Maharashtra Live News Update:  saam tv marathi
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, पुणे-सोलापूरमध्ये पाऊस, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, रूपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या , गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

विदर्भात 29 मार्च ते दोन एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

हवामान खात्याने पश्चिम विदर्भात 29 मार्च ते दोन एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारादिला होता त्यानुसार काल बुलढाणा जिल्ह्यातील चिखली,मोताळा, खामगाव, नांदुरा, संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला यामुळे शेतात रब्बीची पिके काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली काढून ठेवलेला कांदा भिजला तर वादळी वाऱ्यामुळे केळी गहू व ज्वारी पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. सध्या रब्बीची पिके काढणीचा हंगाम सुरू आहे व त्यातच अवकाळी पावसाने दिलेल्या दणक्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला आहे सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा दर्जाही खालावत आहे. तर बाजारपेठेत पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे....

भोर तालुक्याला अवकाळीनं झोडपलं

पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भोर शहरातील मशालीचा माळ परिसरात एका घराचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली. वाऱ्याच्या वेगामुळे घरावरील पत्रे उडून थेट रस्त्यावर पडली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. ही संपूर्ण घटना एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अवैध रेती वाहतुकीवर तहसीलदारांचा धडाका; पाठलाग करून वाहन जप्त

खामगाव परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करताना तहसीलदार सुनील पाटील यांनी धाडसी कारवाई करत टिप्पर वाहन जप्त केले. नांदुरा रोडवरील पारखेड परिसरातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः पाठलाग करून MH-28 BB-7314 क्रमांकाचे टिप्पर वाहन अडवले. यावेळी चालकाने वाहन न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न करत तहसीलदारांच्या अंगावर वाहन घालण्याचाही प्रयत्न केला. अखेर टिप्पर वाहन ताब्यात घेण्यात आले असून चालकाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे...

मेळघाटाच्या कोलकास येथे हत्ती सफारी.. उन्हाळ्यात पर्यटकांची हत्ती सफारीला पसंती

हत्ती पहायचा, हत्तीवर बसायचं आणि हत्तीवरुन जंगलाची सफारी करायची कोणाला हौस सगळ्यांना असते. मात्र हत्तीवर बसण्याचं स्वप्न अपूर्ण असेल त्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणारं कोलकास हे एकमेव हत्ती सफारीचं ठिकाण आहे. हत्तीवर बसून हलत-डुलत जंगल पाहण्याचा आगळावेगळा आनंद घेण्यासाठी मेळघाटातील कोलकास हे ठिकाण पर्यटकांचं खास पसंतीचं आहे.

कोलकास इथं सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत एका हत्तीवर चार जणांना सफारीसाठी नेले जाते. अर्धा तासाच्या या जंगल सफारी दरम्यान घनदाट जंगलातून हत्ती सफारीचा आनंद पर्यटक घेतात. आता उन्हाळ्यात पानगळ झाल्यामुळं हत्ती सफारीचा आगळावेगळा फील येतो. जंगल ओसाड असल्यामुळं चितळ, रानगवे आणि नशीब बलवत्तर असेल तर वाघाचं दर्शन देखील या हत्ती सफारीदरम्यान पर्यटकांना घडते.

चाकण बाजार समितीचा गलथान कारभार; पावसात भिजून कांदा खराब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

चाकण बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला कांदा अचानक झालेल्या पावसामुळे भिजून खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आधीच कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसताना आता बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे हा फटका अधिकच तीव्र झालाय.बाजार समितीत आवश्यक सुविधा आणि पावसापासून संरक्षणाची योग्य व्यवस्था नसल्याने कांद्याच्या ढिगांवर थेट पावसाचं पाणी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल अक्षरशः वाया गेला असून त्यांच्या आर्थिक कंबरड्याला मोठा तडा गेलाय.एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला आणि दुसरीकडे बाजारभाव घसरलेले असताना अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालंय

बुलढाणा सुटाळा बुद्रुक येथे शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न

खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे भगवान शिव व माता पार्वती यांचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. शास्त्रोक्त विधी, मंत्रोच्चार आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर महादेव संस्थान परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली आहे. मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला असून विविध दुकाने, पाळणे व खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे यात्रेला रंगत आली आहे. गावातील लेकी-सुना माहेरी येत असल्याने सामाजिक एकोपा व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे....

नांदेड जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा

वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, आंबा, मका,काढून ठेवलेली हळद यासह इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

नागपुरात गो-गॅस एलपीजी पंप बंद पडले

- नागपुरात गो-गॅस एलपीजी पंप बंद पडले असून आज चौथा दिवस आहे...एलपीजी इंधन वाहन धारक मोठा मनस्ताप, शिवाय आर्थिक फटका गी बसत आहे...

- इराण-इस्रायल तणावाचा परिणाम, इंधन पुरवठ्यावर जागतिक संकटाचे सावट

अवकाळी पाऊस आणि युद्धजन्य परिस्थिती अशा दुहेरी संकटात शेतकऱ्यांवर शेतमाल फुकट देण्याची वेळ

युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस मिळत नसल्याने चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगार स्थलांतरित होतोय तर दुस-या बाजूला आवकाळी पाऊस गारपिठ यामुळे शेतमालाचे नुकसान झालंय अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय असून कष्टाने पिकवलेला शेतमाल चाकण बाजारात फुकट आणि कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली

मायबाप सरकार लक्ष देत नाहीये अन् निसर्ग साथ देत नाहीये,शेतकऱ्यांचा आक्रोश

यवतमाळ जिल्ह्यात रात्री दरम्यान अवकाळी पावसामुळे अक्षरशः काढणीला आलेला पीक भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं,अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अस्मानी संकटामुळे काढणीला आलेला गहू या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक सापडलाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत बातचीत केली

सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा! खंडाळा तालुक्यात महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू

कराडवाडी येथील सोनाली अजित कराडे २९ वर्षीय महिलेचा मृत्यू! शेतामध्ये शेळ्या चारत असताना ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं.. पावसामुळे जीवितहानीसह शेती व जनावरांचे मोठे नुकसान…

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं असून पिकांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान

भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी

भंडारा जिल्ह्यातील मध्यरात्री काही भागात हलक्या तर, कुठं मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसान हजेरी लावली. जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वादळ सुटल्यानं काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या पावसाचा उन्हाळी भारपिकाला फायदा होणार असला तरी, कापणीला आलेल्या पिकांना याचा काही प्रमाणात फटका बसण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे

चार दिवस पुणे शहराला येलो अलर्ट देण्यात आला आहे

शहर आणि परिसरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आल आहे

पुढील चार दिवस मात्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अवमान प्रकरणी कायद्यानुसार कारवाई करा, नागपूर खंडपीठाचे पोलिसांना आदेश

- या संदर्भात सीताबर्डी पोलिसांना 8 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश..

- नागपूर येथे आयोजित हिंदू संमेलनात ज्येष्ठ पत्रकार पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी राष्ट्रपित्याने पंडित लक्ष्मीचार्य यांच्या ईश्वर तेरो नाम या गाण्याची चोरी केली. त्यामुळे ते राष्ट्रपिता होऊ शकत नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते..

- राष्ट्रपित्याविषयी अवमानजनक आणि निंदनीय वक्तव्य केल्यामुळे कुलश्रेष्ठ आणि संमेलन संयोजक निशांत गांधी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला जावा याकरिता नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस यांनी याचिका दाखल केली आहे..

जळगावजामोद नगर परिषदेच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा काल पार पडली. या सभेत शहरातील प्रलंबित विकास कामे आणि शहरातील स्वच्छतेच्या व्यवस्थेवरून मोठा गदारोळ बघायला मिळाला. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सभापती सय्यद नफीस यांनी शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत सफाई कंत्राटदार अत्यंत हलगर्जीपणा करत असून, शहरात मोठे मोठे कचऱ्याचे ढीग बघायला मिळत आहेत. आठ ते दहा दिवस कचरा उचलला जात नाही. नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही. मग या सफाई कंत्राटदारावर मेहरबानी कशासाठी...? असा सवाल उपस्थित करत चक्क सभागृहाच्या वेलमध्ये जाऊन जमिनीवर बसून प्रशासनाचा निषेध नोंदवला. यामुळे मात्र सत्ताधाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाली.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बचाव समिती

पालखी सोहळ्याचे ठिकाण बदलू नये यासाठी महाआरती

भवानी पेठेतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेत असल्याचे समजले. हा निर्णय आपल्या परंपरेवर आपल्याला भागावर आणि विठ्ठल भक्तांवर अन्याय करणारा आहे.

तळेगाव दाभाडे मधील सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू, शासकीय इतमाने केला अंत्यविधी...

सीआरपीएफ मध्ये गांधीनगर, गुजरात येथे काम करत असलेला तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला जवान प्रशांत कदम हा २५ मार्च रोजी घरातून ड्युटीवर जातो असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर लोणावळा येथून पुन्हा तो तळेगाव च्या दिशेने कोणाला काही न सांगता आला. फोन देखील बंद ठेवला. २५ मार्च रोजी रात्री सोमाटणे फाटा जवळ हॉटेल अंगण समोर रस्ता क्रॉस करताना त्याला एका अनोळखी गाडीने जोरदार धडक दिली या अपघातात तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची नोंद करण्यात आली

सोलापूरमध्ये अवकाळी पवासाचा तडाखा

दक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

अवकाळी पावसासोबत सुरु असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंद्रूप गावातील डीपीला लागली आग

मंद्रूप गावातील डीपी जळाल्यामुळे रात्रभर वीजपुरवठा होता खंडित

त्यामुळे मंद्रूप गावातील गावाकऱ्यांना रात्र काढावी लागली अंधारात..

मावळ तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर आमदार सुरेश शेळके यांनी केला संताप व्यक्त..

मावळ तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर आमदार सुनिल शेळके यांनी संताप व्यक्त करत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक वडगाव येथे घेण्यात आली होती. या बैठकीत महसूल विभाग, महावितरण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आमदार शेळके यांनी विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेत असताना अनेक त्रुटीं निदर्शनास आल्या. दरम्यान नागरिकांच्या तक्रारींना योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच, कामात होत असलेली दिरंगाई आणि निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना तत्पर आणि पारदर्शक सेवा द्यावी, असे निर्देश दिले. कामात सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आमदार शेळके यांनी दिला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera Water Benefits: उन्हाळ्यात जिरा पाणी रोज सकाळी प्यायल्याने मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

BMC आयुक्त कोण होणार? मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीनंतर नव्या आयुक्तांच्या नावावर झालं शिक्कामोर्तब

Hidden Fort In Pune : पुरंदर तालुक्यात लपलाय १६व्या शतकातील खजिना, 'या' किल्ल्यावर जाताच उलगडेल रोचक इतिहास

Dhurandhar : रहमान डकैत विरुद्ध हमजा अलीचा थरार घरबसल्या पाहा; रणवीर सिंहचा 'धुरंधर ' टीव्हीवर येतोय, कुठे अन् कधी पाहाल?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलमध्ये वाढू शकतो महागाई भत्ता, नवीन अपडेट समोर

SCROLL FOR NEXT