पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी वैतागले
वैतागलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्याचा थेट पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर गोंधळ
अर्धा तास शिवीगाळ करत जाब विचारल्याची चर्चा
मुंबई महापालिकेचा कारभार सरकारनेच चालवावा; नगरसेवकांच्या निष्क्रियतेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
प्रभागातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी नगरसेवकांनी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाचा सवाल.
झोपडपट्टी परिसरात कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणारा एक तरी नगरसेवक दाखवा, असे न्यायालयाने सुनावले.
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील दाऊतपूर येथील हृदयद्रावक घटना.
नदीत बुडालेल्या ९ वर्षीय शिवांश निलेश आमझरेचा मृतदेह आढळला.
नदी परिसरात खेळताना पाय घसरून शिवांश नदीत पडल्याचा प्राथमिक अंदाज.
दुष्काळ निवारणासाठी डीपीसीच्या १० टक्के निधीची तरतूद
पुणे जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मिळणार बळ
वाशिम जिल्ह्यात कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका आता पशुपालक शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे.
पावसाअभावी चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी आपले पशू विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.
मात्र जनावरांची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली असताना खरेदीदारांची संख्या घटली आहे.
* नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
* तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती मिळवण्यासाठी याचिकाकर्त्यांचे प्रयत्न
* साधुग्राम उभारण्यासाठी पर्यायी जागा अद्याप उपलब्ध नसल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा
* साधू-संत मात्र त्याच जागेवर साधुग्राम उभारण्यावर ठाम
* प्रशासनाच्या तोंडी आश्वासनांवर विश्वास नसल्याची याचिकाकर्त्यांची भूमिका
रत्नागिरी जिल्ह्यात आता बिबट्या थेट मानवी वस्तीतच नव्हे, तर बाजारपेठांमध्येही शिरू लागला आहे.
संगमेश्वरच्या आठवडा बाजारपेठ परिसरात बिबट्याचा वारंवार वावर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत मोगलाई सुरू
विना पुरावा अधिकार्यांवर निलंबनाचे बालट
शिवसेनेचा सत्ताधारी भाजपावर आरोप
पेणमधील ५० वर्षीय रिक्षाचालकावर नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
३० मिनिटांच्या आव्हानात्मक एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे टूथब्रश बाहेर काढण्यात यश
यवतमाळ शहरात देशी बनावटीची पेस्टल विक्रीसाठी आणली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली
त्यावरून पथकाने चौसाळा मार्गावर सापळा रचून तिघांना रात्री रंग यात अटक केली
त्यांच्याकडून दोन वाहना सह दोन लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर नांदेड जिल्ह्यात थंडीची चाहूल.
थंडीची चाहूल लागताच ग्रामीण भागात पसरली धूक्याची चादर.
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील येळी,महाटी परिसरात धूक्याची चादर.
सर्वत्र धूक्याची चादर पसरल्याने दृश्यमानता कमी.
ठाण्यातील पातलीपाडा ब्रिजजवळ पहाटेच्या सुमारास पिकअप टेम्पो डिव्हायडरला धडकून आणि मागून येणारा केमिकल टँकर पलटी होऊन भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेत टेम्पो चालक सलीम जखमी झाले असून, त्यांना एका जवळ असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.