भाजप नगरसेविका तृप्ती संतोष कांबळेवर गुन्हा दाखल करा
पिंपरी-चिंचवड महापालिकेची पोलिस आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे मागणी
पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 32 येथील त्या नगरसेविका आहेत
तृप्ती संतोष कांबळे यांच्याविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी
नांदेडमध्ये पीक कर्ज देण्यास एसबीआय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेची टाळाटाळ.
एसबीआय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांनी केले जलसमाधी आंदोलन
विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम?
विमान प्रवासाच्या तिकिटांचे मनमानी दर आणि अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम अंतिम केले
दोन आठवड्यांत ते जाहीर केले जातील, अशी माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिली.
खासगी विमान कंपन्यांच्या मनमानी दरांविरोधात दाखल जनहित याचिकेवर न्यायालयाने सरकारला १६ नोव्हेंबरपर्यंत नियम सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज बाद झाल्याने आता वंचितचा पाठिंबा कोणाला?
शिंदे सेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष दूत वंचितच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलणी करण्यासाठी पाठवल्याची सूत्राची माहिती
वंचितचा पाठिंबा कोणाला असेल याबाबत आज प्रकाश आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती
धाराशिव -
धाराशिवमधील हातलाई देवी मंदिराच्या गाभाऱ्यात साकारली दुष्काळाचे वास्तव मांडणारी रांगोळी
तहानलेली धरती,हतबल बरीराजा.. रांगोळीच्या माध्यमातून साकारत 'आई' दुष्काळातुन तुच बाहेर काढ गं..! आणि एक थेंब पाण्याचा,किती लाख मोलाचा! अशा ह्रदयस्पर्शी संदेश देत दुष्काळाची दाहकता दाखवली
धाराशिव मधील कलायोगी आर्ट्सचा वतीने 110 किलो रांगोळीतुन माध्यमातून मांडली दुष्काळाची विदारक परिस्थिती
नागपूर-
- सणासुदीच्या काळात विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
- दसरा-दिवाळीच्या तोंडावर विमान तिकिटांच्या दरात भरमसाठ वाढ
- नागपूर-मुंबई विमान प्रवासाचे भाडे २२ हजार ८०० रुपयांपर्यंत
- मुंबई ते नागपूर विमान तिकिटासाठी १५ हजार ते २२ हजार ८०० रुपये मोजावे लागतायत
शेतात आणि सातबारावर विहिर नसतानाही, विहीर असल्याचे कारण देत शेतकऱ्यांचे सिंचन विहिरीचे प्रस्ताव केले रद्द
मालेगाव पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा प्रताप
प्रस्ताव मंजूरसाठी लाच न दिल्याने फाईल ६ महिने रेंगाळत ठेवून अखेर रद्द केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी ४५,००० रुपयांची बोनस महासभेत सर्वानुमते मंजूर
एकसमान सानुग्रह अनुदान देणारी नमुंमपा ठरली पहिली महानगरपालिका
नवी मुंबईतील सरसकट सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ४५ हजार रुपये बोनस
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.