NASHIK LADKI BAHIN SCHEME UPDATE: 1.5 LAKH WOMEN DECLARED INELIGIBLE AFTER VERIFICATION DRIVE Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या खात्यात मेचा हप्ता जमा, 'या' दीड लाख महिला अपात्र; काय आहेत कारणं? जाणून घ्या

Maharashtra Ladki Bahin Yojana Installment Update : नाशिक जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करण्यात आली असून सुमारे दीड लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.

Alisha Khedekar

  • लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा

  • नाशिकमधील दीड लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र

  • पात्रता निकषांच्या तपासणीनंतर ही कारवाई

  • अपात्र लाभार्थ्यांचा योजनेचा आर्थिक लाभ तात्काळ थांबवला

Maharashtra Ladki Bahin Yojana Installment राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात १६ जून पासून मे महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान नागपूरनंतर नाशिक जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या पात्रतेची तपासणी करताना मोठी माहिती समोर आली आहे. प्रशासनाने ई-केवायसी, कागदपत्र पडताळणी आणि पात्रतेच्या विविध निकषांची सखोल छाननी केल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे दीड लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे या महिलांना मिळणारा योजनेचा आर्थिक लाभ थांबवण्यात आला आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ केवळ शासनाने निश्चित केलेल्या सर्व अटी व निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच दिला जातो. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात पडताळणी मोहीम राबवण्यात आली. या प्रक्रियेत अनेक अर्जांमध्ये त्रुटी, अपूर्ण माहिती आणि नियमांचे उल्लंघन आढळून आले. तपासणीत अपात्र ठरलेल्या महिलांपैकी मोठ्या संख्येने महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. योजनेच्या नियमानुसार वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

याशिवाय अनेक अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रांची कमतरता असल्याचेही समोर आले. महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि जन्मदाखला यांसारखी कागदपत्रे अपूर्ण किंवा गहाळ असल्याने अनेक अर्ज बाद करण्यात आले. काही प्रकरणांमध्ये अर्जदारांच्या नावांमध्ये, जन्मतारखांमध्ये तसेच बँक खात्याच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळेपणा आढळल्यानेही अर्ज अपात्र ठरले.

अहवालानुसार, योजना सुरू झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात सुमारे १४ ते १५ लाख महिलांनी अर्ज केले होते. मात्र, पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सरकारी निधीचा योग्य वापर व्हावा आणि योजनेचा लाभ खऱ्या पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान आता जूनचा हप्ता (Ladki Bahin June Installment Update) कधी येणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT