Maharashtra Kesari 2023 Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Kesari 2023: हमालाचा पोरगा ते २०२३ चा महाराष्ट्र केसरी, असा घडला लाल मातीतला सिकंदर!

Sikandar Shaikh: १० नोहेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवत सिकंदरने केसरीचा किताब पटकावला.

साम टिव्ही ब्युरो

विश्वभूषण लिमये

Sikandar Shaikh:

घरात अठराविश्व दारिद्र्य असणाऱ्या शेख परिवारातील एका हमालाचा मुलगा २०२२ मध्ये चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र केसरीचा मानापासून दूर गेला. मात्र काल झालेल्या कुस्ती आखाड्यात सिकंदरने अखंड कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील ताईत होऊन ६६ वा महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला अन् पित्यासह तालुक्याची शिरपेचात मानाचा तुरा रोवला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जानेवारी २०२२ मध्ये नियोजन करून मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्रातील पहिलवानाला प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. परंतु, फडातील पंचगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले.

आयुष्यभर पाठीवर ओझे वाहून रक्ताचे पाणी करून बापाने तयार केलेल्या सिकंदर शेखला महाराष्ट्र केसरीला मुकावे लागले होते. परंतु, उराशी मी 'महाराष्ट्र केसरी होणारच' ही जिद्द बाळगून तयारी सुरू ठेवली. अखेर १० नोहेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवत सिकंदरने केसरीचा किताब पटकावला.

१४ जानेवारी २०२२ मध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या होत्या. माती विभागातील फायनल कुस्तीमध्ये मोहोळचा सिकंदर शेख विरुद्ध महिंद्र गायकवाड अनेक कुस्तीमध्ये पंच कमिटीकडून भेदभाव झाल्याचा पंचांच्या आरोप झाला.

मैदानातील निर्णयामुळे सिकंदरला महाराष्ट्र केसरीपासून रोखले गेले. या निकालाबाबत सोशल मीडियावर चर्चा होती सिकंदरच्या महाराष्ट्र केसरीची बातमी मोहोळ शहरात धडकताच त्याला लहानपणापासून कुस्तीसाठी मदतीचा हात देणारे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांच्यासह अनेक कुस्ती शौकिनांनी फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT