Alisha Khedekar
मिक्सरची पाती बोथट झाली असतील, तर महागडी धार लावण्याची गरज नाही; घरच्या घरी ही ट्रिक करून पाहा.
या ट्रिकसाठी फक्त जाडे खडे मीठ लागेल. त्यामुळे अतिरिक्त खर्च न करता पात्यांची धार सुधारण्यास मदत होते.
मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी जाडे खडे मीठ घाला आणि झाकण व्यवस्थित बंद करा.
मिक्सर काही सेकंद हायस्पीडवर फिरवा. मिठामुळे पात्यांवरील बोथटपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
मिक्सर सलग बराच वेळ चालवू नका. काही सेकंद फिरवल्यानंतर तो बंद करून थोडा वेळ थांबा.
पाती थोडी बोथट असल्यास घरगुती उपाय करून पाहिल्यामुळे लगेच नवीन भांडे किंवा पाते घेण्याचा खर्च टाळता येऊ शकतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा