Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण,कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Marathi Breaking Live Headlines Updates: गणेशोत्सवाचा ११ वा दिवस, कृषीमंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ दौरा, राहुल गांधी, निवडणूक आयोग, मुंबईसह महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण,कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण

या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे असून, कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिलच्या पालकांनी आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी परवानगी मागितली होती

मात्र, आझाद मैदान पोलिसांकडून उपोषणासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.

भीमाशंकर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; धबधब्यांनी धारण केलं रौद्ररूप

भीमाशंकर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अभयारण्यातील धबधब्यांना मोठा प्रवाह आला आहे. कोंढवळ धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. धबधब्यांचं हे विहंगम आणि रौद्र दृश्य सध्या लक्ष वेधून घेत आहे.

तुर्भे जलबोगदा कार्यान्वित करण्यासाठी २४ तासांचे काम; एम पूर्व-मध्य पश्चिम विभागात पाणीपुरवठा विस्कळीत

तुर्भे निम्नस्तरीय जलाशय ते तुर्भे उच्चस्तरीय जलाशय जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम पालिकेकडून हाती

२९ सप्टेंबर सकाळी १० ते ३० सप्टेंबर सकाळी १० वाजेपर्यंत २४ तास कामकाज

या कालावधीत एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत

काम पूर्ण झाल्यानंतरही पुढील ७ दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता.

भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरण; आरोपी शैलेश पाटीलला फाशी द्या, आईची मागणी

भिवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे खळबळ उडाली असताना या प्रकरणातील आरोपी असलेले माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील सध्या फरार असल्याची माहिती आहे. दरम्यान, शैलेश पाटील याची आई सुलोचना पाटील यांनी आपल्या मुलाबाबत गंभीर आरोप करत त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.

साताऱ्यातील सज्जनगड रोडवर दरड कोसळली, वाहतूक बंद

साताऱ्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ असलेल्या सज्जनगड रस्त्यावरील घाटात डोंगराची मोठी दरड कोसळली. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे ही घटना घडली. दरड थेट रस्त्यावर आल्यामुळे सज्जनगड घाट रस्ता वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे सज्जनगडाकडे जाणारी आणि येणारी सर्व वाहतूक जागीच ठप्प झाली असून, दर्शनासाठी आलेले न भाविक आणि पर्यटक रस्त्यातच अडकून राहिले आहेत.

पुण्यातील अलका टॉकीज चौकात विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी

अलका टॉकीज चौक सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा अखेरचा टप्पा मानला जातो

केळकर रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड हे चार ही रस्ते याच चौकात एकत्र येतात

चार ही रस्त्यांनी येणाऱ्या मिरवणुका याच चौकातून पुढे विसर्जनासाठी जातात

अलका टॉकीज चौकात महापालिकेकडून आणि पुणे पोलिसांकडून भव्य स्वागत कक्ष उभारणी

महाराष्ट्र FDA ची राज्यभर धडक कारवाई; 9.76 कोटींचा संशयित अन्नसाठा जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर FDA ची राज्यभर विशेष मोहीम

१ ते २३ सप्टेंबरदरम्यान 3,068 अन्न आस्थापनांची तपासणी

तपासणीत 2,423 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले

भेसळीच्या संशयावरून 6,34,362 किलो अन्नसाठा जप्त

जप्त अन्नसाठ्याची किंमत तब्बल 9.76 कोटी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1,506 आस्थापनांना सुधारणा नोटिसा

माणगावामध्ये गावठी दारूवर पोलिसांची कारवाई

रायगडच्या माणगाव तालुक्यात गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. वावे दिवाळी परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे माणगाव पोलिसांनी सापळा रचून हि कारवाई केली. या कारवाईत आरोपीत लक्ष्मण कोकरे यांच्याकडून 52 लिटर गावठी दारू, मोटारसायकल आणि मोबाईल असा 1 लाख 42 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोकरे हा मोटारसायकलवरून गावठी दारू घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती लागला असून माणगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

राहुल गांधींची महत्वाची पत्रकार परिषद

राहुल गांधींनी अमित शाह आणि मोदींचे जूने व्हिडिओ दाखवले

भाजपचंच सरकार राहणार असल्याचा व्हिडिओत दावा

सत्ता विरोधी लाट अचानक कशी गायब झाली

महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीवर मोठे परिणाम

हा फक्त मतावर नाही तर प्रत्येक भारतीयावर हल्ला

मोदी-शाहांसोबत असं होत नाही

आम्ही उत्तर शोधत होतो ते आम्हाला सापडले

सरकार विरोधात लाट असूनही भाजप निवडणूक कशी जिंकली?

