Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट, कोर्टाचे तपास अधिकाऱ्यांना ताशेरे

Marathi Breaking Live Headlines Updates : आज राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, मराठा आंदोलन, ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

अतिक्रमण कारवाईवरून खासदार अमर काळे आक्रमक

- अतिक्रमण कारवाईवरून खासदार अमर काळे आक्रमक

- खासदार अमर काळे यांचा पारा चढला; गटविकास अधिकाऱ्यांची घेतली खरडपट्टी

- “आमदारांनी आदेश दिला म्हणून कारवाई करणार का?” खासदारांचा अधिकाऱ्यांना थेट सवाल

- “तुमचा पगार आमदार देतात का?” असा सवाल करत अमर काळेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

- आष्टी तालुक्यात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या गटविकास अधिकाऱ्यांना खासदारांनी चांगलेच धारेवर धरले

पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यानची अतिक्रमण हटविली

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नऱ्हे येथील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या जागेतील अतिक्रमणांवर आज महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली.

बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक दोन,अतिक्रमण विभाग आणि आकाशचिन्ह विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल १२ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

मंत्री भरत गोगावले यांची आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंच्यादौऱ्यावर टीका

एक जण माणगावच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आणि एक जण माझे बॅनर किती लागलेत ते बघायला आले होते. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नाव न घेता गोगावले यांनी टीका केली.

नारळी पौर्णिमा समाज बांधवांसाठी पवित्र सण,आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिल्या शुभेच्छा

नारळी पौर्णिमेनिमित्त कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कोळी समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली. पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहात सहभागी झालेल्या समाज बांधवांनी सागराला नारळ अर्पण करण्यासाठी मिरवणुकीद्वारे प्रस्थान केले. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच कोळी समाज बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

बारामतीत राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी

उद्या होणाऱ्या रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राख्यांची दुकाने सजली असून यावर्षी विविध प्रकारच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत राख्या खरेदीसाठी महिला आणि मुलींनी गर्दी केली आहे

नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

एंकर - नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक, मनोहारी व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. या पारंपरिक अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिक विलोभनीय दिसून येत आहे.

प्रदूषण मंडळाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार सगळे सण उत्सव साजरी करणे अनिवार्य

प्लाझ्मा आणि प्रेशर मिड या वस्तूंचे डेसिबल खूप जास्त आहेत हे निदर्शनास आले आहे

पुणे पोलिस आयुक्तालयात याबाबत टेस्टिंग सुद्धा झाली.

गणेश मंडळांकडून सुद्धा प्लाझ्मा, प्रेशर मिड, लेसर बद्दल सुद्धा या गोष्टी वापरणार नाही याबाबत चर्चा झालेली आहे.

अमरावती स्त्री रुग्णालय अग्निकांड; आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची पाहणी

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्दैवी अग्निकांडानंतर आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नवजात शिशू अतिदक्षता विभाग, जनरल वॉर्डसह विविध विभागांची पाहणी करत दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणातील एकाही दोषी व्यक्तीला पाठीशी घातले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे बोर्डीकर यांनी स्पष्ट केले. आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्याकडून दुर्घटनेची मिनिट टू मिनिट माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात अशा तांत्रिक चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री भरत गोगावले यांनी केली मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे पुलाची पाहणी

० मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे येथील पुल बनला आहे धोकादायक

० गणेशोत्सवा दरम्यान नागोठणे येथे वाहतुक कोंडी होऊ नये या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी केली पुलाची पहाणी

० पुलावरून हलक्या वाहनांची वाहतुक गणेशोत्सवादरम्यान सुरू करण्याबाबत अधिकारी आणि ठेकेदाराला दिल्या सूचना

अमित ठाकरे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनला भेट देणार

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलना अमित ठाकरे भेटतील

आदिवासी विभागिय कार्यालयात आंदोलनास देणारे भेट, साधणार तरुण विद्यार्थ्यांशी संवाद...

रायगडमधील तीन जण नेपाळमध्ये अडकले

पर्यटनासाठी तिबेट आणि नेपाळ परिसरात फिरायला गेले होते

० नेपाळमधील दुर्घटनेत तीन जण आडकले

० तीनही पर्यटकांचा अद्याप संपर्क झालेला नाही

० रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील रहिवाशी

० रश्मी दिलिप शेठ, प्रमोद केणे, सोनाली बेलोसे अशी अडकलेल्या पर्यटकांची नाव

मालेगाव महापालिकेतील उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानाचा फोटो लावल्याप्रकरणी शिंदे गट आक्रमक

- शिंदे गटाच्या सर्व नगरसेवकांकडून उपमहापौर कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन..

