० टके उत्पादन महामेट्रोस दिले जाणार आहे.
दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आम्हाला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे.त्यामुळे आमच्या सांविधानिक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे असा दावा करत सुटका करण्याची मागणी करणारी याचिका शिवानी आणि विशाल अग्रवाल यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने या याचिकेसह अशाच प्रकारच्या ४० याचिका दोनपेक्षा जास्त न्यायमूर्ती असलेल्या खंडपीठाकडे पाठविल्या आहेत.
कल्याणीनगर अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०) आणि आई शिवानी विशाल अग्रवाल (वय ४९, दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना जुलै महिन्यात अटक करण्यात आली आहे.
शिवानी यांनी मुलाच्याऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे, तर विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी यांचे रक्त घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र अटक करताना कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली नाही असे नमूद करत अग्रवाल दांपत्याचे वकील यांनी याचिका दाखल केली आहे.
पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त परमजीत सिंग दाहिया यांनी अंधेरी पोलीस ठाणे येथे भरवला जनता दरबार
तक्रार निवारण दिनी स्वतः अप्पर पोलीस आयुक्तांनी तक्रारीन संदर्भात साधला तक्रारदारांशी संवाद
तक्रार निवारण दिनानिमित्त एकूण ७० अर्जदार व गैरअर्जदार हजर
अप्पर पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया यांनी केले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त दहिसर येथे महिलांसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
दहिसर पूर्वेकडील अलकनंदा मैदानावर लाडकी बहीण चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन
महिला विभाग प्रमुख मीना पानमंद यांच्या माध्यमातून महिलांसाठी च्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजन
आमदार प्रकाश सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून केले क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
महिलांचे क्रिकेट सामने पाहण्यासाठी दहिसरकारांची गर्दी
यवतमाळ जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीने पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वसाहतीसाठी 110 मोठे मध्यम, लघु प्रकल्प आणि तलावाचे पाणी आरक्षित असून आगामी काळात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रकल्प निहाय पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील 33 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
विदर्भाचा मागास शिक्का पुसण्यासाठी विदर्भातील 11 ही जिल्ह्यात मोठ-मोठे उद्योग आले पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडली.विशेष म्हणजे यवतमाळचा विस्तार मोठा आहेत.या जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवर आधारीत उद्योग उभारून बेरोजगारी कमी करण्याचा माझा प्रयत्न असणार असल्याची माहिती राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन ने भरलेल्या वाहनांची नाफेडच्या खरेदी केंद्रा बाहेर सोयाबीन भरलेल्या वाहनांची तीन किलोमीटर मीटर रांग लागली आहे. नाफेडच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः आठ दिवसापासून बसावे लागतेय ताटकळत माजलगांव येथील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने शेतक-यांच्या रांगा लागल्या असुन वेळेवर माप व्हावे यासाठी गर्दी वाढत असतांना मात्र चालकाकडुन कसल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. परिणामी शेतक-यांना आठ दिवसांपासून बसण्याची वेळ येत आहे. तालुक्यातील हरभरा, सोयाबीन व इतर धान्य उत्पादक शेतक-यां करीता एकच शासकीय खरेदी केंद्र तसेच एकच खरेदी केंद्र आणि त्यातही बारदाण्या अभावी अथवा कुल्याही कारणांमुळे नेहमीच बंद असल्याने शेतक-यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नोंदणी करून महिणा उलटला तरी देखील अनेकांना मॅसेज न आल्याने सोयाबीन खरेदी केंद्रावर आणता आलेले नाही.शेतक-यांना इतर कामे सोडुन शासकीय खरेदी केंद्रावर मुक्काम करावा लागत असल्याचे शेतक-यांनी सांगीतले.
जालन्यात कापूस विक्री करून आलेल्या एका शेतकऱ्याला दीड लाख रुपयांना लुटल्याची घटना जालन्यातील शिंगाडे पोखरी फाट्याजवळ घडली होती. शेतकऱ्याला लुटणाऱ्या टोळीच्या मौजपुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे. शेतकरी कापूस विक्री करून दुचाकीवर गावी जात असताना पाठीमागून पाठलाग करणाऱ्या चोरट्यंनी शिंगाडे पोखरी फाट्याजवळ चालू गाडीवरून शेतकऱ्याच्या हातातील बॅग हिसकावून आरोपी फरार झाले होते. कृष्णा शिंदे, विठ्ठल पास्टे, अनिकेत खरात, गजान झाडे असे संशयित आरोपीचे नाव असून त्यांना मौजपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास मौजपूरी पोलीस करत आहे
बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरात मृतदेह आढळला धुळे-सोलापुर महामार्गालगत एका शेतात कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील मोहम्मद सलीम वय-55 वर्षे (ट्रक चालक) या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरसुंबा परिसरात हा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तर या प्रकारणत फॉरेन्सिक टिम देखील दाखल होणार असुन अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे.
भारत हरिदास रसाळ यांच्या शेतात मृतदेह आढळला आहे. शरिरावर मोठे घाव आहेत तर तोंडाला गमजाने बांधलेले आहे. यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे अधिक तपास बीड पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.