Maharashtra Live News Update: Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, पुणे-सोलापूरमध्ये पाऊस, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

आमदार किरण सामंत यांची सहसंपर्कपदी नियुक्ती

शिवसेना शिंदे गटाच्या दक्षिण कोकणच्या विभागीय संपर्कप्रमुख पदावर राजापूरचे आमदार किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी संपर्कप्रमुख नेमतानाच विभागीय संपर्कप्रमुखही नेमले आहेत.

आमदार किरण सामंत यांच्याकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनेक वर्षे संघटनात्मक पातळीवर काम केल्यानंतर किरण सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तरीही संघटनात्मक बाबींवर त्यांची पकड कायम आहे.

लोणार सरोवरासाठी 9.88 कोटींचा निधी मंजूर

लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी शासनाकडून 9 कोटी 88 लाख 10 हजार रुपयांचा नवीन निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र यापूर्वीच सुमारे 123 कोटी रुपये खर्च होऊनही प्रत्यक्षात विकास व संवर्धनाची ठोस कामे दिसून येत नसल्याने लोणारवासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढतच आहे.. यावर आता मंजूर झालेल्या निधी योग्य पद्धतीने खर्च करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे... तसेच मागील काळातील केलेला निधी खर्चाचा हिशोब पारदर्शकपणे मांडावा आणि प्रत्यक्ष कामे व्हावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे....

शेत रस्त्याच्या प्रकरणावर लातूर महसूल प्रशासनाचे विशेष लक्ष 

लातूर जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेत रस्त्याचा प्रश्न अखेर महसूल प्रशासनाने सोडवला आहे. दीर्घकाळ रखडलेल्या या प्रकरणामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान, लातूरच्या कासारखेडा महसूल मंडळात महसूल विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत, कायदेशीर प्रक्रियेनुसार शेत रस्त्याच्या वादाचा निपटारा केला आहे.

भोंदू अशोक खरातचा आयकर विभागाला देखील गंडा?

भोंदू अशोक खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवून भरत होता आयकर

तर अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात, तर १२ लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरत असल्याचं समोर

आयकर विभागाला अशोक खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा देखील संशय

आयकर विभागाकडून अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

पुणे वाहतूक पोलिसांकडून नियमभंगावर कारवाई

तीन दिवसांत 51.54 लाख रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल

तर 852 वाहनांवर पुणे पोलिसांकडून जप्तीची कारवाई

शहर वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या कालावधीत वाहतूक नियमभंगाविरोधात राबवली विशेष मोहीम

तीन दिवसांच्या कारवाईत ट्रिपल सीट प्रवास, मद्यपान करून वाहन चालवणे आणि मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर करण्यात आली कारवाई

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्याचा संताप

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकरी बाळासाहेब रोचकरी यांनी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे थेट शेतात उभ्या कांद्यावर ट्रॅक्टर चालवून तीव्र संताप व्यक्त केला आहे.सुमारे दीड एकर क्षेत्रात चार महिन्यांपूर्वी कांद्याची लागवड करण्यात आली होती.या पिकासाठी अंदाजे 70 ते 75 हजार रुपये खर्च झाला होता.योग्य बाजारभाव मिळाला असता तर अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र सध्या बाजारात कांद्याचे दर अत्यंत घसरल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या आर्थिक संकटामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने अखेर कांद्याचे पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला.

धाराशिव जिल्ह्यात 3 एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळीची पावसाची शक्यता

धाराशिव जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी व गारपीटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर एप्रिल महीन्यात ही वादळी वारे व अवकाळीचे सावट घोंगावणार आहे.1 ते 4 एप्रिल दरम्यान मेघगर्जनेसह वादळी वारे व अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.या अवकाळी पावसामुळे आंबा,खरबुज,टरबुज ज्वारी सह भाजीपाल्यांना फटका बसणार आहे.धाराशिव जिल्ह्यात मार्च महिन्यात वीज पडून तब्बल 12 जनावरे दगावली आहेत त्यामुळे अवकाळीच्या तडाख्यात वीज पडण्याची अधिक शक्यता असते नागरीकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केल आहे.

Nagpur : उकाड्याने त्रस्त नागपूरकरांना ढगाळ वातावरणापासून दिलासा

- गेल्या तीन दिवसांपासून 40° च्या वर गेलेला उन्हाचा पारा सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे घसरला

- नागपुरात ढगाळ वातावरणामुळे पाऱ्याची चार अंशांची घसरण

- काल नागपूरचा पारा 36.6° वर

- विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातही दोन ते सहा अंशाने तापमान कमी झाल्याने विदर्भ 40° च्या खाली

- हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे

- त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार

Pune: वृंदावन सोसायटीतील गादी कारखान्याला काल सायंकाळच्या सुमारास आग

कोंढवा खुर्द परिसरातील वृंदावन सोसायटी आईमाता मंदिराजवळ असलेल्या गादी तयार करण्याच्या कारखान्याला काल मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली.

