वाशिम -
वाशिमच्या रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आडोळ प्रकल्पात या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने सध्या प्रकल्पात केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आगामी काळातील पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान नगर परिषदेसमोर आहे.
त्यामुळे आतापासूनच पाण्याची बचत आणि उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करणं गरजेचं आहे.
मात्र, दुसरीकडे शहरातील अनेक भागात दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचं चित्र आहे.
त्यामुळे पाणीगळती रोखण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
यवतमाळात डाॅल्बी, प्लाझ्मा-प्रेशर मिड साउंड सिस्टिमवर बंदी
यवतमाळ जिल्ह्यात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी प्रतिबंधात्मक अधिसूचना जाहीरी केली असून त्यानुसार डॉल्बी साऊंड सिस्टिम, टॉप- मिड बेस अशा मल्टी स्पीकर सिस्टीम,प्लाझ्मा साऊंड सिस्टिम, प्रेशर मिड साऊंड तसेच अशा साऊंड सिस्टिम साठी बदल (माॅडिफाय) केलेल्या वाहनांचा वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत हे निर्बंध अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून एक नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहे.
अमरावती -
अमरावतीत घनकचरा वाहतुकीची १०० वाहने बेपत्ता; कोणार्क कंपनीची राजापेठ पोलिसांत धाव
मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनावर परिणामाची शक्यता; पोलिसांकडून कंपनीकडे कागदपत्रांची मागणी
अँकर : अमरावती महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व वाहतूक कार्यासाठी वापरण्यात येणारी तब्बल १०० वाहने अचानक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
याप्रकरणी कोणार्क कंपनीने राजापेठ पोलीस ठाण्यात पत्र देऊन तक्रार नोंदवल्याने मनपा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे
नांदेड -
दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम खाल्ल्याच्या टीकेनंतर आता आमदार दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे.
नांदेडमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता.
या आढावा बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी काजू-बदामावर ताव मारला होता.
धाराशिव:
नशामुक्त धाराशिवसाठी लोकचळवळ,गावोगावी जाऊन जनजागृती
ड्रग्जसह व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी लेझीम पथकातुन जनजागृती
पहील्या टप्प्यात गणेशोत्सवानिमित्त कळंब तालुक्यातील 132 गावात वर्षेभर राबवण्यात येतोय उपक्रम
अमरावती -
50 टक्के कर्ज वितरित करू हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलेला ठराव नियमबाह्य, हा ठराव वापस घेण्यास सांगू
चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया...
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेंन जो निर्णय घेतला की शेतकऱ्यांना 50 टक्केच कर्ज देऊ तो निर्णय आम्ही मागे घेण्याची त्यांना सांगितले आहे
शेतकऱ्यांना 50 टक्केच कर्ज देऊ असा ठराव घेता येत नाही 100 टक्के कर्ज जिल्हा बँकेने दिले पाहिजे हे महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.