मुंबई -
राज्यातील आयटीआय व तंत्र शिक्षण इमारतींचा चेहरामोहरा बदलणार
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री येथे दुपारी 2 वाजता बैठक
शाळा, निवासी शाळा, आश्रम शाळांच्या देखभाल व दुरुस्ती संदर्भात आढावा घेणार
अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीवर ही चर्चा होणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, जयकुमार गोरे राहणार उपस्थित
पुणे - अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या
राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली
पाणी टंचाईमुळे पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या २४५ वर पोहोचली
१४ ते २० सप्टेंबरदरम्यान २१४ टँकर सुरू होते.
२१ ते २७ सप्टेंबरदरम्यान टँकरची संख्या वाढून २४५ झाली.
जळगाव -
शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक
जिल्ह्यातील शाळांची झाडाझडती; नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये साडेआठ तास चौकशी
नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते वामन पाटील वडगावकर आणि दत्ता पाटील सोनारीकर यांनी नांदेडच्या हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल आहे.
त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. वामनराव पाटील वडगावकर यांची मध्यरात्री प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
अमरावती -
अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती
नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
जिल्ह्याची सरासरी अवघी ४७ पैसे
२ हजार ०९२ महसुली गावांपैकी
१ हजार २८५ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
दोडामार्ग तालुक्यातील कुडासे येथे एका परसबागेत अत्यंत दुर्मीळ असलेल्या बॉम्बे शिल्डटेल (Bombay Shieldtail) या सापाचे दर्शन झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सर्पमित्र प्रकाश नाईक आणि सर्पमित्र सिद्धेश धारगळकर यांनी या सापाचे निरीक्षण केले.
सह्याद्रीच्या जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या सापाच्या अधिवासातील उपस्थितीमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दोडामार्ग तालुका हा जैवविविधतेने समृद्ध असून, अशा वन्यजीवांच्या नोंदीमुळे वन्यजीव विविधतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
नागपूर -
- विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीसाठी २ लाख २२ हजार १४९ मतदार नोंदणी झाली आहे
- सर्वाधिक १ लाख १७ हजार १७३ मतदार नागपूर जिल्ह्यात नोंदणी करण्यात आली आहे
- गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे १५ हजार मतदारांची नोंदणी अधिक झाली आहे
- या मतदारसंघासाठी प्रत्येक निवडणुकीत मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात येते
- आतापर्यंत पदवीधर निवडणुकीसाठी ५५ जणांनी १०६ अर्जाची उचल केली आहे
उल्हासनगर -
उल्हासनगर महानगरपालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांची निवड आज, १ ऑक्टोबर रोजी विशेष महासभेत पार पडणार आहे.
सात जागांसाठी तब्बल ४२ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महायुतीच्या जागावाटपानुसार भाजपला चार, तर शिवसेना शिंदे गटाला तीन जागा मिळणार आहेत.
दरम्यान, अर्जांच्या छाननीदरम्यान ४२ पैकी ३५ उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने प्रशासनाने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
आवश्यक व वैध कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेक महिने रखडलेली ही निवड आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जळगाव -
चाळीसगावात रोहित पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा; कोणताही शेतकरी वंचित राहिला तर सरकारला महाग पडेल ; रोहित पवारांचा इशारा
अंधार पडल्यानंतरही पाहणी दौऱ्यात रोहित पवार यांनी जाणून घेतले शेतकऱ्यांचे दुःख
चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा, तरवाडे, करजाई गावांत दुष्काळी परिस्थितीची पाहणी
शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन साधला संवाद
शेतातील मातीत बसून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
यवतमाळ जिल्ह्यात शेतमाल विक्री तीन दिवस बंद राहणार
खुल्या बाजारामध्ये पुढील तीन दिवस शेतमालाची विक्री बंद राहणार आहे 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे
त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस शासकीय सुट्ट्या आल्या आहेत
यामुळे शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस बाजार समित्यांमधील शेतमालाजी खरेदी विक्री बंद राहणार आहे
यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सोमवारीच बाजारपेठेत घेऊन जाता येणार आहे.
पुणे -
पुणे महापालिका कर्मचारी भरतीची फेर तपासणी
23 गावातील कामगारांच्या समावेशाचा पेच
महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील 403 कर्मचाऱ्यांच्या समावेशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया नियुक्तीचे नियम आणि कागदपत्रांची फेर तपासणी करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने महापालिकेला दिले आहेत.
पुणे -
स्पॉट राऊंडमधून प्रवेश मिळालेल्या ओबीसी व्हिजेएनटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक रद्द
मेडिकल, अभियांञिकी, फार्मसी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्पॉट राऊंडमधून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना शासन निर्णयाचा मोठा फटका
अभाविपसोबत दोन दिवसांपासून उपोषण विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू...
आमचा डिएनए ओबीसी असं सांगणाऱ्या शासनाकडून ओबीसी विद्यार्थी उपोषणाची साधी दखलही नाही
पुणे -
शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा
पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट
येत्या ३ ऑक्टोबर रोजी शरद पवार जिल्ह्यात दुष्काळ दौऱ्याला सुरुवात करणार
बारामती, पुरंदर आणि दौंड या तीन तालुक्यांना भेट देणार
दौऱ्यादरम्यान शरद पवार शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
तसेच दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. या दौऱ्यात एका सभेचेही आयोजन करण्यात आले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.