- उपमहापौरांचे कार्यालय तात्काळ उघडण्याची शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची मागणी..

- जोपर्यंत दालनातील टिपू सुलतानाचा फोटो काढला जात नाही, त्याची शहानिशा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा नगरसेवकांचा निर्धार..

- उपमहापौर कार्यालयातील फोटोवरून मालेगाव महापालिकेत राजकीय वातावरण तापले..

- फोटो प्रकरणाचे पडसाद उमटत असताना शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आंदोलनावर ठाम...

- परिपत्रक प्रमाणेच फोटो लावावे अशी मागणी..

- फोटो न काढल्यास उपमापौर कार्यालयाचा दरवाजा तोडणार असल्याचेही सर्व नगरसेवकांचा निर्णय..

शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली राष्ट्रवादीच्या आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर जहरी टिका

अनिकेत तटकरे यांचा सरोगसी बाळ म्हणून केला उल्लेख

० आम्ही फॉर्म काढला नसता तर लढाई होऊन आम्ही जिंकलो असतो, अनिकेत तटकरे यांचा राजकिय जन्म झालाच नसता

० अनिकेत तटकरे यांनी आकलेचे तारे तोडू नयेत

० दळवी यांचा सल्ला

० दळवी यांच्या या जहरी टिकेनंतर रायगडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा राजकिय वाद पेटण्याची चिन्ह

सोलापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख राख्या पाठवणार

- जिल्ह्यातील विविध भागातून महिलांतर्फे 1 लाख राख्या पाठवल्या जाणार

- शिवसेना शिंदे गटाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येतेय

- दक्षिण सोलापुरातील प्रताप नगर तांड्यावरून आज 5 हजार राख्या जमा करण्यात आल्या.

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेतून महिन्याला दीड हजार रुपये सुरू केले.

- त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही या 1 लाख राख्या त्यांना पाठवतोय.

- उद्या रात्री या राख्या मुंबईला पोहोच करणार आहोत.

Pune: हातात जीआर मिळाला की आंदोलन मागे घेऊ, आंदोलक विद्यार्थ्यांनी स्पष्ट सांगितले

पुणे -

आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत

हातात जीआर मिळाला की आंदोलन मागे घेऊ

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे.

आम्ही आंदोलन मागे घेण्यासाठी तयार आहोत.

पंधरा मागण्यांपैकी सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत.

फक्त हातामध्ये आमच्या जीआर मेळावा आम्ही आंदोलन मागे घेऊ.. आता विद्यार्थी जीआर हातात मिळण्याची वाट पाहत आहेत..

Gadchiroli: अहेरीत काँग्रेसचा चक्काजाम; खड्ड्यातच केली भाताची रोवणी

गडचिरोली -

अहेरीत काँग्रेसचा चक्काजाम; खड्ड्यातच केली भाताची रोवणी

अहेरी-देवलमरी मार्गाच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसचे आंदोलन.

खड्ड्यांत भाताची रोवणी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

२० ते २५ गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली इंदारम येथे सकाळी ९.३० ते ११.५० वाजेपर्यंत चक्काजाम करण्यात आला.

आंदोलनामुळे वाहतूक दोन तास वीस मिनिटे ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच आंदोलन झाल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे.

Kolhapur: कोल्हापूरमधील ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित

कोल्हापूरमधील ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित

महामार्गावर धावणाऱ्या खासगी बसेसवर राज्य परिवहन विभागाकडून लावण्यात येणाऱ्या ई-चलनाच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे.

आरटीओकडून मनमानी पद्धतीने दंड आकारला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

याच मागणीसाठी कोल्हापूर आरटीओ कार्यालयाबाहेर प्रदीप राठोड यांनी १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं.

