Maharashtra School Timetable News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शाळा आणि कॉलेजच्या वेळापत्रकात मोठा बदल; नेमकं कारण काय?

Maharashtra School Timetable News : जळगाव जिल्ह्यात वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ९ मार्चपासून सर्व शाळा आणि कॉलेज सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • जळगाव जिल्ह्यात वाढत्या उकाड्यामुळे शाळांच्या वेळा बदलल्या

  • ९ मार्चपासून सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सकाळी भरवण्यात येणार

  • विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

  • हवामान खात्याने १५ मार्चपर्यंत सौम्य उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला

संजय महाजन, जळगाव

Maharashtra Jalgaon School College Timing Change राज्यातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाची झळ सोसावी लागत आहे. अशातच सुरक्षिततेच्या कारणास्तव जळगावमधील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

जळगावमध्ये उन्हाची काहिली भलतीच तापदायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश दिले आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीचा विचार करून आणि विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून हा मधला मार्ग काढण्यात आला आहे. दरम्यान, येत्या १५ मार्चपर्यंत सौम्य उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामानखात्याने दिला आहे.

राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली असून विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान अधिक दिसत आहे. अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. या वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT