वसई -
वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी काँग्रेसच्या विरोधात वसईच्या तहसील कार्यालयावर जनआक्रोश
तहसील कार्यालयासमोर असलेल्या संविधान पूर्णकृतीला पुष्पहार अर्पण करून या जनआक्रोश सुरुवात
भारत माता की जय, वंदे मातरम घोषणा देत, हम होंगे कामयाब एक दिन, हम होंगे कामयाब एक दिन, असं गीत गायन केले
काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षाने नारी शक्ती वंदन अधिनियम' बिल पास होऊ दिल नाही, या सर्व विरोधी पक्षांच्या विरोधात निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महिला तहसील कार्यालयाच्या ठिकाणी जमलो आहोत,
काँग्रेसविरोधात भाजप महिला आघाडीचा कणकवलीत मोर्चा
जेव्हा जेव्हा देशातील माता भगिनींच्या हिताच काही होत असेल तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाने त्याला विरोध केलाय.
काँग्रेसचा बुरखा फाटला आहे. त्यांचा खरा चेहरा दिसलाय त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या वतीने कणकवली मध्ये आक्रोश निषेध पदयात्रा काढण्यात आली आहे.
या पदयात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
राज ठाकरे
महाराष्ट्रातील माणसाने फक्त मराठी मध्ये बोलावं, समोरचा हिंदी मध्ये बोलू दे
जे व्यक्त करायचं आहे ते मराठीमध्ये करा
जिथे कुठे जाल मराठी मध्येच बोला
- धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांना देण्यात आलेले ८० लाख रुपयांचे आव्हान आणि त्यासंदर्भातील अटी-शर्ती दीर्घकाळासाठी कायम असल्याचे प्रा. शाम मानव यांनी स्पष्ट केले.
- आजवर आम्ही अनेक बाबांचा भांडाफोड केला असून, बागेश्वर महाराज यांचाही भांडाफोड करू, असा दावा शाम मानव यांनी केला.
- बागेश्वर महाराजांनी आम्हाला त्यांच्या दरबारात येण्याचे आवाहन केले होते. मात्र, दरबारात ते स्वतः ठरवलेल्या व्यक्तीला बोलावून तिचे नाव सांगत आम्हाला हरवल्याचा दावा करू शकतात, असा आरोप त्यांनी केला.
- शिवाय अशा ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, आम्ही ठरवलेल्या ठिकाणी येऊन त्यांनी ८० लाखांचे बक्षीस जिंकून दाखवावे, असे खुले आव्हानही शाम मानव यांनी दिले.
- “दूध का दूध, पाणी का पाणी” होईल अशा वातावरणात हे आव्हान स्वीकारण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री कधीच पुढे येणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
- धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे कोणतीही दिव्यदृष्टी किंवा अलौकिक ओळखण्याची शक्ती नसल्याचा दावा करत, ते केवळ लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप प्रा. शाम मानव यांनी केला.
जेव्हा जेव्हा देशातील माता भगिनींच्या हिताच काही होत असेल तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाने त्याला विरोध केलाय. काँग्रेसचा बुरखा फाटला आहे. त्यांचा खरा चेहरा दिसलाय त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले..नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या वतीने कणकवली मध्ये आक्रोश निषेध पदयात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केल. यावेळी शेकडो महिला या निषेध पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. कणकवली जाणवली नदी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही पदयात्रा काढण्यात आली.
- थोड्यावेळात राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे थोड्याच वेळात उपस्थित असणार आहे ..
- सेवानंद विद्यालयाचा मैदानावर पाच दिवस कबड्डी स्पर्धा होणार आहे..
- या छत्रपती शिवाजी महाराज चषक मध्ये राज्यभरातील तसेच विविध राज्यातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहे...
परभणी जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला असून उकाड्याचा फटका आता वीज यंत्रणेलाही बसत आहे. कडक उन्हामुळे ट्रान्सफॉर्मर गरम होऊन बिघाड होऊ नये, यासाठी महावितरण प्रशासनाने शहरातील काही भागांमध्ये ट्रान्सफॉर्मरना कुलर बसवून विशेष कुलिंग व्यवस्था केली आहे. या उपाययोजनेमुळे ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होणार असून नागरिकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत.
विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ द्यायला कोल्हापूर सर्किट बेंच चा स्पष्ट नकार
येत्या चार मे ला संपणार आहे गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत
मात्र सभासद संस्था आणि अवसायान संस्थांच्या सुनावणी मुळे विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची गोकुळ तर्फे न्यायालयाला करण्यात आली होती विनंती
मात्र विद्यमान संचालक मंडळाला दिलासा द्यायला कोर्टाचा नकार
प्रशासक नियुक्तीमुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान चार महिन्याने पुढे जाण्याची शक्यता
गोकुळ दूध संघाने न्यायालयाची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला
याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांचा आरोप
पशुसंवर्धन विभागाने प्रयोगशाळेत पाठवलेले नमुने आले पॉझिटिव्ह...
गेल्या 13,14 तारखेला नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील एका पोल्ट्री फार्म मधल्या दीडशे ते दोनशे कोंबड्या अचानक पावल्या होत्या मरण...
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते
आज प्रशासनाला या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, नवापूर मध्ये शिरकाव झाल्याचं यातून दिसून येत आहे.
शेगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ एका शेतातील जनावरांच्या चारा कुटाराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. प्रशासनाकडून पंचनामा करून मदत देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
वाशिमच्या मंगरुळपीर शहरातील एका वाईनबारमध्ये अचानक पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) छताचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या घटनेच्या वेळी वाईनबारमध्ये काही ग्राहक उपस्थित होते. अचानक छताचा भाग खाली कोसळताच ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. मात्र, सुदैवाने वेळीच सर्वांनी बाहेर पळ काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
अमरावतीत बच्चू कडू समर्थकांचा मोठा जल्लोष...
फटाक्याची आतषबाजी करतं,पेढे मिठाईचं वाटप करत आनंद केला साजरा....
बच्चू कडू,शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गजर......
बच्चू कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणतात की आम्ही मुळंचे शिवसैनिकच.....
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर बच्चू कडू समर्थकांचा जल्लोष
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बच्चू कडू संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना मजबूत करणार - बच्चू कडू यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विश्वास
आगीत बांबूची लागवड केलेली जवळपास एक एकरातील बांबूची झाडे जळून खाक
एक एकरातील बांबू जळून खाक झाल्याने शिवाजी राजपूत या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
शिरपूर अग्निशमन विभागाच्या पथकाचे आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरू
सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवीत हानी नाही
वाढत्या तापमानाचा फटका पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसत असून धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 44 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानाने उच्चांक गाठला आहे आणि त्यामुळे या वाढत्या तापमानाचा सर्वात जास्त फटका हा पोल्ट्री उद्योगाला बसत असल्याचे दिसून येत आहे
पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा
पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी तलाव परिसराची केली पाहणी
प्रशासनाला तातडीने अंमलबजावणी करत ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे दिले आदेश
तलावातील पाण्याची गुणवत्ता, वाढता दूषितपणा तसेच सीओडी व बीओडी यांच्या पातळीचा सविस्तर आढावा घेण्यात आला
नागरिकांनी वेळेत कर भरण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी पुणे महापालिकेकडून सवलत जाहीर
विहित मुदतीत संपूर्ण मिळकत कर भरलेल्या नागरिकांचं या सवलतीचा लाभ मिळणार
महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार
पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकरची देयके तयार केली आहेत
गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीचा वापर सुद्धा करता येणार
नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती नंदुरबार मध्ये कार्यकर्ता मेळावा
सुमित्रा पवार यांना भर देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी वाढवण्यासाठी मेहनत घ्यावी
शासनाचे योजना तळागाळापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा
मरावतीच्या तिवसा येथील आनंदवाडी परिसरातील वन विभागाच्या गार्डन मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुरुवातीला लहान प्रमाणात असलेली आग वाऱ्याच्या वेगामुळे अल्पावधीतच भडकली आणि विक्राळ रूप धारण केले. आगीचे लोट जवळील वस्तीकडे सरकल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक
मतदानाला सुरवात
ऍड.यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क
रायगडच्या म्हसळ्यात बॉक्साईड वाहतुक करणाऱ्या ट्रेलर आणि टाटा सफारी गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रेलर रस्त्यावर पलटी झाला तर टाटा सफारी गाडी दरीत कोसळली. या अपघातात 4 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. बॉक्साइडच्या ओव्हर लोड वाहतुकीमुळे म्हसळ्यात रस्ते अपघाताचा धोका वाढला असून, याकडे RTO विभाग त्याचप्रमाणे स्थानिक पोलिस प्रशासन लक्ष घालत नसल्याने स्थानिक तसेच पर्यटकांकडून संताप व्यक्त होत आहे.
- भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी पहिल्यांदा न्यायालयाने नाकारली
- 8 व्या गुन्ह्यात अशोक खरातला पोलीस कोठडी नाकारली
- SIT आणि सरकारी वकिलांनी मागितली होती पोलीस कोठडी
- 12 तारखेपर्यत अशोक खरातला मिळाली न्यायालयीन कोठडी
- 9 व्या गुन्ह्यात पुन्हा अशोक खरात चा ताबा मिळवण्यासाठी SIT कडून अर्ज
- उद्या पुन्हा अशोक खरात ला करणार कोर्टात हजर
यवतमाळ जिल्ह्यात एक मेपासून 16 वी जनगणनेचा पहिला टप्पा जिल्ह्यात सुरू होत असून 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना डिजिटल स्वयगणनेची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईलद्वारे अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून माहिती भरता येणार असून प्रत्येक कुटुंबाला 11 अंकी युनिक ई-नंबर मिळणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
देवळाली कॅम्पमध्ये मिलिटरी हॉस्पिटलच्या औषधांची मोठी चोरी उघडकीस, तब्बल ८२ लाखांच्या औषधांची अफरातफर
मुंबईहून आलेली औषधे सैन्य दलाच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचलीच नसल्याने खळबळ
मिलिटरी हॉस्पिटलसाठी १३३ बॉक्समध्ये औषधांचा पाठवला होत साठा
दोन संशयिताविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सेवानिवृत्त कर्मचारी विनायक कांबळे याच्यावर आरोप
औषधांचे बॉक्स संशयित आरोपीच्या घरी उतरवल्याचा करण्यात आला आरोप
औषधांचे रीपॅकिंग करून दुसऱ्या वाहनातून हलवण्याचा कटाच्या संशय
पुण्यातील निरज सिंग याच्याशी संगनमत केल्याचा आरोप
इंजेक्शन आणि इन्सुलिनचा मोठा साठा चोरीला
रुपयाची किंमत पुन्हा घसरली
डॉलरच्या तुलनेत ३५ पैशांनी घसरला
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ९५.२०
झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार गटाकडून केला उमेदवारी अर्ज दाखल
विधानपरिषदेची निवडणूक लढवणार
आज सकाळी करण्यात आली होती अधिकृत घोषणा
पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन
विश्वकर्मा इंस्टीट्यू च्या निकृष्ट कारभाराचा निषेध करत आंदोलन
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागणीसाठी आंदोलन
दुसऱ्या वर्षाचा निकाल लागण्यापूर्वी पुढील वर्षाची संपूर्ण फी भरण्याची सक्ती त्वरित थांबवण्यात यावी.
सध्या देण्यात आलेली ३० एप्रिलची अंतिम मुदत रद्द करून, निकाल जाहीर झाल्यानंतर किमान १५ दिवसांची मुदत विद्यार्थ्यांना देण्यात यावी.
बिबवेवाडी येथील विश्वकर्मा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी बाहेर आंदोलन करण्यात आलेय
संजय राऊत यांच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला. उद्धव ठाकरे जिंकले असते, पण त्यामुळे राऊत यांच्या राज्यसभा महत्त्वाकांक्षेला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे अंतर्गत दबाव टाकून अंबादास दानवे यांना पुढे करण्यात आले. काँग्रेस उमेदवार दिल्यास या संघर्षाचा परिणाम अधिक तीव्र होईल आणि आघाडीचे अंतर्गत मतभेद उघड होतील, असा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे.
उन्हाळ्यात बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांना मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला.
धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील अभयारण्यामध्ये वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात वन विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला असून तापमान 41 अंश सेल्सिअस कडे पोहोचले आहे. त्यामुळे अभयारण्यातील प्राणी पाण्याच्या शोधामध्ये असलेले दिसत आहे.2200 हेक्टर वरती पसरलेल्या येडशी अभयारण्यामध्ये बोटावर मोजण्याइतकेच पानवठे असून त्यामध्ये काही पानवट्यामध्येच पाणी पाहायला मिळत आहे तर काही पानवटे कोरडे दिसत आहेत.
उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू, अहिल्यानगर जिल्ह्यात 2 तर सोलापूर 1 रुग्णाचा मृत्यू.
एका दिवसात उष्माघाताच्या 25 रुग्णांमध्ये वाढ.
115 पैकी सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 23 रुग्णांची नोंद.
तर नंदुरबार जिल्ह्यात 17, नाशिक 11,अमरावती 8 बुलढाणा 7 गडचिरोली 6, रत्नागिरी 5, रुग्णांची नोंद झालीय.
राज्यभरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
हिंगोली च्या कळमनुरी शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, रुग्णांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात गांधीगिरी करत रुग्णालयामध्ये बिसलरी बॉटल वाटप केल्या आहेत, उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी लाखो रुपये खर्च करून शुद्ध पाणी पुरवठा सुरू असल्याचं अनेक वेळा रुग्णालय प्रशासनाने सांगितल आहे मात्र मागील काही दिवसापासून या रुग्णालयात पाण्याचा एक थेंबही मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते
बच्चू कडू हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत
शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार
दिव्यांग, शेतकऱ्यांसाठी शिवसेनेत प्रवेश करणार
आमचे सर्व मुद्दे शिवसेनेनं स्विकारले- बच्चू कडू
खासदार संजय राऊत पुण्यात येताच वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी
उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांची केली पुणे शिवसेना शहरप्रमुख म्हणून नियुक्ती
या आधी शिवसेनेत होते दोन शहर प्रमुख मात्र आता एकच शहरप्रमुख
संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांच्या जागी आता वसंत मोरे पुणे शहर प्रमुख असतील..
महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता
त्यांनतर काल संजय राऊत यांनी ही संघटनामत्क बदल होतील असा सूचक इशारा दिला होता
आणि त्या नंतर २४ तासात आधीच्या दोन्ही शहरप्रमुखाना हटवून वसंत मोरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये सध्या पालेभाज्यांच्या दर अक्षरशः गगनाला भिड घेतली आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येतो आहे.
गेल्या काही दिवसांत पालेभाज्यांच्या दरात तब्बल १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. विशेषतः कोथिंबीरच्या दरांनी मोठी उसळी घेतली असून सध्या एक जुडी कोथिंबीर तब्बल ३० रुपयांना विकली जात आहे.