गंगाधाम व कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रांतील अग्निशमन जवानांनी तत्काळ कारवाई करत १ लाईन होज व १ लाईन होज रीलच्या सहाय्याने पाण्याचा मारा सुरू केला. तसेच कारखान्याचे पत्रे तोडून आत प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

जुन्नरमध्ये गारपिटीचा कहर; शिवनेरी हापूसचा मोठा फटका, आंबा उत्पादक हतबल

शिवनेरी हापूसला या गारपिटीचा जबर फटका बसला असून आंब्याच्या बागांमध्ये अक्षरशः फळांचा खच गळून पडलेला पाहायला मिळतोय. काही मिनिटांच्या गारपिटीने शेतकऱ्यांचे महिन्यांचे कष्ट उद्ध्वस्त झाले असून आंबा उत्पादक शेतकरी हतबल झालाय.या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असून प्रशासनानेही या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पिंपरी दुमाला परिसरात बिबट्याची दहशत; वाढत्या वावरामुळे नागरिक भयभीत

गेल्या आठवडाभरात तिसऱ्यांदा बिबट्या लोकवस्तीच्या शेजारी दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरलीय. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीच्या जवळ येत असल्याने पाळीव जनावरांवर हल्ल्याचा धोका निर्माण झालाय, तर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आलाय.या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, गस्त वाढवावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे

व्यवसायीक गॅस सिलेंडर तुटवड्याचा पर्यटन स्थळांना फटका

शासनाने हॉटेल व्यवसायासाठी वापरल्य जाणाऱ्या व्यवसायीक गॅस सिलेंडर वितरणावर निर्बंध घातल्याने याचा फटका पर्यटन स्थळांवरील हॉटेल व्यवसायीकांना बसताना दिसत आहे. रायगडला विस्तिर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. येथे वर्षाचे बारा महिने पर्यटन चालते. मात्र आत्ता पर्यटक बुकिंगचे वेळी गॅस सिलेंडर आणि जेवणाच्या सुविधेची आवर्जुन चौकशी करत असल्याचे येथील व्यवसायीकांचे म्हणने आहे. याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे तर चुलीवरच जेवण मिळणार याचा विषेश आनंद देखील काही पर्यटकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फटाका उद्योग अडचणीत

मराठवाड्याची शिवकाशी म्हणून ओळखला जाणारा धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फटाका उद्योग मोठ्या अडचणीत आला आहे.आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम या फटका उद्योगावर झाल्याचं पाहायला मिळत असून फटाका निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर हे दुपटीने वाढले आहेत.फटका बनवण्यासाठी सुतळी, प्लास्टिक सल्फर यासारखे पदार्थ लागतात हे कधी परराज्यातून तर कधी विदेशातून आणावे लागतात याचे दर वाढले आहे,परिणामी मालाचे दर वाढले आहेत त्यातच काही ठोक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्यांनी इसार घेतला आहे

शिंदेसेनेच्या संपर्क प्रमुखपदी मंत्री संजय राठोड

शिंदेसेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि बदलते राजकीय समीकरण लक्षात घेऊन राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी विविध स्तरांवर नियुक्त जाहीर करण्यात आल्या आहेत या निर्णयाअंतर्गत पश्चिम विदर्भ विभागीय संपर्क प्रमुख पदी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली असून विभागीय सहसंपर्क प्रमुख पदी पराग पिंगळे यांची निवड करण्यात आली आहे.

यवतमाळ शहरातील विविध चौकातील रस्त्यावर खड्डे

यवतमाळ शहरातील मुख्य चौकातील विविध रस्त्यावर पाइपलाइन टाकण्यासाठी पालिकेने रस्त्यांचे खोदकाम केले मात्र पालिकाने रस्त्यावर डांबरीकरण करण्या ऐवजी चक्क माती टाकल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये,त्यामुळे रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जातेय.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका कथित आर्थिक व्यवहारावरून आणि फ्लॅट भेट दिल्याप्रकरणी केलेल्या आरोपांचा थेट प्रत्युत्तर माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केले आहे. ​

त्यांना फ्लॅट गिफ्ट केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी अंधारे यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

​पदाधिकाऱ्याची भूमिका:

"सुषमा अंधारे या एक सुजाण सामाजिक कार्यकर्त्या आणि एका मोठ्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. मात्र, त्यांनी पूर्ण माहिती न घेता माझ्यावर केलेले आरोप हे वैयक्तिक आकसातून केलेले दिसतात," असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "अशोक खरात यांच्याशी माझी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाली होती, हे मी नाकारत नाही. सार्वजनिक जीवनात काम करताना अनेक लोकांशी आमचे फोटो निघतात, पण त्याचा अर्थ असा नाही की आमचे त्यांच्याशी आर्थिक व्यवहार आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

Summer Skin Care Tips: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' ५ गोष्टी; त्वचा काळी पडणार नाही

SCROLL FOR NEXT