रात्री उशिरा आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या शेतात
संकटाच्या काळात आम्ही तुमच्या सोबत असल्याचा विश्वास दिला
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील माळवटा परिसरात आदित्य ठाकरेंनी घेतली शेतकऱ्यांची भेट
शेतात लाईट लावून शेतकऱ्यांशी संवाद साधला
आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार व नेते उपस्थित
सरकारने मदत देण्यासाठी उशीर का केला असा सवाल करत आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका
* २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता कुटुंबीयांसोबत असताना मुलगा अचानक बेपत्ता.
* पालकांच्या तक्रारीनंतर मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६२७/२०२६ दाखल.
* भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल.
* बालकाच्या शोधासाठी मानखुर्द, देवनार, आरसीएफ आणि ट्रॉम्बे पोलीस ठाण्यांची ८ पथके तयार.
* परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला बालकाला घेऊन जाताना आढळली.
* सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती आणि मानवी माहितीच्या आधारे तपासाला वेग.
* संशयित महिलेच्या हालचाली आणि संभाव्य मार्गांचा मागोवा घेण्यात आला.
* बालकाला शहराबाहेर नेले असण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली.
* ४० तासांच्या अथक दिवस-रात्र प्रयत्नांनंतर बालकाचा सुखरूप शोध.
* बालकाचे अपहरण करणारी मुस्कान भोलाकुमार साह आणि मदत करणारा तिचा पती भोलाकुमार जग्गु साह यांना अटक.
* दोन्ही आरोपी महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथील रहिवासी.
* आरोपींच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
* पोलिसांच्या तत्पर तपासामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा.
ब्लॅकस्टींगचा ट्रॅक्टर वेल्डिंग करताना झालेल्या भीषण स्फोटात मृतकांची संख्या वाढली
आधी दोन जण जागीच ठार झाले होते,तर उपचारादरम्यान दोघांचा नांदेड येथे मृत्यू झाल्याची माहिती
यवतमाळच्या उमरखेड-ढाणकी रस्त्यावर ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करतांना स्फोट झाल्याची घटना घडली,घटनेत आधी दोन ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.
गंभीर जखमींना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला असून आता या घटनेत तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे
ब्लास्टिंगच्या टँकरला वेल्डिंग करत असताना टायर जवळ असलेल्या हवेच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान नांदेड येथे दोघांचा मृत्यू झालाय त्यामुळे या घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला.
अविनाश बेले वय 32,साजेब खान,अनिस खान,तर उपचारादरम्यान वैभव बोक्से वय 12 आणि शेख जावेद,शेख बाबू यांचा नांदेड येथे मृत्यू झाला.
जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पठारावरील पर्यटनाला लक्झरी ओळख मिळवून देण्यासाठी ‘द सुपर कार रुट ग्रुप’च्या तब्बल २५ आलिशान सुपरकार्स साताऱ्यात दाखल झाल्या आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईहून आलेल्या या सुपरकार्सच्या ताफ्याने थेट खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘जलमंदिर पॅलेस’ येथे भेट दिली. सुपरफास्ट गाड्यांचे शौकीन असणाऱ्या उदयनराजेंनी सर्व कार मालकांचे उत्साहात स्वागत करत त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला आणि रॅलीला शुभेच्छा दिल्या. कासच्या पर्यटन संवर्धनाचा आणि प्रसाराचा हा एक उत्तम उपक्रम असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. यावेळी या लक्झरी गाड्या पाहून "थोड्या वेळासाठी मला वाटलं मी परत कॉलेजच्या दिवसांत गेलो की काय!" अशी मिश्किल टिप्पणी उदयनराजेंनी करताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. साताऱ्याच्या रस्त्यांवरून धावलेल्या या कोट्यवधींच्या सुपरकार्स ने सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
आंबिवली फाटकाजवळ प्रयागराज एक्सप्रेस अर्धा तास थांबली; पेंटोग्राफमध्ये बिघाड, लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी संतप्त
आंबिवली रेल्वे फाटकाजवळ 20435 प्रयागराज एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे थांबली
पेंटोग्राफमध्ये बिघाड झाल्याने एक्सप्रेस गाडी सुमारे अर्धा तास जागीच थांबल्याने डाऊन मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप
एक्सप्रेस गाडी बराच वेळ थांबल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त
रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्ती करत गाडी मार्गी लावण्यात आली
रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सायंकाळी 6.20 ते 6.30 वाजण्याच्या सुमारास पेंटोग्राफमधील तांत्रिक अडचण झाली असून ती दूर करून प्रयागराज एक्सप्रेस मार्गी लावण्यात आली असून डाऊन मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत; लोकल सेवा नियोजित वेळापत्रकावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती
बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार – जयकुमार गोरे
सातारा जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात आमदार जयकुमार गोरे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्यास भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजय मिळवेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर आणि आचारसंहिता काळात बँकेत झालेल्या भरती व बढत्या बेकायदेशीर असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
पावसाचा जोर नसतानाही उल्हास नदीच्या पाण्याला अचानक गढूळपणा कसा आणि कुठून आला, असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमी शशिकांत दायमा यांनी उपस्थित केला आहे. नदीचे पाणी गढूळ झाल्याने नागरिकांच्या घरात होणारा पाणीपुरवठाही काही ठिकाणी गढूळ होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, संबंधित सरकारी यंत्रणांनी तातडीने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रात्रीच्या सुमारास लोकलमधून अचानक रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या 24 वर्षीय तरुणीचे रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान राखत प्राण वाचवले. ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. सुदैवाने लोकल सिग्नलमुळे थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. उल्हासनगर येथील प्रीती संजय पाल या कामावरून घरी परतत होत्या. लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान सिग्नलमुळे थांबलेली असताना अचानक चक्कर आल्याने त्या लोकलमधून खाली रेल्वे ट्रॅकवर पडल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
येत्या 28 तारखेला राज्यभरात काँग्रेसचे आंदोलन
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाची मागणी काँग्रेस करणार
मोखाडा येथील शेतात काम करताना विषारी सापाने दंश केलेल्या ६० वर्षीय नर्मदा महाले यांचे प्राण १०८ रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेमुळे वाचले. डॉक्टर पंजाबराव चव्हाण यांनी रुग्णवाहिकेतच उपचार सुरू करून त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली असून कुटुंबीयांनी १०८ पथकाचे आभार मानले.
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा शिंदे सेनेच्या आमदारा विरोधात संताप
जवळपास दोन महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतातील पीक गेली करपून.
करपलेलं सोयाबीन पेटवून शिंदे सेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांचा शेतकऱ्याने केला निषेध.
नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर आज मतदारसंघातील वाडीपुयड येथे दुष्काळी परिस्थितीची केली पाहणी.
सोयाबीनच्या शेंगमध्ये दाणा न भरल्याने आमदारा समोरच संतप्त शेतकऱ्याने पेटवले सोयाबीन
उत्तम कदम नावाच्या शेतकऱ्याने सोयाबीन पेटवून आमदारा समोर व्यक्त केला संताप.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कर्नाटक सरकारने आधीच दुष्काळग्रस्त भागांसाठी मदत सुरू केली, मात्र महाराष्ट्रात निर्णय घेण्यास उशीर झाल्याचा दावा पटोले यांनी केला
जामनेर मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील पिकांची आज मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. राज्य सरकारने नुकतेच २५५ तालुके दुष्काळसदृश जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, तहसीलदार, तलाठी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अंबादास दानवेंनी धाराशिव लोकसभा निवडणूक लढवावी, असं आवाहन केलं आहे. दानवेंनी हे आव्हान स्वीकारत, “पक्षाने आदेश दिला तर धाराशिवमधून लोकसभा निवडणूक लढवणार,” असं म्हटलं. दरम्यान, ओमराजेंनी दानवेंवर टीका करत “नुसतं चॅलेंज स्वीकारून चालत नाही, माणसात राहावं लागतं,” असा टोला लगावला. “पक्षाने सांगायची गरज नाही; लढायचं असेल तर लढावं, मोस्ट वेलकम,” असं म्हणत ओमराजेंनी दानवेंना पुन्हा आव्हान दिलं.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोली हद्दीत मुंबई लेनवर तीन कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महिंद्राच्या गाड्या वाहून नेणारा कंटेनर, फेविकॉलचा कंटेनर आणि पुठ्ठा घेऊन जाणारा कंटेनर यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर फेविकॉल रस्त्यावर सांडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून फेविकॉल साफ करण्याचे काम सुरू आहे.
लातूरच्या औसा तालुक्यातील तावशी ताड येथे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. कोरड्या दुष्काळाच्या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून उपोषण करणारे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांची त्यांनी भेट घेतली.
अमरावती विभाग शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या निवडणुकीसाठी ११ सदस्यीय विशेष निवडणूक समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीत माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे आणि वसंतराव पुरके यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच आमदार अमित झनक, साजिद खान पठाण, अनिल मांगुळकर, धीरज लिंगाडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे, माजी महापौर विलास इंगोले आणि स्वाती वाकेकर यांचीही या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबारमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. पालकमंत्री फक्त बंद केबिनमध्ये बसून निर्णय घेतात, ते शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकलेच नाहीत, असा आरोप चौधरी यांनी केला. शेतकऱ्यांना नंदुरबारचे पालकमंत्री कोण, असे विचारले तर त्यांनाही सांगता येणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
दुष्काळाच्या नावाने सरकारची फक्त जुमलेबाजी सुरू असल्याचा आरोपही घनश्याम चौधरी यांनी केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हेक्टरी ६० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ शेतकऱ्यांच्या बांधाकडे फिरकलेच नाहीत, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर टीकास्त्र डागलं.
शासनाने नंदुरबार जिल्ह्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि शेतीच्या नुकसानीची परिस्थिती पाहता, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा, यासाठी आमदार पाडवी सातत्याने प्रयत्नशील होते.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले होते आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची शासनाने दखल घेत जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, बळीराजाला दिलासा मिळाल्याने आमदार राजेश पाडवी यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळाचा मंडप आणि स्टेज ग्रामस्थ व सरपंचांनी घेतलेल्या निर्णयानंतर काढण्यात आल्याची माहिती आहे. तब्बल ३ वर्षे २७ दिवस, म्हणजेच ११२३ दिवस हे उपोषणस्थळ केंद्रस्थानी राहिले. याच व्यासपीठावरून तीन वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचा लढा उभारला होता.
अंतरवाली सराटीत २९ ऑगस्ट २०२३ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ११ उपोषणे केली. दरम्यान, शेवटच्या ११व्या उपोषणावेळी जरांगे यांनी हे उपोषण निर्णायक आणि अंतिम असल्याचे सांगितले होते.
पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी नवनाथ नामदेव या युवकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हातात जळालेला ऊस घेऊन नवनाथ नामदेव यांनी आपली व्यथा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली. दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या.
ठाकरे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी लातूरच्या औसा तालुक्यातील तावशी येथे दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर नुकसानग्रस्त पिकांची व्यथा मांडली.
पिंपरी-चिंचवड शहरातील ट्रान्सपोर्ट नगर भागातील पीएमपीएमएल बस डेपोमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. विजय कोळी असं आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. आज सकाळी विजय कोळी यांचा मृतदेह पीएमपीएमएल बस डेपोमध्ये आढळून आला. कौटुंबिक वादातून विजय कोळी यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेचं गांभीर्य पाहता पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.
निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून एकत्रित मोर्चा काढण्यात येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी त्यांच्या समाजमाध्यमाद्वारे दिली आहे.
आज सकाळी संजय राऊत आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी समाजमाध्यमावर आपली प्रतिक्रिया मांडली आहे. हा मोर्चा एका पक्षापुरता मर्यादित न राहता तमाम राजकीय व्यवस्था आणि जनतेचा आवाज ठरावा, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी या मोर्चात सहभागी व्हावे, यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
राज्य शासनाने दुष्काळासंदर्भात केलेली घोषणा चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. २०१७ च्या जीआरनुसार जून-जुलैमध्ये पडलेल्या पावसाच्या आधारे ट्रिगर-१ जाहीर करणे राज्य शासनाकडून अपेक्षित होते. त्यानंतर जुलैमध्ये ट्रिगर-२ जाहीर करून ५ ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल करणे अभिप्रेत होते.
सुपर एल निनोची परिस्थिती असतानाही राज्य सरकारने जुलैमध्ये ट्रिगर-१चा सर्वे करणे अपेक्षित होते, मात्र तो करण्यात आला नाही, असा आरोप सतेज पाटील यांनी केला. मोठा दुष्काळ असेल तरच केंद्र सरकारकडून त्यामध्ये मदत केली जाते, असेही त्यांनी सांगितले.
गणेश विसर्जनानंतर अवजड वाहने रस्त्यावर आल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली, मानकोली आणि खारेगाव परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या वाहतूक कोंडीमुळे सुमारे ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, असंख्य वाहने कोंडीत अडकली आहेत. महामार्गावर वाहनांचा वेग मंदावल्याने प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कोल्हापुरातील केर्ले पैकी मानेवाडी गावात क्षुल्लक कारणावरून २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान आमच्या दारात फटाक्यांची माळ कोणी लावली, असा जाब विचारत तिघांनी संबंधित तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर त्याच्या मानेवर कोयत्याने हल्ला करून डोक्यात दगडाने मारण्यात आले.
संग्रामसिंह दत्तात्रय माने, रणजीत दत्तात्रय माने आणि दत्तात्रय कृष्णा माने अशी हल्लेखोरांची नावे आहेत. मंडळातील कार्यकर्त्यांनी तिघांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र रागाच्या भरात त्यांनी तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाच्या मानेवर सहा टाके पडले असून, सुदैवाने तो थोडक्यात बचावला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अमोल मिटकरी यांनी प्रमुख मागण्या केल्या आहेत. राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन करत, दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसांत भरीव आर्थिक मदत जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली. हेक्टरी मदतीची मर्यादा व अटी शिथिल करून सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांना मदत द्यावी. तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीमुळे वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार करून स्वतंत्र मदत द्यावी.
जनावरांसाठी पुरेसा व मोफत किंवा अनुदानित चारा उपलब्ध करून द्यावा, तसेच दुष्काळग्रस्त गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून आवश्यकतेनुसार टँकर सुरू करावेत, अशी मागणी मिटकरी यांनी केली. आगामी रब्बी हंगामासाठी मोफत किंवा मोठ्या अनुदानावर बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देऊन कर्जवाटप सुलभ करावे, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
एल निनोच्या संकटामुळे पावसात खंड पडला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे.
यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात दौरा केला होता. त्याप्रमाणे २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे.
येणाऱ्या कालावधीत अधिकच्या सवलती राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. हे नैसर्गिक संकट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जावे लागेल.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू. आज अधिसूचना निघाली असून, आता लवकरच सवलती मिळतील.
महाराष्ट्र शासनाने आणि महायुतीने आज दुष्काळाची घोषणा केली आहे. याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात असून, सरकारचे आभारही मानले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्यांमध्ये त्यांना दुष्काळाची वास्तविक परिस्थिती जाणवली.
काही लोकांचा असा संभ्रम होता की ५ तारखेनंतर पंचनामे होतील आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर केला जाईल. मात्र, सरकारने त्याची वाट न पाहता २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
गणेश विसर्जनाला यंदा विलंब; भरती-ओहोटी आणि भव्य मिरवणुका ठरल्या कारणीभूत
गोराई आणि वर्सोवा चौपाटीवर अनंत चतुर्दशीला अनेक मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन पूर्ण होऊ शकले नाही
दुसऱ्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत विसर्जन प्रक्रिया सुरू
उपनगरचा राजा, उपनगरचा लिटिल मास्टर गणपतीचे अजूनही विसर्जन नाही
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
भेटीचे कारण अस्पष्ट
निवडणूक आयोगाच्या बाबत राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्ट नंतर ही भेट महत्त्वाची
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधक असलेले सर्वच राजकीय पक्ष एकवटले
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे सोमवारी छत्रपती संभाजीनगर-जालना दौऱ्यावर
नुकसानग्रस्त मच्छीमार आणि तलावांची मंत्री नितेश राणे करणार पाहणी
कन्नडच्या शिवणटाकळी तलावाची सकाळी १० वाजता पाहणी
दुष्काळ जाहीर केला मात्र अंमलबजावणी तातडीने करा,धाराशिव मधील शेतकऱ्यांची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दौरा केल्यानंतर आजq 265 तालुक्यात दुष्काळ केला जाहीर
उमरखेडमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट
गणेश विसर्जनादरम्यान नदीत बुडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पंढरपुरात तातडीने बैठक बोलावले आहे.
या बैठकीमध्ये सरकारने दुष्काळाबाबत काढलेल्या जीआर वरती सविस्तर चर्चा केली जाणार आहे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
- राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
- ट्रिगर 1 लागू झालेल्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
- राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ, याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर
पंढरपूर -
दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा
पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार
हा मोर्चा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार
मोर्चामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह सर्व आमदार आणि पदाधिकारी सहभागी होणार
विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी सुप्रिया सुळे
मुंबई-
मुंबई उपनगरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनात नियोजनाचा अभाव
सकाळचे ९ वाजले तरीही पवई तलावात गणेशमूर्तींचे विसर्जनच नाही..
पवई तलाव परिसरात गणेश मूर्तींच्या लाबंच लांब रांगा..
परिणामी मोठी वाहतूक कोंडी..
पवई तलावात भांडूप, पवई, साकिनाका, अंधेरी अशा पूर्व व पश्चिम उपनगरातील गणपतींचे विसर्जन होत असते..
पुणे -
पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण
उत्साह आणि जल्लोषात गणेश मंडळांचे कार्यकर्ते मागे नाहीत
मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप
पुण्यातील चार ही प्रमुख लक्ष्मी, कुमठेकर, टिळक, केळकर रस्त्यांवर विसर्जन मिरवणुका सुरू
काही ठिकाणी ढोल ताशांचा गजर तर काही गणेश मंडळांकडून डी जे साउंड सिस्टिम
नांदेड -
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन.
नांदेडच्या लोहा कडे रवाना.
उपमुख्यमंत्री सुनिता पवार आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
नांदेडच्या लोहा येथे पीक परिस्थितीची करणार पाहणी.
पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधणार संवाद.
लोहा तालुक्यात पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांची साधना संवाद.
लोहा येथील पीक परिस्थितीची पाहणी करून परभणी कडे होणारा रवाना.
परभणी जिल्ह्यातील मरडसगाव येथे करणार पीक परिस्थितीची करणार पाहणी.
सोलापूर -
मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेत तीन महिलांसह अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.या प्रकरणी दोन्ही गटांकडून पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
एका गटाच्या म्हणण्यानुसार,मंदिरात प्रवेश नाकारल्याच्या कारणावरून आपल्याला मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटाने शेतात शेळी का नेली,या कारणावरून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.
छत्रपती संभाजीनगर -
छत्रपती संभाजीनगर शहरात रात्री विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलाल उधळण्याच्या कारणावरून पोलिस आणि गणेश भक्तांमध्ये बाचाबाची झाली.