या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले असून गृहिणींना स्वयंपाक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पुरंदर तालुक्यातील जाधव परिवारातील अक्षय जाधव व जान्हवी पिसे यांचा शुभविवाह सोहळा आज अत्यंत साध्या व भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी जम्मू-काश्मीर येथे वीरमरण आलेल्या पुरंदर तालुक्याच्या सुपुत्र शहीद घनश्याम आढाळगे यांना संपूर्ण विवाह सोहळ्यात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
भंडाऱ्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंपची चोरी...भंडारा शहराच्या लगत बायपास मार्गावर भंडाऱ्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांची वडिलोपार्जित शेती आहे. या शेतातील पिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी त्यांच्या शेतात त्यांनी विहिरीवर मोटरपंप बसवली असून त्यासाठी वीज पुरवठ्याच कनेक्शन घेतलं... मात्र काल जेव्हा ते शेतात पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. चोरट्यांनी चक्क त्यांच्या शेतातील वीज मीटर आणि विहिरीवरील बसवलेली मोटरपंप चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. भंडारा शहरासह जिल्ह्यात छोट्या छोट्या चोरीसह दुकान थोडी आणि अनेक शेतातील मोटर पंप चोरी जिल्ह्याच्या घटना समोर आल्या असताना आता खासदारांच्या शेतातील थेट बीज पंपा सह मोटरपंप चोरी गेल्याने खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी पोलीस प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
- गाडीला कट लागल्याने आणि भांडण सोडवण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी;लोखंडी सळई हॉकी स्टिक आणि दगडांचा वापर
- याप्रकरणी दोन गटांनी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात फिर्याद दाखल करून गुन्ह्याची नोंद करण्याची रात्री प्रक्रिया सुरू होती.
- या दोन गटात झालेल्या मारहाणीत सहा जण जखमी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
- सर्व जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
वाशिमच्या मेडशीजवळ आज झालेल्या कार आणि टाटा मॅजिकच्या अपघातानंतर मेडशी गावाजवळ वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थ आक्रमक होत,अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर धिम्या लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने असल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे.
हिंगोली नरसी राज्य मार्गावर अपघाताच्या घटने नंतर महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याची तत्परता पाहायला मिळाली आहे, हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी अपघातग्रस्त दोघांना शासकीय गाडी मधून रुग्णालयात दाखल केले आहे, जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दोघांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नागरिक रुग्णवाहिकेची वाट पाहत असताना वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी वेळीच इतर शासकीय कामकाज बाजूला ठेवत जखमींना रुग्णालयात दाखल केल्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार केले आहेत तर अपघातात जखमी झालेल्या जितेश पवार व शंकर पवार या दोघांचे प्राण देखील बचावले आहेत
कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीर रीत्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने टाकलेल्या धाड प्रकरणात अन्य चौघांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी रात्री धाड टाकली या कारवाईत सात बंदुका आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात वार्षिक सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला यानंतरही जिल्ह्याची भूजल पातळी झपाट्याने खाली गेली. गत पाच वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील भूजल पातळी 0.59 टक्क्याने खाली गेल्याची नोंद भूजल सर्वेक्षण विभागाने केली आहे.
बुलढाणा चे तापमानात मोठी वाढ होऊन 43 डिग्री चे वर तापमान पोहचेल आहे . त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होताना दिसत आहे. तर नागरिकांनी थंड हवा मिळावी म्हणून आपल्या घरातील कुलर काढले असून त्याच्या जाळी दुरुस्ती करताना दिसत आहे. या जाळी दुरुस्त करण्याचे काम अकोला येथिल मुकुंद डोंगरे हे अनेक दिवसांपासून बुलढाण्यात आलेले असून जाळी दुरुस्तीचे काम करताना दिसत आहे. 100, 200, रुपयांपासून तर 300 रुपयांपर्यंत ही कुलर ची जाळी लावल्या जात असून जी थंड हवा फेकते .. आणि या जाळी साठी लागणार गवत जे हिमाचल प्रदेश, शिमला, ओडिसाधून आणावा लागते .. गरमी पासून थंडी हवा मिळण्यासाठी ज्याची मदत होते .. आणि यासाठी मुकुंद डोंगरे प्रयत्न करताना दिसतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.