हा ट्रक कारंजा वरून वाशिमकडे येत असतांना सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झालाय.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालंय. स्फ़ोट झाल्या नंतर प्रचंड मोठा आवाज झाल्यानं गावाकऱ्यांनी तात्काळ धाव घेत चालकाला सुरक्षित स्थळी हलवलं.
रिलीफ हॉस्पिटल कर्मचारी मारहाण प्रकरणानंतर काही जणांवर नाहक गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांची तातडीने तपासणी करून सर्व बाबींचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रंकाळा चौपाटीसमोर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध
हातगाड्या लावण्यावरून नागरिक आणि खाद्य विक्रेत्यांमध्ये वाद
वाद वाढल्यानंतर घटनास्थळी ढकलाढकली, गोंधळाचे वातावरण
महानगरपालिकेने १५ दिवसांपूर्वीच कारवाई करून हटवल्या होत्या हातगाड्या
विरारच्या गडगापाडा येथील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाकडून 55 वर्षीय वयोवृद्धाला जोरदार धडक
महादेव रत्न चौरे अशी धडक दिलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव असून या धडकेत वयोवृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
विरार कडून महामार्ग कडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे.
गडचिरोलीत 313 आत्मसमर्पित माओवाद्यांना शासकीय योजनांचा लाभ
प्रोजेक्ट संजीवनीतून माजी माओवाद्यांचे पुनर्वसन - नोकरी, आरोग्य, विवाहापर्यंत मदत
819 पैकी 313 जणांना लाभ; गडचिरोली पोलिसांचा संजीवनी उपक्रम
गडचिरोली पोलिसांचा प्रोजेक्ट संजीवनी मेळावा - 313 आत्मसमर्पित माजी माओवाद्यांना शासकीय योजनांचा लाभ - आधार, आयुष्मान, ई-श्रम कार्डचे वाटप
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पित माजी माओवाद्यांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. गडचिरोली पोलीस मुख्यालय आणि अहेरी येथे झालेल्या या मेळाव्यात 313 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण गावे या मागणीसाठी आज परभणी मध्ये विराट मोर्चा काढण्यात आला होता मात्र हा मोर्चा झाल्यानंतर दीपक बोराडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही आणि आम्हाला लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत इथून उठणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे शासनाच्या शिष्टमंडळाने आम्हाला भेटून चर्चा करावी अशी मागणी देखील केली आहे तर परभणीच्या पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी दीपक बोराडे यांची भेट घेऊन चर्चा केली या चर्चेदरम्यान देखील कुठलाही पोरगा निघाला नसल्याने नेमकं हे आंदोलन पुढे काय दिशा घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
चिखली तालुक्यातील वैरागड येथे गव्हाणे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने रेस्क्यू मोहीम राबवली. आरएफओ वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर तो वर काढत असताना पिंजरा लोखंडी टोकाला अडकला आणि अचानक दरवाजा उघडल्या गेला, तोच बिबट्याने झेप घेत शेताच्या दिशेने धूम ठोकली.
बिबट्या सुटल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ धावपळ उडाली. वनपाल नेव्हरे, वनरक्षक पैठणे मॅडम आणि रेस्क्यू टीमने मोहीम राबवली... बिबट्या परिसरात असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज गणपती पाठोपाठ सर्वत्र गौराईचे आगमन होत आहे. सासुरवाशीन आणि माहेरवासीनींचा आवडता सण म्हणजेच गौरी गणपती असतो. त्यामुळे गौरी गणपतीच्या सणाचा उत्साह महिलांमध्ये मोठा असतो. आज सकाळपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठावर गौराईच्या पूजनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्या ठिकाणाहून कृष्णा नदीच्या पाण्याने भरलेली घागर आणि गौराई घेऊन महिला आनंदी वातावरणात आपल्या घराकडे प्रतिष्ठापनेकडे जाताना पाहायला मिळाल्या. पुढील दोन दिवस घरोघरी गौराईची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आंगणामध्ये गौराईचे खेळही खेळले जातात. आज गौराईच्या आगमनाने आनंदित झालेल्या सुवासिनी आणि माहेर वाशिम महिलांनी नदीकाठावरच झिम्मा फुगडीचा फेरा धरला. यावेळी आनंदाच्या वातावरणात पारंपारिक वाद्यांच्या गजरात महिलांनी घरोघरी आपल्या गौराईची प्रतिष्ठापना केली आहे.
पुणे
आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या
उजनी धरणातील प्रस्तावित मच्छीमारी ठेका रद्द करा या मागणीसाठी पुण्यातील सिंचन भवन येथे मच्छीमारांचे आमरण उपोषण.....
उजनी धरणातील ठेका रद्द होईपर्यंत उपोषणकर्ते उपोषणावर ठाम...
रायगड -
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमधून दरे गावाकडे रवाना
महाबळेश्वर परिसरातील वातावरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच हेलिकॉप्टर महाडमध्ये उतरुन शिंदे पुढे बायरोड दरे गावाकडे रवाना झाले
शिवसेनेचे युवानेते विकास गोगावले आणि शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच स्वागत केल
विकास गोगावले यांनी एकनाथ शिदे यांच सारथ्य केल आणि ताफा दरे गाया कडे रवाना झाला
पुणे
आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या
उजनी धरणातील प्रस्तावित मच्छीमारी ठेका रद्द करा या मागणीसाठी पुण्यातील सिंचन भवन येथे मच्छीमारांचे आमरण उपोषण
उजनी धरणातील ठेका रद्द होईपर्यंत उपोषणकर्ते उपोषणावर ठाम
पुणे -
चाकण परिसरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेबाबत उच्चस्तरीय समितीची आढावा बैठक
रस्ते,चौक,जड वाहतूक आणि वाहनतळांसाठी समन्वित उपाययोजना
चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी,औद्योगिक वाहनांची वाढती वर्दळ, रस्त्यांवरील खड्डे आणि अनधिकृत वाहनतळांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी विविध विभागांनी समन्वयाने कृती आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
अभिजीत दिपके यांनी गडचिरोलीच्या कोहका येथील शाळेला दिली भेट
शिक्षक नाहीत, रस्ता नाही... विद्यार्थ्यांचा ३ किलोमीटर जीवघेणा पायी प्रवास!
वाघाच्या भीतीतून पायवाटेने शाळेची वाट
कोहका येथील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पुणे-
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे पोलिसांकडून शहरावर करडी नजर ठेवण्यात आलीय.
पुणे शहरातल्या विविध भागांमध्ये तब्बल ३५०० सी सी टिव्ही कॅमेरा कार्यान्वित असून त्या माध्यमातून प्रमुख गणेश मंडळ, महत्त्वाच्या रस्त्यांवर तसेच गर्दीच्या ठिकाणी "वॉच" ठेवला जातोय.
कुठली ही संवेदनशील गोष्ट निदर्शनास आल्यास या कंट्रोल रूम मधून थेट त्या ठिकाणावर कार्यवाहीचे आदेश देण्यात येतात तसेच तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काही सूचना असतील तर त्या सुद्धा देण्यात येतायत.
जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर
२२ जानेवारी रोजी होणार परीक्षा
एनटीएकडून वेळापत्रक जारी
सोलापूर -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावले बॅनर
सोलापुरातील भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या बॅनरमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा
शिखर पहारिया हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांचे पुत्र आहेत
मागील 2 वर्षांपासून शिखर पहारिया हे सोलापुरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून सक्रिय आहेत
पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या बॅनरमुळे संपूर्ण सोलापुरात चर्चा रंगतेय
दरम्यान शिखर पाहरिया यांनी लावलेल्या बॅनरवर भाजपच्यावतीने देखील प्रतिक्रिया देण्यात आलीय
नंदूरबार -
गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस
अक्राणी तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाला सुरुवात
अनेक दिवसांनी आलेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक लहान नद्यांमध्ये पाणी पातळी कमी
जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम
जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. वाळवा तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने भात पिकाला फटका बसला आहे. पाण्याअभावी भात पीक करपण्याच्या मार्गावर असून, उत्पादनाची आशा मावळली आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने एका शेतकऱ्याने नाईलाजाने आपल्या शेतातील भात पिकावर अक्षरशः नांगर फिरवला. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने पिकांची पाहणी करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे अती ज्वलनशील लिक्विड वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर चारोटी उड्डाणपुलाच्या कठड्याला टँकर धडकला. टँकरमध्ये बेंझीन हे ज्वलनशील द्रव असल्याची माहिती आहे. अपघातानंतर टँकरमधून धूर निघू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात टँकरचा चालक आणि वाहक जखमी झाले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
वेळ न दिल्याने पुणे विद्यापीठ कुलसचिवांच्या कार्यालयाच्या दरवाजाला निवेदन लावण्यात आले.
विद्यार्थी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
गेली दोन महिन्यापासून कुलसचिव भेटण्यास वेळ देत नाहीत त्यामुळे आज त्याच्या कार्यालयाच्या बाहेर निवेदन
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन देण्यासाठी कुलसचिव कार्यालयात उपस्थित होते मात्र, कुलसचिव कार्यालयात उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निवेदन त्यांच्या कार्यालयाच्या गेटवर लावण्यात आले विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आलीय.
धानाला योग्य भाव आणि बोनस मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे धान उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा काढला. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाल्याने नागभीड परिसरात शेतकऱ्यांचा मोठा जनसागर पाहायला मिळाला. धानाला बोनस मिळालाच पाहिजे’ या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. तळोधी, नागभीड आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह आंदोलनात सहभागी झाले होते. या मोर्चातून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार आक्रोश व्यक्त केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासन आता शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आकृतीबंध रद्द कराव यासाठी डॉक्टर आक्रमक...
आकृतीबंध यामुळे ससून रुग्णालयातील आणि बीजे मेडिकल कॉलेज मधील अनेक जागा कमी होतील आणि त्याच्यामुळे रुग्णांचं आणि इथं शिकणाऱ्या डॉक्टरांचे मोठं नुकसान होईल..
ससून मध्ये विविध विभागातील 31 पदे रिक्त.... कमी डॉक्टरांमध्ये जास्त रुग्णांची करावी लागत आहे वैद्यकीय सेवा
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत हलाखीच्या आर्थिक संकतात सापडले आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली असून, कोमेजलेली झाडे पाहून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.या हंगामात बियाणे, खते, मशागत आणि औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांनी प्रतिएकर हजारो रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, पावसाची कोणतीही चिन्हे नसल्यामुळे हा लावलेला लाखोंचा खर्च निघणे आता अशक्य झाले आहे.
रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गुजरात दौऱ्यावर असून, वडनगर येथील त्यांचे नियोजित कार्यक्रम आटोपून ते हेलिकॉप्टरने अहमदाबादकडे रवाना होणार होते. हेलिकॉप्टर उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच वैमानिकाच्या हा तांत्रिक बिघाड लक्षात आला.
नाशिकहून ठाणे-नवी मुंबईत विक्रीसाठी आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा कळवा पोलिसांनी खारेगाव टोलनाक्यावर पकडला. दोन वॅगनआर कारमधून १२ लाख ७१ हजार ७०० रुपयांचा गुटखा जप्त करत दोघांना अटक करण्यात आली. वाहनांसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २६ लाख ८१ हजार ७०० रुपये आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोठे वक्तव्य
मनोज जरांगेंचा जसा आदर तसाच एकनाथ शिंदेंचा आदर , त्यांनी टीका केल्यामुळे आम्हाला बोलावं लागलं - प्रताप सरनाईक
जरांगे पाटील मला दिवसातून दोन ते तीन वेळा फोन करतात माझ्याकडून जी काम ती मी लगेच पूर्ण करतो- प्रताप सरनाईक
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये आंदोलन
तुमसे ना हो पाएगा - आंदोलनातून उद्धव ठाकरे
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील विवेकनगर येथील तीन १६ वर्षीय मित्र काल सायंकाळी पिंजाळ नदीवर आंघोळीसाठी गेले होते. मानव चरणदास राठोड आणि गितेश पाटील हे दोघे नदीत उतरले असता पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ते वाहून गेले. अभय जाधव याला पोहता येत नसल्याने तो नदीत उतरला नाही. दोघे वाहून गेल्याचे पाहून घाबरलेल्या अभयने कोणालाही न सांगता घरी परतला.
रात्र झाली तरी मुले घरी न परतल्याने नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अभयची विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर रात्री पोलिसांनी नदीपात्रात शोध घेतला; मात्र दोघांचा ठावठिकाणा लागला नाही. आज सकाळी सुमारे ४० ते ५० ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी काही अंतरावर मानव राठोड याचा मृतदेह आढळून आला असून गितेश पाटीलचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेने वाडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिकच्या निफाड नगर पंचायतीमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील टेबलवर कुत्रे सोडणे व टेबलला चलनी नोटांचा हार घालणे शिवसेना ठाकरे गटाचे युवा जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, नगरसेविका रूपाली रंधवे यांना चांगलेच महागात पडले असून रंधवे दाम्पत्यांसह पाच जणांविरुद्ध एका निफाड पोलिसात मुख्याधिकारी धीरज भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यावर ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा समाजाचा विश्वासघात केला असून, रात्रीच्या अंधारात सरकारसोबत साटेलोटे करून मोठी सेटलमेंट केली आहे,” असा आरोप ससाने यांनी केला.
मोठमोठ्या बाता मारणारे जरांगे आता अचानक मागे का हटले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या आंदोलनाच्या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत तीन मराठा बांधवांचा मृत्यू झाला असून, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारत मराठा समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ससाने म्हणाले.
तसेच ओबीसी आंदोलकांवर कारवाई करणाऱ्या सरकारने मनोज जरांगे यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. जरांगे यांनी सातत्याने शिवीगाळ करून माता-माऊलींच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे मंगेश ससाने यांनी सांगितले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याच जरी नसले तरी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय पुण्यातील एका गणेश मंडळाने. पुण्यातील गुरुवार पेठ असणाऱ्या श्री शिवछत्रपती मित्र मंडळाने अजित पवारांचे गाजलेले काही डायलॉग त्याशिवाय दादांचं प्रसिद्ध झालेलं गुलाबी जॅकेट असे दोन मोठे कट आउट लावले आहेत. याशिवाय अजित पवारांनी वेळोवेळी वापरलेले वाक्य ज्यामध्ये "वाह रे पठ्ठ्या", "जनतेची कामं करा", "मी आहे ना," असे पोस्टर सुद्धा लावले आहेत. दादा आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील तसंच गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांना सलामी देण्यासाठी हा देखावा सादर केल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
एक हजार रुपये प्रति क्विंटलचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
सध्या सोयाबीनला 4 हजार 555 ते 5 हजार प्रति क्विंटल दर..
यंदा पाऊस कमी झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता..
ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम..
यंदा सरासरी उत्पादनात किमान 30 ते 40 टक्क्यांची घट होण्याची शक्यता..
काही भागांत सोयाबीनची शेंगा भरलेली नसल्याने दाणे कमी येण्याची शक्यता..
गोरे होण्यासाठी स्वतः औषधे घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
औषधांचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप.
आदित्यने नाशिक येथून बीएएमएस पदवी घेतली होती.
अमरावतीतील एका रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होता.
नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून तो खोलीत झोपण्यासाठी गेला.
दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडल्यानंतर तो मृतावस्थेत आढळला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही मुंबईत जाण्यापूर्वी आणि मुंबईत गेल्यानंतर सरकारने त्यांच्या मागण्यांसमोर झुकल्याचं वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शिवीगाळ झाल्यानंतरही सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंकडे जातं आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातात, अशी टीकाही त्यांनी केली.
‘या सरकारला आता शिव्या खायची सवय झाली असून, जरांगे पाटलांच्या शिव्या खाल्ल्याशिवाय सरकारचं पोट भरत नाही,’ असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. तसेच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देऊन त्यानंतर व्हॅलिडिटीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी आहे.
हा नियम न्यायाच्या चौकटीत कितपत बसेल आणि त्याला किती घटनात्मक मजबुती मिळेल, हे येणारा काळच सांगेल, असंही वडेट्टीवार म्हणाले.
आदिवासी स्कूल ठीक करो अभियानांतर्गत ते एटापल्ली तालुक्यातील डुंमे, आलेगा, पायडी या जिल्हा परिषद शाळांना भेटी देणार असून विविध अपूर्ण कामांचीही पाहणी करणार आहेत. आदिवासी स्कूल ठीक करो, अभियानाची सुरुवात विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातून करणार अशी घोषणा काल त्यांनी नागपुरात केली होती. अभिजीत दिपके रात्रीच गडचिरोलीत दाखल झाले असून सकाळी 11 वाजता एटापल्ली तालुका मुख्यालयात पोहोचणार आहेत. तर सायंकाळी भामरागड येथे मुक्काम करणार असून दुसऱ्या दिवशी भामरागड मधील काही शाळांना भेटी देणार आहेत.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना नजरकैदेत ठेवल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाले असतानाही मराठा कार्यकर्त्यांना घरातून ताब्यात घेण्यात आले असून महिलांनाही डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही मार्गाने पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांना भेटू दिले जात नसेल, तर सरकारची मानसिकता रजाकारांसारखी असल्याची टीका कैलास पाटील यांनी केली. दरम्यान, पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेल्या मराठा आंदोलकांची पोलीस ठाण्यातून त्यांनी सुटका केली. याप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसांनंतर आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मात्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 90 दिवसांचा वेळ दिला आहे. तीन महिन्यांनंतर सरकारनं धोका दिल्यास मुंबई गाठण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारच्या शिष्टमंडळानं बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरसमोरच मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी,
सरनाईकांच्या दौऱ्यापुर्वीच काही मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मराठा आंदोलक आक्रमक
सरनाईकांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर ताब्यात घेतलेल्या मराठा आंदोलकांना तातडीने सोडण्याची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात मराठा आंदोलक व पोलिसात झटापट,रस्त्यावर अचानक गोंधळ झाल्याने पोलिसांची धावपळ
गोंधळ करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
धाराशिव मध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 78 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी सरनाईकांकडून हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करण्यात आले.त्यावेळी स्वातंत्र सैनिकांच्या हस्तेही हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली.खासदार ओमराजे निंबाळकर,भाजप आमदार राणाजगजीतसिंह,ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचीही यावेळी उपस्थित होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे आज लातूर दौऱ्यावर आहेत, यावेळी जिल्ह्यातील भीषण परिस्थिती शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली मात्र पालकमंत्र्यांनी, प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप करत, मराठवाड्याच्या प्रश्नाची जाण असणारा पालकमंत्री लातूर जिल्ह्याला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा मार्ग रोखला
पोलिसांसोबत आंदोलकांची झटापट
नांदेड नाका परिसरात शेकडो आंदोलक रस्त्यावर बसले
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात
पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्याच सत्र थांबता थांबेना असं झालेलं आहे.. गेल्या आठ महिन्यात जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अमरावती ,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या ठिकाणी तब्बल ५५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे.. यामध्ये सर्वाधिक १७४ शेतकरी आत्महत्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यामधील आहे... अमरावती जिल्ह्यातील १०२, अकोला १०५, बुलढाणा ९२ आणि वाशिम मध्ये ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.. यावर्षी खरीप हंगामात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, महिन्या घरापासून पावसाने दांडी मारली.. सुरुवातीला बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसला.. सततची नापिकी, शेतमालाला भाव न मिळणे, कर्जबाजारीपणा यामुळे सातत्याने शेतकरी आत्महत्याचा मार्ग स्वीकारतो आहे.. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे... ५५६ शेतकरी आत्महत्यापैकी २०२ शेतकरी आत्महत्या साठी पात्र ठेवण्यात आले.. तर धक्कादायक म्हणजे १३५ शेतकरी अपात्र करण्यात आले...
शिरूर तालुक्यातील आंबळे येथे बिबट्याने थेट घराच्या अंगणात येत कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. घराच्या उंबरठ्यापर्यंत बिबट्या येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी एकीकडे आपल उपोषण स्थगित केल आहे मात्र दुसरीकडे धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ध्वजारोहण करु देणार नाही,कार्यक्रम उधळुन लावु असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीसांकडून मराठा आंदोलकांना नोटीसा देत ताब्यात घेतल आहे.तर जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.त्यामुळे परीसरात पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असुन कसुन चौकशी करूनच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांना प्रवेश दिला जात आहे
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने अनेकजण जखमी झाले आहेत.. जखमींमध्ये लहान मुलांसह युवक, महिला आणि वयोवृद्धांचा समावेश आहे.. सात जखमींना उपचारासाठी अहिल्यानगर येथे पाठवण्यात आले आहे.. पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुणे विभागातील १२ आस्थापनांवर छापे
प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्याप्रकरणी १४ ठिकाणी कारवाई करून सुमारे २० लाख २६ हजार रुपयांचा साठा जप्त
पुणे विभागात १० ते १५ सप्टेंबरदरम्यान ही कारवाई करण्यात आली
पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्येही तपासणी
सणासुदीच्या काळात खवा, मावा, स्वीट, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर अन्नपदार्थांची मागणी वाढते
या काळात भेसळयुक्त अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे अन्नपदार्थांची खरेदी करताना ग्राहकांनी लेबल, उत्पादनाची तारीख आणि इतर माहिती तपासावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत मात्र अद्याप अस्पष्टता
एमपीएससी परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलण्याचा निर्णय
मात्र, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६चे पेपर नव्याने सेट करण्याच्या मागणीबाबत आयोगाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही
त्यामुळे मुख्य परीक्षा पुढे ढकलून नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घ्यावी, ही विद्यार्थ्यांची मागणी कायम
पुण्यात बुधवारी लाईट, साउंड असोसिएशन तर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे प्रशासनाकडून सहकार्याची आणि इतर बाबींबाबत मागण्या करण्यात आल्या. या मोर्चा मध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक साउंड व्यवसायिक आणि डी जे ऑपरेटर सहभागी झाले होते. यातील एका डी जे ऑपरेटर ने प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बापट शिकून विद्यानंद झाले, आम्ही सुद्धा कोर्स करून डी जे झालो आहोत, आम्ही सुद्धा कष्ट केले आहेत. आमच्या पोटावर पाय देऊ नका, आमच्यावर अन्याय करू नका, प्रशासनाला विनंती आहे."
रायगडच्या माणगाव तालुक्यात बल्क ड्रग्ज प्रकल्प होऊ घातला आहे. रासायनीक कारखान्यांमुळे परिसराच होणार नुकसान लक्षात घेऊन बाधीत होणाऱ्या 21 गावातील ग्रामस्थांनी लढा पुकारला आहे. बल्क ड्रग्ज पार्क विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर आज माणगावच्या कडापे येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आ. अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते. माणगावमध्ये बल्क ड्रग्ज प्रकल्पा होणार नाही असा विश्वास गोगावले यांनी प्रकल्प बाधित ग्रामस्थांना दिला. बल्क ड्रग्ज प्रकल्प विरोधी आंदोलनासाठी पालक मंत्री पणाला लावावे लागले तरी मागे हटणार नाही अशी घोषणा मंत्री भरत गोगावले यांनी केली. उद्योग मंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबत गणेशोत्सवानंतर बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचा शब्द गोगावले यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्त आंदोलक ग्रामस्थांना दिला.
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने सरोवराची जैवविविधता आणि परिसरातील प्राचीन मंदिरांवर संकट निर्माण झाले आहे. मागील वर्षी संबंधित विभागाने एका वर्षाच्या आत पाणी कमी करण्याचे आश्वासन दिले होते. राज्य वन्यजीव मंडळाची ना हरकत मिळाल्याचे विभागाकडून सांगण्यात येत असले तरी केंद्र सरकारच्या वन्यजीव मंडळाची एनओसी अद्याप प्रलंबित असल्याने पाणी काढण्याचे काम सुरू झालेले नाही. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने कमळजा माता मंदिरासह काही प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच पाण्याचा pH स्तर व क्षारांचे गुणधर्म बदलल्याने लोणार सरोवरातील अल्कधर्मी जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. वाढत्या पाण्यामुळे जंगल क्षेत्रही कमी होत असून, वन्यप्राणी गावांकडे येऊन मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवरात्रोत्सव जवळ येत असल्याने कमळजा माता मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे तातडीने पाणी कमी करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा विविध संघटनांकडून तीव्र आंदोलन आणि चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या जलपातळीची गंभीर दखल उच्च न्यायालयानेही घेतली आहे. त्यामुळे शासन-प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.
अमरावती शहरातील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ हे अमरावती शहरातील सर्वात जुने मंडळ आहे,या मंडळाला यावर्षी 99 वर्ष पूर्ण होत आहे,यावर्षी मंडळाने 'हारे का सहारा, बाबा श्याम हमारा' या संकल्पनेवर आधारित राजस्थानमधील जयपूर येथील प्रसिद्ध 'श्री खाटू श्याम बाबा' मंदिराची भव्य आणि नयनरम्य प्रतिकृती साकारली आहे.हा देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.हे मंडळ 1926 पासून कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रम ही मंडळी शहरामध्ये राबवत असते,या मंडळाचे पूर्वी नाव रॉयल गणेश मंडळ होते मात्र सुभाष चंद्र बोस यांचे आझाद हिंद फौजेचे सरसेनापती कॅप्टन शहानवाज हुसेन यांनी 15 ऑगस्ट 1948 साली या मंडळात ध्वजारोहण केलेले
गडचिरोलीतून मोठी बातमी, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शासनाने हा आदेश काढला आहे. १६ सप्टेंबरच्या आदेशानुसार त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं असून निलंबन काळात त्यांचं मुख्यालय गोंदिया जिल्हा रुग्णालय असणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात पावसाने दोन महीन्यापासुन दडी मारल्याने शेतकऱ्यांच नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचा अक्षरशःपालापाचोळा झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप पुर्णपणे वाया गेला आहे.त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.धाराशिवच्या भुम मधील शेतकरी अमोल माळी यांनी सोयाबीन पिकातुन हाती काहीच येणार नसल्यामुळे आपल्या उभ्या सोयाबीन पिकात म्हशी सोडल्या आहेत,आता सरकारनेच काही तयी मदत करावी अशी मागणी शेतकरी माळी यांनी केलीय.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा झटका बसला असून काँग्रेसचे प्रफुल मानकर आणि श्रीनिवास नालमवार या दोघांचे अर्ज बाद झाले आहेत तर युतीच्या उमेदवारांविरोधात असलेले तीन आक्षेप फेटाळण्यात आले आहे महाविकास आघाडीला बसलेल्या धक्क्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.