ओठांच्या वर गाठ झाल्याने उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १० वर्षीय आस्था योगेश प्रजापती हिचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप आस्थाच्या नातेवाईकांनी केला आहे.
आस्थाला २७ ऑगस्ट रोजी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २८ ऑगस्ट रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया होणार होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७ वाजता तिला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाला लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री बावनकुळे यांनी दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही दिलीय. यंत्रसंदर्भात सर्व चौकशी होईलच. चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई होणारच असं म्हटलंय.
ग्राहकांना खरी पैठणी ओळखता यावी, त्यासाठी एक बारकोड आणि लोगो बनवण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सुरू असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे. खऱ्या पैठणीची ओळख होण्यासाठी बारकोडच्या माध्यमातून कोणता धागा वापरलाय कोणत्या गावात कोणत्या कारागिरांना ही पैठणी तयार केलेले याची माहिती ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बनावट पैठणी ओळखता येणार आहे
सहाय्यक दुग्ध निबंधक आणि निवडणूक अधिकारी नारायण परजणे यांच्याकडून 798 संस्था अपात्र. तर गोकुळच्या कर्मचारी ठेकेदार यांना दिलासा मिळाला आहे. त्यातील 148 संस्था सभासद मतदानाला पात्र तर 677 संस्था न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने निकाल ठेवला राखून
श्रावणातील तिसरा सोमवार आणि गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भिमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भक्तिमय वातावरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भिमाशंकरमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे हे भगवान महादेवाचे दर्शन घेऊन पूजा आणि अभिषेक करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात प्रशासन आणि पोलिसांकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच दर्शनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी परिसरात विशेष नियोजन करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावरील दरोडाप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ५ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी वाहनं ताब्यात घेतली आहेत. लोखंडी पट्टी रस्त्यावर टाकून वाहनं पंचर करायची आणि गाडी थांबल्यानंतर लूट करायची, अशी आरोपींची मोडस ऑपरेंडी असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. 100 किलोमीटरच्या पॅचवर पोलिसांकडून पेट्रोलिंग वाढवण्यात येणार असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
आम्ही ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल
अमित ठाकरे सह २५ जणाविरोधात गुन्हा दाखल चतुरशृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे येथून मुंबईतील मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या ओबीसी मोर्चासाठी हिंगोली मधून आंदोलक मुंबईत जाण्यास सुरुवात झाली आहे, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे, ओबीसी आरक्षण बचावासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं ओबीसी बांधवांनी सांगितल आहे
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन 31 ऑगस्ट भटक्या विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बंजारा क्रांतीदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण होते, तर प्रा. डॉ. रवींद्रकुमार बावने यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले.
उजनी धरणातील मासेमारीसाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेली ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सकाळपासून पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव परिसरात मच्छीमारांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं.
विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महासभेत प्रवेश करण्या अगोदरच भाजपा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक होत निदर्शन केली आहेत. घरपट्टी, पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वसूल केली जाते. तर दुसरीकडे पाणीपट्टी वाढवून करदात्याना नाहक त्रास दिला जातो असा आरोप ही करण्यात आला आहे.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चौक कर्जत मार्गावर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणा विरोधात आज प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. कर्जत फाटा ते वावर्ले गावादरम्यान 26 पेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम करण्यात आली होती.
भाजप कार्यकारिणी बैठकीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संविधानाची मुल्य पायदळी तुडवली जातात पण भारताला कधीही रोखता येणार नाही. विरोधक नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करतात. तसेच संविधानाचा दुरुपयोग केला तर हात जाळल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले.
गणपती उत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या बैठका घेऊन कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि सुरक्षिततेबाबत पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत जावुन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलन करण्याच्या घोषणेला धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
इंदापूरमध्ये विविध मागण्यांसाठी मच्छीमारांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान दोन मच्छीमार महिलांची पाण्याच्या मध्यभागी प्रकृती खालावली. दोन्ही महिलांना तातडीने पाण्याबाहेर आणण्यात आले, मात्र आंदोलन अद्याप सुरूच आहे. शासनाने मागण्या मान्य करेपर्यंत पाण्याबाहेर येणार नाही, अशी ठाम भूमिका मच्छीमारांनी घेतली आहे.
