shivraj rakshe saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीत राडा! कॉलर ओढली, छाताड्यात लाथ घातली; शिवराज राक्षेचा पंचांवर राग अनावर- VIDEO

Maharashtra Kesari, Shivraj Rakshe Crisis : महाराष्ट्र केसरी सुरु असताना शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आहे.ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

महाराष्ट्राच्या इतिहासात मानाची समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धचा थरार अहिल्यानगरमध्ये सुरु आहे. या स्पर्धेतील गादी विभागातील सामना सुरु असताना, स्पर्धेला गालबोट लागलं आहे. सामना सुरु असतानाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र केसरीचा विजेता शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गादी विभागातील सेमीफायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे हे दोन्ही मल्ल आमनेसामने आले होते. या अटीतटीच्या लढतीला सुरुवात होताच अवघ्या १ मिनिटाच्या आत शिवराज राक्षे चितपट झाला.

चितपट होताच शिवराज राक्षेने पंचांना चॅलेंज केलं. त्याच्या मते त्याची पाठ आणि खांदा गादीला टेकला नव्हता. पंचांनी चुकीचा निर्णय दिला असल्याचं शिवराज राक्षेने सांगितलं. शिवराजने पंचांकडे रिव्ह्यू घेण्याची मागणी केली. पण पंचांनी रिव्ह्यू घेण्याची मागणी फेटाळून लावली, रागात त्याने पंचांची कॉलर ओढली आणि पंचांना लाथही मारली.

नांदेडचा असलेला शिवराज राक्षे मुळचा पुणे जिल्ह्यातील..

शिवराज राक्षेचे वडील आणि आजोबा दोघेही होते पैलवान2023 ला शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरी पद पटकावला, सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट करत पद पटकवलेला.

यंदा अहिल्यानगर येथे होत असलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने उपांत्यफेरीत 10-0 गुणांची कमाई करत फायनल पर्यंत पोहचला आहे...

पृथ्वीराज मोहळ -

अहिल्यानगर येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याने मुबंईच्या सतपाल शिंदे वर 11-0 ने मात करत फायनलचे तिकिटं मिळवले...

मोहोळ हा पुणे येथील मुळशी तालुक्यातला रहिवाशी आहे. 2023 मध्ये पैलवान सिकंदर शेख सोबत माती विभागात अंतिम सामना मोहोळ याने खेळला होता... तसेच महाराष्ट्र केसरी वगळता अनेक सामने त्याने खेळले आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Earthquake : हाहाकार! भूकंपाच्या धक्क्याने 'हा' देश हादरला; १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT