Maharashtra lift rules 2026 meta ai
महाराष्ट्र

Maharashtra Lift Rules : महाराष्ट्रात लिफ्ट वापरण्याचे नियम कडक! 12 वर्षांखालील मुलांना एकट्याने लिफ्ट वापरण्यास बंदी; सोसायटीची जबाबदारी वाढली

Children Lift Safety : महाराष्ट्रात लिफ्ट वापरण्याचे नवे नियम लागू झालेले आहेत. १२ वर्षांखालील मुलांना एकट्याने लिफ्ट वापरण्यास बंदी, तर सीसीटीव्ही नियमित तपासणीची जबाबदारी सोसायटीवर असेल.

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्रातल्या इमारतींमध्ये लिफ्ट वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने लिफ्टच्या वापराचे नवे नियम लागू केले आहेत. यामध्ये १२ वर्षांखालच्या मुलांना एकट्याने लिफ्ट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच लिफ्टची नियमित तपासणी, सीसीटीव्ही आणि देखभालीची जबाबदारी सोसायटी व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे. हे नियम १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाल्याचं दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

१२ वर्षांखालील मुलांना एकट्याने लिफ्ट वापरता येणार नाही

नव्या नियमांनुसार, १२ वर्षांखालील मुलांना आई-वडील किंवा जबाबदार प्रौढ व्यक्तीशिवाय लिफ्ट किंवा एस्केलेटर वापरता येणार नाही. लिफ्टमधील अपघात टाळणे आणि लहान मुलांची सुरक्षा ठेवणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हे नियम लागू असतील.

लिफ्टची नियमित तपासणी करणं बंधनकारक

नव्या नियमांनुसार प्रत्येक लिफ्टची सुरक्षितता तपासणं आवश्यक असेल. त्यासाठी खालील बाबींची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

  • प्रत्येक लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे अनिवार्य.

  • दर महिन्याला लिफ्टची सुरक्षा तपासणी करणे आवश्यक.

  • वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करावे लागणार.

  • तपासणी आणि सर्व्हिसिंगचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक.

  • सुरक्षा ऑडिटचा अहवाल विद्युत निरीक्षकांकडे जमा करावा लागणार.

  • लिफ्टच्या देखभालीसाठी मान्यताप्राप्त कंत्राटदाराची नियुक्ती करावी लागणार.

नव्या नियमांनुसार, १८ वर्षांखालच्या व्यक्तीला लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करता येणार नाही. तसेच नवीन लिफ्ट बसवण्यापूर्वी विद्युत निरीक्षकांची परवानगी घेणे आवश्यक असेल. लिफ्टमध्ये अपघात झाल्यावर २४ तासांच्या आत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणं बंधनकारक असेल.

सोसायटी व्यवस्थापनाची जबाबदारी वाढली

लिफ्टची सुरक्षितता आणि देखभाल करण्याची जबाबदारी आता सोसायटी व्यवस्थापनावर असेल. लिफ्ट किंवा एस्केलेटर असुरक्षित आढळल्यास आवश्यक दुरुस्ती आणि बदल करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद

Health Tips : लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची खाणे अधिक फायदेशीर? जाणून घ्या, हिरव्या मिरचीचे आरोग्यदायी फायदे

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पाठलाग करून विनयभंग; निलंबित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Family Pension Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दरमहा ₹9,000 मिळणार? सरकारने स्पष्ट केले पेन्शनचे नियम

Police Commissioner: पोलीस आयुक्त्याचं व्हॉट्सॲप हॅक; स्टेटसवर 50 मिनिटे चालले अश्लील व्हिडिओ!

SCROLL FOR NEXT