Maharashtra Live News Update:  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये पुन्हा कारला आग; पार्किंग माफियावर संशय

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, पुणे-सोलापूरमध्ये पाऊस, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, राजकारणातील घडामोडी जाणून घ्या.

Bharat Jadhav

Mumbai : गोरेगावमध्ये पुन्हा कारला आग; पार्किंग माफियावर संशय

गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिराजवळ, आर-14 म्हाडा इमारतीच्या परिसरात उभी असलेली होंडा सिटी कार अचानक पेट घेतल्याची घटना आज घडली. काही दिवसांपूर्वी याच भागात एक वॅगनआर कारलाही आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक, घटना CCTV मध्ये कैद

कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झालाय.

ओतूर येथील मुख्य चौकात ट्रकने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिला ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली

या भिषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार, ८ वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली

शाळेतील वर्ग पाठाची वही न आणल्याच्या शुल्लक कारणावरून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून लाकडी काठीने मारहाण

धाराशिव शहरातील श्री श्री रविशंकर या खाजगी शाळेतील धक्कादायक प्रकार

विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरोधात धाराशिव शहर पोलीसात गुन्हा दाखल

विद्यार्थ्याने क्लास वर्कची वही आणली नाही म्हणून आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या उजव्या,खांद्यावर,डाव्या हातावर,पाठीवर मारहाण केल्याची तक्रार

1 एप्रिल रोजीची घटना घडल्याने शिक्षकाविरोधात बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकच्या सातपूर परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

नाशिकच्या सातपूर परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

फॉरेन्सिक टीम कडून लैंगिक शोषण करणाऱ्या व्यावसायिक रवींद्र एरंडेच्या कार्यालयावर झाडाझडती

स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील तांत्रिक पुरावे गोळा करण्याची कारवाई

याच कार्यालयातील संगणकाच्या हार्ड ड्राईव्हमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ असल्याचं आलं होतं समोर

 दत्तशिखर देवस्थानचे महंत श्री मधुसूदन भारती महाराज यांचे निधन

दत्तशिखर देवस्थानचे महंत श्री मधुसूदन भारती महाराज यांचे निधन

तीर्थक्षेत्र माहूरगडावरील दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे आज निधन झाले.

ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

त्यांचे वय ९९ वर्ष असल्याचे सांगितले जात आहे.

उद्या, रविवारी दुपारी ३ वाजता माहूरगडावर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत

पुण्यात तडीपार असलेल्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार असलेल्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

जर कोणी कायदा मोडला तर त्याला कायद्याच्या भाषेत जशास तसे उत्तर

आरोपींना गुडघ्यावर चालायला लावत ज्या परिसरात दहशत केली तिकडेच शिक्षा दिली

तडीपार असतानाही असतानाही आरोपी निखिल मधुकर कांबळे याने पोलिसांच्या नाकावर टिचून कायद्याची उघडपणे पायमल्ली केली होती.

आरक्षण बचाव समिती आक्रमक; वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा

भारतीय संविधानाने न्यायासाठी आरक्षण दिले आहे. आरक्षण हे गरीबी हटविण्याचा कार्यक्रम नाही. भारत सरकार आरक्षणाची वर्गवारी करुन जातीवाद वाढवित आहेत.

अमरावतीच्या मेळघाटात मुसळधार पावसासह जोरदार गारपीट

मेळघाटातील काटकुंभ परिसरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. गहू,आंबा, कांदा आणि भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. अचानक अवकाळी पाऊस व गारपिटीने मेळघाटातील शेतकरी संकटात आले आहेत.

Maharashtra Live News Update : धुळ्यात लग्नाच्या वराडाचा व्हॅनचा भीषण अपघात

वाहन अनियंत्रित झाल्याने डीवाईडरला ठोकून या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात तीन जण दगावल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे.

नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेला सुरुवात

देशभरातील प्रमुख आखाड्यांच्या साधू, महंत आणि अन्य पिठांचे ३०० साधू, महंत परिषदेला उपस्थित झाले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासह देशातील धार्मिक वातावरण, देशविघातक कारवाया आणि धर्माच्या संरक्षणासंदर्भात परिषदेत चर्चा आहेत.

रत्नागिरीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या टँकरचा आठ दिवसात सलग दुसऱ्यांदा अपघात 

मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर मुंबईहून लोटे एमआयडीसी इथेनॉल घेऊन जाणारा टँकर झाला पलटी.

Maharashtra Live News Update : बड्या आमदाराच्या वाहनावर कारवाई, अकोल्यात खळबळ

भुसावळ शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी अकोल्याचे आमदार साजिद पठाण हे भुसावळात आले होते. यावेळी त्यांच्या वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट तसेच राजमुद्रेचे चिन्ह लावलेले आढळून आले.

बारामती राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये जय पवार दाखल

बारामतीत आज राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जय पवार यांनी जोरदार एन्ट्री घेतली. त्यांच्या आगमनावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत घोषणाबाजी केली.

भुसावळ शहरात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

भुसावळ शहरात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह एका तरुणाला अटक

एलपीजी टंचाईने जळगावकर हैराण; एजन्सी बंद, ग्राहकांचा संताप

गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांवर अक्षरश चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ

आखाती देशातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे चित्र जळगाव शहरात पाहायला मिळत आहे.

Mumbai : मुंबईच्या जोगेश्वरी भागात मद्य प्राशन पत्नीने केला पतीवर चाकू हल्ला

मुंबईच्या जोगेश्वरी भागात खळबळजनक घटना

मद्य प्राशन पत्नीने केला पतीवर चाकूने हल्ला

मोहोम्मद रफिक कुरेशी अस तक्रारदार पतीचे नाव

डोंबिवलीत सुरक्षा रक्षकावर अल्पवयीन मुलाकडून प्राण घातक हल्ला

डोंबिवली पूर्वेतील टाटा नाका येथील मॉल परिसरात अल्पवयीन क्रिकेट खेळण्यास जाऊ नको असे सांगून मज्जाव केला .

या कारणामुळे अल्पवयीन मुलाने ७५ वर्षीय तुकाराम सुपुगडे या सुरक्षा रक्षकावर दगडाने हल्ला केला.

यात वयोवृद्ध सुरक्षा रक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत.

बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात! जांभुळवाडी दरी पुलाजवळ दोन ट्रेलरची धडक

बेंगलोर महामार्गावर कात्रज नवीन बोगद्या जवळच्या जांभुळवाडी दरी पुलाजवळ,एका ट्रेलरची दुसऱ्या ट्रेलरला मागून धडक बसल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.

मोशीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर ४० वर्षीय शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे विमानतळावर गांजाची तस्करी

पुणे विमानतळावर पुन्हा गांजाची तस्करी

बँकॉक वरून आलेल्या एका प्रवाशाकडून पुणे विमानतळावर गांजा जप्त

पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई

जवळपास 34 लाख रुपयांचा गांजा जप्त

एअर इंडियाच्या विमानातून करण्यात येत होती आरोपीकडून गांजाची तस्करी

वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

वाशिम च्या आडोळी येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफी सरसकट द्या,निकष नको,वाशिम जिल्ह्याला पिक विमा द्या,खाजगी फायनान्स कर्ज वसुली थांबवा या मागण्यांनासाठी आडोळी हे गाव गावकऱ्यांनी विक्रीस काढले आहे.

या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस

या आंदोलनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ कृषीमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे.

राहुरी येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल 

राहुरी येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले. राहुरी पोटनिवडणूक लढविण्याबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) देखील या जागेसाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत हेही मातोश्रीवर उपस्थित असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पालघरमध्ये बस चालकाची दादागिरी; प्रवाशावर संताप

पालघर जिल्ह्यातील सफाळे बस आगारात बस चालकाच्या दादागिरीचा प्रकार समोर आला आहे. सफाळे-कोरे बसला उशीर झाल्याने एका प्रवाशाने जाब विचारला असता चालक अश्वजीत कांबळे संतापले. त्यांनी युनिफॉर्म काढत प्रवाशांवर आक्रमक वर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी होत आहे.

पालघरमध्ये विराज प्रोफाइल विस्ताराविरोधात आंदोलन; रस्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प

बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीच्या 104 एकर विस्ताराविरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत. बोईसर-चिल्हार मार्गावर सर्वपक्षीयांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कंपनीमुळे आधीच वायू व पाणी प्रदूषण वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विस्तार झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. 8 एप्रिलची जनसुनावणी रद्द करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीचा कहर; 3 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर परिसरात तासभर झालेल्या गारांच्या माऱ्यामुळे सुमारे 3 एकरांवरील पपईची बाग उध्वस्त झाली. जवळपास तीन हजार पपईची झाडे भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हतबल झाला असून साम टीव्हीशी बोलताना त्याला अश्रू अनावर झाले.

यो यो हनी सिंगच्या पुण्यातल्या कॉन्सर्ट वर पावसाच सावट

पावसाच्या शक्यतेमुळे हनी सिंगच्या आजचा होणारा शो पुढे ढकलण्यात आला

आज होणारा पुण्यातील हनी सिंग याचा लाईव्ह शो १८ एप्रिल रोजी होणार

पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून होत आहे जोरदार पाऊस

आजही पुणे शहरात पावसाची शक्यता

पुणे शहरातील याच खराब हवामानामुळे हनी सिंगचा शो पुढे ढकलण्यात आला आहे

यासह पुणे पोलिसांकडून हनी सिंगच्या शो वर काही अटी व शर्ती देखील लागू करण्यात आल्या आहेत

हनी सिंगच्या लाईव्ह शो मध्ये मद्य विक्री करता येणार नाही यासह असभ्य भाषेवर देखील बंदी घालण्यात आली आहे

सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या दरम्यान सभागृहातून शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांचा वॉक आऊट...

प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्व सदस्य पडले सभागृहातून बाहेर...

सातारा जिल्हा परिषद च्या पायऱ्यांवर बसून दोन्ही पक्षाच्या सदस्यांची जोरदार घोषणाबाजी...

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवर बहिष्कार

आज सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती होणार होत्या निवडी...

मात्र राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेने सदस्य भाजपने या आधी झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी बेकायदेशीर असल्याचे कारण देत टाकला मतदानावर बहिष्कार...

निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने होत नसल्याने टाकला बहिष्कार...

राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सदस्य निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही...

या बहिष्कारामुळे भाजप चे सर्व सभापती बिनविरोध निवडून येणार..

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या 40 फूट उंच होर्डिंग चे लोकार्पण

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 40 फूट लांबीच्या होर्डिंगचे लोकार्पण भिवंडी पश्चिम चे आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते पार पाडले ढोल ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोषात या होर्डिंगचे लोकार्पण करण्यात आले या लोकार्पण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भीम अनुयायी तसेच आम्ही शेलारकर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मेंढपाळांवर तिहेरी संकट कोसळलं आहे. बिबट्याच्या हल्ल्याची भीती, कडाक्याचं ऊन आणि अवकाळी पाऊस-गारपिटीमुळे शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू होत आहे.

Yewala: येवल्यात अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्याने बाजरी पिकाला फटका

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी हवामानामुळे शेतकऱ्यांची उन्हाळ बाजरी, मका पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.अचानक आलेल्या पावसाने व जोरदार वाऱ्याने पिके आडवी झाली. शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे.

Maharashtra: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचे थैमान 

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचे थैमान...

एका उंच नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने क्षणात झाडाने पेट...

वाऱ्याचा वेग जास्त असल्याने जळणाऱ्या झाडाचे आगीचे गोळे आणि ठिणग्या परिसरात उडू लागल्या, ज्यामुळे मोठी घबराट...

आग शेजारच्या घरांना किंवा शेतांना लागू नये, यासाठी स्थानिक नागरिकांनी पावसातही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न...

झाडाला लागलेले आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल....

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी अपघातातील मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांची घेतली भेट

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी अपघातातील मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांची घेतली भेट

एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा

मृतांच्या नातेवाईकांचं झिरवाळ यांनी केलं सांत्वन

तर मंत्री गिरीश महाजन देखील अपघात स्थळी पोहचले

अपघात स्थळाची पाहणी करून अपघातासंदर्भात घेतली माहिती

Tadoba: ताडोबाच्या नियमांचा आमदार करण देवतळे यांच्याकडून भंग

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील भाजप आमदार करण देवतळे यांनी ताडोबा प्रशासनाचा नियमभंग केल्याची गंभीर बाब समोर आली. ताडोबा कोअर आणि बफर क्षेत्रात सफारी करताना मोबाईल जवळ बाळगणे नियमबाह्य आहे. असे केल्यास पाच हजारांचा दंड ठोठावला जातो. असे असताना आमदार देवतळे यांनी चक्क रिल तयार करून सोशल मीडियावर टाकली. पण असे करताना मोबाईल आरशात कैद झाला. जिप्सीच्या आरशात हा मोबाईल दिसून आला. त्यामुळे सफारी दरम्यान मोबाईलने शूटिंग केल्याचे स्पष्ट झाले. ताडोबा बफरच्या निमढेला गेटवरून देवतळे यांनी सपत्नीक सफारी केली. मात्र त्यात त्यांनी नियमभंग केला. सर्वसामान्य पर्यटकांना काटेकोर नियम लागू करणारे ताडोबा प्रशासन आमदार महोदयांवर आता काय कारवाई करतील, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी आणि पर्यटनाचा दर्जा टिकवण्यासाठी सफारीदरम्यान मोबाईल फोन वापरण्यावर व नेण्यावर सक्त मनाई करण्यात आली आहे.

Amravati: अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका...

अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका...

मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावालाही अवकाळी पावसाचा..

फटका वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील संत्र्याची झाडे उन-मळून पडली.

शेतात काढून ठेवलेला गहू उन्हाळी कांदा आणि संत्रा च नुकसान..

अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा हवालदिल

Jay Pawar: जय पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असून बारामतीत पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार आज राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेणार आहेत या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनिता पवार या सहा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

Nanded: नांदेड शहरात गँग वॉर, दोन गटातील तिघांचा मृत्यू

नांदेड शहरात गँग वॉर

दोन गटातील तिघांचा मृत्यू

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीमार्ट जवळ मध्यरात्री घडला थरार.

दोघांचा जागेवर तर एकाचा रूग्णालयात मृत्यू.गुंडाच्या दोन गँग मध्ये झाला राडा

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अजूनही

भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अद्यापही लागेना शोध

SIT, नाशिक आणि शिर्डी पोलीसांची पथके कल्पनाच्या मागावर

कल्पनाचे नातेवाईक आणि मैत्रिणींचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती

कल्पना विरोधात पोलीसांनी लूक आऊट नोटीसही केलीय जारी

Latur: उदगीर शहरात हातात कोयते घेऊन दहशत वाजवण्याचा प्रयत्न

,लातूरच्या उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरात चार ते पाच टवाळखोरांनी हातात कोयता घेऊन, दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला आहे, शहरातील जळकोट रोड हा अतिशय वरदळीचा परिसर आहे आणि या परिसरात रात्री दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, जोरदार गोंधळ घातला आहे, तर कोयता घेऊन काही जणांना जखमी देखील केल्याची माहिती समोर येते आहे .

Wardha: वर्धा जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत उत्तुंग भरारी

वर्धा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी यंदाच्या नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता सहावीच्या निवड चाचणीत 80 पैकी तब्बल 28 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील आहेत. विशेष म्हणजे, हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत जांगोणा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील 9 विद्यार्थ्यांची निवड होऊन शाळेने विक्रम नोंदवला आहे. या यशामुळे जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत होत असलेली वाढ पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Pandharpur: अंजनगावमधील तणाव निवळला..

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद मिटला असून गावातील वातावरण निवळले आहे.

दरम्यान माढा सोलापूर मार्गावर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्याने रस्ता खुला झाला आहे. लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. आज दिवसभरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतरित करून योग्या त्या ठिकाणी बसवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॅरिकेटिंग लावून सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

Murbad: अवकाळीमुळे मुरबाड तालुक्यातील फळ पिकांचं मोठं नुकसान

मुरबाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिकांचं मोठं नुकसान झालय. आदिवासी विभागातील टोकावडे, मोरोशी, शिरोशी, आणि धसई विभागात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, चिकूसह इतर फळबागांमधील फळं गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. भाजीपाला पिकांचं नुकसान आणि फळबागांना फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं.आर्थिक नुकसान झालय. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाकडे केलीय.

Pune: पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीच मोठ नुकसान

जवळपास सव्वा दोन हजार हेक्टर वरील पिकांच झाल नुकसान

१२७ गावातील साडे चार हजार शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे.

जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसात मोठ नुकसान

Nagpur: नागपुरात निर्वस्त्र अवस्थेत व्यावसायिकाचा मृतदेह सापडला; परिसरात खळबळ

- नागपुरात व्यावसायिकाचा निर्वस्त्र मृतदेह सापडला, वाडीच्या लावा परिसरात खळबळ उडाली

- खडगाव मार्गावरील झुडपांत मृतदेह आढळला

- सुचित भोजापुरे (४४) अशी मृतकाची ओळख पटल्यानंतर खळबळ, ते मशिनरी स्पेअर पार्ट्स व्यवसायिक होते.

- डोक्यावर जड वस्तूने वार केल्याचा संशय निर्घृण हत्येची शक्यता

- निर्वस्त्र अवस्थेमुळे ओळख पटवणे कठीण सुरुवातीला पोलिसांची अडचण गेली..

- घटनास्थळी ठोस पुरावे नाहीत वाहनाचेही कोणतेही चिन्ह सापडले नाही

- रात्रीपासून बेपत्ता होता, वाडी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद

- मृतदेहाचे छायाचित्र दाखवत ओळख पटली कुटुंबीयांचा आक्रोश

- वडिलांचा थेट खुनाचा आरोप पोलिसांकडे तक्रार दाखल,

Bhandara: भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी

भंडाऱ्यात रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात जोरदार तर, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस बरसला. मागील दोन दिवसात पडलेल्या पावसानं जिल्ह्यातील मका, भाजीपाला आणि आंबा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहे. रात्रीच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. अवकाळी पावसात रात्रीच्या सुमारास अनेक भागातील काहीकाळ वीज पुरवठा खंडीत झाला होता.

Solapur: कार्तिकेयन एस. यांनी सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नवीन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला.

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली तर सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासमोर सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा प्रगतीपथावर नेण्याचं काम करावं लागेल. पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात विशेष लक्ष घालावे लागणार आहे असे मत मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले.

Vidarbha: विदर्भातील वाघ आता पुन्हा सह्याद्रीत फोडणार डरकाळी, 5 वाघांच्या स्थलांतराची तयारी

विदर्भातील वाघ आता पुन्हा सह्याद्रीत फोडणार डरकाळी, 5 वाघांच्या स्थलांतराची तयारी

विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने आता वन विभागाने हालचाली सुरू केले आहेत

यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाठविलेले तीन वाघ सह्याद्रीच्या वातावरणात रमल्यानंतर आता पुन्हा विदर्भातून पाच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे...

यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची परवानगी मिळाली आहे...

विदर्भात पेंच आणि ताडोबा वाघांची संख्या झपाट्याने वाढल्याने वर्चस्वासाठी वाघांमध्ये झुंज होतात, तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वाघांना टप्प्याटप्प्याने पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात सोडले जाणार...

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

६० लाखांची जागा वृद्धाश्रमाच्या नावे २२ लाख २५ हजार इतक्या कवडीमोल भावात खरेदी करून प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक

वृद्धाश्रमाच्या जागेऐवजी चांगल्या लोकेशनवर जागा घेऊन देण्यासाठी ८५ लाख रुपये घेत जागा दिलीच नसल्याची तक्रार

पैसे आणि जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा खूप होईल, असा शाप देत कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचं उघड

भोंदू खरातविरोधात आत्तापर्यंत १२ गुन्हे दाखल, १२ पैकी ८ लैंगिक शोषणाचे तर ४ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे

Dharashiv: धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गंजेवाडी येथे शेतकऱ्याच्या 17 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गंजेवाडी येथे शेतकऱ्याच्या 17 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू

गंजेवाडी येथील शेतकरी महावीर गंजे यांचे लाखो रुपयांचे नुकसान

सोलार कंपनीच्या लोकांनी शेळ्या मारल्याचा शेतकरी महावीर गंजे यांचा आरोप

शेतकरी महावीर गंजे आणि सोलार कंपनीमध्ये गेली एक वर्षापासून सुरु आहे भांडण

मात्र हिंस्र प्राण्यांनी हल्ला केला असल्याचा वन विभागाचा दावा

शेतकरी महावीर गंजे यांची प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी

Yavatmal: शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचा अखेर मुहूर्त ठरला

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला जातो मात्र गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक दिन पुरस्कार वितरण सोहळा विविध कारणाने टळत आहे,आता शिक्षण विभागाला पुरस्कार वितरण सोहळा घेण्याचा मुहूर्त मिळाला आहे येत्या सोमवारी यवतमाळ जिल्हा परिषद सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षकांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

Metro: दहिसर–मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या स्थानकाच्या नावावरून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी

दहिसर–मिरा-भाईंदर मेट्रो ९ अ मार्गावरील पहिल्या स्थानकाच्या नावावरून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी

मेट्रो ९ अ स्थानकाला ‘पांडुरंग वाडी’ असे नाव देण्यात आल्यामुळे स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

पांडुरंगवाडी हे एक पेणकर पाड्याचा अंश आहे त्यामुळे पेणकर पाडा असेच नाव देण्यात यावे स्थानिक आग्रही

वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी थेट स्थानकावर जाऊन नाव बदलून आंदोलन केले.

‘पांडुरंग वाडी’ या नावावर ‘पेनकरपाडा’चे पोस्टर लावून स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच ६ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Nashik: नाशिकमध्ये खरात पार्ट २; NGO संस्था चालकाकडून १२१ महिलांचं लैंगिक शोषण

नाशिकमध्ये खरात पार्ट २ उघडकीस आल्यानं खळबळ

NGO संस्था चालकाकडून १२१ महिलांचं लैंगिक शोषण, फिर्यादीत निघाला आरोपी

उद्योजक आणि NGO संस्था चालकाकडून खंडणी प्रकरणात उद्योजकावरही गुन्हा दाखल

संशयित आरोपी रवींद्र एरंडेला पोलिसांकडून अटक

टॅबमधील ८१ व्हिडिओनी फाडला एरंडेचा बुरखा

४ मोबाईल, २ पेनड्राईव्ह, १ मेमरी कार्ड जप्त

गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून तसंच तुझं भविष्य उज्वल करतो सांगत शोषण केल्याचा आरोप

नाशिक आणि इगतपुरीतील हॉटेलमध्ये अत्याचार करून गुपचूप चित्रीकरण

अश्लील व्हिडिओ ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात पॉर्न साईट्स अथवा ब्ल्यू फिल्म बनवणाऱ्यांना विक्रीचा देखील संशय

बलॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली का? याबाबत देखील तपास सुरू

Pandharpur: अंजनगाव खेलोबा येथे नानदेव फरांदे महाराज यांचे अन्न त्याग आंदोलन मागे....

अंजनगाव खेलोबा येथे नानदेव फरांदे महाराज यांचे अन्न त्याग आंदोलन मागे....

खेलोबा मंदिर परिसरातून पुतळा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय झाल्या नंतर आंदोलन मागे...

नानदेव फरांदे यांचे तीन दिवसांपासून सुरू होते अन्न त्याग आंदोलन....

गावातील तणाव निवळला...

नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

- कार थेट पाण्याने भरलेल्या विहीरीत कोसळली

- इंदोरे गावचे सुनिल दरगुडे कुटुंब आणि त्यांच्या नात्यातील अशा एकूण 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

- एका खाजगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत असतांना घडली घटना

- चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती, दिंडोरी पोलीसांकडून अधिक तपास सुरु

जत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची आमदार गोपीचंद पडळकररांकडून पाहणी..

सांगलीच्या जत तालुक्याला वादळी वाऱ्याचा गारपिटीचा फटका बसलाय अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्याने शेतीचा मोठा नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतीची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे खंडनाळ,संख,मुचंडी, रावळगुंडवाडी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची आमदार पडळकर यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह बांधावर जाऊन पाहणी केली आहे.

सांगलीला अवकाळी पावसानं झोडपलं, द्राक्ष बागांचे लाखोंचे नुकसान

सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या भिलवडी परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसलाय काढलेल्या द्राक्षबागांवर पावसाचा अवकाळी पावसाचा कहर झाल्याने द्राक्षबाग शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने भिलवडी,माळवाडी ,सुखवाडी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या द्राक्ष बागांवर या नैसर्गिक आपत्तीने घाला घातला असून, अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

Mhada Lottery: खुशखबर! मुंबईतील २६४० घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, जाणून घ्या नवी डेडलाइन

मोठी बातमी! भाजपचा दणदणीत विजय; विरोधकांचा सुपडासाफ, 192 पैकी 158 जागा जिंकल्या

Mumbai Pune Missing Link: मिसिंग लिंकवरून प्रवास करताना वेग मर्यादा किती असणार? या वाहनांना असेल बंदी

Hair Care: झाडूसारखे केस १५ मिनिटात होतील शायनी आणि सॉफ्ट; आठवड्यातून एकदा लावा हा हेअर मास्क

SCROLL FOR NEXT