महाराष्ट्रातल्या तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे, त्यात धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावचे चैत्राम पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधल्या बारीपाडा येथे चैत्राम पवार यांच मोठ कार्य असून, या ठिकाणी चैत्राम पवार यांची पद्म पुरस्कारासाठी घोषणा होताच त्यांच्या मूळ गावी बारी पाडा येथे ग्रामस्थांनी घराबाहेर गुढी उभारत त्यांना पेढे भरवत तसेच त्यांची मिरवणूक काढत त्यांचे स्वागत केले आहे.
चेंबूरमधील एसआरए बिल्डिंगमध्ये भीषण आग
घटनास्थळावर सहा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
अग्निशामक दलाकडून संपूर्ण बिल्डिंग रिकामी करण्यात आली
अंतरवली सराटी मध्ये गेवराईचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असून यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हंटलय. दरम्यान मयत सरपंच धनंजय देशमुख यांच्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे हा केवळ राजकीय विषय असून बीडचा बिहार म्हणून बदनामी करणे चुकीचे असल्याचं म्हणत सुरेश धस यांना त्यांनी टोला लगावलाय.
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनतर्फे 24 ते 27 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या पुष्प प्रदर्शनास 26 जानेवारी आणि रविवार सुट्टीचा आनंद घेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी विविध प्रकारचे रोपे खरेदी, हुर्डा पार्टी, विविध खाद्याच्या प्रकारावर ताव मारित, फुलांसोबत सेल्फी काढत पुष्प प्रदर्शनाचा आनंद लुटला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सोनूर्ली येथे कापूस जिनिंगला भीषण आग लागली. कोरपना तालुक्यातील एम. एस. जिनिंगला दुपारी ही मोठी आग लागली. आगीमुळे जिनिंगमधील कापूस जळून खाक झाला. आसपासच्या अग्निशमन दल सेवानी अग्निशमनाचे शर्थीचे प्रयत्न केले. माणिकगड सिमेंट, दालमिया सिमेंट, यासह कोरपना आणि गडचांदूर नगर परिषदेचे बंब घटनास्थळी पोचले. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सोनूर्ली येथे कापूस जिनिंगला भीषण आग लागली. कोरपना तालुक्यातील एम. एस. जिनिंगला दुपारी ही मोठी आग लागली. आगीमुळे जिनिंगमधील कापूस जळून खाक झाला. आसपासच्या अग्निशमन दल सेवानी अग्निशमनाचे शर्थीचे प्रयत्न केले. माणिकगड सिमेंट, दालमिया सिमेंट, यासह कोरपना आणि गडचांदूर नगर परिषदेचे बंब घटनास्थळी पोचले. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज आहे.
संविधानावरून विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टिकेवर मंत्री जयकुमार रावल यांनी बोलताना विरोधक राजकारणासाठी टीका करतात अस म्हणत पंतप्रधान मोदींनी संविधानाला अभिवादन करून पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे आणि संविधान दिवस साजरा करण्याचे आदेश देखील पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी संविधानाला पवित्र ग्रंथ मानणारा पक्ष असुन संविधानानुसारच काम आजपर्यंत आम्ही करत आलो असल्याचे म्हणत मंत्री जयकुमार रावल यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
राजेंद्र काळू साळुंखे असे आत्मदहन करणाऱ्या वन मजुराचे नाव असून साळुंखे हे गंभीर जखमी झाले आहेत.
वरिष्ठांकडून नाहक मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत साळुंखे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
अंगावर डिझेल ओतून घेतल्याने साळुंखे 80% भाजल्याचे प्राथमिक माहिती.
साळुंखे यांना उपचारासाठी नाशिककडे पाठवण्यात आले.
वनमजूर म्हणून साळुंखे वीस ते पंचवीस वर्षांपासून काम करत असून देखील कायमस्वरूपी करण्यात न आल्याने हा प्रकार केला असल्याचे नातेवाईकांचे मत.
धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य दलातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांचे आमरण उपोषण सुरू होते.
या आंदोलक जवानांची राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेतली आहे.
त्याचबरोबर त्यांच्या व्यथा जाणून घेत केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची यासंदर्भात भेट घेऊन या सर्व जवानांच्या व्यथा मांडणार असल्याचे आश्वासन दिले.
या सर्व उपोषणकर्त्या जवानांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.
बीड येथील प्रसिद्ध अशा मन्सूर शहावली दर्गाचे दर्शन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतले. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. सिंधिया कुटुंबीयांची मन्सूर शहावली दर्गावर श्रद्धा आहे. यामुळे वर्षभरातून एक वेळेस सिंधिया कुटुंबातील सदस्य या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात पारंपारिक पद्धतीने हा सर्व सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य, हा विचार घेऊन, देशाने गेल्या ७५ वर्षांची गौरवशाली वाटचाल केली. या ७५ वर्षात देशासमोर अनेक संकटे आली, आव्हाने निर्माण झाली; परंतु देश कुणापुढे झुकला नाही. वाकला नाही. डगमगला नाही. भक्कम उभा राहीला, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री पवार यांनी काढले.
कर्नाक ब्रीज गर्डर लॉन्चिंगचे काम तब्बल 5 तास उशिराने संपले, याचा फटका मध्य रेल्वेला बसला, पाच तासांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली.
सकाळी साडे पाच वाजता संपणारा ब्लॉक सव्वा दहा वाजता संपला, हा गर्डर बसवताना एक जॅक तुटला, त्यामुळे एका कामगाराला देखील दुखापत झाली आणि काम अखेर बंद करावे लागले.
नाशिकच्या येवला तालूक्यातील पारेगाव येथिल सोमनाथ काळे यांच्या शेतातील विहिरीत मादी बिबट्या मृत स्थितीतीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.गेल्या काही महिन्यां पासून या परिसरात बिबट्याने धूमाकुळ घालत पाळीव प्राण्यावर हल्ले केले होते.रात्रीच्या वेळी अन्न पाण्याच्या शोधात हा बिबट्या कठडा नसलेल्या विहिरीत पडला असावा अशी शक्यता वर्तवली जात असून,सकाळी शेतकरी काळे हे विहिरीवर गेले असता त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली असता वनविभागाला याची माहिती दिल्या नंतर वनविभागाच्या पथकाने जाळी टाकत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
परळीतील जगमित्र कार्यालयाचे सूत्रे अजय मुंडे यांच्या हाती आली आहेत. याच कार्यालयातून वाल्मीक कराड नागरिकांचे प्रश्न सोडवत होता. वाल्मीक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे बसत असून जगमित्र कार्यालयाची सूत्रे अजय मुंडे सांभाळत आहेत.
अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते देखील आहेत. पिंपरी जिल्हा परिषद गटातून ते विजयी झाले होते. तर धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघात ते ऍक्टिव्ह होते. आता जगमित्र कार्यालयातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजय मुंडे यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे.
क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या राजगुरुनगर येथील जन्मस्थळावर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणा-या क्रांतीकारकांना सलामी देण्यात आली.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कोल्हापुरात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या मान्यवरांचा गौरव पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला, तर विविध पथकांचे संचलनही सादर करण्यात आले.
जालन्यात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमावेळी नियोजनाचा अभाव असल्याने जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे हे जालना जिल्हाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जालना शहरातील पोलीस मुख्यालयावरती पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमात नियोजनाचा अभाव असल्याने दोन्ही आमदार जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्यावरती संतापलेले पाहायला मिळाले.
राज्याच्या तमाम सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील.. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडके ज्येष्ठ, युवा आणि आम्ही अडीच वर्ष काम केलं त्यामुळे जनतेने शिक्कामोर्तब केलं.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
आज 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .. दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर विविध शासकीय योजनांचे देखाव्याद्वारे पतसंचलन देखील करण्यात आले आहे... यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे..
मुंबई - नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटात चिंतामणवाडी जवळ एका खाजगी मिनी बस च्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. 21 जण जखमी, 3 गंभीर
जालन्यात 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे. शहरातील पोलीस मुख्यालयावर हा शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय. यावेळी पोलीस पथक, स्काऊट गाईड पथक, एनसीसी पथक यांनी पथसंचलन केलं आहे
वर्धेच्या जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तब्बल ११ वर्षांनंतर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केले.यावेळी ११ वर्षांनंतर प्रथमच वर्धा जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले आहे. यापूर्वी राज्यमंत्री म्हणून काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यानंतर मात्र वर्धा जिल्ह्याला मंत्रीपद मिळालेले नव्हते. यंदा वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांना राज्यमंत्रीपद मिळाले. आज पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यासह सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील शहीद परिवारातील कुटुंबियांची उपस्थिती होती. पालकमंत्री यांनी परेड निरीक्षण केले सोबतच पोलिसांकडून सलामी देण्यात आलीय.