जिल्हा परिषद सदस्य आंदोलन करत आहे. सत्ताधारी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पदाधिकारी आंदोलन करत आहेत
जिल्ह्यात प्रशासनाकडून मॉडेल स्कूलचे काम सुरू आहे.त्यात अनियमित्ता झाल्याचा आरोप आहे.संबंधित कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करा अशी मागणी या सदस्यांची आहे...
करण खलाटे, तुषार थोरात, शिवसेना (UBT) विजयसिंह शिंदे, भाजप गटनेते शिवजीराव बुचडे, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर,प्रफुल शिवले,गणेश बोत्रे जिल्हा परिषदेच्या पार्किंग मध्ये प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे
उजनी धरणातील मासेमारीसाठी राज्य सरकारकडून ई टेंडर प्रक्रिया म्हणजे ठेका पद्धत राबवली जात आहे याला उजनीतील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे सरकारने ही ठेका पद्धत रद्द करावी आणि मासिक पास पद्धत चालू ठेवावी अशी मागणी मच्छीमारांकडून केले जात आहे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावानजीक भीमा नदीपात्रात शेकडाच्या संख्येने मच्छीमारांनी भीमा नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन केल आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भिमाशंकर दौऱ्यावर येणार असल्याने तळेघर ते भिमाशंकर मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम तातडीने सुरू करण्यात आलंय. गेल्या १५ दिवसांपासून भाविकांचा खड्डेमय प्रवास सुरू असताना, मंत्री येणार असल्याने प्रशासनाकडून तत्परता दाखवली जातेय.
मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा समन्वयक शिष्टमंडळ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज ४ वाजता भेट घेऊन समक्षात प्रश्न विचारणार आहे.
आज पुणे शहरात लागलेल्या मराठा क्रांती मोर्चा च्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे पाटील मराठा समाजाचे SEBC आरक्षण टिकवा कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांच्या आरक्षणाचे काय? उत्तर द्या!
यामुळे तणावाचे वातावरण तयार झाले होते.आज ४ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे मराठा आंदोलकांची भेट होणार आहे.
शिरपूर तालुक्यात अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या एका मोठ्या गांजा शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे, चक्क कापूस आणि तुरीच्या पिकात लपवून या गांजाची लागवड करण्यात आली होती, पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा 330 किलो गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे, याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार झाला आहे.
- उप-महापौरांच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात
- हिंदुवादी संघटनांनी टिपू सुलतानाचा फोटो करण्याचा दिला आहे आजचा अल्टिमेटम
- उप महापौर शान ए हिंद फोटो लावण्यावर ठाम
- पोलिसांकडून फोटो काढण्यासाठी उप महापौर, आयुक्तांना दिली नोटीस
- फोटो का काढावा पोलिसांना दिले उप महापौरांनी दिले लेखी प्रतिउत्तर
- पाच दिवसापासून टिपू सुलतानच्या फोटो बाबत मालेगावात वातावरण तापले असून अद्यापही कार्यालयातून फोटो निघाला नसल्याची माहिती
बदलापूर-कर्जत रस्त्यावरील वांगणी शहरच्या हद्दीत कुळगाव ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर धडक कारवाई केलीय.
कारवाईत पोलिसांनी 5 लाख 32 हजार रुपये किमतीचा विमल पानमसाला आणि सुगंधित तंबाखू, तसच वाहतुकीसाठी वापरलेला 3 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 8 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या ओबीसी महामोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, मंगळवारी (१ सप्टेंबर) सकाळी १० वाजता पुणे जिल्ह्यातील पाटस येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.
प्रा. हाके हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करताना मनोज जरांगे यांच्या मागण्यांवरही जोरदार टीका केली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचू नये आणि समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी हा महामोर्चा काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला असतानाच, आज पुण्यात होत असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत FDA च्या पथकाने अचानक भेट देत जेवणाची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे.
