Maharashtra Politics: 'काही लोक सकाळी ९ वाजता नशा करून कुस्ती खेळतात'; देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे?

Devendra Fadnavis News: 'काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळतात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर टीका केली.
Devendra Fadnavis news
Devendra Fadnavis news saam tv
Published On

सुशील थोरात

Devendra Fadnavis News: अहमदनगर येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेच्या समारोपला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आले होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 'काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळतात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर टीका केली. (Latest Marathi News)

छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे कार्यक्रमप्रसंगी भाषणात बोलताना फडणवीसांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता खरपूस टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये काही कुस्त्या चालल्या आहेत. आपल्याला माहिती आहे जसं कुस्तीमध्ये डोपिंग झालं, तसं काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले. त्यांना बाद केलं'.

Devendra Fadnavis news
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: 'मला उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे, पण...'; दीपक केसरकरांकडून टीकेला चोख प्रत्युत्तर

'आमच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये सकाळी नऊ वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीच्या बाहेरच राहावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात, तेच कुस्त्या जिंकतात. तुमच्या आशीर्वादाने आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे. 2024 ला पुन्हा जिंकू, तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या, असे देवेद्र फडणवीस पुढे म्हणाले.

Devendra Fadnavis news
Uddhav Thackeray : महंगाई कम हुई की नही हुई?; PM मोदींची मिमिक्री करत उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा

पैलवान महेंद्र गायकवाड ठरला कुस्ती स्पर्धेचा मानकरी

दरम्यान, अहमदनगर येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतं. या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी पैलवान महेंद्र गायकवाड हा ठरला.

अंतिम कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये लढत होत असताना शिवराज राक्षे यांच्या पायाला इजा झाल्याने महेंद्र गायकवाड याला विजयी घोषित करण्यात आले. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्धा किलो सोन्याची गदा देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com