Maharashtra Kesari wrestling tournament has landed in court amid a dispute between wrestling federations saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी' ची कोर्टात कुस्ती; स्पर्धेचं काय होणार 16 मार्चला लागणार निकाल, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Maharashtra Kesari Wrestling Dispute: महाराष्ट्र केसरी ही राज्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक कुस्ती स्पर्धा मानली जाते. इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाच्या विरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्रातील प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेवरून वाद निर्माण.

  • इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाने पुणे न्यायालयात याचिका दाखल केली.

  • स्पर्धेच्या नाव आणि ब्रँडच्या वापरावरून वाद.

महाराष्ट्र केसरी ही राज्यातील प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धा आहे. मात्र गेल्या काही वर्षांत कुस्ती महासंघांमधील वाद, विविध संघटना आणि स्पर्धांच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. आता हा वाद थेट कोर्टात गेला असून 16 मार्चला याची सुनावणी आहे. इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाने महाराष्ट्र कुस्ती महासंघाच्या विरोधात पुणे न्यायालयात दावा दाखल केला आहे. यामुळे १८ मार्चपासून पुण्यातील वाघोली येथे सुरू होणाऱ्या कुस्ती स्पर्धेविषयी प्रश्न निर्माण झालेत.

काय आहे प्रकरण?

इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेविरोधात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाला 'महाराष्ट्र केसरी' ही ऐतिहासिक आणि पारंपरिक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी किंवा प्रतिनिधित्व करण्यास कोणताही कायदेशीर अधिकार प्राप्त नाहीये.

त्यामुळे या स्पर्धेच्या नावाचा आणि ब्रँडचा गैरवापर होत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. नोंदणीकृत ट्रेडमार्क आणि कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यासाठी इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाने कुस्ती संघ यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान शनिवारी ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण व मानाच्या गदेचे पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते झाले. यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थितीत होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. मात्र या स्पर्धेवर स्थगितीचे सावट आहे.

इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाने महाराष्ट्र कुस्ती महासंघाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. १९५८ पासून ISWAI 'हिंद केसरी', 'भारत केसरी' आणि 'रुस्तम-ए-हिंद' यांसारख्या प्रतिष्ठित अजिंक्यपद स्पर्धांची आयोजक आणि या पदव्यांची 'ट्रेडमार्क धारक' संस्था आहे. या पदव्यांनी पैलवानांच्या अनेक पिढ्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिला आहे. या पदव्यांची अस्मिता आणि प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याचं संघटनेने म्हटलंय. पुणे सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT