Shreya Maskar
कुणकेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वसलेले एक किनारी गाव आहे. कोकणात गेल्यावर या ठिकाणाला नक्की भेट द्या.
पावसाळ्यात कुणकेश्वरचा परिसर हिरवाईने नटलेला असतो. धुक्याची चादर आणि समुद्राच्या लाटांचा प्राचीन शिवमंदिरावर होणारा आघात यामुळे येथे एक अद्भुत आणि शांत अनुभव मिळतो.
कुणकेश्वर मंदिर हे १२ व्या शतकातील प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर यादव काळात बांधले गेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता.
कुणकेश्वर मंदिराला अनेकदा 'दक्षिणेची काशी' म्हटले जाते. हे मंदिर अरबी समुद्राच्या समोरच खडकाळ किनाऱ्यावर वसलेले आहे.
येथे ५ किलोमीटर लांबीचा पांढऱ्या वाळूचा स्वच्छ किनारा आहे, ज्याच्या कडेला आंबा आणि नारळाची झाडे आहेत. निवांत फेरफटका मारण्यासाठी, सूर्यास्त पाहण्यासाठी आणि पोहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
पावसाळ्यात आसपासचा देवगड आणि कोकण परिसर दाट हिरवाईने बहरतो. त्यामुळे शांत रोड ट्रिप्स, फोटोशूट आणि अरबी समुद्राच्या नजाऱ्यासाठी हे बेस्ट आहे.
हिवाळ्यातील गर्दीच्या हंगामाच्या तुलनेत पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी कमी असते. त्यामुळे शांत वातावरण अनुभवता येते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.