त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार केला. त्यात एक गणेश भक्त जखमी झाला त्यामुळं रात्री उशिरा विसर्जन मिरवणुकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विसर्जन मिरवणुकीत भक्तांकडून मोठ्या उत्साहात गुलाल उधळला जात होता.
याचवेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत भक्तांचा वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर अल्पावधीतच शाब्दिक बाचाबाचीत झाले.
मुंबई -
मुंबई उपनगरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनात नियोजनाचा अभाव
सकाळचे ९ वाजले तरीही पवई तलावात गणेशमूर्तींचे विसर्जनच नाही
पवई तलाव परिसरात गणेश मूर्तींच्या लाबंच लांब रांगा
परिणामी मोठी वाहतूक कोंडी
पवई तलावात भांडूप, पवई, साकिनाका, अंधेरी अशा पूर्व व पश्चिम उपनगरातील गणपतींचे विसर्जन होत असते
परतीच्या पावसाने कर्जतच्या ओलमनमधील भाजीपाला शेती उद्ध्वस्त; लाखोंचे नुकसान
घटना: मुसळधार परतीच्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील ओलमन येथे भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान.
तोडणीच्या तोंडावर पीक उद्ध्वस्त झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान.
मुंबई -
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज तीन जिल्ह्यात पाणीटंचाई दौरा
महाराष्ट्रातील नांदेड परभणी बीड या तीव्र पाणीटंचाई असलेल्या जिल्ह्यांमध्ये सुनेत्रा पवार यांचा दुष्काळ दौरा
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची स्थिती गंभीर आहे
या संदर्भात सर्व मंत्र्यांना दौरे करून परिस्थिती जाणून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या
अमरावती -
अमरावती जिल्हा परिषदमध्ये औषधांचा लाखोंचा साठा कालबाह्य; एफडीएच्या तपासणीत अडगळीत आढळला
अमरावती जिल्हा परिषदेच्या औषधी भांडारगृहाची तपासणी; अन्न आणि औषध प्रशासनाची अचानक धाड
यवतमाळ -
यवतमाळ जिल्ह्यात पारंपारिक वांद्याच्या गजरात बाप्पाला निरोप
पोलिसांचा चोख बंदोबस्त,पुढील दोन दिवस चालणार विसर्जन
अहिल्यानगर -
पुढच्या वर्षी लवकर या... बाप्पांचे विसर्जन, चिमुकला झाला भावुक, धाय-मोकलून रडला
गणेशोत्सव हा फक्त भक्तिभावाचा नाही तर घराघरातील लहानग्यांच्या आनंदाचा सण म्हणूनही ओळखला जातो.
दिवाळीपूर्वी सर्वात मोठ्या उत्साहाने साजरा होणाऱ्या या सणात चिमुकल्यांचाही तितकाच सहभाग असतो.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात,बाल गणेश मंडळात आणि घरातील बाप्पांच्या उत्सवातही ही चिमुकले गणरायाची सजावट, पूजाअर्चा आणि आरती यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
यवतमाळ -
'मुख्यमंत्री साहेब,हिच ती वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची'
सत्ताधारी-विरोधीपक्षांनी एक वर्षाचं मानधान न घेता शेतकऱ्यांना द्यावं
मंत्र्यांच्या ताफ्यात पन्नास-शंभर गाड्यांवर होणार खर्च थांबवा
यवतमाळ जिल्ह्यात पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटली
मुंबई -
जुहू समुद्रकिनारी गणेश भक्तांची गर्दी; सुलभ शौचालय चालकाकडून भाविकांची लूट!
गणेश विसर्जनासाठी जुहू समुद्रकिनारी भाविकांची मोठी गर्दी
गर्दीचा फायदा घेत सुलभ शौचालय चालकाकडून भाविकांकडून पैसे वसूल
पालिका के-पश्चिम प्रभाग कार्यालयाने विसर्जनाच्या दिवशी शौचालयाचा वापर मोफत करण्याच्या दिल्या होत्या सूचना
पालिकेच्या आदेशाला सुलभ शौचालय चालकाकडून केराची टोपली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.