बीडमध्ये 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बीड मधील मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले आहे.. बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर हा शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय. यावेळी पोलीस पथक, स्काऊट गाईड पथक, एनसीसी पथक यांनी पथसंचलन करत आन, बान अन् शान असणाऱ्या तिरंगा झेंड्याला मानवंदना देखील दिली.. दरम्यान आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम देखील होत असून मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
प्रजाकसत्ता दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा नंदुरबार पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या विविध पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली पोलिसांनी केलेले पथसंंचालन उपस्थितांच्या डोळ्यांचे पाळणे फेडणारे होते, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि स्वातंत्र सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते उपस्थितांना संबोधन करताना राज्याच्या कृषी मंत्री यांनी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवलेल्या अनेक योजना बद्दल माहिती दिली, तर कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहणार असून, शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. तर जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी शिक्षक खेळाडू यांच्या सन्मान आणि सत्कार करण्यात आला,
दिव्यांगांच्या मागण्या मंजूर करा तोडगा निघाला नाही तर मार्च महिन्यात दिव्यांगाच्या मागण्या संदर्भात मुंबईत मंत्रालयावर मी स्वतः आंदोलन करणार आहे.बच्चू कडू
राहाता शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी परिक्षेत कॉपी न करण्याची शपथ घेतली.. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 10 वी आणि 12 वी च्या परिक्षा होणार आहेत.. त्या अनुषंगाने शिक्षण विभागामार्फत कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे.. रयत शिक्षण संस्थेतील परिक्षेला सामोरे जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी कॉपी न करण्याची शपथ घेतली आहे..
लोकसभा निवडणूकनंतर भाजपच्या पायाखाली जमीन सरकली आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी कटकारस्थान केलं.प्रणिती शिंदे, काँग्रेस खासदार
रायगडच्या पालकमंत्री पदी सुनील तटकरे यांच्या कन्या आदित्य तटकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवन देत आंदोलन केले होते त्यावर बोलताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे, जाळपोळ करणं हे प्रत्येकाला किरकोळ गोष्ट झाली आहे, शेवटी तीन पक्षांच सरकार चालवायचा असल्याने कुठेतरी प्लस मायनस होत असल्याचं सांगत मंत्री झिरवाळ यांनी तटकरेंच्या पालकमंत्री पदाला एक प्रकारे पाठिंबा दर्शविला आहे दरम्यान रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिळा वरिष्ठ नेते सोडवतील आपण त्या प्रक्रियेत नाही असं देखील मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.
वर्धा पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा आणि सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच उद्घाटन सोहळा पार पडलाय.वर्धा येथील शहरामध्ये 22 जागेवर 93 व हिंगणघाट शहरातील 14 जागेवर 59 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून वर्धा येथील या प्रकल्पाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी. नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. सागर कवडे, वर्धा, पुलगाव, आर्वी व हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंचावर उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावे, व गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारांचा शोध घेणे व ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा महत्वाची भुमिका बजावणार आहे. यामुळे वर्धेतील गुन्हेगारी सोबतच, अतिक्रम, विस्कळीत वाहतुकीस आळा बसून वर्धेची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी केले.
अंबरनाथच्या चिखलोली परिसरात लघुपाटबंधारे विभागाचं चिखलोली धरण आहे असून धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जातो. या धरणालगतच्या भूखंडावर काही वर्षांपूर्वी विकासक विक्रमराज उर्फ गुड्डू चौहान यांच्या रिसॉर्टचं बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र चिखलोली धरणाची उंची वाढवल्यानंतर रिसॉर्टची जागा सुद्धा चिखलोली धरणाच्या नावावर करण्यात आल्याचा दावा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केला असून याबाबतचा सातबारा उतारा देखील त्यांनी दाखवला आहे. त्यामुळे भविष्यात ही जागा शासनाच्या नावावर होणार, हे माहीत असूनही रिसॉर्टला बांधकाम परवानगी देणाऱ्या अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसंच आता शासकीय जागेवर असलेल्या या अनधिकृत रिसॉर्टची बांधकाम परवानगी रद्द करून तोडक कारवाई करावी, अशी मागणी शिर्के यांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे केली आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी सजावट केली आहे.
पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मार्ग आंबेगाव जुन्नर तालुक्याचा बदलण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री आग्रही असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देत हा मार्ग बदलला जावु नये यासाठी दिल्लीला जाऊन बाजु मांडणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिलेय..
कर्नाक पुलाच्या गर्डर लॉन्चिंग साठी घेण्यात आलेल्या ब्लॉकचा कालावधी वाढला
सकाळी 5.30 पर्यंत असलेला ब्लॉक अजूनही संपला नाही, त्यामुळे मध्य रेल्वेवर अजूनही वाहतूक पूर्णपणे सुरू नाही
बी एम सी कडून ब्लॉक संपल्याची घोषणा नाही त्यामुळे मध्य रेल्वे लोकल आणि एक्सप्रेस चालवू शकत नाही
गर्डर बसवताना एका कर्मचाऱ्याला झाली आहे दुखापत तसेच गर्डरचे अलाइनमेंट देखील चुकले असल्याने ब्लॉक अजूनही पूर्ण नाही
त्यामुळे लोकल केवळ भायखळा, दादर, कुर्ला स्थानकापर्यंत सुरू, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड पर्यंत लोकल सुरू
अनेक एक्सप्रेस गाड्या देखील नवीन वेळेनुसार सोडण्यात येणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.