पथकाने जेवणाचे नमुने घेतल्याने भाजपच्या बैठकीपेक्षा सध्या ‘त्या’ जेवणाच्या सॅम्पलचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनीही FDA चे अधिकारी येऊन तपासणी करून गेल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी अन्नपदार्थांचे नमुने घेतले असून, तपासणीदरम्यान त्यांना काही आक्षेपार्ह आढळले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यक्रमानंतर भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून गोमूत्र टाकून कार्यक्रमस्थळाचे शुद्धीकरण करण्यात आले होते. या घटनेचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
याच निषेधार्थ पुण्यातील काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांनी RSSच्या मोतीबाग येथील कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान मनुस्मृतीचे दहन करण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला होता. मात्र, मनुस्मृतीचे दहन करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील द फॉरेस्ट हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का बारवर सासवड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत हुक्का साहित्य व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांविरोधात कोप्टा अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
SIT ने भोंदू अशोक खरातविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे एकूण ८ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी ६ गुन्हे लैंगिक शोषणाशी संबंधित असल्याने सेशन्स कोर्टाकडे वर्ग करण्यात आले असून, उर्वरित २ गुन्हे अद्याप मॅजिस्ट्रेट कोर्टात आहेत. हे दोन्ही गुन्हेही लवकरच सेशन्स कोर्टाकडे वर्ग होतील, अशी आशा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.
सेशन्स कोर्टात असलेल्या ६ खटल्यांपैकी एका प्रकरणात अशोक खरातने आपला गुन्हा जामीनपात्र असल्याचा दावा करत जामीन देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. मात्र, सरकारतर्फे त्याच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला आहे. खरातला जामीन का देऊ नये, याची कारणे सरकारतर्फे न्यायालयात सादर केलेल्या खुलाशात नमूद करण्यात आली आहेत, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली.
मनुस्मृति जाण्यासाठी काही कार्यकर्ते येत होते त्या विरोधात काँग्रेस आक्रमक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी जात असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात
बुलडाणा -
शस्त्राच्या धाकावर आदिवासी विवाहितेवर अत्याचार प्रकरण.
महिनाभरानंतर दोन आरोपींना अटक करण्यात बुलढाणा पोलीस यशस्वी.
नाशिक -
- भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात
- विशेष सरकारी वकील उज्वल निकम मांडत आहेत बाजू
- मात्र आरोपी खरातचे वकील राहुल कासलीवाल सुनावणीला गैरहजर
- भोंदू अशोक खरातच्या जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने श्रावण सोमवारच्या दिवशी भव्य कावड यात्रा काढली
संभाजीनगर येथे श्रावण सोमवार निमित्ताने काढलेल्या कावड यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि भाविक या कावड यात्रेत सहभागी झाले.
छत्रपती संभाजीनगर -
- श्रावणातील तिसऱ्या सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
- पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा
- हर हर महादेवाच्या जयघोषाने घृष्णेश्वर मंदिर परिसर दुमदुमला
शिरूर तालुक्यातील चांडोह येथील जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीने आज टाळं लावले
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांवरती भर उन्हात शाळेबाहेर बसण्याची वेळ आल्याने पालक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत
तर दुसरीकडे जागा मालकाने हि जमिन माझ्या नावावर असल्याने गावातील अंतर्गत राजकारणामुळे मला आता ही जागा शाळेसाठी द्यायची नाही अशी भूमिका घेतली आहे
तर दुसरीकडे ही जागा जर त्या व्यक्तीची असेल तर शासनाने त्याची मोजणी करून त्यांना त्यांची जागा काढून देऊन शाळेसाठी च्या जागेचा तोडगा काढावा अशी भूमिका ही ग्रामस्थांनी घेतलीय
लातूर -
लातूरच्या प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचा कळस
कर्मचारी आणि नागरिक त्रस्त
संबंधित विभागाचे दुर्लक्ष
इमारतीच्या परिसरात आणि कार्यालयीन भागात घाणीचे साम्राज्य
विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे
नंदुरबार -
नंदुरबार शहरातील पाणीटंचाईची समस्या सुटली
नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात 80 टक्के जलसाठा
पाणीसाठा उपलब्ध झाल्याने नंदुरबार शहरात पाणी कपातीच्या संकट टळलं
कोल्हापूर -
शक्तीपीठ महामार्गासाठीच्या मोजणीवरून आमदार राजेश क्षीरसागर यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांना सज्जड दम
अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे राजू शेट्टी राक्षस आहेत का ?