Nagpur: नागपुरातील आदिवासी आयुक्त कार्यालय येथे विद्यार्थ्यांचा आंदोलनस्थळी सामाजिक कार्यकर्त्या नेहा बोरा दाखल

नागपूर -

नागपुरातील आदिवासी आयुक्त कार्यालय येथे विद्यार्थ्यांचा आंदोलनस्थळी सामाजिक कार्यकर्त्या नेहा बोरा दाखल

जंतर मंतर येथे झालेला आंदोलन नंतर चर्चेत आलेल्या हे नेहा बोरा आहेत आज नागपुरात तरुणांशी संवाद साधणार आहे..

त्यापूर्वी नागपुरात सुरू असलेक्या आदिवासी विद्यार्थ्यांचा आंदोलनात संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे...

Bhandara: भंडाऱ्यात वन विभागाची मोठी कारवाई, ५६ किलो चंदनासह एकाला अटक 

भंडारा -

भंडाऱ्याचा बघेडा येथे वन विभागाची मोठी कारवाई

५६ किलो चंदनासह १.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

एका व्यक्तीवर गुन्हा दाखल

Ahilyanagar: साई चरणी 11 लाखांचा हिरे जडीत सोन्याचा ब्रोच अर्पण

अहिल्यानगर -

साई चरणी हिरे जडीत सोन्याचा ब्रोच अर्पण

11 लाख 19 हजार रुपये किमतीचा तथा 75 ग्रॅम वजनाचा ब्रोच अर्पण...

मूळचे दिल्लीचे तसेच सध्या इटली येथे वास्तव्यास असलेले साईभक्त सतीश कुमार चान्ना यांच्याकडून साई चरणी दान...

आकर्षक नक्षीकाम केलेला हिरे जडीत सोन्याचा ब्रोच अर्पण...

साई संस्थानच्या वतीने दानशूर साईभक्ताचा सत्कार...

Pune: नेपाळमध्ये अडकलेले पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुरक्षित आणि सुखरूप

पुणे -

नेपाळमध्ये अडकलेले पुणे जिल्ह्यातील व्यक्ती सुरक्षित आणि सुखरूप

पुणे जिल्हा प्रशासनाची माहिती

पुणे जिल्ह्यातील एक व्यक्ती असून त्यांच्यासह इतर ३ नातेवाईक नेपाळ मध्ये अडकले

या अडकलेल्या व्यक्तींपैकी २ जणं मुंबईचे एक जण अहिल्यानगर आणि एक जण पुण्यातील असल्याची माहिती

अडकलेले सर्व व्यक्ती सुरक्षित असून जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती

नेपाळ मध्ये कोणी अडकून पडल्याची माहिती असल्यास जिल्हा प्रशासनाला कळवावे असे आवाहन

Pune: मागण्या मान्य होऊनही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, उपोषणाचा १५ वा दिवस 

पुणे -

मागण्या मान्य होऊनही आंदोलन सुरूच

उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा आजचा पंधरावा दिवस

शरद ठोकळ याची प्रकृती बिघडली

प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटल साठी रवाना

ठाणे शहरातील क्लस्टर योजने विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक

ठाण्यातील तीन हात नाका सिग्नल ते क्लस्टर कार्यालयावर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत काढण्यात आला आहे धडक मोर्चा..

मोर्चात शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित..

पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली असता राष्ट्रवादी SP पक्षाकडून काढण्यात आला आहे मोर्चा ..

अमित ठाकरे नागपुरात; विद्यार्थ्यांच्या समस्या घेतल्या जाणून

कल्याण-डोंबिवली आणि नाशिकनंतर आता नागपूरमध्ये सभासद नोंदणीसाठी आलो असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. कॉलेज स्तरावर विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी आणि समस्या आहेत, हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. आमच्या काळात अशी परिस्थिती नव्हती, मात्र आज संघटना विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. विद्यार्थ्यांना कधीही कोणतीही मदत लागल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मेहंदी काढण्याबाबत बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, माझ्या डोक्यात फक्त माझी बायको असते, त्यामुळे बाहेर आल्यावर मेहंदी काढून घ्यावी असे वाटले आणि ती काढली. दुर्दैवाने जिकडे जातो तिकडे लोक सेल्फी काढतात, मात्र त्यांच्या समस्या आणि अडचणी सांगत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. विशेषतः विद्यार्थिनी आपल्या समस्या सांगत नसल्याचे ते म्हणाले. तसेच, एका ठिकाणी वॉशरूममध्ये गेल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणेकरांची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपीएलमध्ये धक्कादायक प्रकार

विना तिकीट करणाऱ्या विद्यार्थ्याकडून 500 रुपये दंड असताना 7000 रुपयाचा दंड तिकीट तपासणीने घेतले स्वतःच्या बँक खात्यावर

कारवाईच्या नावाखाली विद्यार्थ्याकडून तिकीट तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याने केली आर्थिक लूट..