ज्ञानेश कुमार यांची निवड खुद्द मोदींनी केलीय

देशातील प्रत्येक निवडणुकीत घोटाळा केलाय

आयोगातले दोन आयुक्त ज्ञानेश कुमारांवर आरोप करता आहेत

मतचोरी म्हणजे थेट कायद्याच्या चोरी

मतचोरी करून खासदार संसदेत आले

2024 मध्ये देशात VOTE चोरी झाली

आयोगात ज्ञानेश कुमार यांची मनमानी

भाजपच्या विजयाचे रहस्य आता समोर आले

ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा

पिंपरी- चिंचवडमध्ये काळ्या काचांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कठोर कायदेशीर कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरात काळ्या काचा लावून फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. विशेष करून या कारवाईत थार गाड्यांचीही तपासणी होताना दिसत आहे.

नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त

नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त...

अतिसंवेदनशील भागात ड्रोनची करडी नजर...

नंदुरबार, शहाद्यात 125 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच...

विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचे विशेष नियंत्रण...

जिल्ह्यातील 228 सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी मोठा फौजफाटा तैनात.....

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

UPSC प्रकरणाच्या सुनावणीमुळे आज शिवसेनेची सुनावणी झाली नाही

पुढच्या आठवड्यात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता

मंगळवारी शिंदेसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करण्याची शक्यता

सातारा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची शंभूराज देसाईंकडून पाहणी

सातारा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची शंभूराज देसाईंकडून पाहणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी सुरू असतानाच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज उत्तर कोरेगाव, फलटण, माण आणि खटाव परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी या भागातील घेवडा, सोयाबीन आणि बाजरीची पिके करपू लागली आहेत. यंदा जिल्ह्याच्या पूर्व आणि उत्तर भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.

नवी मुंबईत डोंगरावरुन कार रेल्वे रुळावर कोसळली

नवी मुंबईत डोंगरावरुन कार रेल्वे रुळावर कोसळली

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आज सुनावणी होण्याची शक्यता

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आज सुनावणी होण्याची शक्यता

UPSC प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर शिवसेनेची सुनावणी होण्याची शक्यता

शिंदेसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करण्याची शक्यता

गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

गडचिरोली जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून अहेरीच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. सिरोंचा, अहेरी, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याने सुरू केले शेतीच्या बांधावर आमरण उपोषण

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी एका तरुण शेतकऱ्याने शेतीच्या बांधावर आमरण उपोषण सुरु केले आहे.लक्ष्मण कदम असं या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील निवघा येथे या शेतकरी तरुणाने हे आमरण उपोषण सुरु केलं आहे. यापूर्वी देखील कदम यांनी पाण्याच्या टाकीवर बसून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. त्यावेळी प्रशासनाने आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. परंतु आता जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पुन्हा या तरुणाने शेतीच्या बांधावर आमरण उपोषण सुरु करून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज चांदवड, देवळा, मालेगाव आणि नांदगाव या दुष्काळग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथे त्यांनी सोयाबीनच्या शेतात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या दौऱ्यात आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार गोकुळ गीते, माजी आमदार शिरीष कोतवाल आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

दुष्काळसदृश परिस्थितीची वैजापूरमध्ये अतुल सावे यांच्याकडून पीक पाहणी

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान, उत्पादनातील घट आणि पाणीटंचाईमुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली.

पुण्यात उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक प्रमुख रस्ते बंद

पुणे शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे २५ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागातील अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. आज रात्री १२ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत ही वाहतूक बंदी लागू असेल. मिरवणुकीला सकाळी ९ वाजता सुरुवात होणार असून, अनेक ठिकाणी नो पार्किंग, तसेच डायव्हर्शन व रिंगरोडची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रवासापूर्वी वाहतूक नियोजन करून पुणे पोलिसांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार- उद्धव ठाकरे

कोरड्या दुष्काळावरून कोरड्या घोषणा नको

विकासाच्या नावाखाली सरकारकडून उधळपट्टी

पक्ष फोडाफोडी बंद करून राज्य वाचवण्याची गरज आहे

दुष्काळात केंद्र सरकरानेही मदत केली पाहिजे- उद्धव ठाकरे

दुष्काळासाठी सरकारने डॅशबोर्ड तयार करावा

प्रत्येक जिल्ह्याची माहिती डॅशबोर्डवर असावी

दुष्काळ निवारणासाठी दूरगामी उपाय केले पाहिजेत

दुष्काळी दौरे काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल

दौऱ्यातील अधिकाऱ्यांना गांभीर्य आहे का?

2-3 दिवसात मदत देऊ म्हणाले, मग वाट कशाची पाहताय?

सरकार दुष्काळाची घोषणा का करत नाही?

कर्जमाफीची रक्कम खरंच शेतकऱ्यांना मिळाली का?

गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; उद्या सकाळी ९ वाजता मिरवणुकीला सुरुवात

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण असल्याची माहिती दिली. दहा दिवसांच्या उत्साहाचा उद्या समारोप होत असून, विसर्जनाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

पोलिसांसह विविध यंत्रणा सज्ज असून नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला उद्या सकाळी ९ वाजता सुरुवात होणार असून, मिरवणुकीच्या वेळेबाबत पोलिसांशी चर्चा झाली आहे.

नदीकाठच्या विसर्जनस्थळांवरील यंत्रणाही सज्ज असून, नागरिकांनी शांततेत आणि उत्साहाने मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.

अल्पवयीन तरुणांची धिंड काढणे पुणे पोलिसांना भोवले; १७ पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यात अल्पवयीन आरोपी तरुणांची धिंड काढल्याप्रकरणी पुणे पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या आदेशानंतर सीआयडीने ही कारवाई केली असून, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह एकूण १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ॲट्रॉसिटीसह जन्मठेपेची शिक्षा असलेली कलमे लावण्यात आली आहेत.

भिंगारमध्ये कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

पोलिसांचा लाठीचार्ज, गणेशभक्ताचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

-भिंगारमध्ये कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

-पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

-पोलीस अधिकाऱ्यांची मध्यस्थी, कार्यकर्त्यांनी धुडकावली

राज्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडा तयार करण्याचे पाणीपुरवठा विभागाचे आदेश

राज्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडा तयार करण्याचे पाणीपुरवठा विभागाचे आदेश

नागरिकांना पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश

मराठवाड्यात नैसर्गिक स्तोत्रात केवळ ७ टक्के पाणीसाठा

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अमरावती विमानतळावर दाखल

मुख्यमंत्र्यांचं आमदार रवी राणा, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रताप अडसळ, आमदार प्रवीण तायडे,जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश, ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचं स्वागत

अमरावती विमानतळावरून चार चाकी वाहनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस वाशिम जिल्हात रवाना....

जंगल मेडो’ रिसॉर्टचे संचालक कुणाल जयंत पटेल यांची आत्महत्या

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा परिसरात ‘जंगल मेडो’ रिसॉर्टचे संचालक कुणाल जयंत पटेल (४२) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

या घटनेने ताडोबाच्या पर्यटन क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, त्यांच्या परिचितांमध्ये आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन रथ तयार

पुणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन रथ तयार

श्री वक्रतुंड रथात बाप्पा विसर्जनासाठी होणार विराजमान

दरवर्षी प्रमाणे यंदाही रथाला आकर्षक विद्युत रोषणाई आणि सुंदर नक्षीकाम

पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

हौद, टाक्यांसह मूर्ती संकलन केंद्रे सज्ज

सुरक्षेसाठी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक घाटावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत

गणपती विसर्जन मिरवणूक तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पोलिस प्रशासनाची भूमिका समोर

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दीपक वाघस्कर मृत्यूप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती...

ज्या ठिकाणी सौम्य लाठीमार झाला, त्या ठिकाणी दीपक वाघस्कर उपस्थित नसल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती

Amravati: वाशिमच्या 'रील्सस्टार' तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांची चौकशी सुरू

अमरावती -

वाशिमच्या 'रील्सस्टार' तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांची चौकशी सुरू

अमरावती विभागीय आयुक्तांकडून विशेष पथक गठित..

बुलढाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अन् सहाय्यक आयुक्तांकडून चौकशी सुरू

आठवड्याभरात विभागीय आयुक्तांना सादर करावा लागणार अहवाल..

Ratnagiri: चिपळूणमधल्या खेर्डी MIDC मधील फर्निचर कंपनीमध्ये रात्री अग्नी तांडव

रत्नागिरी - चिपळूणमधल्या खेर्डी MIDC मधील फर्निचर कंपनीमध्ये रात्री अग्नी तांडव

MIDC मधील इम्पेरियल ट्रेडर्स कंपनीमध्ये रात्री लागली आग

आगीत कोट्यावधी रुपयांचं फर्निचर जाळून खाक.

आगीच्या ज्वाला भडकल्याने MIDC परिसरात नागरिकांची उडाली तारांबळ

अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीवर मिळवण्यात आलं नियंत्रण

कुशनींग फर्निचर बनवण्याचा होता मोठा कारखाना.... आगीचे कारण अस्पष्ट.

घटनेत कंपनीचे मोठे नुकसान

Nagpur: नागपूर शहरात गणेश विसर्जनासाठी तब्बल 225 ठिकाणी 447 कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था

नागपूर -

- नागपूर शहरात गणेश विसर्जनासाठी तब्बल 225 ठिकाणी 447 कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे

- नागपूर शहरात लाडक्या बाप्पाचे विसर्जन सुलभ आणि पर्यावरण पूरक व्हावे यासाठी महानगरपालिकेने चोख व्यवस्था केली आहे

- घराजवळचे कृत्रिम विसर्जन कुंड शोधण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष संकेत स्थळ आणि क्यूआर कोड तयार केला आहे

- मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी,कच्छीविसा मैदान आणि कोराडी येथे विशेष मोठे त्याला सज्ज आहेत

- याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी शहरात 22 फिरत्या मोबाईल कुंडांची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे

Pune: उत्तर प्रदेश सहप्रभारीपदी मेधा कुलकर्णी यांची निवड

पुणे -

उत्तर प्रदेश सहप्रभारीपदी मेधा कुलकर्णी यांची निवड

येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होत असताना भाजपने ३६ राज्यांमधील प्रभारी आणि सहप्रभारी यांची यादी जाहीर केली आहे.

यामध्ये पुण्याच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची उत्तर प्रदेश सहप्रभारीपदी निवड केली आहे.

विधानसभा व २०२९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेता ही निवड महत्त्वाची आहे.

काही महिन्यांपूर्वी संसदीय स्थायी समितीच्या (विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल) अध्यक्षपदी डॉ. मेधा कुलकर्णी यांची निवड झाली आहे.त्यानंतर ही जबाबदारी मिळाली आहे.

Pune: पुणे-बेंगळुरू महामार्गाजवळ भीषण किवळे येथे बुधवारी रात्री घडला अपघात

पुणे -

- पुणे-बेंगळुरू महामार्गाजवळ भीषण किवळे येथे बुधवारी रात्री घडला अपघात

- अपघात सीसीटीव्हीत कैद

- दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार 25 ते 30 फूट दूर जाऊन पडला

- एक्झिटसमोरील पत्रे नसलेल्या मोकळ्या भागातून जात असताना अपघात

- दुचाकी थेट पुढे गेल्यानंतर दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्याच्या पलीकडे जाऊन कोसळला

- अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी; प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती

Nagpur: नागपुरात महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेचा प्रवास सुसाट

नागपूर -

- नागपुरात महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेचा प्रवास सुसाट

- एकाच दिवशी तब्बल २ लाख ३७ हजार प्रवाशांनी केला आपली बसमधून प्रवास

- आपली बससेवेला प्रवाशांची वाढती पसंती....मे महिन्यापासून २२ सप्टेंबरपर्यंत प्रवासी संख्येत ६५ हजार ८९ प्रवाशांची विक्रमी वाढ

- दिवाळीपर्यंत दररोज २ लाख ५० हजार प्रवाशांचे उद्दिष्ट....आगामी काही महिन्यांत दररोज ३ लाख प्रवासीसंख्या गाठण्याचे परिवहन विभागाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

Dharavshiv: धाराशिवमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरकार विरोधात हलगी नाद आंदोलन

धाराशिव -

धाराशिवमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरकार विरोधात हलगी नाद आंदोलन

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

Amravati: अमरावतीमध्ये ज्वेलर्स दुकानांवर डल्ला मारणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

अमरावती शहरातील ज्वेलर्स दुकानांमध्ये घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ने पर्दाफाश केला.

तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गाडगेनगर,फ्रेजरपुरा आणि राजापेठ परिसरातील ज्वेलर्स दुकान फोडीचे गुन्हे उघडकीस आले आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

Amravati: युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले सह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्या विरुद्ध गुन्हे दाखल

अमरावती-

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले सह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्या विरुद्ध गुन्हे दाखल..

अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये २२३,३८७,BNS सह कलम १३५ नुसार गुन्हे दाखल..

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळल्या प्रकरणी गुन्हे दाखल...

Mumbai: चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

मुंबई-

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्री मंडळ उपसमिती गठीत

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती गठीत

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जारी

प्रत्येक आठवड्याला उपसमिती राज्यातील दुष्काळाचा आढावा घेणार

दुष्काळाचा आढावा घेऊन समिती उपाययोजना सुचविणार

Washim: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर

वाशिम -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

यात कारंजा तालुक्यातील म्हसला येथे पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

त्यानंतर मंगरूळपीर तालुक्यातील मोहगव्हाण येथे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीव पाहणार आहेत.

शेवटी मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांच्या परिस्थितीची पाहणी करून परत अमरावती कडे रवाना होणार आहेत...

Dharashiv: भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा अंबादास दानवेंचा दावा

धाराशिव -

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा अंबादास दानवेंचा दावा

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यातील व्हिडीओ दानवेंनी ट्विट करत केला आरोप

काजु बदाम छाप सरकारचे दे धक्का म्हणत दानवेंचा टोला

तर गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्यात सुरू आहेत राजकीय आरोप प्रत्यारोप

Dharashiv: आमदार आंबदास दानवेंचा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना टोला

धाराशिव -

ठाकरे गटाचे नेते आमदार आंबदास दानवेंचा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना टोला

दोन चार ट्रान्स्फॉर्मरच्या बदल्यात 3 लाख 29 हजारांचे मताधिक्य सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले की असाच तुसडेपणा नशिबाला येतो म्हणत दानवेंकडुन व्हिडिओ ट्विट

ठाकरेंनी केलेले जिवापाड प्रेम पचले नाही तुम्हाला,अंबादास दानवेंकडुन ओमराजेंवर निशाना

मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसतानाचा व्हिडिओ दानवेंनी ट्विट करत ओमराजे निंबाळकरांवर साधला निशाला

Nalasopara: पेल्हार पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टी अड्ड्यावर मोठी कारवाई

नालासोपारा -

पेल्हार पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टी अड्ड्यावर मोठी कारवाई

नालासोपारा पूर्व पेल्हार परिसरातील सागपाडा श्रीरामनगर जंगलात अवैधरित्या गावठी दारूचा अड्डयावर ही कारवाही केली आहे.

या कारवाहित १ लाख १७ हजार रुपये किमतीचा दारू बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करून नष्ठ केला आहे.

या प्रकरणात नरेश भोये, या ५५ वर्षीय व्यक्तीला अटक करून, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ब),(इ),(फ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

Panvel: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला भीषण आग

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला भीषण आग

पनवेल हद्दीत किलोमीटर १६ जवळ ही घटना घडली.

बसला आग लागल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली

आयआरबी देवदूत रेस्क्यू टीम आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

Nagpur: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई

नागपूर

- शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दिलासा, दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई

- बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना महिलांवरील कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अंतरिम दिलासा मिळाला आहे.

- न्यायालयाने कायदेशीर बाबी विचारात घेता गायकवाड यांच्याविरुद्ध पुढील आदेशापर्यंत दोषारोप पत्र दाखल करण्यास मनाई केली आहे

- बुलढाणा शहर पोलिसांनी 12 सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या सविता बेंडवाल यांच्या तक्रारीवरून गायकवाड यांच्या विरोधात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे

Nagpur: नागपुरात पुन्हा डिजिटल अरेस्टची घटना, वृद्ध महिलेला 45 लाखांचा फटका

नागपूर -

- नागपुरात पुन्हा डिजिटल अरेस्ट ची घटना, वृद्ध महिलेला 45 लाखांचा फटका

- 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली सायबर भामट्यांनी नागपुरातील एका ७२ वर्षीय महिलेची ४५ लाख ५० हजार २०० रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे

- 72 वर्षीय मालती पांडुरंग भाजीपाले वर्धा रोड, नागपूर येथील रहिवासी असून त्यांनी या प्रकरणी सायबर पोलिसांत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

- आरोपींनी फोन करून स्वतःची ओळख 'प्रदीप जयस्वाल, कुलगाव पोलीस ठाणे' अशी सांगितली. पीडितेच्या नावावर कॅनडा बँकेत खाते उघडून त्यातून दोन कोटी रुपयांचे अवैध व्यवहार झाल्याचे आणि ते पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचे सांगून भीती निर्माण केली.

Pune: गणेश विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह ट्रॅकिंग, ४० प्रमुख मंडळांच्या रथांवर जीपीएस

पुणे -

गणेश विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह ट्रॅकिंग

४० प्रमुख मंडळांच्या रथांवर जी पी एस

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना प्रमुख गणेश मंडळांची मिरवणूक नेमकी कुठे पोहोचली आहे,हे घरबसल्या पाहता यावे यासाठी पुणे पोलिसांनी यंदा तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

प्रमुख मंडळांच्या मिरवणूक रथांवर जी पी एस उपकरणे बसवून त्यांच्या हालचालींचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करण्यात येणार आहे.

मानाच्या गणपती सह दगडूशेठ आणि इतर मंडळांना जीपीएस लावले जाणार..

Pune: पीएमपीला तब्बल 16 कोटींचे उत्पन्न, सुमारे ९६ लाख प्रवाशांचा प्रवास

पुणे -

पीएमपीला तब्बल 16 कोटींचे उत्पन्न

सुमारे ९६ लाख प्रवाशांचा प्रवास

गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी व उत्पन्न वाढले.

गणेशोत्सवात नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

१४ ते २१ सप्टेंबर दरम्यान

पीएमपीतून ९५ लाख ७६ हजार ६९९ प्रवाशांनी प्रवास केला असून यातून पीएमपीला १६ कोटी ८५ लाख ४५ हजार ९७३ रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ३२ बस संख्या घटली असताना देखील प्रवाशांच्या संकेत एक लाख ३७ हजार ९२२ प्रवाशांची वाढ झाली आहे तर उत्पन्न देखील ११ लाख रुपयांनी वाढले आहे.

Mumbai: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना न्यायालयाने ठोठावला ३०० रुपयांचा आर्थिक दंड

मुंबई -

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ठोठावला ३०० रुपयांचा आर्थिक दंड

२०१६ च्या शिक्षक मारहाण प्रकरणी सातत्याने सुनावणीला गैरहजर राहिल्याने रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ठोठावला दंड

मागील सुनावणीत उपस्थित न राहिल्याने शेवटची संधी म्हणून त्यांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट देण्यात आली होती

मात्र त्यानंतरच्याही सुनावणीत रितू तावडे आणि अन्य काही आरोपी कोर्टात गैरहजर राहून वारंवार उपस्थितीतून सूट मिळण्यासाठी अर्ज दाखल करत असल्याच न्यायालयाकडून नमूद

Kolhapur: आदमापुरातील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

कोल्हापूर -

आदमापुरातील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट मधील घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

निढोरी आणि मुरगुड परिसरातील पाच जणांना अटक

जमीन खरेदी विक्री व्यवहारात गैरव्यहार प्रकरणी अटक

भीष्म सूर्यवंशी,रणजित सूर्यवंशी, प्रकाश मांगले,सागर शिंदे,तन्मय बाचणकर

मुख्य आरोपी रागिणी खडके आणि ट्रस्टी मात्र अद्याप फरार

कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल; MPSC आंदोलनातील वक्तव्यांप्रकरणी कारवाई

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; पक्षाच्या झेंड्यात लपेटून अखेरचा निरोप, राजकीय वर्तुळात शोककळा

ठाणेकरांवर पाणीसंकट, 24 तास 10 टक्के पाणीकपात यातला तुमचा एरिया कोणता? वाचा

Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Makhana Vs Peanuts: मखाने की शेंगदाणे? नवरात्रीच्या उपवासाला काय खाणे अधिक फायदेशीर?

SCROLL FOR NEXT