सरकारने एकदा मनात घेतलं तर तुम्हाला टांगून ठेवलं जाईल
चोपून काढण्याची भाषा करणे इतकं सोपं आहे का?
आमदार राजेश क्षीरसागर यांची आक्रमक प्रतिक्रिया
बीड -
समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद
समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मालडहून व दृशिंगपूर शिवारात गेट क्रमांक 538 ते 543 दरम्यान गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी मांडला होता उच्छाद
याच दरोडेखोरांच्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी बीडच्या शिरूर तालुक्यातून केली अटक
टोळीचा मुख्य सूत्रधार किरण अजिनाथ गायकवाड राहणार हिवरसिंगा याला तांत्रिक आणि गुप्तहेरांच्या माहितीवरून पोलिसांनी केली अटक
दरोडेखोरांच्या इतर साथीदारांचाही पोलिसांकडून शोध सुरू
या दरोडेखोरांनी खिळे आणि टोकदार लोखंडी पट्ट्यांचा वापर करत वाहनांचे टायर पंचर केले
भोर तालुक्यातील पसुरे येथे अंत्यविधीसाठी कुटुंबीयांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. भाटघर धरणाच्या फुगवट्यात गावची स्मशानभूमी गेल्याने स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे अंत्यविधीसाठी पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
राज्य भाजप कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली पाहणी
पुण्यात गणेश कला क्रीडा मंदिरात होत आहे राज्य भाजप कार्यकारणीची बैठक
पुण्यात दरोडेखोरांचा हैदोस
पुण्यातील सहकार नगर मधील प्रकार
दरोडेखोरांमुळे पुणेकर भयभीत
हातात ग्लोव्ज, तोंडाला मास्क लावून दरोडेखोर सोसायटीत घुसले
सोसायटीतल्या वेगवेगळ्या फ्लॕट मधे दरोडा
राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या बॉक्साइट खनिज उत्खनन प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध होतान पहायला मिळतोय.
स्थानिक आमदार किरण सामंत जनतेसोबत असून, त्यांनीही या प्रकल्पाला ठाम विरोध आहे.
त्यामुळे या प्रकल्पाची सोमवार, ७ सप्टेंबर रोजी होणारी जनसुनावणी होणार नाही ती रद्द केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात
१५ विद्यार्थी सुखरूप
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त...
अंतरवाली सराटी फाटा आणि परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त...
राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुण्यात भाजपने मोठा यश मिळवलं
पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता तिथं कार्यकारणी घ्या
राष्ट्रीय कार्यकारणीला उशीर झाला त्यामुळे आता राज्य कार्यकारणी पुण्यात घेतो आहे
राजकीय सामाजिक ठराव या बैठकी दरम्यान होतील..
ही कार्यकारणी प्रथा परंपरेचे आहे राहुल गांधी कार्यक्रमानिमित्त आले होते.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस......
1 सप्टेंबरच्या आक्रोश मोर्चाच्या संदर्भात पोलिसांची नोटीस......
उद्यापर्यंत मोर्चाचा मार्ग आणि मोर्चातील वाहन आणि संख्या कळवण्याच्या पोलिसांच्या सूचना
- भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
- नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात होणार महत्त्वाची सुनावणी
- लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांप्रकरणी अशोक खरात सध्या कारागृहात
- मार्चमध्ये भोंदू अशोक खरात याला करण्यात आली होती अटक, खरातचे काळे कारनामे आले होते देशासमोर
धनगर आरक्षणासाठी सरकारला पुन्हा इशारा
17 सप्टेंबरला परभणीत एल्गार मेळावा आणि आंदोलन
नांदेड येथे पार पडलेल्या धनगर समाजाच्या बैठकीमध्ये आंदोलनाची घोषणा
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रशासनाने मान्य केले असून, पुरावे समोर आल्यानंतर तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी,अशी मागणी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.
- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मारबत महोत्सवाचे आयोजन.
- महापौर निता ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निमंत्रण.
- नागपूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा मनपाचा प्रयत्न.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे
दरम्यान आज सरकारचे शिष्ट मंडळ आंतरवाली सराटी मध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.