Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Marathi Breaking Live Headlines Updates : ज्ञानेश कुमारांविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महाराष्ट्रात राजू शेट्टींचे आंदोलन, नवरात्रौउत्सव, सीजीपीचे दिल्लीत आंदोलन, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

जावयाचा सासू व पत्नीवर प्राणघातक हल्ला, पत्नी जागीच ठार, सासू गंभीर जखमी

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरवड गावात एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पत्नी अनेक महिन्यांपासून माहेरी राहत असून सासरी का येत नाही, या कारणावरून जावयाने पत्नी आणि सासूवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून सासू गंभीर जखमी झाली आहे.

कमलाबाई प्रभाकर पाईकराव (सासू) आणि दिपाली विशाल डोंगरे (मृत पत्नी) अशी या हल्ल्यातील महिलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नी सासरी येत नसल्याच्या कारणावरून जावयाने जाब विचारण्यास सुरुवात केली. यादरम्यान पती-पत्नीच्या भांडणात सासू मध्यस्थी करण्यासाठी आली असता, संतापलेल्या जावयाने मध्यरात्रीच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. झोपण्यासाठी अंगणात ठेवलेल्या बाजेच्या (खाटेच्या) लाकडाने त्याने पत्नीच्या डोक्यात जोरदार वार करून तिची निर्घृण हत्या केली.

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी

मतदारांची मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचा आरोप आणि मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

वांद्रे गरीब नगर तोडक कारवाई प्रकरणात लष्कर मुख्यालयातून आला होता धमकीचा फोन; मुंबई क्राइम ब्रँचच्या तपासात मोठा खुलासा

मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील गरीब नगर झोपडपट्टीतील अवैध धार्मिक बांधकामावरील कारवाईनंतर धमकी दिल्याचे प्रकरण.

अवैध मशीद तोडण्याचे समर्थन करणाऱ्या इम्तियाज खत्री याला धमकी मिळाल्याचा आरोप.

मुंबई क्राइम ब्रँचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटकडून (CIU) प्रकरणाचा तपास.

धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाइल क्रमांक हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचा तपासात संशय.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने शफीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना अटक.

दोन्ही आरोपी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबासाठी सक्रियपणे काम करत असल्याचा पोलिसांचा संशय.

मोशीत महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवड शहरातील बोराडेवाडी परिसरातील मंत्रा मोमेंट्स हाऊसिंग कॉम्प्लेक्स मधील कमर्शियल ऑफिसमध्ये 12 ऑक्टोंबर च्य मध्यरात्री

प्रियंका आकाश कांबळे वय 30 वर्ष या महिलेची धारदार शस्त्राने गळा आणि चेहऱ्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. प्रियंका आकाश कांबळे हिच्या मारेकऱ्यांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

रिलायन्स पॉवर लिमिटेडची भारतातील २,०३२.८१ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली

परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या कलम ३७-अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त मालमत्तांमध्ये कंपनीच्या बँक खात्यांतील शिल्लक आणि सासन पॉवर लिमिटेडमधील भागभांडवलाचा समावेश आहे.

परदेशात कथितरीत्या नियमबाह्य पद्धतीने ठेवण्यात आलेल्या परकीय चलनाच्या सममूल्याची मालमत्ता भारतात जप्त करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.

सेबीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू झाला. रिलायन्स पॉवरच्या लेखा नोंदींमध्ये परदेशातील गुंतवणूक आणि आगाऊ रकमेबाबत एकूण २,१०१.४६ कोटी रुपयांच्या राइट-ऑफ किंवा तरतुदी करण्यात आल्याचे या माहितीमध्ये नमूद होते

विदर्भात परतीच्या पावसाची शक्यता, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज

- 17 ऑक्टोबर नंतर नागपूरसह विदर्भातील काही भागात पावसाचा येल्लो अलर्ट

- बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं परतीच्या पावसाची शक्यता वाढली

- परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा आणि नुकसान दोन्ही होणार, काढणीला आलेल्या शेतमालाचे नुकसान तर कापूस, धान, संत्रा पिकांना फायदा होणार अशी आशा...

पुणे म्हाडा लॉटरीच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

पुणे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता २२ ऑक्टोबरपर्यंत

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढीचा निर्णय

पुणे मंडळाच्या ४ हजार ४६२ घरांसाठी सोडत जाहीर

यापूर्वी १५ ऑक्टोबर होती अर्ज करण्याची अंतिम तारीख

म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत १ लाख ६५ हजारांहून अधिक अर्ज दाखल

३ हजार ८०० हून अधिक अधिवास प्रमाणपत्रे आणि ९ हजारांहून अधिक उत्पन्नाचे दाखले पडताळणीसाठी प्रलंबित

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

पुणे आणि सांगली जिल्ह्यातील सहा आस्थापनांवर कारवाई

मिठाई, वेफर्स, चकली, भगर आणि साबुदाण्याचा ४ लाख ४६ हजार रुपयांचा साठा जप्त

विटा येथील श्री बालाजी स्वीट मार्टमधून ६ किलो जिलेबी आणि म्हैसूर पाक जप्त

सिरवी बंधू मिठाईवाले येथून २७ किलो बुंदी लाडू आणि म्हैसूर पाक जप्त

कवठेपिरान येथील रुचिरा स्वीट्समधून ७२ किलो नारळ बर्फी आणि म्हैसूर पाक जप्त

पुण्यातील बिबवेवाडी येथील आशिष फूड्समधून २१० किलो बनाना वेफर्स,तर रेड्डी स्वीट हाऊसमधून ७५.६ किलो चकली जप्त

मार्केटयार्ड येथील समीर सेल्समधून १ हजार २९८ किलो भगर आणि २ हजार ९९८ किलो साबुदाणा जप्त

तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय?

दुर्मिळ बोर्ना स्नेकहेड माशाच्या तस्करीच्या मुद्यावर सरकारने लक्ष द्यावे यासाठी थेट केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! थेट ५ मोठ्या योजनांची नावं बदलली; महिलांसाठीच्या या योजनेचाही समावेश

Women Heart Attack : छातीत दुखत नसतानाही येऊ शकतो हार्ट अटॅक; 'ही' ७ लक्षणे फक्त महिलांमध्येच दिसतात

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांचा फैसला सुप्रीम कोर्टात, आज होणार महत्वाची सुनावणी

Sabudana Paratha Recipe: उपवासासाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाणा पराठा, वाचा सोपी रेसिपी

Gold Rate : नवरात्रोत्सवात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सुवर्णनगरीतील मागील ५ दिवसातील दर पाहाच

SCROLL FOR NEXT