उत्सव संतांचा कुंभमेळा वारकऱ्यांचा या धार्मिक सप्ताह कार्यक्रमात जमा झालेल्या देणगी स्वरूपाच्या निधीवरून मोठा वाद पेटला आहे, देणगी स्वरूपात जमा झालेली जवळपास अडीच ते तीन कोटीची रक्कम घेऊन फरार झाल्याचा आरोप, आयोजक समितीकडून करण्यात आला आहे, दरम्यान किशोर महाराज शिवनीकर यांचा हातात बंदूक घेऊन काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, मात्र आता चक्क कमरेला पिस्तूल लावून हा महाराज वावरत असल्याचा देखील व्हिडिओ समोर आलाय.
राज ठाकरे यांची पुण्यात सभा
आत्ताची परिस्थिती दिसेल त्याची जमीन असा विषय सुरू आहे
आज पुण्याची अवस्था बघा. मूळ पुणे वेगळं, काही आकार उकार नाही
पुण्यात पाणी तुंबणार कारण कोणाचे लक्षच नाहीय
मुंबईत हजारो एकर जागा गोदरेज ची आहे. सरकारी जमिनीवर अनधिकृत कामं कशी झाली?
कुठल्याच नगरसेवकाला, आमदाराला आपलेपणाची भावना नाही राहिली
नंदुरबार -
नंदुरबारातून जाणार सुरत-नागपूर महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार
तांदूळ भरलेल्या ट्रकला रस्त्यावर भीषण आग.....
नवापूरच्या पानबारा गावाजवळ ट्रक जळून खाक, लाखोंचे नुकसान झालं मात्र सुदैवाने कुठलेही जीवितहानी टळली....
डिझेल गळती आणि उन्हाच्या तडाख्याने आग लागल्याचा अंदाज....
आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती त्यामुळे भीतीचे वातावरण.....
गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी भामरागड तालुक्यातील बिनागुंडा , लाहेरी गावातील विविध विकास कामांची पाहणी केले त्यात राष्ट्रीय महामार्गावरील गुंडेनूर पूल आणि एकलव्य शाळा यांची प्रामुख्यानी भेट दिली त्यावेळी कामाचा आढावा घेऊन त्यांना पावसाळा पूर्वी दोन्ही कामे पूर्ण व्हावे असे निर्देश दिले.....
बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरातील गजबजलेल्या किराणा मार्केट परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली, ही आग इतकी भीषण होती की, जवळच उभा असलेला नगरपालिकेचा ट्रॅक्टर या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, यामध्ये ट्रॅक्टर पूर्णतः जळून खाक झाला आहे..
नांदेडमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा विहिरीत शॉक लागून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. नांदेडच्या धर्माबाद येथील ही घटना आहे.
बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्री बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन केले. संभाजी ब्रिगेड,सर्वपक्षीय कुणबी समाज , मराठा सेवा संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सह वेगवेगळ्या सामाजिक संगठना आणि शिवप्रेमी मिळून हे आंदोलन करणार आहेत.
पुणे महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी त्यांच्याच म्हणजेच भाजपच्याच नगरसेविका मृणाल कांबळे यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असून पोलिसात सुद्धा तक्रार दिली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक २२ मधुन निवडून आलेल्या भाजपच्या दोन नगरसेविकांमधील वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचलाय.
शहापूर तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक तर 6 सरपंच पदासाठी थेट निवडणूक जाहीर करण्यात आली होती यात 28 तारखेला मतदान व 29 तारखेला मतमोजणी ठेवण्यात आली.
डोंबिवली पश्चिम येथील रेतिबंदर रोडवरील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक १ येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूलाच्या कामासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत निविदा जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूरच्या हराळवाडी परिसरातील वाढत्या उष्णतेमुळे मुलांनी विहिरी आणि सीना नदीच्या कालव्यात पोहण्याचा आनंद लुटण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी ‘नैसर्गिक वॉटर पार्क’चीच मजा अनुभवायला मिळत आहे. टायर आणि प्लास्टिक डब्यांच्या सहाय्याने पाण्यात खेळण्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दानवे उद्या सकाळी ११ वाजता अर्ज भरणार आहेत.
बुद्ध पौर्णिमेला म्हणजेच एक मे रोजी मचाणवरून प्राणीगणना केली जाणार
प्राणीगणनेला निसर्गनुभव असे नाव देण्यात आले
रात्रभर मचाणवर बसून प्रगणकांना करायची प्राण्यांची गणना
ताडोबाच्या बफर क्षेत्रातील 57 लोखंडी मचाण सिद्ध करण्यात आल्या
एका मचाणावर दोन प्रगणक बसणार शकतील.
वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारीवर्ग प्राणीगणना करणार
मंत्रालयातील एसी बंद झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे एसी बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. एसी बंद झाल्याने अनेक उकाड्याने त्रस्त झालेत.
अनुसूचित जातीतील 59 जातींमध्ये उपवर्गीकरणाच्या नावाखाली फूट पाडण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप करत यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आलाय. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय.
अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे.. याचाच परिणाम साईबाबांच्या शिर्डीतही जाणवू लागलाय.. उन्हाचा तडाखा वाढल्याने नेहमी भाविकांच्या गर्दीने गजबजनाऱ्या शिर्डीतील रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसून येतीये.. वाढलेल्या तापमानामुळे दुपारच्या सत्राऐवजी भाविक सायंकाळच्या सत्रात दर्शनासाठी पसंती देत आहेत.. भाविकांच्या सुविधेसाठी साईसंस्थानने मंदिर परिसरात मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे.. एकंदरीत वाढत्या तापमानाचा फटका धार्मिक स्थळांनाही बसला असून भाविकांच्या गर्दीवर त्याचा परिणाम झाल्याचं बघायला मिळतंय
बुलढाण्यात युवक काँग्रेस आणि आ. गायकवाड समर्थक आमनेसामने
दोघांकडून प्रचंड घोषणाबाजी
बुलढाण्यात युवक काँग्रेसकडून शिवाजी कोण होता? पुस्तकाचे वाचन..
पुण्यातील सदाशिव पेठेत पर्यटकांवर कारवाई
टुरिस्ट व्हिसावर येऊन धार्मिक प्रचार करणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी दिले आदेश
येत्या १० मे पर्यंत देश सोडण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सेव्हन हिल पूल ते भाजीवाली बाई चौक या दरम्यान सुरू असलेल्या कारवाईला स्थानिकांकडून विरोध होत आहे.
महानगरपालिकेच्या पथकाने आज सकाळपासून सेव्हन हिल पूल ते भाजीवाली बाई चौक या परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली.
यावेळी काही मालमत्ता धारक आणि व्यावसायिकांनी कारवाईला विरोध दर्शवला.
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय थालपथीचे शिर्डीच्या साई मंदिरात आगमन
विजयला बघण्यासाठी मंदिर परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी
TVK पक्षाची स्थापना करत तामिळनाडू विधानसभा निवडणूकीत विजयची दमदार एंट्री
नवापूरच्या खांडबारा सरपंचपदी दिपाली गावित यांचा 1 हजार 100 मतांनी दणदणीत विजय
प्रतिष्ठेच्या लढतीत भरत गावित पॅनलची बाजी, आजी-माजी आमदार पॅनलला धक्का
नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर, 80 जागांचा फैसला
चुरशीच्या निवडणुकीत खांडबारा सरपंचपदावर दिपाली गावित विराजमान
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.
हालोली गावाच्या पाडोस पाडा परिसरात भरधाव कारने महामार्ग ओलांडत असलेल्या माय-लेकांना जोरदार धडक दिली.
धडक इतकी जबरदस्त होती की, अपघातानंतर कार महामार्गालगत उलटली.
गुजरात वाहिनी परिसरात घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी
आज दोघांनाही वडगाव कोर्टात केले होते हजर
शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई या दोघांनाही केले होते कोर्टात हजर
शाहिद सनदे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपासासाठी सहा दिवसांची कोठडी
सोलापूर जिल्ह्यातील करमाळयातील भोंदू बाबा मनोहर भोसले याचा पाय खोलात, करमाळा पोलिस ठाण्यात अजून एक अर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल
करमाळा तालुक्यातील घोटी येथील आश्रमात मनोहर भोसले याच्या कडे पुण्यातील एक जण अडचणीतून मार्ग काढण्याची आला होता. त्याला सुरुवातीला 5 हजार रुपयांची पावती घेतली. संबंधित व्यक्तीची अडचण ऐकण्यासाठी 50 हजार रुपये घेतले. त्याची अडचण ऐकून घेतल्यानंतर त्याला धागा बांधणे साठी एक लाख पन्नास हजार रुपयांची मागणी केली. सदर व्यक्तीने एक लाख एकवीस हजार रुपये मनोहर भोसले याच्या कडे दिले.
भोंदू बाबा अशोक खरात याला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी
आठव्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयाला पत्र
आठव्या गुन्ह्यात उद्या अशोक खरात याला पुन्हा व्हिसी द्वारे हजर करण्यात येई
उद्या अशोक खरात यांच्या संदर्भातील आठव्या गुन्ह्याचा युक्तिवाद न्यायालयात होईल
अशोक खरात यांच्यावर आठवा गुन्हा देखील महिलेवर लैंगिक शोषणाचा आहे
उद्या अशोक खरात याला पोलिस कोठडी मिळविण्यासाठी तपास यंत्रणांकडून प्रयत्न केले जातील
थोड्याच वेळात अशोक खरातवरील सुनावणीला होणार सुरुवात
तपासी अधिकारी आणि सरकारी वकील कोर्टात पोहचले
महिला अत्याचाराच्या सातव्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपत असल्याने आज खरातला व्हिसीद्वारे पुन्हा कोर्टात हजर करणार
महिला अत्याचाराच्या आठव्या गुन्ह्यात SIT कडून अशोक खरातची पोलीस कोठडी मागितली जाणार
कोर्टाच्या आजच्या निर्णयाकडे लक्ष
नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाने तब्बल 45 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. या तीव्र उष्णतेचा परिणाम मानवी जनजीवनावर होत असून, डिहायड्रेशनसह उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषत लहान मुलांमध्ये ताप, उलट्या, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत लहान मुलांना बाहेर न पाठवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन डॉ. मालविका कुलकर्णी यांनी केले आहे.
नाशिकच्या महापौरांनी उद्या बोलावली अधिकारी आणि कंत्राटदारांची तातडीची बैठक
कुंभमेळ्याच्या कामाच्या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आली बैठक
कालच महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदें यांनी शहरात सुरू असलेल्या कामांची केली होती सरप्राईज व्हिजिट
अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे ,कामात हलगर्जीपणा होत असल्याचे आले होते निदर्शनास
दर्जेदार कामे झाली नाही तर महापौरांनी दिला होता कारवाईचा इशारा, याच पार्श्वभूमीवर बोलवण्यात आली बैठक
जळगाव शहराचा पारा हा 44 अंश सेल्सिअस वर पोहोचला असून शिरसोली नाका परिसरात आज दुचाकी वाहनाला अचानक या ठिकाणी आग लागली असून परिसरात एकच खडबड उडाली होती,. दुचाकी मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे उन्हाचा पारा प्रचंड असताना अचानक आग लागली . रामेश्वर कॉलनी येथील वाहन मालक योगेश महाजन व नितीन महाजन यांनीअचानक आग लागल्यामुळे प्रसंगवधान राखत आपला जीव वाचवला. या आगीमुळे दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे
महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची निवड करण्यात आलीय. मुंबईत पार पडलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या महासंघात राज्यातील 393 नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत. महत्त्वाचं म्हणजे महासंघाच्या कार्यकारणी समितीत अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांचीही निवड करण्यात आलीय.गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्यामुळे महासंघाची कार्यकारणी निवडण्यात आली नव्हती. मात्र आता त्यातील सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यामुळे अध्यक्षपदासह कार्यकारणी समिती निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्याला अनुसरून एकमतानं रुचिता घोरपडे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय.
लातूरच्या निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एक 75 वर्षे शेतकऱ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, शेतातून जनावरांना पाणी वैरण करून आलेल्या 75 वर्षीय शेतकरी घरी आले, मात्र अचानक भोवळ आली आणि त्यातच त्यांचा जीव गेला. त्र्यंबक बेळंबे असे या शेतकऱ्याचे नाव आहे, जिल्ह्यात सध्या उष्णतेचा पारा प्रचंड वाढलाय, दुपारी बारा ते चार च्या दरम्यान साधारण 41 ते 42 सेल्सिअस इतका तापमानाची नोंद होत आहे, आतापर्यंत जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू उष्माघातने झाल्याची माहिती आहे.
डाळिंबाचे आगार अशी ओळख असलेल्या कसमादे भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेतात,चांदवड तालुक्यातील वागदरडी येथील भारत पगार यांनी आपल्या साडे चार एकरात डाळिंब बाग लावली असून सध्या डाळिंब बहरले आहे,मात्र तीव्र उन्हाचा कडाका, अचानक होणारी गारपीट,पाऊस या पासून बचावासाठी त्यांनी मोठा खर्च करत संपूर्ण बागेवर सफेद कपड्याचे क्रॉप कव्हर केले आहे,या मुळे बदलत्या वातावरणात पिकाचे नुकसान होण्यास मदत होणार आहे.
मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीची मतमोजणी काही वेळातच सुरू होणार आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख आणि सरपंच पदासाठी लढत झाली.यानंतर आता केज तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.या मतमोजणीसाठी 3 टेबल ची व्यवस्था करण्यात आली असून एकाच राऊंडमध्ये हि मतमोजणी पार पाडणार आहे. काल झालेल्या मतदानात एकूण 2080 मतदारांपैकी 1744 मतदारांनी आपला हक्क बजावल्याने 84 टक्के मतदान झाले.आता विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे काही वेळात स्पष्ट होईल.
लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा पुढाकार
महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात
महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकार एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत - सूत्रांची माहिती
मे महिन्यात होणार एक दिवसीय विशेष अधिवेशन
मात्र, तारखेसंदर्भात अद्याप स्पष्टता नाही
अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय आमदार मांडणार भूमिका
अमरावतीच्या परतवाडा मध्ये आज मंत्री नितेश राणे यांची सभा...
नितेश राणेंच्या सभेला अखेर परतवाडा पोलिसांची परवानगी...
सायंकाळी 6 वाजता परतवाडाच्या जयस्थंभ चौकात होणार नितेश राणे यांची भव्य सभा....
काल नितेश राणे यांच्या सभेमुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलिसांनी सभेला नाकारली होती परवानगी
अमरावतीच्या परतवाडा मध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरन ताज असतानाच दुसरीकडे आज नितेश राणेंची सभा..
लोणार तालुक्यातील वढव गावात मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत ६ ते ७ शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाली. या आगीत सोयाबीन, तूरसह घरातील सर्व साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेहेकर येथून अग्निशमन च्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविले.. महसूल विभागाकडून तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..
वाढत्या तापमानामुळे आंबा निघतोय भाजून, उष्णतेमुळे आंबा फळाची गळ,
पुढील दहा दिवसात तयार होणार आंबा गळून पडत असल्याने बागायतदार संकटात
कोकणात सध्या आंब्याचे केवळ १० टक्केच उत्पादन, त्यात उष्णतेमुळे आंबा पीक धोक्यात
गेल्या दोन दिवसापासून तापमानाचा पारा दुपारनंतर ४० अंशांच्या पुढे
काल रात्रीच्या सुमारास देहूरोड मध्ये झालेल्या गोळीबारात रमेश रेड्डीची गोळ्या झाडून हत्या झाली होती
-या प्रकरणात दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत
-एक संशयित मावळ तालुक्यातील गहुंजे मधील साई नगर मधून ताब्यात घेण्यात आला आहे तर दुसरा संशयित देहूरोड मधील थॉमस कॉलनी इथून पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतला आहे
छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीतील तिरुपती इंटरप्रायझेस या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपनीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटची शक्यता व्यक्त केली जात आहे
पावसाळ्याची वर्दी देणारा निसर्गाचा दूत म्हणून ओळखला जाणारा 'चातक' पक्षी यंदा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत विक्रमी वेळेत कृष्णाकाठी दाखल झाला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आफ्रिकेतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारा हा पाहुणा यंदा चक्क एप्रिल महिन्यातच मुक्कामी आला आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथील पक्षीप्रेमी आणि अभ्यासक संदीप नाझरे यांनी कृष्णाकाठच्या अंबाजीबुवा घाट परिसरात या पक्षाची नोंद केली असून, गेल्या सात वर्षांतील हे सर्वांत लवकर झालेले आगमन ठरले आहे.
पुण्यातील खडकवासला धरणसाखळीतून उन्हाळी आवर्तनांतर्गत २९ मार्च ते २७ एप्रिलदरम्यान २.५२ टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. याचा बारामती, दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यांतील पिकांना मोठा फायदा झाला. सध्या धरणसाखळीत १०.६७ टीएमसी (३६.६१%) पाणीसाठा असून, मेअखेरपर्यंत आवर्तन सुरू राहणार आहे.
गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व विभाग राहणार बंद
तरकारी, गुळ-भुसार, फुलबाजार कांदा बटाटा, पान आणि केळी बाजाराचा समावेश
बाजारावारातील पेट्रोल पंप विभाग, वजन काटा विभाग तसेच बाजार समितीचे मावशी खडकी, उत्तम नगर, मांजरी उपबाजार ही राहणार बंद
शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये प्रशासनाचा आवाहन
माथेरानमधील मलनिःसारण प्रकल्पाच्या चेंबरचे झाकण तुटून घोडा जखमी झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने या घोड्यावरून प्रवास करणारे पर्यटक बचावले आहेत. हा घोडा दस्तुरी ते माथेरान असा प्रवास करत असताना त्याचा पाय चेंबरच्या झाकणावर पडला आणि हे झाकण तुटले. घोड्याचा पाय त्या चेंबरमध्ये अडकून पायाला दुखापत झाली. या घटनेमुळे मलनि:सारण प्रकल्पाच्या कामाबाबत शंका व्यक्त होत आहे.
सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, एल निनोच्या व आय.ओ.डी.च्या प्रभावामुळे यावर्षीचा उन्हाळा लांबणार असल्याने व पर्जन्यमानामध्ये घट होणार असलेने धरणातील उपलब्ध पाणी साठयाचा पावसाळा सुरु होईपर्यंत काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. परिणामी, काळम्मावाडी व शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेसाठी होणारा दैनंदिन पाणी उपसा मर्यादित ठेवणे आवश्यक झाले आहे. उपलब्ध पाणी साठा पावसाळा सुरु होईपर्यंत पुरवण्यासाठी महानगरपालिकेने शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, 30 एप्रिल 2026 पासून शहरातील विविध भागांमध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसासाठी मदतीचा निर्णय
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांकडून निधी वितरणासाठी शासन निर्णय जारी
सातारा जिल्ह्यासाठी ६० लाख ४९ हजार रुपये मंजूर
शेतकरी मदतीचा निधी बँक खात्यातून थेट कर्जासाठी वळता करू नका
शासन आदेशातून बँकांना महसूलमंत्री बावनकुळेंची तंबी
बीड जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींमधील 31 रिक्त जागांसाठी काल मतदान पार पडली आहे. यामध्ये 12 सरपंच आणि 19 सदस्य पदांचा समावेश आहे बीड जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींचा निकाल आज हाती येणार यामध्ये विशेष म्हणजे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मास्साजोग मध्ये देखील पोटनिवडणूक झाली असून या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
बीडच्या परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानक परिसरातून उत्तर प्रदेश राज्यातील एक १२ ते १३ वर्ष वयोगटाची मुलगी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रेल्वे पोलीस प्रशासनाकडून तिचा शोध घेतला जात आहे.
बुलढाणा येथे छत्रपती शिवरायांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार नोंदविण्यात आली आहे. आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी फिर्यादी म्हणून लेखी तक्रार दाखल केली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज धुळे शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा गोदा ते नर्मदा या यात्रेनिमित्त धुळ्यात आले असता धुळेकरांनी या यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे,
राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोदा ते नर्मदा जलयात्रा सुरू म्हणत मंत्री विखे पाटील यांनी या यात्रेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्याचा प्रयत्न असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे,
नाशिक अमरावतीनंतर आता अकोला 'लव्ह जिहाद'च्या घटनेने हादरलाय.. प्रेमाच्या नावाखाली विवाहित मुस्लिम तरुणाकडून हिंदू मुलीचं अपहरण करीत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. अखेर खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका करण्यात आलीय. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.