या तिकीट तपासणीने सुरुवातीला 13 हजार रुपयांची विद्यार्थ्याकडे मागणी केली असल्याची माहिती तडजोडी अंतर 7000 रुपये स्वीकारले

अमरावती भाजप शहर जिल्हा कोर कमिटी जाहीर; नवनीत राणा, अनिल बोंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे....भाजपने अमरावती शहर जिल्हा कोर कमिटी जाहीर केलीय.

या नवीन कोर कमिटीमध्ये नितीन धांडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची तर संजय कुटे यांच्याकडे जिल्हा प्रभारीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे...

ललित समदुरकर, बादल कुळकर्णी, राधा कुरील आणि चेतन पवार यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे....

सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली. 29 आॅगष्ट पासून जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत.

त्यांच्या या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा देत उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे आहे.

सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये, गनिमी काव्याने मुंबईत आंदोलन केले जाईल असा इशाराच मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी दिला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून बेरोजगार हक्क एल्गार

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रॅली

हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत रॅली

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली चे आयोजन

अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर, विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर असून ते विद्यार्थ्यांशी वेगवेगळ्या 4 कॉलेजेस मध्ये जाऊन संवाद साधणार आहे....

ते दौऱ्याची सुरुवात नागपूर आतील संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दौऱ्याला सुरुवात करणार आहे..

मॉडिफाइड सायलेन्सर व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांवर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

मॉडिफाइड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तसेच फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकी वाहनांबाबत वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली. मागील दोन महिन्यांपासून परिसरात अशा वाहनांवर विशेष लक्ष ठेवून कारवाईची मोहीम राबविली आहे.या मोहिमेदरम्यान मॉडिफाइड सायलेन्सर, कर्णकर्कश आवाज करणारी उपकरणे तसेच फटाक्यासारखा मोठा आवाज करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकी वाहनांवर आतापर्यंत एकूण २२ वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहनचालकांकडून एकूण २२,००० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. वाहने १५ दिवसांसाठी शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात ठेवली आहेत.

नागपुरातील आदिवासी आयुक्त कार्यालय येथे भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं

- या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

- केवळ ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्याची मागणी नसून विद्यार्थ्यांच्या तब्बल 29 मागण्या असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

- संबंधित जीआर पूर्णतः रद्द करावा, आदिवासी वसतिगृहांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

- सर्व 29 मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला असून, गरज पडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

Maval : पोषक वातावरण आणि समाधानकारक पाऊस त्यामुळे भाताच्या पिकाला बहर

पोषक वातावरण आणि समाधानकारक पाऊस त्यामुळे भाताच्या पिकाला बहर आला

पिक बघून बळीराजा आनंदित झाला

तर पिकावर कोणताही किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कामगंध सापळे तयार करण्यात शेतकरी व्यस्त

Jalgaon : टकरेखेडा येथे पती-पत्नीची दोन मुलींसकट रेल्वेखाली आत्महत्या

टकरेखेडा येथे पती-पत्नीची दोन मुलींसकट रेल्वेखाली आत्महत्या केली आहे

अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा येथे आज पहाटे दुर्दैवी घटना घडली आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी ६ जणांना अटक

औषध विभागातील गट - ब ची परीक्षा २२ मार्च रोजी झाली होती. मात्र परीक्षे आधीच पेपर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याची तक्रार काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधी यांनी केली होती. मात्र याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गांभीर्याने घेतले नव्हते. अखेर तपासाअंती पेपर फुटी झाल्याचे समोर आले . ६ जणांना अटक करण्यात आली असून ३ जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकारी आहेत.

मध्य रात्री मुंबई पुणे हायवेवर मोठी वाहतूक कोंडी

मध्य रात्री मुंबई पुणे हायवेवर मोठी वाहतूक कोंडी

पुण्याहून सातारा ला जाणाऱ्या दिशेने झाली होती मोठी वाहतूक कोंडी

भोर जवळ मोठा ट्रक पलटी होऊन अपघात

अपघातामुळे ट्रॅफिक जॅम

पिंपरी चिंचवड शहरात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरात मॅन होम क्लीन करत असताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

अमोल शिंदे वय 20 वर्ष आणि मनोज शिंदे वय 26 वर्ष असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव

जवळपास एक वर्षांपूर्वी याच मॅन हॉलमध्ये देखील बीएसएनएलच्या तीन कामगारांचा मॅन होल क्लीन करत असताना देखील झाला होता दुर्दैवी मृत्यू

मराठा समाजानंतर आता ब्राह्मण समाज आक्रमक

मराठा समाजानंतर आता ब्राह्मण समाज देखील आक्रमक,

प्रलंबित मागण्यासाठी जालन्यात 29 ऑगस्टपासून ब्राम्हण समाजाचे उपोषण,

ब्राम्हण समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत द्या, ब्राम्हण समाजावर होत असलेली चिखलफेक थांबवण्यासाठी कायदा करण्याची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात

यंदा यवतमाळ जिल्ह्यातील पावसाची निर्माण झालेली तूट शेतकऱ्यांसाठी चिंताजनक असून सध्या कपाशी पिकावर तुडतुडे फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

या प्रकारामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी वेळीच उपाय करावा असे आवाहन कृषी तज्ञांकडून केल्या जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नागपुरात

- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नागपुरात विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. मनसेच्या सदस्य नोंदणी

- अभियानालाही सुरुवात करणार आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास ते संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळळ्याला मळ्यार्पण करतील..

- तिथून शहरातील सिंधू महाविद्यालय, कमला नेहरू महाविद्यालय, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालय आणि एनआयटी इंजिनिअरिंग कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या भेटीगेटी आणि विद्यार्थी केंद्रांचे उद्घाटन करणार आहेत.

समृद्धी महामार्गावरील बोगदा आज १ तास बंद राहणार

- समृद्धी महामार्गावरील बोगदा आज १ तास बंद राहणार

- समृद्धी महामार्गावरील नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील बोगदा १ तासांसाठी बंद राहणार

- दुपारी १२ ते १ या वेळेत बोगदा बंद ठेवण्यात येणार

तुळजाभवानी मंदीरात दर्शन रांगेत बदल,पुढील पाच दिवस बिडकर पायऱ्यामार्गे भाविकांना मंदीरात प्रवेश

तुळजाभवानी मंदीरात दर्शन रांगेत बदल,पुढील पाच दिवस बिडकर पायऱ्यामार्गे भाविकांना मंदीरात प्रवेश

३० अॉगस्ट पर्यंत मंदीराचे महाद्वार भाविकांसाठी राहणार बंद

तुळजाभवानी मंदीरात श्रावण पोर्णिमा तसेच सलग सुट्ट्यांमुळे गर्दी होण्याची शक्यता

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नरहरी झिरवळांकडून थट्टा

नरहरी झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे झिरोळांकडून थट्टा

खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं.. आणि आंदोलन करायचो...

विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरूच तोडगा निघाला नाही.. चर्चा निष्फळ

Raigad : ठाकरेंच्या पहाणी दौऱ्याकडे शासकिय अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ, शिवसैनिकांमध्ये संताप

मुंबई गोवा महामार्गाच्या काल झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे शासकिय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. कामाची सद्यस्थिती काय आहे. काय करणार हे सांगण्यासाठी एकही अधिकारी दौऱ्यात आला नाही. यामुळे ठाकरे सेनेचे सैनिक संतप्त झाले असून अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उधना पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे लवकरच धावणार

फाईल अडवणाऱ्यांची आता खैर नाही! दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; सरकारी कामकाजासाठी नवे निर्देश

Gauri Saree Draping: गौराईला साडी नेसवताना गोंधळ होतोय? 'या' ७ स्टेप्स फॉलो करून झटपट आणि सोप्या पद्धतीने नेसवा साडी

अभिजीत दिपकेंनी केली मोठी घोषणा; CJP हाती घेणार नवी मोहीम, महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातून होणार सुरुवात

LPG eKYC Update : LPG बाबत महत्वाची अपडेट, eKYC संदर्भात संभ्रम, ReKYC करावी लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT